Skip to main content

काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

 काझीरंगा, मोठ्या पाचांचे घर!! कोण आहेत हे मोठे पाच? गेंडा, हत्ती, वाघ, हरीण आणि पाणम्हैस! काय आहे हे काझीरंगा? कुठे आहे हे काझीरंगा?

भारताच्या आसाम राज्यात काझीरंगा राष्ट्रीय उद्यान आहे. ४०० चौ. कि. मी. पेक्षा जास्त क्षेत्रफळ असलेले हे उद्यान आसामच्या नागाव, गोलाघाट आणि कार्बी अँग्लोन्ग या तीन जिल्ह्यात पसरलेले आहे. 


भारतीय एकशिंगी गेंड्यांसाठी काझीरंगा राष्ट्रीय उद्यान प्रसिद्ध आहे. असे म्हणतात की जगातील दोन तृतीयांश एकशिंगी गेंडे ह्या राष्ट्रीय उद्यानात आहेत. युनेस्कोने हे उद्यान जागतिक वारसा स्थळ म्हणून जाहीर केलेले आहे. 

ह्या उद्यानातील वाघांच्या वाढत्या संख्येमुळे ह्याला वाघांचे अभयारण्य म्हणूनही घोषित करण्यात आले आहे. 

ब्रह्मपुत्रेसह काही नद्या ह्या राष्ट्रीय उद्यानातून वाहतात. तसेच अजूनही अनेक तळी, तलाव ह्या राष्ट्रीय उद्यानात आढळतात. ह्यामुळे इथे घनदाट जंगल, उंचच उंच हत्ती गवत आणि दलदलीची जमीन आढळते. जवळपास वर्षभर हा परिसर हिरवा असतो. 



Kaziranga National Park


काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, मानस आणि पोबितोरा ह्या इतर दोन अभयारण्यांना नदीतल्या छोट्या छोट्या बेटांनी जोडलेले आहे. त्यामुळे वन्य जीव त्या मार्गाने एका उद्यानातून दुसऱ्या उद्यानात जाऊ शकतात. ह्यामुळे त्यातील प्रत्येकच अभयारण्यात आणि राष्ट्रीय उद्यानात जैव विविधता आढळून येते. 

आसाम बील साठी प्रसिद्ध आहे आणि काझीरंगा ह्याला अपवाद नाही. ह्या राष्ट्रीय उद्यानात अनेक बील आहे. ज्यांना बील म्हणजे काय ते माहिती नाही त्यांच्यासाठी - बील म्हणजे तळ्यासारखी पाणथळ जागा. नदीला पूर आला आणि नंतर पुराचे पाणी ओसरले तरी काही खोल जागी पाणी साठलेलेच राहते आणि बील तयार होते. आसाम आणि पश्चिम बंगाल मध्ये गंगा आणि ब्रम्हपुत्रा नद्यांच्या खोऱ्यात अशी अनेक बील आहेत. एकशिंगी गेंड्याना पाणी आवडते. त्यामुळे साधारणपणे ते ह्या बीलच्या आसपास दिसतात. 
 











ही अशी पाणक्षेत्रे आणि उंच उंच हत्ती गवत काझीरंगाचे वैशिष्ट्य आहे. हत्ती गवत शाकाहारी एकशिंगी गेंड्यांसाठी अन्न म्हणून तर उपयोगात येतेच शिवाय इतर अनेक प्राण्यांनाही राहायला, लपायला आडोसा मिळतो. 












 काझीरंगामधील बील आणि तळ्यांच्या पाण्यात अनेक प्रकारच्या पाणवनस्पती, हायसिंथस दिसतात. संपूर्ण आसाम आणि आजूबाजूच्या राज्यात शिंगाडा पाण्यात वाढताना दिसतो. गेंड्याना ह्या वनस्पती खायला आवडतात. 



 





दरवर्षी पावसाळ्यात काझीरंगात पुराचे पाणी शिरते आणि वन्य जीवन धोक्यात येते. त्यातल्या त्यात एक चांगली गोष्ट घडते ती म्हणजे पुराच्या पाण्याबरोबर सुपीक गाळाची माती वाहून येते ती काझीरंगात साठून राहते आणि त्यामुळे ह्या संपूर्ण प्रदेशात वनस्पतींची वाढ उत्तम होते.

पुराच्या संकटकाळात गेंडे आणि इतर वन्य जीव कार्बी अँग्लोन्ग भागातल्या जरा उंचावर असलेल्या प्रदेशात जातात. जे जाऊ शकत नाहीत त्यांना मात्र जमिनीच्या उंचवटा असलेल्या छोट्याश्या भागात अडकून पडावे लागते. २०१७ मध्ये आलेल्या पुराने काझीरंगाचे अतोनात नुकसान केले. प्राण्यांना आसरा घेता येईल असे अनेक कृत्रिम उंचवटे भारतीय सैन्यदलाने तिथे तयार केलेले आहेत. 

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानाने आपला शतक पूर्ती महोत्सव २००५ मध्ये साजरा केला. असे म्हणतात कि १९०४ मध्ये तत्कालीन भारतीय व्हॉइसराय ची पत्नी मेरी कर्झन जेव्हा काझीरंगात गेंडे बघण्यासाठी गेली तेव्हा तिला एकही गेंडा दिसला नाही. ह्या जंगलाची अशी धोकादायक परिस्थिती, गेंड्यांची कमी होत जाणारी संख्या ह्या प्रश्नाचे गांभीर्य लक्षात घेऊन १९०५ मध्ये काझीरंगा प्रस्तावित अभयारण्य म्हणून घोषित करण्यात आले. पुढे वेळोवेळी त्या अभयारण्याचे क्षेत्रफळ वाढवले गेले आणि परिणाम म्हणून आज आपण असे भव्य राष्ट्रीय उद्यान पाहत आहोत. ह्या ठिकाणाचे काझीरंगा राष्ट्रीय उद्यान असे नामकरण १९५० मध्ये केले गेले. 

त्याचे नाव काझीरंगा कसे पडले त्याच्या अनेक लोककथा, कहाण्या सांगितल्या जातात. पण इतिहासकारांचे म्हणणे आहे की काझीरंगा हा शब्द आला काज़ीर - ओ - रोंग अशा कार्बी भाषेतील शब्दावरून. त्याचा अर्थ आहे काज़ीर नावाच्या मुलीचे घर. काज़ीर ही कोणे एके काळी त्या भागाची शासक होती. 

जंगलाच्या अंतर्भागात जाण्यासाठी जीपच्या आणि हत्तीच्या सफारी उपलब्ध असतात. अर्थातच पर्यटकांना मर्यादित भागातच प्रवेश आहे आणि ठराविक मार्गानेच जावे लागते. फक्त वन खात्याचे अधिकारीच काझीरंगा राष्ट्रीय उद्यानातील संपूर्ण अंतर्भागात हिंडू शकतात. 

आम्ही जीप सफारी घेतली होती. जीप सफारीसाठी दोन वेळा असतात, एक अगदी लवकर सकाळी आणि दुसरी दुपारी साधारण अडीचच्या सुमारास असते. दोन्ही वेळी आपल्याला साधारण २-३ तास हिंडवून आणतात. 

सफारीसाठी चार मार्ग आहेत. तुमच्याबरोबर असलेला गाईड/ ड्रायव्हर तुम्हाला कोणत्या वेळी कोणता मार्ग घ्यावा त्याचे मार्गदर्शन करेल. कोणत्या ठिकाणी सध्या कोणते प्राणी दिसत आहेत ते त्यांना साधारणपणे माहिती असते. 

उद्यानाच्या प्रवेशद्वाराशी अनुमतीपत्र मिळते. ते घेऊन मगच आत जाता येते. तुम्हाला तुमची वाहने घेऊन आत जात येत नाही. वन खात्याकडे नोंदणी केलेली वाहने असतील ती भाड्याने घेऊन, तिथलाच नोंदणीकृत ड्रायव्हर घेऊनच जाता येते. 


Information - 3rd Nov.2019
📷Girish Tilak 


आम्ही बागोरी मार्ग घेतला होता. काझीरंगाच्या पश्चिम क्षेत्रात फिरवून आणणारा हा मार्ग डोंगा कॅम्प मध्ये नेऊन आणतो. आत्तापर्यंत तुम्ही पाहिलेत ते सगळे फोटो ३ नोव्हेंबर २०१९ सकाळच्या बागोरी मार्ग जीप सफारीचेच आहेत. आम्हाला ह्या मार्गावर खूप एकशिंगी गेंडे दिसले. 

ह्या क्षेत्रात खूप पक्षी दिसतात. गरुड, सारसपक्षी, पेलिकन्स, बदके, हंस हे त्यातील काही पक्षी. तुमच्याकडे जर का चांगला कॅमेरा असेल आणि तुमचा हात स्थिर असेल तरच तुम्हाला चालत्या जीपमधून, उडत्या पक्ष्यांचे फोटो काढता येतात. 



In front of the Donga Camp.
📷Girish Tilak 


एकशिंगी गेंड्यांच्या बाबत एक मनोरंजक गोष्ट म्हणजे ते शी करायला त्याच ठरलेल्या ठिकाणी परत येतात. त्यामुळे सफारीच्या रस्त्यात बाजूला, अनेक ठिकाणी शी चे ढिगारे दिसतात. ते नैसर्गिक रित्या विघटित होऊन जाईपर्यंत तसेच ठेवले जातात आणि मग ते मातीत मिसळून मातीचा कस वाढवतात! 

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात अनेक वाघ असले तरी दाट जंगलामुळे आणि उंच हत्ती गवतामुळे ते दिसत नाहीत. त्यांचे अस्तित्व जाणवते ते त्यांच्या पायांच्या खुणांमुळे आणि त्यांनी खाल्लेल्या प्राण्यांच्या अवशेषांमुळे!

काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप हत्ती आणि जंगली पाणम्हशीदेखील आहेत. दुपारच्या सफारीमध्ये आम्हाला त्या मोठ्या पाचांपैकी उरलेला पाचवा दिसला. ते म्हणजे हरीण. हरणांपैकी बारशिंगी, सांबर, भेकर हे काझीरंगा राष्ट्रीय उद्यानात खूप मोठ्या प्रमाणात आहेत. सूर्यास्ताच्या सुमाराला आम्हाला पुष्कळ हरणे आणि हत्ती दिसले. 

आम्ही दुपारच्या जीप सफारीला दुपारी अडीचच्या सुमाराला सुरुवात केली. जेव्हा साधारण अडीच तास फिरून आम्ही परत आलो तेव्हा गडद अंधार झाला होता! त्या दिवशी सूर्यास्त साडेचारच्या सुमाराला झाला. आम्ही मध्य भागाची सफारी घेतली होती. दफलांग डिफओलू नदीच्या किनाऱ्याजवळ आम्ही सूर्यास्ताच्या वेळी होतो.



Water body



Beel



Surroundings



Watch Tower








पाण्याजवळ चरणारी हरणे!




मी काढलेल्या सर्वात चांगल्या फोटोंपैकी एक!!




Water body



pugmarks and mounds of poop!




When the road is beautiful, who would want the journey to end!




Watch tower near the Diffolu river bank. 




Jeeps and too many people




About to set!




Last few minutes..and ..gone




Their day starts when the sun sets.




Out for a walk!!!















Must be the Safari elephants.


सूर्यास्तानंतर जंगलात प्रवास करणे खूपच अनोखा अनुभव आहे. सगळे जगच चंद्रप्रकाशात वेगळे दिसते. खूप आनंददायी आणि मन शांत करत जाणारा अनुभव असतो तो. वाऱ्याने हलकेच हलणारी झाडांची पाने, पाण्यात चमकणारे चंद्राचे किरण, मध्येच उडत जाणारे पक्षी, आजूबाजूला प्राण्यांच्या चाहुलीचा भास आणि आपण सुरक्षित जीपमध्ये असल्याने हा आनंद उपभोगता येण्याजोगी स्थिती!!

प्राणी पाणी पिण्यासाठी बाहेर पडलेले होते. सगळीकडे शांतता. जीपच्या इंजिनचा अगदी हळू येणारा आवाज पण खूप मोठा आहे असे वाटत होते.

काझीरंगाच्या पर्यटनाची सुरुवात १ नोव्हेंबर ला होते. आम्ही तेथे ३ नोव्हेंबरला होतो. जंगलात खूप लोक जीप सफारी घेतलेले फिरत होते. त्यांचा मोठमोठ्याने बोलण्याचा आवाज जंगलातल्या शांततेवर ओरखाडे उमटवत होता. 

प्राण्यांच्या घरात एकतर आपण त्यांना न विचारता येतो, फिरतो. मग निदान काही नियम तरी पाळायला हवेत. 

अगदी शांतता पाळायला हवी. अत्यावश्यक असेल तेव्हाच आणि तेवढेच बोलावे. मातकट रंगाचे, जंगलाशी, झाडांशी, मातीशी सुसंगत असतील असे कपडे घालावे. भडक रंग जसे लाल, पिवळा, केशरी, गडद निळा असे घालू नये. प्राणी बिचकतात. उग्र वासाची अत्तरे, रासायनिक वासांचे किडे पळवणारे स्प्रेज मारून जंगलात जाउ नये. हे नियम तर अगदी सहज कोणालाही सुचतील आणि पाळता येतील असेच आहेत. 

हे नियम पाळले तर प्राण्यांनाही त्रास होणार नाही आणि तुम्हाला देखील जास्त प्राणी बघायला मिळतील.

संध्याकाळी ऑर्किड गार्डन जवळचा सांस्कृतिक कार्यक्रम बघायला विसरू नका. आसामची आणि एकूणच पूर्वांचलाची लोकगीते, लोकनृत्ये बघणे आनंददायी आहे. 

तिथे समोरच एक बाजार आहे. तिथे हस्तकलेच्या, विणकामाच्या वस्तू, शाली, ओढण्या,स्टोल्स विकत घेणे हे आद्यकर्तव्य आहेच!! खूप सुंदर, मनमोहक वस्तू, कापडे तिथे मिळतात. 










#OneHornedRhino #Naturalreserve #JeepSafari #HowToTravelInKaziranga #MustVisitPlacesInIndia #SanctuaryInIndia #TouristPlaceInAssam




Comments

  1. वाहवा नक्की एकदा भेट द्यायला हवी. फोटो खूप सुंदर आले आहेत.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद! नक्कीच भेट द्यायला हवी!

      Delete
  2. फोटो अप्रतिम 👌👌

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद अरुंधती!

      Delete
  3. सुंदर लेख अप्रतिम फोटो. माझी काझीरंगा भेट आठवली.

    ReplyDelete
    Replies
    1. धन्यवाद!! पुन: प्रत्ययाचा आनंद!

      Delete
  4. Thanks for this lovely tour of Kazeeranga .

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...