गोकर्ण महाबळेश्वरजवळ. मिर्जन किल्ल्यापासून निघाल्यावर गोकर्ण महाबळेश्वरला जाण्याचा रस्ता सुंदर होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवीगार झाडे होती. वळण आले की मधूनच डोकावणारा समुद्र, नंतर सामोराच आला. गोकर्ण गोकर्ण गोकर्ण गोकर्ण गंगावली आणि अघनाशिनी नद्या आणि सिंधु सागर (अरबी समुद्र) ह्याच्या मधल्या भागात गोकर्ण महाबळेश्वर वसलेले आहे. खरे तर पूर्वी लहानसे गांव असणार. पण आता पर्यटक, परदेशी पर्यटकांसाठी समुद्रकिनाऱ्यावर उभे राहिलेले असंख्य रिसॉर्ट्स आणि अन्य सुविधा, मोठ्या प्रमाणात भेट देणारे भाविक ह्यामुळे गाव विस्तारते आहे. गजबजलेले आहे. गोकर्ण महाबळेश्वरचा उल्लेख तर शतकानुशतके आपल्या धार्मिक आणि सांस्कृतिक इतिहासात आढळतो. त्याला दक्षिण काशी असेही म्हटले जाते. गोकर्ण महाबळेश्वर मध्ये आपण शिरलो की शिव मंदिराकडे जाताना आधी लागते श्री महागणपती मंदिर. तर तिथे जाण्यासाठी आमची गाडी एका चिंचोळ्या रस्त्याने चालली होती. आता कोपऱ्यावर महागणपती मंदिर येणार म्हणून मी उत्सुकतेने पाहत होते. दोन्ही बाजूला घरे, दुकाने अगदी चिकटून चिकटून उभी होत...
'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.