मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Sohra लेबलसह पोस्ट दाखवत आहे

चेरापुंजी की सोहरा??? ते सोहराच आहे!

  रिकाम्या  जागा भरा, जोड्या लावा , एका वाक्यात उत्तर द्या, कारण सांगा.. आपण शाळेच्या प्रश्नपत्रिकेतील, ह्यातील प्रत्येक प्रकारच्या  प्रश्नाचे नाव घेतले  की  आपल्याला आठवेल, भारतात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या  जागेबद्दल प्रश्न होता. उत्तर नक्कीच चेरापुंजी होते. चेरापुंजीला  एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा गिनीज रेकॉर्ड आहे. जुलै 1861 मध्ये चेरापुंजीला एका महिन्यात 30.5 फूट पाऊस पडला!!!! ह्यामुळे चेरापुंजी गावाचे नाव  - पृथ्वीवरील सर्वात जास्त ओली  जागा असे पडले . परंतु सध्या सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे जवळचेच Mawsynram  नावाचे गाव.  म्हणूनच आता हे ठिकाण सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणही नाही आणि त्या गावाचे आता चेरापूंजी असे नावदेखील नाही!! आता त्याला 'सोहरा' असे म्हणतात, जे खरे तर त्या गावाचे मूळ नाव आहे. मूळ नाव सोहरापूनजी होते, जे ब्रिटिश राज्यकर्ते उच्चारू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी त्याला चेरापुंजी म्हटले. या जागेचे मूळ नाव पुन्हा ठेवले जावे म्हणून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अनेक वर्षे स्थानिक लोका...