मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Museum लेबलसह पोस्ट दाखवत आहे

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

क्रांतितीर्थ - क्रांतिवीर चापेकर बंधू राष्ट्रीय संग्रहालय

१८९६ मध्ये पुण्यात प्लेगची साथ पसरली होती. १८९७ मध्ये आला ब्रिटिश सरकारचा संसर्गजन्य रोग विरोधी कायदा.  त्या कायद्याची अंमलबजावणी अतिशय अमानुषरीत्या केली गेली. लोकांच्या देवघरात ब्रिटीश अधिकारी प्लेग कमिशनर वॉल्टर चार्ल्स रँड ह्याचे सैनिक बुटासकट शिरु लागले. देवघरातले देव रस्त्यावर फेकू लागले. भारतीय धार्मिक, सामाजिक प्रथा परंपरांचा अनादर करत लोकांचा छळ केला गेला.  स्वैपाकघरातील लोणच्याच्या बरण्या, इतर खाद्यपदार्थ संसर्गाचे कारण सांगून उकिरड्यावर ओतले गेले. केवळ संशयावरून कित्येक लोकांचे घरगुती सामान जाळून टाकले. इतकेच करून ब्रिटिश सरकार थांबले नाही. तर प्लेगचे रुग्ण शोधण्याच्या नावाखाली घरातील स्त्रिया आणि वृद्ध ह्यांच्यावर अत्याचार केले गेले.  पुण्यातील जनतेत मोठा असंतोष पसरला. हा सगळा अत्याचार मुकाट्याने सहन करणे कठीणच होते. उन्मत्त रँडला अद्दल घडवण्याची योजना काही स्वाभिमानी तरुणांनी आखली. त्यात सहभागी होते चापेकर बंधू, म्हणजे दामोदर, बाळकृष्ण आणि वासुदेव चापेकर . त्यांच्यासमवेत होते त्यांचे अजून काही शूर मित्र.  २२ जून १८९७ला पुण्यात एक मोठा ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...