कधी कधी मोठ्या ट्रिप्समध्ये काय होते की एखाद्या दिवशी एखादे ठिकाण खूप आवडते. त्यानंतर पुढच्या दिवसांत आपण पाहणार असतो त्या ठिकाणांची तुलना मग आपल्याला आवडलेल्या ठिकाणाशी व्हायला लागते. खरे तर असे व्हायला नको. प्रत्येक ठिकाणचे आपापले वैशिष्ट्य असते, पण मन नकळत तुलना करते हे खरे. माझे काय झाले ते सांगते. शृंगेरी आणि मुकाम्बिका मंदिरे, त्यातील अधोरेखित होणारे पावित्र्य हे मनाला खूप भावले होते. त्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही गेलो मुर्डेश्वरला. मुर्डेश्वरचे मंदिर हे कोस्टल कर्नाटकातील सुप्रसिद्ध पंचलिंग क्षेत्रांपैकी एक. पंचलिंग क्षेत्रांची कथा तर आपल्याला सगळ्यांना माहिती असणारच. पण ज्या कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. रावणाने अमर होण्यासाठी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. काय हवे ते माग म्हटल्यावर रावणाने मागितले शंकराचे आत्मलिंग. भोळ्या शंकराने ते दिले. पण त्याचवेळी हे सांगितले की वाटेत कुठे हे खाली ठेवू नकोस. आता अविवेकी रावणाला शिवशंकराचे आत्मलिंग मिळणे, तो अमर होणे म्हणजे सृष्टीत हाहा:कार माजला असता. त्यासाठी काहीतरी करायला हवे होते. ...
'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.