मथुरा म्हणजे कंस. मथुरा म्हणजे तुरुंग. हे खरे होतेच. पण मथुरा म्हणजे कृष्ण जन्म हे ही खरेच ना! श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरेच्या बाजाराला दही, दूध, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी तर अगदी बालवाडी पासूनच स्नेहसंमेलनात आपण सगळेजण पाहत आलो! पुढे नाटक, सिनेमा, वग या सगळ्यात या मथुरेने आपला पाठपुरावा केलेला असतो. शिवाय ‘अयोध्या केवल झांकी हैं ..काशी मथुरा बाकी हैं’ ही घोषणाही आपण ऐकलेली असतेच. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥ सप्तपुरी स्थान असलेली आणि श्रीकृष्णाच्या आधीपासून अगदी रामायण काळापासून असलेली ही मथुरा. शत्रुघ्नाने लवणासुराला मारून मथुरेची स्थापना केली असे पौराणिक कथांत वाचायला मिळते. वाल्मिकी रामायणांत देखील तसा उल्लेख आहे. तर यमुनेच्या तीरावर असलेल्या या प्राचीन नगरी मथुरेला कृष्णजन्मभूमी पाहण्यासाठी आम्ही यावर्षीच्या श्रावणात म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला पोहोचलो. स्टेशनवर बाहेर पडताच अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले आपल्या भोवती गोळा होतात. इथे ठाण्यात आपल्याला जिथे जायचे असेल तिथे यायला नकार देणारे रिक्षा...
लोकमान्य टिळक म्हणजेच बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव. केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो. त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली. वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता. ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते. त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे. वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...