मुख्य सामग्रीवर वगळा

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे. 

कवी केशवसुत जन्मस्थान 
मार्गावरील फलक 
प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य 

कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे. एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार!

स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे. 

कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना 

तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. 

घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे . 

माजघर 
घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला. मानवी भावभावना, प्रेम, निसर्ग, समता, बंधुभाव हे प्रकर्षाने त्यांच्या कवितेत आढळून येते. समाजातील विषमता नाहीशी करून पृथ्वी सुरलोकसम करण्याची आस दिसते. त्यांच्या काही कवितांतून गूढ अनुभव वर्णन आहे. रचनेतील आणि भावार्थातील वैशिष्ट्यांमुळे त्यांना मराठी नवकवितेचे जनक म्हणून ओळखले जाते. 

तुतारी ही त्यांची सामाजिक क्रांतीची कविता प्रसिद्ध आहे. त्यांच्या स्मारकात एक तुतारीच्या शिल्प उभारले आहे. एक तुतारी द्या मज आणुनी, फुंकीन मी जी स्वप्राणाने ... ह्या ओळी माहिती नाहीत असा मराठी माणूस नसेल. 

तुतारी 

तुतारी 
तुतारी 
तुतारी 

त्यांच्या प्रसिद्ध कविता लिहिलेल्या आहेत असे एक मोठे खुले दालन आहे. कविता लिहिलेले मोठाले कट्टे चांगले अडीच तीन फुटाचे आहेत. त्यावर दोन्ही बाजूना कविता लिहिलेल्या आहेत.

पाठीमागेच त्यांचे जन्मस्थळ आहे. त्यांच्या जन्मगावाचा उल्लेख असलेली कविता म्हणजे नेऋत्येकडचा वारा. ही कविता वाचताना पाठीमागे त्यांचे घर दिसत राहते. ह्याच ठिकाणी ७ ऑक्टोबर १८६६ मध्ये त्यांचा जन्म झाला. 

नैऋत्येकडला वारा 
नैऋत्येकडला वारा अंशतः ऐकण्यासाठी इथे क्लिक करा. 

कवी केशवसुतांच्या अनेक कविता तिथे वाचायला मिळतात. खरे तर ह्या सर्व कविता आपण आधी अनेकदा वाचलेल्या अशाच आहेत. पण तिथे, केशवसुतांच्या जन्मस्थळी त्या वाचण्याचा अनुभव काही आगळाच आहे हे निश्चित. त्यातील काहींचेच फोटो काढले. 
दिवस आणि रात्र 

दिवस आणि रात्र 
सतारीचे बोल 
सतारीचे बोल 
ईश्वराचा ग्रंथ 
केशवसुतांची गाजलेली तुतारी ही कविता स्मारकात प्रामुख्याने उद्धृत केलेली जाणवते. तुतारीचे शिल्प, त्याखालील ओळी तर आपण पाहिल्याचं. आपण अजूनही एकदा त्या कवितेच्या ओळी समोर येतात. ती संपूर्ण कविता आधी वाचण्यासाठी इथे देते. म्हणजे नंतरच्या ओळींचा संदर्भ लक्षात येईल. 

तुतारी
एक तुतारी द्या मज आणुनि
फुंकिन मी जी स्वप्राणाने
भेदुनि टाकिन सगळी गगनें
दीर्घ जिच्या त्या किंकाळीने
अशी तुतारी द्या मज आणूनी
अवकाशाच्या ओसाडीतले
पडसाद मुके जे आजवरी
होतील ते वाचाल सत्वरी
फुंक मारीता जिला जबरी
कोण तुतारी ती मज देईल?
रुढी, जुलूम यांची भेसूर
संताने राक्षसी तुम्हाला
फाडूनी खाती ही हतवेला
जल्शाची का? पुसा मनाला!
तुतारीने ह्या सावध व्हा तर!
चमत्कार! ते पुराण तेथुनी
सुंदर, सोज्वळ गोड मोठे
अलिकडले ते सगळे खोटे
म्हणती धरुनी ढेरी पोटे
धिक्कार अशा मूर्खांलागुनी
जुने जाऊ द्या मरणालागुनी
जाळुनी किंवा पुरुनी टाका
सडत न एक्या ठायी ठाका
सावध!ऐका पुढल्या हाका
खांद्यास चला खांदा भिडवूनी
प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा
निजनामे त्यावरती नोंदा
बसुनी का वाढविता मेदा?
विक्रम काही करा, चला तर!
धार धरलिया प्यार जीवावर
रडतील रडोत रांडापोरे
गतशतकांची पापे घोरे
क्षालायाला तुमची रुधिरे
पाहिजेत रे! स्त्रैण न व्हा तर!
धर्माचे माजवुनी अवडंबर
नीतीला आणिती अडथळे
विसरुनीया जे जातात खुळे
नीतीचे पद जेथे न ढळे
धर्म होतसे तेथेच स्थ्रिर
हल्ला करण्या तर दंभावर तर बंडावर
शूरांनो! या त्वरा करा रे!
समतेचा ध्वज उंच धरा रे!
नीतीची द्वाही पसरा रे!
तुतारीच्या ह्या सुराबरोबर
नियमन मनुजासाठी, मानव
नसे नियमनासाठी, जाणा;
प्रगतीस जर ते हाणी टोणा
झुगारुनी दे देऊनी बाणा
मिरवा नीज ओजाचा अभिनव!
घातक भलत्या प्रतिबंधांवर
हल्ला नेण्या करा त्वरा रे!
उन्नतीचा ध्वज उंच धरा रे!
वीरांनो! तर पुढे सरा रे
आवेशाने गर्जत हर-हर!
पूर्वीपासूनी अजुनी सुरासुर
तुंबळ संग्रामाला करिती
संप्रति दानव फार माजती
देवावर झेंडा मिरवीती!
देवांच्या मदतीस चला तर!

त्यांच्या अनेक कविता लिहिलेल्या खुल्या दालनानंतर एक सुंदर पुष्करणी आणि बाग आहे. तिथे तुतारी कवितेतील ह्याओळी 
'प्राप्तकाल हा विशाल भूधर
सुंदर लेणी तयात खोदा'
 भिंतीवर लिहिलेल्या आहेत. 
स्मारकातील पाठीमागची बाजू 
कवी केशवसुत 
बागेतून दिसणारी तुतारी 
बाग 
बाग 
पुष्करणी 
स्मारकात एक वाचनालय आहे. दुसऱ्या हॉलमध्ये मराठीतील निवडक कवींच्या कविता आणि माहिती दिलेल्या फ्रेम्स आहेत. ही कल्पना पण आवडली. केशवसुतांचे समकालीन आणि नंतरचे असे अनेक कवी कवयित्री त्यात आहे. 
ह्या स्मारकाला जाण्यासाठी जवळचे रेल्वे स्टेशन रत्नागिरी आहे. तिथून साधारण २८ किलोमीटरचे अंतर आहे. गणपतीपुळ्याहून मालगुंड अगदीच जवळ आहे. अडीच तीन किलोमीटरचे अंतर असेल. 
गणपतीपुळ्याहून रिक्षाने, गाडीने फार तर दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले हे स्मारक, पण त्या मानाने फार कमी पर्यटक इथे येतात. जे येतात त्यातीलही फार कमीजण लक्षपूर्वक हे संपूर्ण स्मारक बघतात. 
इतके सुंदर स्मारक उभारलेले आहे तर अनेक लोकांनी यावे, केशवसुतांच्या आणि इतर कवींच्या कविता वाचाव्यात. त्यांचा थोडा तरी अर्थ समजून घ्यावा असे मनापासून वाटले. 
आमच्यासमोरच अनेक पर्यटक येऊन नुसते फेरी मारून दहा मिनिटांच्या आत बाहेर देखील पडले. सगळ्या कविता नुसत्या नीट वाचायच्या म्हटल्या तरी तुमच्याकडे कमीत कमी दोन तास वेळ हवाच. 
मालगुंड मधील मुख्य रस्त्यावर 'स्वाद डाईनिंग' ह्या मेहेंदळे ह्यांच्या शुद्ध शाकाहारी उपाहारगृहात आम्ही जेवलो. आम्हांला सात्विक, रुचकर, विगन अन्न मिळाले.
 'स्वाद डाईनिंग'
 'स्वाद डाईनिंग'
 'स्वाद डाईनिंग'
गणपतीपुळे परिसरात मालगुंद सोबत आणखी काही पर्यटनस्थळे आहेत. सुंदर समुद्रकिनारे आहेत. प्राचीन कोकण नावाचे म्युझियम आहे. 
भव्य परिसरात उभारलेले हे म्युझियम नावाप्रमाणेच प्राचीन कोकणाची ऐतिहासिक, सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक माहिती देते. 
ग्रामदेवता, विविध सण उत्सव, वेगवेगळे कारागीर आणि त्यांचे काम ह्यांची माहिती मनुष्याकृती पुतळ्यांतून जिवंत देखाव्यांद्वारा इथे मिळते. 
कोकणातील अनेक प्रकारची झाडे इथे लावलेली आहेत. प्राचीन कोकणात आढळणारे प्राणी ( पुतळ्यांच्या रूपात ) गर्द झाडीतून डोकावताना आपल्याला दिसतात. समुद्रातील वेगवेगळ्या प्रकारच्या शंखांचे तर एक स्वतंत्र प्रदर्शनच तिथे मांडलेले आहे. 
ते सगळे दाखवण्यासाठी एक गाईड आपल्यासोबत असतो. त्यामुळे स्थानिकांना रोजगार आणि ह्या प्रकारचे प्रशिक्षण मिळाले आहे. 
छत्रपती शिवाजी महाराज 
गाईड 
शिलालेख 
प्राचीन कोकण 
गुहा आणि पर्यटक 
कोल्हे 

कोळी 
केशकर्तन 
खोताचे घर 
न्हाणीघर 
घर 
मडकी तयार होताना 
वाणी 
सुतार 
दरवेशी 

लोहार 
तेलाचा घाणा 
बुरुड 
स्वयंपाकघर 

कासार 

चर्मकार 
धार्मिक स्थानांची माहिती 
धनगर 
मचाण 
पावसाळा सोडून इतर ऋतूंमध्ये ह्या मचाणावर चढून जाण्याचा अनुभव घेता येतो असे लिहिले आहे. आम्ही ऑकटोबर मध्ये गेलो होतो. ह्या वर्षी पावसाळा लांबल्याने तेव्हाही जाण्याचा रस्ता बंदच होता. 

दशावतार 

गावाची वेस 
साकव 
ह्या म्युझियममध्येच कोकणी पदार्थ मिळणारे एक उपाहारगृह आहे. तसेच खरेदीसाठी एक दुकानदेखील आहे. 
आजच्या पिढीला ह्या म्युझियम मधील अनेक गोष्टी नव्या असल्याने त्यांना प्राचीन कोकणाचा नक्कीच आनंद घेता येतील. परदेशांत अशी थीम पार्क असतात. आपल्याकडे का नसतात ह्याची रुखरुख प्राचीन कोकण म्युझियम पाहिल्यावर जरा कमी झाली. 
परदेशांत अशा थीम पार्क मध्येच त्या त्या काळातले सांस्कृतिक कार्यक्रम सुद्धा होतात. आपल्याइकडेही हळूहळू सुरुवात होईल. मग परदेशी लोकांना आणि तो काळ न पाहिलेल्या भारतीय लोकांनाही तो काळ खऱ्या अर्थाने अनुभवता येईल. 

#kavi keshavasut #Malgund #prachin konkan #Mehendale's swad dining #vegan food in konkan #theme park in konkan 








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...