काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती.
श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा
आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा
आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.
त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.
ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.
अवघ्या १९/२०व्या वर्षी पेशवेपदाची जबाबदारी त्यांच्यावर आली. तेव्हापासून ते ३९ व्या वर्षी झालेल्या दुर्दैवी मृत्यूपर्यंत ते सतत हिंदवी साम्राज्याचा विस्तार करण्यासाठी लढत राहिले.
अशा थोर व्यक्तिमत्वाचे जन्मस्थान असलेला बर्वेवाडा आज कशा स्थितीत आहे हे पाहू या.
बर्वेवाडा - बाह्य भाग बर्वेवाडा - बाह्य भाग बर्वेवाडा - बाह्य भाग बर्वेवाडा - बाह्य भाग बर्वेवाडा - बाह्य भाग
जिथे बाजीरावांचा जन्म झाला ती बाळंतिणीची खोली जतन केली आहे. त्यात बाजीरावांची ढाल, तलवार व इतर शस्त्रे ठेवली आहे. बाजीरावांची एक सुंदर प्रतिमा आहे.
शस्त्रे शस्त्रे मातोश्री राधाबाई प्रतिमा
मुळातला वाडा भव्य तीन मजली होता असे वाचनात आले. परंतु आता बराच भाग दुरुस्तीच्या प्रतीक्षेत आहे.
अजूनही सुंदर लाकडी दरवाजे पाहायला मिळतात.
लाकडावरचे नक्षीकाम लाकडावरचे नक्षीकाम लाकडावरचे नक्षीकाम
वाड्यात प्रवेश करताच समोर दिसतो तो श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांचा रेखीव पुतळा. काल ३२५ व्या जयंतीनिमीत्त तिथे भोसला मिलिटरी स्कुल च्या मुलांनी मानवंदना दिली.
दर्शनी चौकातील पुतळा मानवंदना मानवंदना मानवंदना मानवंदना
बर्वे घराण्यातील सध्याचे वंशज बर्वे ह्यांना देखील काल भेटता आले.
बर्वे
अजेय योद्धा असलेल्या बाजीरावांच्या जन्मस्थळी केवळ ती जागा पाहायला जायचे नसते तर पुन्हा एकदा इतिहासाची उजळणी करण्याची ती संधी असते. बर्वे
Comments
Post a Comment