मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

 कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे. 

उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच. 

फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर!

त्रासी मरवंथे बीच 
📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi

उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना. 

मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!!

पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे आणि दुसऱ्या बाजूला समुद्र आहे हे अनोखेपण तर होतेच ना!!

हे दृश्य कसे दिसत होते हे तिथे काढलेल्या व्हिडिओमध्ये आपण पाहू शकता. 

Trase Marvanthe Beach 

https://youtu.be/c_hCEkdj5WU

पश्चिम घाटात कोडाचाद्री जवळ उगम पावणारी सौपर्णिका नदी कोल्लूरच्या मुकाम्बिका मंदिराजवळून वाहते म्हणून हिला कोल्लुरू असेही म्हटले जाते. 

आमचा ह्या नंतरचा कार्यक्रम होता कोल्लुरू नदीतील बोटिंगचा. तसे फलक लावलेले नसल्याने हे ठिकाण शोधावे लागले. मग एका दुकानदाराने फोन कल्यावर दोन तरुण मुले आली आणि आम्हाला बोटिंगसाठी घेऊन गेली. कोल्लुरू नदी एका लहानशा बेटामुळे दुभंगते आणि बेट संपल्यावर पुन्हा एकत्र येते. 

कोल्लुरू नदी 
हे मध्ये दिसते आहे ते लहानसे कुरु बेट. ह्याचे गुगल मॅप लोकेशन पाहिलेत की कल्पना येईल. 

कुरु बेट 
इतके शांततेत बोटिंग करायचे, आपल्याखेरीज नदीत दुसरे कोणी नाही, असे अनुभवायचे तर अशाच एखाद्या भागात यायला पाहिजे. इथे तसे अजून पर्यटन फारसे विकसित झालेले नाही. 

कोल्लुरू नदी 

कोल्लुरू नदी 

बोटिंगची तयारी 

बोटीतून दिसणारे दृश्य 

बोटीतून दिसणारे दृश्य 

बोटीतून दिसणारे दृश्य 

नाव माहिती नाही!

बोटीतून दिसणारे दृश्य 

थोड्याच वेळात आम्ही कुरु बेटावर पोचलो. हे अगदी लहानसे बेट आहे. माझ्या आठवणीत कुरु बेट राहिले आहे आणि लक्षात राहील ते असे.. नारळ, केळी, पोफळीची झाडे, सुपीक मातीमुळे लवलवत असलेली हिरवी पोपटी शेती, स्थानिकांची अगदीच मोजकी घरे, दूर अंतरावर दिसणारे मंदिर आणि प्रगाढ शांतता!! आम्ही सकाळच्या वेळी गेलो होतो. पण जर पहाटे कोणी तिकडे गेले तर खूप पक्षीदेखील दिसतात असे कळले. 

कुरु बेट 
कुरु बेट 

कुरु बेट 
कुरू बेटावर 
कुरू बेटावर 
कुरु बेत साधारण कसे होते ह्याची कल्पना ही विडिओ बघून येईल.
https://youtu.be/ZUj4TaIIqiQ
कुरु बेटाला भेट देऊन आल्यावर आणि बोटिंग  झाल्यावर आम्ही परत आलो आणि जवळच असलेल्या वराहमंदिरात गेलो. वराहमंदिरे फारशी आढळत नाहीत. एरवी मंदिरातून दशावतार असतात त्यातील एक म्हणून वराह मूर्ती पाहायला मिळते. पण वराह अवताराचे स्वतंत्र मंदिर फारच क्वचित बघायला मिळते. म्हणून हे विशेष वाटले. तिथे कांताराचे शूटिंग झाले होते असे कळले. मी कांतारा सिनेमा पाहिलेला नसल्याने आम्हाला सांगणाऱ्याची उत्सुकता एकदमच मावळली!!
त्यानंतर त्रासि मारवंते बीचजवळच्या रस्त्याने आम्ही परत निघालो. अनेगुडडे गणपती मंदिराला जाताना आधी कुंभासी येथील चंडिका परमेश्वरी मंदिरात गेलो. नव्याने प्रवेशद्वाराचे काम चालू होते. 
कुंभासी चंडिका परमेश्वरी मंदिर प्रवेशद्वार 

कुंभासी चंडिका परमेश्वरी मंदिर 
कुंभासी प्रसिद्ध आहे ते अनेगुड्डे श्री विनायक मंदिरासाठी. एका टेकडीवर असणाऱ्या मंदिरासाठी एक पिटुकला देखणा घाट चढून गाडी जाते. 
कुंभासी हे नाव इथे भीमाने कुम्भासुराचा तलवारीने वध केला त्यावरून पडले आहे. विनायकाने गजरूपात 
 (गजरूप विश्वम्भर) ही तलवार भीमाला दिली होती. टेकडीचे नाव कानडीत अनेगुड्डी आणि संस्कृतमध्ये गजगिरी असे पडले. 
ही सर्व माहिती मंदिरात लिहिलेली आहे!! येथील मूर्ती स्वयंभू आहे. साधारण १२ फुटाची मूर्ती आहे. भाविकांमध्ये ह्या स्थानाची मोठी महती आहे. त्यामुळे इथे गर्दी असते. मंदिरात आत फोटो काढण्याची अनुमती नाही. हे बाहेरून काढलेले फोटो आपण पाहू शकता. 

श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
श्री विनायक मंदिर, अनेगुड्डे 
ह्या भागातील सर्व मंदिरांप्रमाणे इथेही सुंदर हार फुले विकणारे दुकान होते. 
श्री विनायक मंदिराजवळ, अनेगुड्डे 
ह्या मन्दिरातील प्रसाद भोजन सात्विक आणि फार चविष्ट होते. भोपळ्याची पातळ भाजी आणि भात. हे झाले की खीर! खीर नारळाच्या दुधातील होती म्हणून मला खाता आली ह्याचा आनंद चेहऱ्यावर झळकतो आहे!! प्रसादाचे भोजन खरोखर तृप्त करणारे असते!
प्रसादाची खीर 
त्या नंतर आमचे पुढचे ठिकाण होते मालपे बीच. आम्ही तिथे पोचलो आणि बोटिंगच्या रांगेत उभे राहिलो. पण त्या दिवशी, त्या वेळी भयंकर जोरात वारा वाहत होता. त्यामुळे बोटिंग बंद केले होते. ज्या बोटी आधीच समुद्रात गेलेल्या होत्या त्यांनाच कसेबसे परत आणले जात होते. 
इतक्या लांब अंतरावर येऊन बोटिंग करायला नाही मिळणार म्हणून त्या वेळी थोडे खट्टू झाल्यासारखे वाटले तरी वाऱ्याचा वेग पाहता त्यांनी बोटिंग बंद करण्याचा घेतलेला निर्णय योग्यच होता. नंतर कुठे कुठे झालेल्या अपघाताच्या बातम्या ऐकल्यावर तर हे विशेषच पटले. 
मालपे बीच 

मालपे बीच 

इथून बोटीने आम्ही जाणार होतो सेंट मेरीज आयलंडला. ह्या बेटावर बसाल्टचे उभे खडक आहेत, जणू षटकोनी खांब असावेत असे. पूर्वी असे खडक आम्ही कोरियाच्या जेजू बेटावर पहिले होते. इथलेही पाहण्याची उत्सुकता होती. पण आम्ही तिथे जावे असे वाऱ्याच्या मनात नव्हते तर काय करणार?!! ह्या खडकांचा फोटो आपल्याला आंतरजालावर निश्चितच पाहायला मिळेल. 
मालपेचा समुद्रकिनारा सुंदर आहे. इथे अनेक वॉटर स्पोर्ट्स आहेत जे त्या दिवशी अर्थातच बंद होते. 
त्या दिवशी वारा किती होता, मालपेचा समुद्रकिनारा कसा आहे ते आपल्याला ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. 

https://youtu.be/pfpGmUJ-a5A
आता सेंट मेरीज बेटावर जाणार नव्हतो म्हटल्यावर आमच्या कडे भरपूर वेळ होता. म्हणून आम्ही दुसरी दोन ठिकाणे पाहण्याचे ठरवले. 
मग आम्ही गेलो मणिपाल लेकला. स्थानिक लोक ह्याला मनापल्ला की मणीपल्ला लेक म्हणतात. मणीपालला जाणे हा एक वेगळाच अनुभव आहे. अनेक शैक्षणिक संस्था, मोठमोठी हॉस्पिटल्स, सगळीकडे तरुण मुले असे सगळे दिसत राहते. 
आम्ही ज्या तळ्यावर गेलो होतो तिथेही अनेक तरुण मुली फिरायला आल्या होत्या, कोणी निवांत झाडाच्या सावलीत गप्पा मारत होत्या, कोणी अभ्यास करत होत्या. 
तळ्याभोवतीने चालायला चांगला रस्ता केलेला आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजूला भरपूर झाडे असल्याने ऊन जाणवत नव्हते. 
मणिपाल लेक

मणिपाल लेक
तळ्याभोवतीचा रस्ता 
मणिपाल लेक
मणिपाल लेक
मणिपाल लेक
मणिपाल लेक
मणिपाल लेक
मणिपाल लेक
मणिपाल लेक 

हा फलक फार आवडला आहे. असे करायला हवे सगळ्यांनी. कदाचित ह्या लेकजवळ सगळे जण करत असतीलही. कारण तळ्याभोवतीचे रस्ते अगदी स्वच्छ होते!!
मणिपाल लेक गार्डन 
मणिपाल लेक
मणिपाल लेक
इथून आम्ही सूर्यास्त बघण्यासाठी मणिपालमध्ये प्रसिद्ध असलेल्या एन्ड पॉईंटला जायचे ठरवले. मणिपाल लेकजवळून बऱ्याच वेळाने रिक्षा मिळाली. एन्ड पॉईंटला जातो तर तिकडे भरपूर गर्दी होती. तरी आम्हाला वाटले की सूर्यास्त बघण्यासाठी इतकी मुले जात असतील. पण जसजसे पुढे जात होतो तसतशी गर्दी वाढू लागली आणि पुढे तर पोलिसांनी रस्ताच बंद केला होता!!
त्या दिवशी एन्ड पॉइंट ग्राउंडवर सुप्रसिद्ध गायक शानचा कार्यक्रम होता. त्यामुळे तो संपूर्ण भाग आम जनतेसाठी बंद केला होता. 
तर अशा रीतीने त्या एका दिवसात मालपे बीच आणि मणिपाल एन्ड पॉईंट अशी दोन ठिकाणे आम्हाला वेगवेगळ्या कारणांमुळे पाहता नाही आली. पण मोठ्या ट्रीपमध्ये असे लहान लहान प्रसंग तर घडत राहणारच ना!!
त्या दिवसभरात घेतलेले बाकी अनुभव इतके सुंदर होते की आधी ठरवलेली ही दोन ठिकाणे पाहता न आल्याची निराशा फार जाणवली नाही. 

#मराठीब्लॉग #प्रवासवर्णन #भटकंती #कर्नाटकपर्यटन #कोस्टलकर्नाटक #समुद्रकिनारा #प्रवास #मराठीब्लॉगर #मराठीट्रॅव्हल#MaravantheBeach #TrasiBeach #KuruIsland #KollurRiver #AneguddeTemple #ManipalLake #Udupi #UdupiTourism #CoastalKarnataka #KarnatakaTourism#MarathiTravelBlogger #IndianTravelBlogger #HiddenGemsOfIndia #IncredibleIndia#NatureLovers #SilverVeganTravels




टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....