तीर्थक्षेत्रे- आपापल्या आराध्य देवतांच्या, कुलदैवतांच्या मंदिरात सगळे जातात. आदर्श अशा राष्ट्रपुरुषांच्या स्मारकांना देखील भेटी दिल्या जातात. ह्या शिवाय प्रत्येक भारतीयाने भेट दिलीच पाहिजे अशी तीर्थक्षेत्रे म्हणजे युद्ध स्मारके. स्वतंत्र भारताने लढलेल्या युद्धांची स्मारके. देशाच्या रक्षणासाठी धारातीर्थी पडलेल्या सैनिकांना मानवंदना देण्यासाठी उभारलेली गेलेली स्मारके. का भेट द्यायची? - समूहाची स्मरणशक्ती अल्पजीवी असते ह्याचा प्रत्यय अनेकदा येतो. १५ ऑगस्ट, २६ जानेवारीच्या दिवशी सकाळी उफाळून येणारे राष्ट्रप्रेम दुपारनंतर पुसट होत होत नाहीसे होते. युद्धकथा असलेला एखादा चित्रपट आला की त्या आठवणी ताज्या होतात. ते तेवढ्यापुरतेच. प्रसार माध्यमे स्वतःच्या चष्म्यातून एखाद्या घटनेकडे पाहायला लावतात आणि प्रेक्षकांची विचारशक्ती झाकोळली जाते. ह्या सगळ्या पार्श्वभूमीवर युद्धस्मारके पाहताना त्या घटनेची सत्य माहिती मिळते. आपले मत स्वतःच्या विचारानुसार तयार होते. आपल्या सैनिकांनी केलेला त्याग पाहून त्यांच्याविषयीच्या आदराने आणि कृतज्ञतेने मन भरून येते. सैनिकांइतके मला जम...
'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.