मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Ta Prohm लेबलसह पोस्ट दाखवत आहे

कंबोडिया - मंदिरे आणि बरेच काही.

अंगकोरवाट आणि बाकी मंदिरे पाहून झाल्यावर सियाम रीपहुन  एक बोट राईड अवश्य घ्यायला हवी.  तसेही कंबोडियात सगळीकडे पाण्याच्या कालव्यांचे जाळे असल्याने सगळीकडे पाणी दिसतच राहते.   पाण्याच्या तलावात कमळे तर आहेतच! कंबोडियातील सर्वात महत्वाचे असे टोनले सॅप ( सब/सप - असा उच्चार तिथले लोक करतात. ) तळे जवळच आहे. गोड्या पाण्याचे अत्यंत विशाल असे हे तळे आणि ह्याच नावाची नदी. ऋतूनुसार हिच्या प्रवाहाची दिशा बदलते हे एक आश्चर्यच आहे.  २५ डिसेंबर २०१२ ला उतरत्या दुपारी आम्ही ह्या नौकाविहाराला गेलो होतो. मेकाँगचे काय किंवा टोनले सपचे काय, पाणी अतिशय मळकट आहे. लाल माती मिसळून झालेला गढूळ रंग असावा तसे आहे. ह्या तळ्यात अनेक तरंगत्या वसाहती आहेत. गावंच म्हणा ना लहानशी. मग त्यात घरे, दुकाने सगळे काही आहे. प्रामुख्याने कोळी इथे राहत असले तरी इतरही अनेक जण राहतात. काहीजण तर जन्मभर इथेच राहिलेले आहेत. काहीजणांकडे अधिकृत कागदपत्रे कोणत्याच देशाची नसतात. असेही काहीजण इथे राहतात असे कळले.  इथल्या मुलांसाठी दुसऱ्या देशातील लोकांनी सुरु केलेल्या तरंगत्या शाळा, धर्मस्थाने देखील पाहायला ...

ता प्रोह्म आणि प्रेह खान - अजब न्याय नियतीचा

  जयवर्मन सप्तम अंगकोरवाट मंदिर समूहांविषयी विचार करताना जयवर्मन सप्तमला विशेष महत्व आहे. त्याला ओलांडून पुढे जाणे अशक्य. अनेक महत्वाची मंदिरे त्याने बांधली. केवळ इतकेच नाही तर चांगल्या रस्त्यांचे जाळे निर्माण केले.अनेक मोठी रुग्णालये आणि धर्मशाळा बांधल्या. दर १५ किलोमीटरवर एक रुग्णालय/ धर्मशाळा ही अत्यंत उपयुक्त संकल्पना त्याने बाराव्या शतकात प्रत्यक्षात आणली.  आज आपण पाहणार आहोत त्यानेच बांधलेली दोन मंदिरे..ठिकाणे वेगवेगळी. पण उद्देश एकच. तो हा की पालकांना मानवंदना देणे. त्याने आईच्या गौरवार्थ बांधलेले मंदिर आहे ता प्रोह्म आणि वडिलांच्या स्मरणार्थ बांधलेले मंदिर आहे प्रेह खान. ता प्रोह्म ता प्रोह्म मधील प्रोह्म म्हणजे ब्रम्हा. ब्रम्हदेव, सृष्टीचा निर्माता. बाराव्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिरात हिंदू आणि बौद्ध संकल्पनांचा संगम आढळतो. मंदिराचे मूळ नाव होते राजविहार. बौद्ध भिक्षूंना राहण्यासाठी विहार, अभ्यासासाठी विद्यालय, वाचनालय इत्यादी असलेले असे हे मंदिर. राजाने स्वतःच्या आईच्या - राणी श्री जयराजचूडामणीच्या गौरवार्थ बांधलेले हे मंदिर. मंदिरात...