मुख्य सामग्रीवर वगळा

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच. 
गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे. 
रानी की वाव 
रानी की वाव 
रानी की वाव 
रानी की वाव 
रानी की वाव 
'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल. जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे. 
राणी उदयमती हिने तिचा पती राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्रमी राजे पाटणला दिले. त्या काळी या संपूर्ण प्रदेशावर सोळंकी राजघराण्याची सत्ता होती. पाटण ही त्यांच्या राज्याची राजधानी होती.
ह्या राजघराण्याने जसे स्थैर्य आणि सुबत्ता दिली तसेच अनेक कलावंत, विचारवंत, प्रतिभावंतांना प्रोत्साहन आणि राजाश्रय दिला. कला, संस्कृती, इतिहास जपण्याचाच हा एक मार्ग होता. त्यामुळे मोढेराचे सूर्यमंदिर, पाटणची वाव आणि सिद्धपूरसारखी आज शतकानुशतके लोटली तरीही कला आणि स्थापत्याचा उत्कृष्ट नमुना असलेली स्थाने निर्माण होऊ शकली. ही स्थापत्य शैली अतिशय वैशिष्ट्यपूर्ण आहे. 
ह्या काळात अनेक मंदिरे आणि बारवांचे निर्माण झाले. बारव म्हणजे पाण्याचा साठा करण्यासाठी तयार केलेली विहिर. आपल्याला रांगोळीत देखील बारव रचना दिसते, भरतकामाच्या विणीमध्ये देखील बारव रचना दिसते. 
बारव म्हणजे एका किंवा अधिक बाजूंनी खालपर्यंत जाण्यासाठी पायर्‍यांची रचना केलेली असते. आपल्याकडे खूप प्राचीन काळापासून, अशा पद्धतीच्या बारव बांधण्याची पद्धत आहे. महाराष्ट्रात देखील अनेक मंदिरांत बारव पाहायला मिळते. अगदी सर्वाना माहिती असलेले उदाहरण द्यायचे तर वेरूळच्या घृष्णेश्वर मंदिराच्या आवारात अशी बारव आहे. 
त्या काळी अशी बारव बांधून देणे हा व्रतातील, दानधर्मातील एक महत्त्वाचा भाग समजला जात असावा. राजस्थान आणि गुजरातमध्ये मोठ्या संख्येने अशा बारव बघायला मिळतात.
ही बारव म्हणजेच विहीर/ वाव जमिनीच्या खाली आहे आणि बुजली गेली असल्याने परकीय आक्रमकांच्या विध्वंसापासून सुरक्षित राहिली. अनेक शतके हिचे अस्तित्वच कोणाला माहिती नव्हते. 
तसेच ह्या गावाजवळून सरस्वती नदी वाहते. अनेक शतकांपूर्वी या नदीला प्रचंड पूर आला आणि आजूबाजूचा सगळा भाग या नदीच्या गाळामध्ये गाडला गेला. त्यातही ही वाव पूर्णपणे बुजून गेली. 
 साधारण १९५८ च्या सुमाराला ‘आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडिया’ने, त्या भागामध्ये उत्खनन करण्यास सुरुवात केली आणि समोर आले एक अद्वितीय स्थापत्यवैभव! पुरातत्व खात्याने अतिशय काळजीपूर्वक जी शिल्पे आपल्या जागेपासून ढळली होती ती पुनर्स्थापित केली आहेत. तरी काही जागा रिकाम्या दिसतातच. 
सुरुवातीला काही नक्षीदार दगड, काही खांबांचे अवशेष, काही मूर्ती अशा गोष्टी समोर दिसल्या. अशा रीतीने हे स्थान प्रकाशात आले. पुरातत्व खात्याने अनेक वर्षे चिकाटीने काम केल्यानंतर, जमिनीच्या खाली दडलेले हे वैभव जगासमोर आले. 
मरू-गुर्जर स्थापत्यशैलीत बांधलेली ही 'रानी की वाव' सात स्तरांमध्ये ती खाली खोल उतरते. प्रत्येक स्तरावर अप्रतिम शिल्पे कोरलेले अनेक स्तंभ, कमानी आणि मूर्ती आहेत. भौमितिक रचनांमुळे ह्या ठिकाणाला एक आगळेच सौंदर्य प्राप्त झालेले आहे.
छाया प्रकाश!
खांब 
खांबांनी बनलेलं अनेक भाग 
मधला चौक 
अनेक मजले 
रानी की वाव 
रानी की वाव 
ह्या पलीकडे प्रवेश निषिद्ध 
रानी की वाव 
खांब, कमानी, वेलबुट्टी 
रानी की वाव 
अनेक मजले 
रानी की वाव 
इतके खांब, प्रत्येक खांबावरील नाजूक कलाकुसर, वैविध्य पाहून मन थक्क होते. त्यातही जणू चौक असावेत असे खांबांनी वेगवेगळे भाग तयार झाले आहेत. 
हा संपूर्ण परिसरच जमिनीत गाडला जाऊन आक्रमकांपासून वाचल्यामुळे अनेक संपूर्ण अभंग शिल्पे इथे आपल्याला बघता येतात. इथे कोणकोणती शिल्पे आहेत?
प्रामुख्याने विष्णूचे अनेक अवतार आहेत. अप्सरा आहेत, सुरसुंदरी आहेत. देवीची अनेक रूपे आहेत. दिग्पाल आहेत. अतिशय नाजूक कोरीवकाम असलेली अशी शेकडो शिल्पे इथे आहेत. कोरीव स्तंभांच्या रांगा आहेत. पाने, फुले, पक्षी,प्राणी आहेत. 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
तुंबरु?
अप्रतिम कलाकुसर 
विविध भावमुद्रा 
अप्रतिम कलाकुसर 
शंख, चक्र, गदा, पद्म ही आयुधे कोणत्या क्रमाने कोणत्या हातात आहेत ह्यावरून विष्णुरूप बदलते. अशी अनेक रूपे आपल्याला वरील फोटोत पाहायला मिळतात. 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
इकडे आपल्याला महिषासुर मर्दिनी दिसते आहे. ( डावीकडून चौथे शिल्प) दुर्दैवाने माझ्याकडे महिषासुरमर्दिनीच्या शिल्पाचे समोरून काढलेले छायाचित्र नाही. 
एका पायाने महिषासुराला दाबून त्यावर ती आघात करताना दिसते आहे. तिच्या हातात अनेक आयुधे आहेत. त्रिशुळ, बाण, ढाल, भाला, पाश, अंकुश, चक्र अशी विविध आयुधे आपण ओळखू शकतो. बारकाईने पाहिलेत तर देवीचे वाहन असलेल्या सिंहाने महिषासुरावर मागून हल्ला चढवलेला आहे. 
देवीचा चेहरा मात्र अगदी शांत दाखवला आहे. म्हणजे महिषासुराला नेस्तनाबूत करणे ही तिच्यासाठी जणू क्षुल्लक गोष्ट आहे!! 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
नक्षी 
नक्षीतले विविध प्रकार आपण इथे बघू शकतो. आपण वरील फोटोत पहिले तर केवळ आंब्याच्या पानाची तोरणेच तीन प्रकारची चितारलेली दिसतील. केवढे कल्पनावैभव आहे हे!
पटोला साडीवर आज आपण जी नक्षी पाहतो तशीच नक्षी इथे आढळते. तेव्हा कदाचित इथूनच हातमाग कारागिरांना साडीची नक्षी सुचली असेल का?
पटोला नक्षीचे स्फुर्तीस्थान?
अप्रतिम कलाकुसर 
शरणागत?
अप्रतिम कलाकुसर 
अप्रतिम कलाकुसर 
प्रत्येक स्तंभ, मार्गिका आणि त्यावर कोरलेली शिल्पे देखणी, प्रमाणबद्ध आणि सुंदर तर आहेतच पण अगदी सजीव वाटावी अशी आहेत. त्यामुळे ही 'रानी की वाव' विलक्षण कलात्मक आहे. 
या विहिरीची रचना पावसाचे पाणी साठवून मग ते उर्वरित वर्षात वापरता यावे ह्या दृष्टीने केली गेली होती. जलव्यवस्थापनाच्या दृष्टिकोनातून ही वास्तू अभियांत्रिकी आणि स्थापत्यकुशलतेचे उत्तम उदाहरण आहे.
अजून एक विशेष म्हणजे जैन भिक्षू मेरुतुंगा यांच्या १३०४ च्या एका रचनेत उल्लेख आहे की, नरवराह खंगारा यांची कन्या उदयमतीने पाटण येथे ही पायऱ्यांची विहीर बांधली.
एखाद्या राणीचे नाव तिच्या माहेरच्या राजवंशावरून दिलेले असणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. खंगार हा एक लढवय्या, शूर असा प्राचीन राजवंश आहे. 
त्याच रचनेत असेही लिहिलेले आहे की, या विहिरीचे काम १०६३ मध्ये म्हणजे राजा भीमदेवाच्या मृत्यूनंतर लगेचच सुरू झाले आणि ती पूर्ण होण्यासाठी २० वर्षे लागली. 
'रानी की वाव' मध्ये संध्याकाळी एक ध्वनिप्रकाश कार्यक्रम म्हणजेच लाईट अँड साउंड शो असतो. ह्या कार्यक्रमात ह्या जागतिक वारसा स्थानाचा इतिहास सांगितलं जातो. पण आम्ही गेलो तेव्हा पाऊस असल्याने तो कार्यक्रम बंद होता. 
सुरक्षेच्या कारणास्तव 'रानी की वाव' चा काही भाग पर्यटकांना खुला केलेला नाही. त्यामुळे तो आपल्याला बघता येत नाही.
सर्वात मागचा भाग आहे तो सर्वात खोल आहे. तिकडे तुम्हाला जाता येत नाही. पण तुम्ही विहिरीच्या बाहेरच्या बाजूने मागे गेलात तर साधारण असे दृश्य दिसते. 
रानी की वाव 
तिथल्या भागाची तुम्ही झूम करून छायाचित्रे काढलीत तर तुम्हाला लक्षात येते की ही वाव मूळ स्वरूपात असेल तेव्हा त्याचे वैभव कसे असेल! किती बारीक कलाकुसर केलेली आहे!अक्षरशः एक इंचही जागा मोकळी सोडली नाही. 
रानी की वाव 
'रानी की वाव' ही गुजरातमधील पायऱ्यांच्या वास्तुकलेचा एक उत्कृष्ट आणि सर्वात मोठा नमुना मानली जाते. या वारसास्थळाचे महत्त्व लक्षात घेऊन 2014 साली, 'रानी की वाव'चा समावेश जागतिक वारसास्थळांच्या यादीत केला गेला.
स्थापत्यशास्त्र आणि भूमिती म्हणजेच विज्ञान, संस्कृती, इतिहास, हिंदू धर्माची तत्वे अशा अनेक गोष्टी इथे आपल्याला पाहायला मिळतात. 
जागतिक वारसास्थळांच्या यादीत सर्वांत स्वच्छ स्थान म्हणून, या जागेचा सन्मान झाला आहे. संपूर्ण परिसर पुरातत्व खात्याने अतिशय चांगला ठेवला आहे. हा परिसर पाहिल्यावर 'रानी की वाव' ला सर्वात स्वच्छ जागतिक वारसा स्थानाचा पुरस्कार का मिळाला असेल ते अगदी सहज समजते!
परिसर 
परिसर 
परिसर 
परिसर 
परिसर 
'रानी की वाव' गुजराथेत असली तरी तिचे चित्र आपल्या सगळ्यांच्या पाकिटात असते!!आपल्या शंभराच्या नोटेवर 'रानी की वाव' विराजमान आहे. 
प्रतिमा आणि प्रत्यक्ष! 
आणखी एका गोष्टीचा विशेष उल्लेख करावासा वाटतो ते म्हणजे ह्या स्थानाची माहिती ब्रेल लिपीत देखील तिथे लावली आहे. पुरातत्व खात्याची ही संवेदनशीलता अभिनंदनीय आहे. 
ब्रेल 

#Rani ki Vav #UNESCOWorldHeritage, #Patan, #GujaratTourism, #Stepwell, #IncredibleIndia, #IndianHistory, #ArchitecturalMarvel और #CulturalHeritage #QueenStepwell, #PatanStepwell #History, #Architecture, #StepwellWonders, #AncientArchitecture, #IndianHistory, #CulturalHeritage, #Carvings #UNESCO, #WorldHeritageSite #रानीकीवाव, #गुजरातपर्यटन, #भारतीयविरासत, #इतिहास








 






























 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....