मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये. 

शरावती बॅकवॉटर बोटिंग 
दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे. 

आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते. 

आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते. 

आम्ही गेलो त्या दिवशी, त्या वेळी अजून थोडे धुके होते. पहाटे शेतातल्या पिकांवर जसा वाफसा तरंगतो तसा पाण्यावरही तरंगतो आहे असे भासत होते. हे शरावती बॅकवॉटर मधील बोटिंग फोटोंसाठी उत्तम ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे अनेक बोटीतून प्रिवेडींग शूट्सच्या टीम होत्या. 

त्यामुळे बोटीही चांगल्या सजवलेल्या असतात. आम्ही जी बोट घेतली होती तिच्यावरही प्लॅस्टिकची हिरवळ, कृत्रिम फुलांच्या वेली असे सगळे होते. 

एकूणच अनुभव अतिशय उत्तम होता. त्या भागात जाणाऱ्या प्रत्येकाने आवर्जून घ्यावा असाच बोटिंगचा अनुभव आहे. त्यामुळे शरावती बॅकवॉटर बोटिंग अवश्य करा असेच मी सुचवेन. 

फक्त वेगवेगळ्या साईट्सवरच्या फोटोंवर विश्वास ठेवू नका!!! आजकाल बऱ्याचदा एआय ने तयार केलेले किंवा ड्रोनने काढलेले फोटो असतात. तसे प्रत्यक्षात दिसतेच असे नाही!!हा वर मी जो टाकलेला फोटो आहे तो देखील एआय ने केलेले आहे. आम्हाला न दिसलेली कमळे एआयने तिथे दाखवली आहेत!!

मी घेतलेला खरा फोटो हा बघा असा आहे. 

शरावती बॅकवॉटर बोटिंग लोटस पॉईंट 
लोटस पॉईंट प्रत्यक्षात असा दिसत होता. आम्ही विचारले की इथे फुले कशी दिसत नाहीत. सध्या सिझन नाही का? त्यावर बोटवाला म्हणाला की भल्या पहाटे म्हणजे अगदी चार साडेचार वाजताच काही जण येऊन तोडून नेतात फुले आणि विकतात. खरे खोटे तोच जाणे!!पानांवर अगदी बारक्या कळ्या मात्र दिसत होत्या. 

तुमच्यापैकी कोणी पाहिली का कमळे इथे? फुले पाहण्यासाठी किती वाजता जायला हवे? कॉमेंट्स मध्ये अवश्य लिहा. 

आम्ही घेतलेली बोट टूर ही लोटस पॉईंट, मिनी केरळ पॉईंट आणि खारफुटीची बेटे अशी तिन्ही दाखवणारी दीड तासाची टूर होती. त्यामुळे अप्रतिम दृश्ये बघायला मिळाली. 

आता मी भरपूर फोटो टाकणार आहे! त्याबद्दल मला क्षमा करा. पण तुम्ही तिकडे गेलात तर तुम्ही ह्याच्या दुप्पट फोटो काढाल ह्याची खात्री बाळगा!!

शरावती बॅकवॉटर बोटिंग 
बलाक माला उडता भासे कल्पसुमांची माळचि ते
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
नदीकिनारी .. 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
मिनी केरळ पॉईंट 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
खारफुटीची बेटे 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
बिम्ब - प्रतिबिम्ब 
खारफुटीची बेटे 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
खारफुटी 
पक्षी (बहुतेक आयबीस!)
नितळ 
लोटस पॉईंट 
लोटस पॉईंट 
रविराज हा गगनी आला 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
सूर्योदय फोटोत दिसला तरी त्यावेळचे पक्ष्यांचे आवाज फोटोतून नाही येत. त्यामुळे ही विडिओ!
https://youtu.be/q-UzuTxrymk
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
शरावती बॅकवॉटर बोटिंग 
पक्षी 
बोटिंग संपायची वेळ आली!
सतत पर्यटक येऊन बोटवाले फोटो काढण्यात प्रवीण झाले आहेत. तेच आग्रहाने आपले फोटो काढतात. 

शास्त्र असतं ते!!
काही ठिकाणी तुम्हाला चहा नाश्ता पण मिळू शकतो. एकतर बोट किनाऱ्याजवळ नेतात किंवा दुसऱ्या बोटीतून चहा नाश्ता येतो. 

आपण आयुष्यात कधीतरी एकदा ह्या ठिकाणी आलेलो असतो. पुरते भारावलेले असतो. अशा वेळी स्थानिक लोक बोटीतून कामासाठी दुसऱ्या गावी निघालेले दिसतात. वाटून जाते किती सुंदर आहे ह्यांचे कामाला येणे जाणे! त्यांनाही नक्की असेच वाटते की त्यांना मुंबईच्या वर्दळीचे आकर्षण वाटते, कोणास ठाऊक?!!

एकुणात काय तर एक अप्रतिम अनुभव घेऊन आम्ही अत्यंत तृप्त मनाने बोटीतून खाली उतरलो.

त्या दिवशीचे आमचे दुसरे ठिकाण होते ते शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक. 

ते देखील खूप शांत निवांत ठिकाण होते. जाण्याचा रस्ता काही घरांजवळून जात होता. कौलारू घरे, लाल माती, अंगणात फुललेली बाग, निवांत शांतता ..भुरळ पडावी असे वातावरण होते! 

इतका स्वच्छ, सुंदर बोर्डवॉक, सविस्तर लिहिलेले माहितीफलक, बोर्डवॉकची चांगली निगा राखलेली असे सगळे  पाहून फार आनंद झाला. 

बोर्डवॉक प्रवेशद्वार 
किती तिकीट आहे ते आता लक्षात नाही पण अगदी कमी आहे.

📷प्रज्ञा साठे 
बोर्ड वॉक 
बोर्ड वॉक 
बोर्ड वॉक 
बोर्ड वॉकवरून दिसणारे दृश्य 
बोर्ड वॉकवरून दिसणारे दृश्य 
बोर्ड वॉकवरून दिसणारे दृश्य 
बोर्ड वॉक
बोर्ड वॉक
बोर्डवॉक 
तिथे कोणती झाडे दिसतील त्याचे माहितीफलक लावलेले आहेत. मग ह्यातली कोणती खरेच आपल्याला दिसली हे शोधताना मजा येते!
माहितीफलक 
बोर्डवॉक आमच्या राहण्याच्या ठिकाणापासून चालत दहा मिनिटांवर होता. आम्ही चालत गेलो तो रस्ता तसा थोडावेळ निर्जन होता. पण लगेच दोन्ही बाजूला नांदती घरे दिसू लागली. 
एका छान घराच्या छान बागेत गृहस्वामिनी झाडांना मस्त पाईपने पाणी घालत होती. झाडे धुवत होती. मला मोह आवरलाच नाही. मी त्यांना मी घालू का थोडा वेळ पाणी विचारल्यावर त्यांनी उदारपणे मला पाईप दिला. इतक्या लहान लहान गोष्टीतला आनंद घेणारे आणि घेऊ देणारे निवांत आयुष्य आहे तिथे. 
बागेला पाणी. 
त्या दिवशी धुळवड होती. त्यामुळे हलगी वाजवत घरोघरी जात हिंडणारे मुलांची टोळकी दिसत होती.
नंतर आम्ही आराम केला. आमच्या एयरबीएनबी च्या मागच्या गॅलरीमधून दिसणारी झाडे आणि पुढच्या गॅलरीमधून दिसणारा रस्ता, स्थानिक जीवन पाहत निवांत राहिलो. 
निवांत 
 दुसरा दिवस मोठा असणार होता. मिरजन किल्ला, गोकर्ण महाबळेश्वर पाहून आम्ही कारवारला जाणार होतो. त्या विषयी लवकरच लिहीन. 

#Sharavati backwaters, #Honnavar boating, #Coastal Karnataka trip #Mangrove boardwalk Honnavar #Mini Kerala Karnataka #शरावती बॅकवॉटर #होनावर बोटिंग #कोस्टल कर्नाटक #कर्नाटक पर्यटन #Honnavar backwater sunrise #Lotus point Honnavar reality #Marathi travel blog








टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...