रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तर द्या, कारण सांगा.. आपण शाळेच्या प्रश्नपत्रिकेतील, ह्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचे नाव घेतले की आपल्याला आठवेल, भारतात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जागेबद्दल प्रश्न होता. उत्तर नक्कीच चेरापुंजी होते. चेरापुंजीला एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा गिनीज रेकॉर्ड आहे. जुलै 1861 मध्ये चेरापुंजीला एका महिन्यात 30.5 फूट पाऊस पडला!!!! ह्यामुळे चेरापुंजी गावाचे नाव - पृथ्वीवरील सर्वात जास्त ओली जागा असे पडले. परंतु सध्या सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे जवळचेच Mawsynram नावाचे गाव.
म्हणूनच आता हे ठिकाण सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणही नाही आणि त्या गावाचे आता चेरापूंजी असे नावदेखील नाही!! आता त्याला 'सोहरा' असे म्हणतात, जे खरे तर त्या गावाचे मूळ नाव आहे. मूळ नाव सोहरापूनजी होते, जे ब्रिटिश राज्यकर्ते उच्चारू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी त्याला चेरापुंजी म्हटले. या जागेचे मूळ नाव पुन्हा ठेवले जावे म्हणून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अनेक वर्षे स्थानिक लोकांना प्रयत्न करावे लागले. 2007 मध्ये मेघालय सरकारने ठरविले की आता ह्यापुढे या जागेचे नाव सोहरा असे असेल.
पर्वतरांगा, डोंगर, ढग, धुक्यामुळे आणि पावसामुळे ब्रिटीशांनी या जागेला 'पूर्वेचे स्कॉटलंड' म्हणून संबोधले आणि हे ठिकाण उत्तर-पूर्व भारतातील त्यांचे प्रशासकीय मुख्यालय बनविले.
या प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी सर्वात वरची माती वाहून जाते आणि शेती करणे अवघड होते. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस असूनही, या प्रदेशात हिवाळा आणि उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागतो. अलीकडेच ही वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन, जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही जेव्हा सोहराला गेलो होतो, तेव्हा इतका पाऊस पडणाऱ्या शहरात सगळीकडे हिरवेगार असेल अशी आम्ही अपेक्षा केली होती. आमची निराशा झाली. शहरात सगळीकडे एकतर पिवळे सुकलेले गवत किंवा ओसाड जमीन होती. पण गावाच्या बाहेर, जवळपास मात्र घनदाट जंगले होती आणि त्यामुळे हिरवाई टिकून होती!! मेघालयातील रस्ते खूपच चांगल्या स्थितीत आहेत. सुंदर निसर्ग, ढग आणि उत्कृष्ट रस्ते यांच्यामुळे प्रवास अगदी आनंददायी झाला.
सोहराकडे जाताना आम्ही 'उमियम तलाव' पाहण्यासाठी गेलो. स्थानिक लोक त्याला 'बरापानी तलाव' म्हणतात. बरापानी म्हणजे बडा पानी.. भरपूर पाणी असे असेल का? मला माहित नाही.
हा तलाव गुवाहाटी ते सोहराकडे जाणार्या महामार्गाजवळ आहे आणि शिलाँगपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. हा जलाशय म्हणजे उमियाम नदीवर बांधलेल्या धरणामुळे बनलेला एक कृत्रिम तलाव आहे. साठविलेले पाणी जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी वापरले जाते. हा तलाव पर्यटकांसाठी मेघालयमधील एक मोठे आकर्षण आणि जल क्रीडा केंद्र आहे. नुसते तलावाभोवती आरामात फिरणे हे देखील खूप शांतवणारे आणि सुखद आहे. सततच्या आणि प्रदीर्घ प्रवासानंतर तर असे फिरणे विशेष आवश्यक आहे.
Umiam Lake 2.09p.m.
Umiam Lake 2.10 p.m.
Umiam Lake 2.10 p.m.
Umiam Lake 2.48p.m.
Umiam Lake 2.46 p.m.
Umiam Lake 2.44 p.m.
Umiam Lake 2.50 p.m.
तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्याच एका तळ्याची इतकी छायाचित्रे का दिली आहेत?!! इतकी सगळी छायाचित्रे दिली आहेत ते तुम्हाला मेघालय ह्या नावाला साजेसा मेघांचा-ढगांचा खेळ तिथे कसा अखंड चालू असतो ते लक्षात यावे म्हणून! अवघ्या काही मिनिटांच्या अवकाशाने सगळे चित्र अगदी बदलून जाते. केव्हा ढग येतील, केव्हा सूर्यकिरण दिसतील, कधी धुके असेल काहीच सांगता येत नाही. आपल्याला प्रकाश व सावलीचे नृत्य सतत बघायला मिळते.
मेघालय म्हणजे ढगांचे माहेरघर. ह्या राज्याचा भूभाग सगळा डोंगराळ प्रदेश आहे आणि देशात सर्वाधिक पाऊस जिथे पडतो असे हे राज्य आहे.
सोहराकडे जाताना लागते असे आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे 'हत्ती धबधबा, एलिफन्ट फॉल्स'. स्थानिक भाषेत त्याला तीन चरण किंवा तीन पायऱ्यांचा धबधबा म्हणत असत. पण सध्या प्रचलित आणि लोकप्रिय असलेले नाव एलिफंट फॉल्स आहे.
घनदाट हिरवेगार जंगल, थंड हवामान आणि झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे ह्या ठिकाणचे सौंदर्य वाढले आहे. धबधब्याच्या तळाशी जाण्यासाठी बर्याच पायऱ्या आहेत.
Elephant Falls 📷Wikimedia Commons
Elephant Falls
Elephant Falls
Elephant falls
In case you are wondering!!!
पायर्या चांगल्या बांधलेल्या आहेत आणि खाली उतरणे फार कठीण नाही. चढताना मात्र काही पायऱ्यांची उंची ज्येष्ठ नागरिकांना त्रास देऊ शकते. थोड्या थोड्या पायर्या झाल्या की बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत. तिकिट कार्यालयाजवळ, प्रवेशद्वाराशी सुखद थंडीत आवश्यक अशी गरमागरम चहा, स्नॅक्सची आणि हस्तकलेच्या वस्तू, शाली, स्टोल्स,स्वेटर्स विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. आपण तिथून काहीही न खरेदी करता परत आलात तर मग आपले नाव अनासक्त लोकांच्या यादीतच समाविष्ट करावे लागेल!!
मी केलेली खरेदी
मेघालयातील खासी डोंगराळ प्रदेशात, जिथे सोहरा आहे, तेथे बरीच पवित्र संरक्षित वने आहेत. महाराष्ट्रात देवराईची संकल्पना आहे तशीच काहीशी ही संकल्पना आहे. पूर्वापार चालत आलेल्या स्थानिक धार्मिक श्रद्धा आणि आता 2002 पासून अंमलात आलेल्या, वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे ही सर्व वने संरक्षित आहेत. ह्या पवित्र जंगलात काही मोनोलिथस/ दगडरूपी स्मारके देखील आहेत. कोणी म्हणतात की त्यांचा उपयोग प्राचीन काळी बलिवेदी म्हणून केला जात असे. काहीजण म्हणतात की ती सगळी पूर्वजांची स्मारके व आठवण आहेत.
The Sacred Groves 📷Wikimedia Commons
वेळेअभावी आम्ही ह्या देवराईंना, पवित्र जंगलांना भेट देऊ शकलो नाही. सोहरा प्राचीन गुहांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही त्यापैकी दोन गुहा बघू शकलो.
पहिली गुहा 'अरवाह लुमश्यान' गुहा होती. ही एक अवश्य भेट द्यावी अशीच गुहा आहे. गुहांकडे जाण्याचा मार्ग फार सुंदर आहे. मेघालय शासनाने अतिशय निगा राखलेले आणि सुस्थितीत ठेवलेले असे हे ठिकाण आहे.
He must be tired..so taking rest!
Some distinguished visitors
गुहेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक छान उद्यान केलेले आहे. बसायला बाक आहेत, झोपाळा आहे. त्या उद्यानातून आजुबाजूच्या डोंगरदऱ्यांचे, घनदाट जंगलाचे विहंगम दृश्य दिसते.
आम्ही नंतर भेट दिली त्या mawsmai गुहेपेक्षा, ह्या Arwah गुहेत जाणे खूप सोपे होते. या अरवाह गुंफा मोलस्कच्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध आहेत. ते जीवाष्म प्रागैतिहासिक कालखंडातील आहेत, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 कोटी वर्षांपूर्वीचे! इतके पुरातन जीवाश्म पाहून खरोखर खूप आनंद झाला.
गुहेच्या छतावरून ओघळून आता खडक झालेले Stalactites आणि गुहेच्या जमिनीवर उभे असलेले Stalagmites गुहेच्या सौंदर्यात भर घालतात.
The entrance of the Arwah Lumshyanna caves
Stalactite
Stalactites
Fossils
Large portion with fossils
गुहेच्या आत एक लहानसा पाण्याचा प्रवाह वाहत आहे, त्यामुळे गुहेच्या जमिनीचा काही भाग थोडा निसरडा आहे. काही भागात गडद अंधार आहे. म्हणून सोबत एक शक्तिशाली टॉर्च अवश्य ठेवावा आणि योग्य, घट्ट पकड असलेले आरामदायक चपला/बूट घालावे. गुहेच्या सभोवतालची जागा ह्या व्हिडिओत दिसते आहे अशी आहे.
सोहरा धबधब्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक म्हणजे 'नोहकालिकाई धबधबा'. तो 1100 फूट उंचीवरून खाली पडतो. इतक्या उंचीवरून पडणारा जलप्रपात पाहणे हे पावसाळ्यात नक्कीच एक अद्भुत दृश्य असेल.
Nohkalikai Waterfall
आम्ही धबधबा पाहिला आणि अवघ्या पाच मिनिटात ती दरी संपूर्णपणे धुके आणि ढगांनी आच्छादली गेली. हे असे मेघालयात नेहमीच होते असे कळले. आम्ही सुदैवी म्हणून वेळेत पोचलो. नाहीतर इतक्या लांबून जाऊन धबधबा बघायला मिळाला नसता तर वाईट वाटले असते.
आम्ही सोहरा येथील 'रामकृष्ण मिशन स्कूल' कॅम्पसला भेट देऊ शकलो. ही जवळपास शंभर वर्षे जुनी संस्था असून इथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. येथे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्य विक्रीचे दुकान देखील आहे.
Beautiful old building
शाळेच्या खेळाच्या मैदानाजवळ एक मंदिर आणि प्रार्थना हॉल आहे. शाळेत नियमित शाळेव्यतिरिक्त संगणक प्रशिक्षण केंद्र, एक व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, गरजू मुलांसाठी गदाधर अभ्युदय प्रकल्पाचे संचालन देखील केले जाते. रामकृष्ण मिशन सेवाभावी वृत्तीने रुग्णालये तसेच मोबाइल मेडिकल व्हॅन चालवित आहे. रामकृष्ण मिशन खरोखरच त्या क्षेत्रात अतिशय स्तुत्य काम करत आहेत.
सोहरामध्ये आणखी एक प्रसिद्ध धबधबा आहे. नाव आहे 'सेवन सिस्टर्स धबधबा'. सुमारे हजार फुटांवरून पडणारा हा सात लहान धबधब्यांचा मिळून बनलेला धबधबा पावसाळ्यात नक्कीच सुंदर दिसत असणार.
Seven sisters waterfall in rainy season 📷Wikimedia Commons
सगळ्याच्या सगळ्या, सातही बहिणींना भेटता येईल इतके आम्ही सुदैवी नव्हतो. जेव्हा नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही सोहराला गेलो होतो तेव्हा ह्यातल्या काही धाकट्या बहिणी गायब होत्या, बहुतेक खेळायला गेल्या असणार!! मोठ्या दोघीतिघी बहिणी मात्र, असेल नसेल त्या शक्तीनिशी, अतिशय दक्षतेने मोर्चा सांभाळत होत्या!
Seven Sisters waterfall
असंख्य भूमिगत लेण्यांच्या चक्रव्यूहासाठी मेघालय प्रसिध्द आहे. बऱ्याच लेण्यात अद्याप कोणी गेलेले नाही, त्याविषयी संशोधन चालू आहे. भारतातील सर्वात लांब गुहा जंटीया टेकड्यांच्या भागात, मेघालयात आहे. तिची लांबी 31 किमी आहे, जी जगातील सर्वात लांब गुहांपैकी एक आहे.
सोहराजवळील 'Mawsmai' गुंफा ही एक भव्य गुहा आहे. शतकानुशतके जुनी अशी ही गुहा प्रचंड मोठ्या, अवाढव्य आणि चित्रविचित्र अशा Stalctites आणि Stalgmites नी भरलेली आहे. ह्या गुहेत चांगला उजेड आहे आणि म्हणून आपण निसर्गाचे हे सर्व चमत्कार पाहू शकतो.
गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता तसा सोपा आहे. थोड्या पायऱ्या आहेत. गुहेच्या आत काही जागा आहेत ज्या खरोखरच अतिशय अरुंद आहेत. तिथे आपल्याला अगदी कसे बसे अंग चोरून जाता येते. गुहेत अशाही काही जागा आहेत जिथे आपल्याला पुढे जाण्यासाठी जवळपास रांगत जावे लागते.
या सर्व कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोक आणि स्थूल लोकांना गुहेत आत जाणे कठीण आहे. त्यांनी जाऊ नये असेच मी सुचवेन. गुहेचा फक्त एक लहानसा भाग लोकांसाठी खुला आहे.
पावसाळ्यात गुहेत पाणी भरते आणि त्यामुळे त्यावेळी लोकांना गुहेत जाण्याची परवानगी नाही.
ही चुनखडीची गुहा आपल्याला त्यातील नैसर्गिक रित्या तयार झालेल्या विविध आकृतींमुळे आश्चर्यचकित करते.
लेण्या, धबधबे, ढग आणि घनदाट जंगले आणि चांगल्या स्वभावाचे लोक आणि हस्तकला - आणखी किती कारणे हवीत- मेघालयात जाण्याचे ठरवण्यासाठी?!!!
सोहरामध्ये बरीच रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. आम्ही आमच्या प्रवासाच्या दोन महिने आधी ओयोवर हॉटेल बुक केले होते. ओयोच्या ईशान्य हॉटेल्स असोसिएशनशी झालेल्या वादाला धन्यवाद!! कारण त्यामुळे ऐनवेळी तिथे गेल्यावर त्या हॉटेलने जागा दिली नाही आणि रात्रीच्या वेळी, रस्त्यांवर दिवे नसलेल्या एका नव्या गावात, पुन्हा हॉटेल शोधण्याचा थरार आम्हांला अनुभवता आला.
परंतु आमचा ड्रायव्हर खरोखर शांत आणि धीराचा होता. बरेच फिरल्यावर आणि नेटवर शोधल्यावर आम्हाला एक सुयोग्य हॉटेल मिळू शकले.
हॉटेलचे नाव 'कोनिफेरस रिसॉर्ट' होते. नाव रिसॉर्ट असले तरी हॉटेलच आहे हे. जवळ एक लहानसा पाण्याचा प्रवाह, झरा वाहत होता. हॉटेलचे रेस्टॉरंट आम्ही गेलो तेव्हा ठीक ठीकच होते. मला वाटते त्यांचा नेहमीचा स्टाफ तेव्हा नव्हता. त्यामुळे गेलो त्या रात्री बाहेर जेवायला जायला लागले नाही इतकी सोय होण्यापूरेसाच आम्ही त्या रेस्टॉरंटचा लाभ घेतला.
Coniferous resort
Sunrise viewed from the balcony
सोहरा बघण्यासाठी, एकतर आपण शिलॉंगहून एक दिवसाची सहल करू शकता किंवा सोहरामध्ये राहू शकता. आम्ही दोन रात्री आणि दोन दिवस सोहरामध्ये थांबलो होतो.
सोहरा येथे शाकाहारी जेवणासाठी माझी शिफारस 'ऑरेंज रुट्स' हॉटेल असेल. ऑरेंज रूट्स ह्या नावाचे मूळ चेरापुंजी.. ऑरेंज ग्रोव्ह - संत्र्यांची बाग या शब्दात सापडते.
रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ आहे, जेवण चवदार आहे आणि रेस्टॉरंटमधून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे!
View from the restaurant
जेवणाची अमर्यादित थाळी पण चांगली होती. पण दुर्दैवाने माझ्याकडे त्याचे फोटो नाहीत. बहुधा जेवण आल्यावर फोटो काढण्याइतका संयम उरला नसेल!!
सोहरामध्ये इतके सगळे बघण्याजोगे आहे, आनंद अनुभवण्याजोगे आहे. त्यामुळे शिलॉंग हुन एक दिवसाची ट्रिप घाईघाईत उरकू नये असेच मी सुचवेन. सोहरा मध्ये किमान दोन दिवस तरी राहायलाच हवे.
मस्त मजा आली लेख वाचून. उमीअम्ं लेक चे फोटो आंणि त्यातील ढगांच खेळ पाहून मजा वाटली. Lockdown मधे प्रवासासाठी डोळे लावून बसल्रेल्या मनाला थोडी तरी शांतता लाभली. पण त्याचबरोबर प्रवासाची आणि खसकरूना सोहराची ओढ लावून गेली.
मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते. असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे. गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...
नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह. अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली. ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे. आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...
पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...
कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव. गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...
आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे. पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...
ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच. देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....
आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते, "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही. 📷Samrat Darda सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....
📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती. उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते. इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...
रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...
आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो. हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते. नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली. असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट...
मस्त मजा आली लेख वाचून. उमीअम्ं लेक चे फोटो आंणि त्यातील ढगांच खेळ पाहून मजा वाटली. Lockdown मधे प्रवासासाठी डोळे लावून बसल्रेल्या मनाला थोडी तरी शांतता लाभली. पण त्याचबरोबर प्रवासाची आणि खसकरूना सोहराची ओढ लावून गेली.
ReplyDeleteखूपच सुंदर आहे. तू तर कितीतरी सुंदर सुंदर फोटो काढशील!
DeleteVideo कुठेय
ReplyDeleteOh.. web version try कर. मोबाईल वर नाही दिसल्या का?
Deleteviewed description of Beautiful Meghalaya. Felt like visiting .
ReplyDeleteThanks! Yes..a must visit place!
Deleteमस्त आहे लेख...प्रत्यक्ष तिकडे गेल्यासारखे वाटले
ReplyDeleteधन्यवाद प्रतिमा!
Delete