Skip to main content

बृहदेश्वर मंदिर - चोला वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना

आज आपण बृहदेश्वर ला जाणार आहोत. जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, असे शिवलिंग ज्या मंदिरात आहे, ते हे मंदिर! ज्याचे शिखर (विमान) जगातील सर्वात उंच मंदिर शिखरांपैकी एक आहे, असे हे मंदिर!
गोपुर आणि विमान ह्या दोन संकल्पनांमध्ये बऱ्याचदा गोंधळ होऊ शकतो. गोपुर हे प्रवेशद्वारावर असते तर विमान /शिखर हे गर्भगृहावर असते. अनेक वर्षे बृहदेश्वरचे शिखरच जगातील सर्वात उंच शिखर होते. पण नव्यानेच बांधलेले वाराणसीमधील मंदिर आणि अजून जे बांधून होते आहे असे वृन्दावनमधील कृष्णाचे मंदिर ही दोन मंदिरे आता जगातील सर्वात उंच शिखर/विमान असणारी मंदिरे आहेत.
बृहदेश्वर 
 कुठे आहे हे बृहदेश्वर? तामिळनाडूमधील तंजावर मध्ये हे मंदिर आहे. हो.. बरोबर! तेच हे तंजावर, जे कावेरी नदीच्या तीरावर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी राजे सतराव्या शतकात राज्य करत होते आणि नंतर त्यांचे वंशज जिथे राज्य करीत होते. तेच हे तंजावर, जिथे विविध विषयांवरील हजारोंच्या संख्येने दुर्मिळ पुस्तके असलेले विश्व विख्यात सरस्वती महाल वाचनालय आहे. हे तेच तंजावर, जे तंजावर शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तेच हे तंजावर जिथे भरतनाट्यम नृत्याला, कर्नाटक संगीताला सुविहित रूप देणारी चार भावंडे, सुप्रसिद्ध तंजावर चौकडी जन्माला आली. 
पण ह्या सगळ्यासाठी प्रसिद्ध होण्याच्याही कितीतरी आधीपासून तंजावर प्रसिद्ध होते ते बृहदेश्वर मंदिरासाठी. हे मंदिर बांधले गेले १०१० मध्ये, म्हणजे बरोब्बर १०१० वर्षांपूर्वी!! महान राजा राजराजा चोला प्रथम ह्याने हे मंदिर बांधले आणि म्हणूनच ह्याचे नाव राजराजेश्वर मंदिर असे देखील आहे.
जेव्हा हा राजा सत्तेवर आला तेव्हा चोलांचे राज्य अगदी छोटे होते. पण नंतर राजराजा प्रथम ह्याने अतिशय कार्यक्षम सैन्य आणि शक्तिशाली नौदल उभारले. त्यांच्या जोरावर आपले छोटेसे राज्य, एक मोठे साम्राज्य बनवले. त्याने श्रीलंकेवर स्वारी करून लंका जिंकली होती तसेच त्याच्याच कार्यकाळात त्याच्या मुलाने, राजेंद्र प्रथम ह्याने पार श्रीविजय राज्यापर्यंत म्हणजे आजचे इंडोनेशिया आणि जवळपास सगळेच दक्षिण पूर्व आशिया इथपर्यंत मोहीम नेऊन तेथपर्यंत आपले राज्य वाढवले होते. आपण ह्या मोहिमांचे संदर्भ आधीच्या काही लेखांत वाचले होतेच. 
चोलांच्या नंतर ह्या प्रदेशावर राज्य केले ते पांड्या, नंतर नायक आणि त्या नंतर मराठ्यांनी. ह्या सर्वानी बृहदेश्वर मंदिराच्या आवारात आणखी काही मंदिरे उभारली. पण सुदैवाने ही नंतर उभारलेली मंदिरे देखील मूळ आराखड्याच्या सौंदर्यात भर घालतील, अशाच रीतीने उभारली गेली. 
ब्रिटिशांनी जेव्हा हा भाग काबीज केला होता तेव्हा म्हणजे साधारण १७७२- १८०१ मध्ये हे मंदिर, ब्रिटिश सैनिकांच्या बराकी म्हणून वापरले गेले आणि मंदिराचे बरेच नुकसान झाले. महाराज सर्फोजी राजे भोसले ह्यांनी १८०१ मध्ये पुढाकार घेतला आणि मंदिराची दुरुस्ती, संगोपन ह्यात लक्ष घातले. आज देखील भोसल्यांचेच वंशज मंदिराची व्यवस्था बघतात. 
इथे मला तुम्हाला काहीतरी सांगायचे आहे. जेव्हा मी जूनमध्ये अधिकृतरीत्या माझा प्रवास वर्णनाचा हा ब्लॉग लिहायला सुरुवात केली तेव्हा मला सारखे वाटत होते की आपल्याला ह्या सगळ्या मूर्तींच्या मागचा अर्थ माहिती असायला हवा. मूर्तिशास्त्राची, इंडॉलॉजीची माहिती हवी. तसे तर आपल्याला सगळ्यांनाच आपण प्राचीन मंदिरे, लेण्या पाहत असतो तेव्हा असेच वाटत असते. पण पावलो कोएलो ने अल्केमिस्ट मध्ये लिहिले आहे ," जेव्हा तुम्ही कशाची तरी मनापासून इच्छा करता तेव्हा हे संपूर्ण विश्व तुम्हाला ती गोष्ट मिळवून देण्यासाठी काम करायला लागते!" माझ्या बाबतीत तसेच झाले. VivekSaptahik मध्ये आलेली एका ऑनलाईन कोर्स विषयीची जाहिरात मला दिसली
ह्या वर्गात Virasat च्या इंद्रनील बंकापूरे ह्यांनी अत्यंत बारकाईने आणि सहनशीलतेने आम्हाला हिंदू मंदिरातील शिल्पकलेविषयी समजावून सांगितले. ह्यामुळे भारतीय तत्वज्ञान, वास्तुकला, कला आणि संस्कृती ह्याविषयी जास्तच उत्सुकता निर्माण झाली.
नंतर माहिती मिळाली ह्याच क्षेत्रात काम करणाऱ्या Haaक ह्या संस्थेविषयी आणि अगदी जेव्हा मी बृहदेश्वर मंदिराची पोस्ट लिहिण्यासाठी अभ्यास करत होते तेव्हाच haaक च्या क्षेत्रभेटीत (अर्थात ऑनलाईन क्षेत्रभेट!), उत्साही आणि ज्ञानी वक्त्या केतकी पटवर्धन ह्यांच्याबरोबर बृहदेश्वर ला भेट देता आली. खरेच संपूर्ण विश्व माझ्या मनातली इच्छा पूर्ण करण्यासाठी झटते आहे की नाही!! 
इतक्या मोठ्या प्रस्तावनेनंतर, चला तर जाऊ या आता बृहदेश्वर ला! जेव्हा तुम्ही ह्या मंदिराच्या जवळ येता तेव्हा प्रथमदर्शनीच भारावून जाण्याची अनुभूती मिळते. प्रचंड मोठे शिखर दुरूनही दिसते. मंदिराची भौमितिक रचना आहे आणि ती अगदी गणिती अचूकतेने उभारण्यात आली आहे. जेव्हा तुम्ही प्रवेशद्वाराशी उभे राहता, तेव्हा बाहेरचे गोपुर, आतले गोपुर, नंदी मंडप आणि मुख्य मंदिर सगळे अगदी एका सरळ रेषेत आहेत. ह्या फोटोत तुम्हाला हे दिसेलच. 
मुख्य प्रवेशद्वारा बाहेर 
गोपुरावरील सुंदर मूर्ती 
प्रवेशद्वार 
आहे ना हा वास्तुकलेचा विलक्षण सुंदर नमुना?! प्रवेशद्वारावर, गोपुरावर शेकडो प्रमाणबद्ध सुंदर मूर्ती आपल्याला दिसतात आणि पुढे आपल्याला चोला वास्तुशैलीचे अद्वितीय उदाहरण पाहायला मिळणार आहे ह्याची चुणूक दिसते.
फोटो काढण्याचे कसे थांबवणार?!!!
बृहदेश्वर ह्या नावात जाणवते ते सगळे गुण ह्या मंदिरात आहेत. ते उंच आहे, रुंद आहे, भव्य आहे, दणकट आहे, शक्तिवान आहे, सुंदर आहे... सगळे काही आहे. हा परिसरच भव्य आहे. नायक राजांनी ह्या मंदिराभोवती एक छोटा किल्ला, त्याच्या भोवती खंदक आणि एक तळेदेखील आहे असा किल्ला बांधला आहे. त्याचे नाव शिवगंगा. 
मंदिराचे प्राकार अतिशय भव्य आहे. त्यात अनेक मंदिरे आहेत. गणपती, कार्तिकेय म्हणजेच सुब्रमण्यम, पार्वती माता ही त्यातली काही मंदिरे. मी तुम्हाला ह्या प्राकाराच्या स्वरूपाविषयी कसे बरे सांगू? थांबा, मी १७ ऑगस्ट २०१८ ला काढलेला एक छोटासा व्हिडिओच बघा. म्हणजे तुम्हाला नीट कल्पना येईल. 
सुब्रमण्यम मंदिरात अतिशय शोभिवंत असे खांब असलेली रचना आहे. हे खांब अर्धे भिंतीत आहेत, आणि अर्धी बाहेर असलेली बाजू कोरीवकाम केलेली आहे. 
सुब्रमणियम मंदिर 
📷गिरीश टिळक 
गणपती मंदिर तसे त्या मानाने साधे आहे पण त्याचे शिखर मात्र कोरीव कामाने सजवलेले आहे. नऊ मजली इमारत असावी तेवढे उंच हे शिखर आहे.
गणेश 
📷गिरीश टिळक 

प्राकाराच्या बाहेरच्या भागाच्या केंद्रस्थानी आहे नंदी मंडप. हा महाकाय नंदी एकाच पाषाणातून अखंड कोरलेला आहे. किती असेल ह्याचा आकार? तर हा सोळा फूट लांब आणि तेरा फूट उंच आहे. 
नंदी 
📷गिरीश टिळक 
त्याच्या छतावरची चित्रे ही नंतरच्या म्हणजे बहुधा नायक राजांच्या काळातील असावीत असे म्हणतात. 
नंदी मंडप 
आता आपण मुख्य मंदिराकडे जाऊ या. प्राकाराच्या मागच्या भागाच्या अर्थातच केंद्रस्थानी आहे हे मुख्य मंदिर. 
शिवलिंगाची उंची आहे २. ७ मीटर! इतक्या उंच पिंडीच्या अभिषेकासाठी चक्क एक गॅलरीच बांधलेली आहे. मंदिरात फोटो काढायला परवानगी नाही. 
मंदिर सांधारा पद्धतीचे आहे. म्हणजे प्रदक्षिणा मार्ग आहे तो खांबा खांबांच्या गॅलरी ने बंदिस्त केलेला आहे. खालच्या भागात काही चित्रे रंगवलेली आहेत. वरच्या भागात १०८ नृत्यमुद्रा दाखवणाऱ्या मूर्ती आहेत. आपण आधी पाहिलेच होते की भरतनाट्यम नृत्याला आत्ताचे सुविहित रूप देण्यात बृहदेश्वरचा आणि तंजावरचा मोठा वाटा आहे. 
राजराजा १ला गुरूंच्या समवेत 
📷विकिपीडिया 
ते भव्य शिखर ज्याच्यामुळे मंदिराला बृहदेश्वर किंवा मोठे मंदिर हे नाव मिळाले ते शिखर आहे २१६ फूट उंचीचे! म्हणजे साधारण २१ मजली इमारती इतक्या उंचीचे! शिलालेखांतून त्याचा उल्लेख दक्षिण मेरू म्हणून केलेला आढळतो. 
मंदिर 
बृहदेश्वर मंदिर 
शिखराचा दोन मजली प्रस्तर आहे. त्यावर विविध मूर्ती कोरलेल्या आढळतात. त्यात प्रामुख्याने शिवाच्या मूर्ती दिसतात. शिखराच्या मध्ये आपल्याला काही खिडक्या देखील दिसतात. प्रस्तराच्या वर तेरा ताल आहेत. ताल म्हणजे शिखरावर असलेले मजले किंवा थर. वर जाताना हे क्षेत्रफळाने कमी कमी होत जातात आणि म्हणूनच शिखराला निमुळता आकार येतो.
तालांच्या वर अष्टकोनी पायावर बसवलेला गोल घुमट, कळस आहे. हा भाग आतून पोकळ आहे. नंदी प्रमाणेच हा देखील एका पाषाणातून कोरलेला असा अखंड, अवाढव्य कळस आहे. वजन आहे अवघे ८० टन. त्यावर एक तांब्याचा कलश आणि त्यावर सोन्याचा शिरोबिंदू स्थापिलेला आहे. 
मंदिराच्या भिंतींवर वेगवेगळ्या शतकात कोरले गेलेले विविध शिलालेख आहेत. 
शिलालेख 
शिलालेख 
राजाने आणि राजपरिवाराने मंदिराला दिलेल्या विविध देणग्या, भेटी, जडजवाहीर ह्यांची यादीच ह्या शिलालेखात दिलेली दिसते. ह्याखेरीज मंदिर कोणी, कसे, कधी उभारले? त्या सर्व कारागिरांची नावे, कोणत्या पूजा कधी, कशा व्हाव्यात? कोणी कराव्यात? त्याचा विधी काय? अगदी हे सगळे देखील शिला लेखात सविस्तर लिहिलेले आढळते. इतक्या सविस्तर नोंदी ठेवणारे हे कदाचित एकमेव मंदिर असावे. शिलालेखांचे १०७ परिच्छेद आहेत. 
शिखरातून वाहत येणाऱ्या पावसाच्या पाण्याला वाट करून देणारे पन्हाळ देखील अगदी बघण्याजोगे आहेत. 
मी तो भारवाही - पाण्याचे पन्हाळ 
बृहदेश्वर 
बृहदेश्वर हे भारतातील सर्वात जास्त पर्यटक भेट देतात अशा स्थानांपैकी एक आहे. शिवभक्त, वास्तुशास्त्र आणि इंडॉलॉजी चे अभ्यासक, पर्यटक, आंतरराष्ट्रीय पर्यटक आणि विद्वान लोक बृहदेश्वरला अनेकदा भेट देत असतात. छायाचित्रकारांसाठी तर तो स्वर्गच आहे. तुम्ही सकाळी लवकर भेट देऊन ह्या वातावरणाचा आनंद अनुभवू शकता. आम्ही तर सकाळी सहा वाजताच मंदिरात पोचलो होतो. त्यामुळे आकाशातल्या अनोख्या रंगछटा आणि उंचच उंच कळस ह्यांचे अद्भुत दर्शन झाले.
केवळ अद्भुत!
बृहदेश्वरचा समावेश युनेस्कोच्या विश्व वारसा स्थळांमध्ये द ग्रेट लिविंग चोला टेम्पल्स म्हणून झाला आहे. ह्या मध्ये बृहदेश्वर सोबतच गंगाईकोंडा चोलापूरम मंदिर आणि ऐरावतेश्वर मंदिर ह्यांचा समावेश आहे. लिविंग टेम्पल चा अर्थ आहे की जिथे पूर्वीपासून आजपर्यंत, अजूनही पूजा अर्चा होते आहे असे मंदिर. 
चोलांच्या शिवभक्तीचा बृहदेश्वर हा एक अप्रतिम पुरावा आहे. ते एक शैव संप्रदायाचे, चोला काळातील वास्तू शास्त्र, शिल्पकला, गणित, धातुशास्त्र आणि चित्रकलेतील प्राविण्याचे, प्रगतीचे अनुपम उदाहरण आहे. बृहदेश्वर मंदिर पाहून, तुमचे मन पुन्हा एकदा महान भारतीय वारसा, भारतीय कला आणि संस्कृती ह्या विषयीच्या अभिमानाने भारावून जाते.
राजा राजराजेश्वर स्वतःला शिवपाद शेखर म्हणवून घेत असे. शिवपाद शेखर चा अर्थ आहे, ज्याचा मुकुट शिवाच्या चरणी अर्पण केलेला आहे, जो शंकरा समोर नतमस्तक आहे. त्याने बहुधा शिवाचे, देवांच्या सर्वश्रेष्ठ शक्तीचे, सर्वत्र असणारे, सार्वकालिक महान अस्तित्व जगाला दाखवून देण्यासाठी, जाणवत राहावे म्हणूनच इतक्या भव्य राजराजेश्वर अर्थातच बृहदेश्वर मंदिराची निर्मिती केली. 
ह्यातील मूर्तींच्या विषयी अधिक जाणून घ्यायचे असेल तर वाचा ब्लॉगचा दुसरा भाग 



#TallestTempleInTheWorld #BrihdeshwarTempleFacts #TallestShivTemple #TheBigTemple
#TamilnaduTemples #HinduShivTemple #11thCenturyTemple #TallShivling


Comments

  1. Replies
    1. धन्यवाद अरुंधती! तू नियमितपणे वाचून कॉमेंट्स लिहितोस, फार हुरूप येतो त्याने! 

      Delete
  2. मावशी, खूप सविस्तर माहिती दिली आहेस. प्रवास हा एक अभ्यासाचं आहे, तो तुम्हाला प्रगल्भ बनवतो. हे मंदिर नक्की पाहीन मी. तुझं अभ्यासपूर्ण लेखन, फोटो यामुळे बरीच माहिती कळली. मी गेल्या आठवड्यात श्री वाघेश्वर मंदिर बघून आलो, त्याचा vlog केला आहे. तो तुला पाठवतो.
    - सचिन प्रदिप खरे.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...