मुख्य सामग्रीवर वगळा

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'


कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही. 
 गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात. गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!!
उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो. 
सूर्योदय 
विहंगम दृश्य 
विहंगम दृश्य 
जवळच अगदी मोक्याच्या ठिकाणी असलेला सदाशिवगड खरे तर पाहण्याजोगा असणार. पण आता तिथे खाजगी रिसॉर्टस झाल्याने पर्यटकांसाठी प्रवेश बंद आहे. फक्त त्या रिसॉर्टस मध्ये राहणारे लोकच वरपर्यंत जाउ शकतात. 
सदाशिवगडवर असलेल्या दुर्गा देवी मंदिरापर्यंत सर्वजण जाउ शकतात. सतराव्या शतकातील हे मंदिर आणि ह्यातील दुर्गादेवीची प्रतिमा प्रसन्न आहे. तिच्या चेहऱ्यावरील प्रसन्न भावांमुळे ती शांतादुर्गाच वाटते. 
देवीचे मराठी पद्धतीने नेसवलेले लुगडे पाहून उत्सुकता वाटली. मग कळले की छत्रपती शिवाजी महाराज सदाशिवगडावर येऊन गेलेले आहेत आणि हे मंदिर त्यांनी निर्माण करवून घेतले आहे. 
दुर्गा देवी 

दुर्गा देवी मंदिर 

दुर्गा देवी 
मंदिराची व्यवस्था चांगली ठेवली आहे. संचालक किंवा व्यवस्थापक मंडळापैकी तिथे जे उपस्थित असतील ते आणि मंदिरातील पुजारी अगदी आत्मीयतेने सर्व माहिती देतात. 
मंदिराच्या बाहेर लावलेली पाटी आवडली. सगळीकडे अशी पाटी लावण्याची आवश्यकता आहे! 
मंदिराबाहेरची पाटी 
 कारवारमध्ये हिंडण्यासाठी रिक्षा सोयीची पडते. रिक्षाने गेले लहान रस्त्यांवरून पण जाता येते. शहरातील काळी रिव्हर गार्डन संध्याकाळच्या वेळी निवांत वेळ घालवण्यासाठी ठीक आहे. विशेष बघण्याजोगे असे तिथे काही नाही. स्वच्छ ठेवलेली आहे आणि बोटिंग तिथून सुरु होते. 
तिथली एक पाटी ह्या स्वच्छतेचे गुपित सांगणारी होती. 
आवश्यक पाटी 
येणाऱ्या पर्यटकांनी कचरा मागे ठेवला नाही, घाण केली नाही तर कोणतीही जागा स्वच्छ राहू शकेल!!
कारवार 
काळी रिव्हर ब्रिज आणि सदाशिवगड 
कारवारमध्ये रवींद्रनाथ टागोर बीच आहे. ज्यांना माहिती नाही त्यांच्यासाठी - रवींद्रनाथांचे मोठे भाऊ म्हणजे सत्येंद्रनाथ टागोर. १८८२ मध्ये सत्येंद्रनाथांची नेमणूक कारवारला जिल्हा न्यायाधीश म्हणून झाली होती. त्यांना भेटण्याच्या निमित्ताने रवींद्रनाथ कारवारला १८८३ साली आले होते. मुळातच कारवार हे निसर्गसृष्टीने आणि सौंदर्याने संपन्न. विशी बाविशीच्या ह्या कवी वृत्तीच्या युवकावर कारवारच्या समुद्रकिनाऱ्याची आणि निसर्गसौंदर्याची मोहिनी पडली नसती तरच नवल होते. रवींद्रनाथांनी कारवारच्या समुद्राकडे बघत कविता लिहिल्या. 'प्राकृतिर प्रतिशोध' हे नाटक लिहिले. निसर्गसुंदर बंगालमधून आलेल्या ह्या कवीलाही कारवारने भुरळ घातली ह्यावरून त्याकाळी कारवार किती सुंदर आणि रम्य असेल ह्याची आपण कल्पना करू शकतो. 
हा बीच देखील स्वच्छ आणि शांत आहे. आम्ही गेलो तेव्हा तिथे स्थानिक मुले वाळूत खेळात होती. गुरे हिंडत होती. त्यांचीही वासरे खेळत होती!!
रवींद्रनाथ ठाकूर समुद्रकिनारा 
रवींद्रनाथ ठाकूर समुद्रकिनारा
ह्या बीच कडे येणाऱ्या रस्त्यावर एका बागेत शिवाजीमहाराजांचा एक पुतळा दिसला. अगदीच वेगळ्या चेहऱ्या मोहऱ्याचे शिवाजीमहाराज आहेत हे!! डोळे मात्र अगदीच जमलेले नाहीत.
छत्रपती शिवाजी महाराज 
ती बाग आणि परिसर म्हणजे फेरीवाल्यांचे, बेघर लोकांचे विश्रांतीस्थान दिसत होते. एकूण अवकळाच वाटली. 
रवींद्रनाथ टागोर बीचपासून चालत जाण्याच्या अंतरावर आयएनएस चॅपल युद्धनौका संग्रहालय आहे. रॉक गार्डन आहे. 
 रॉक गार्डन मात्र पाहण्याजोगी आहे. हजारो वर्ष जुने असे काही नैसर्गिक विशाल शिलाखंड आपल्याला इथे पाहायला मिळतात. तसेच कर्नाटकातील काही वनवासी जमातींचे, त्यांच्या आयुष्याचे चित्रण मनुष्याकृती पुतळ्यांच्या माध्यमातून केले आहे. 
त्यांची वस्त्रे, अन्न, राहणीमान, चालीरीती ह्यांचे चित्रण प्रभावीपणे केलेले दिसते. तसेच ह्या ठिकाणाहून दिसणारा समुद्र आणि सूर्यास्ताचा देखावा मनोहर आहे. 
समुद्राच्या लाटा, सूर्यास्ताच्या वेळी उडणारे पक्षी, आजूबाजूची शांतता, रॉक गार्डन मधील रस्ते सगळे मिळून एक निवांत शांत संध्याकाळ अनुभवता येते. 
रॉक गार्डन 
कोळी कुटुंब पुतळे आणि सूर्यास्त 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
हल्लकी 
पद्मश्री सुकरी बोम्मागौडा 
हल्लकीची कोकिळा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सुकरी बौमागौडा ह्यांनी हलक्की संगीत प्रसारासाठी मोठे काम केले आहे. त्यांचे मागच्या वर्षी फेब्रुवारी २०२५ मध्ये निधन झाले. 
रॉक गार्डन 
रॉक गार्डनमधून समुद्र 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 
रॉक गार्डन 

ह्या रॉक गार्डन मध्ये प्रत्येक पुतळ्याच्या सर्व माहितीचे खरे तर चांगले फलक लावलेले आहेत. पण काळाच्या आणि दुर्लक्षाच्या ओघात ते अस्पष्ट झाले आहेत. मुळातले इतके सुंदर असलेले पुतळेही निगा न राखल्याने खराब होऊ लागले आहेत. असे का असे तिकीटखिडकीवर विचारले असता काही कोर्ट केस चालू आहे, त्यामुळे निगा राखण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध नाही असे कळले. 

प्रवेश फी चाळीस रुपये आहे. पर्यटकांची गर्दी आम्ही गेलो तेव्हा तरी नव्हती. म्हणजे त्यातून फारसे पैसे मिळत नसणार.

इतक्या चांगल्या कलाकृती दुर्लक्षामुळे भग्न होऊन जाऊ नये असे मात्र तीव्रतेने वाटत राहते. 

आम्ही हॉटेल स्टर्लिंगमध्ये राहिलो होतो. व्यवस्था, स्वच्छता चांगली आहे. समुद्र अगदी आपल्या गॅलरीतून बघत बसता येतो. 

हॉटेल स्टर्लिंग 
स्टर्लिंग हॉटेलजवळच उडुपी कॅफे नावाचे एक चांगले शाकाहारी रेस्टोरंट होते. तेथील अन्नाची चव चांगली होती. 

आम्ही आमच्या कोस्टल कर्नाटक ट्रिपच्या शेवटी कारवारला गेलो होतो. आधीचे मंगलोर, मणिपाल, शृंगेरी, कासारगोड, मुर्डेश्वर, गोकर्ण महाबळेश्वर आदी ठिकाणांचा, तिथल्या निसर्गसौंदर्याचा, मंदिरांचा, स्वच्छतेचा, जंगलांचा, नद्यांचा, समुद्राचा ठसा मनावर इतका गडद होता की त्या तुलनेत कारवार आवडले नाही. पण हा तर कारवारवर अन्याय झाला!! त्यामुळे आता पुन्हा एकदा नुसते कारवार अनुभवायला जायलाच पाहिजे आहे! 

#कारवार, #कारवारपर्यटन, #समुद्रकिनारा, #मराठीट्रॅव्हलब्लॉग, #प्रवासवर्णन, #वीकेंडट्रिप, #कर्नाटकपर्यटन, #हॉटेल स्टर्लिंग #उडुपी कॅफे,# कोस्टल कर्नाटक #Karwar, #KarwarTourism, #KarwarDiaries, #HiddenGemIndia, #TravelBlogMarathi, #PlacesToVisitInKarwar, #KarwarBeaches, #WeekendGetaway, #KonkanCoast #coastalkarnataka 





टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...