मुख्य सामग्रीवर वगळा

Hangzhou - चीनमधील नंदनवन - भाग १ 

 माणसाला स्वर्गाच्या आणि नंदनवनाच्या कल्पनेचे कायमच आकर्षण वाटत राहिले आहे. म्हणूनच जेव्हा एखाद्या ठिकाणी त्याला खूप सुख वाटते, आनंद होतो तेव्हा त्या ठिकाणाला नंदनवन म्हटले जाते. प्रत्येक देशात असे किमान एक तरी नंदनवन असतेच असते! आज आपण जाणार आहोत हांगचो (Hangzhou) ला, सर्वात जास्त लोकसंख्या देशातील- चीन मधील हे नंदनवन. 

चिनी भाषेत एक म्हण आहे कि वर स्वर्गात नंदनवन आहे तर इथे जमिनीवर सूहांग आहे. सूहांग हि दोन शहरे आहेत. सूचो (Suzhou) आणि हांगचो (Hangzhou). दोन्हीही शहरे फार सुंदर आहेत. दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र ब्लॉग पोस्ट हवीच. म्हणून हि पोस्ट फक्त हांगचो (Hangzhou) बद्दल. तरी देखील नुसते हांगचो (Hangzhou) बद्दल लिहायचे म्हटले तरी दोन पोस्ट झाल्या! 

हांगचो (Hangzhou) हे शांघाई पासून साधारण २०० किलोमीटर वर आहे. म्हणजे बुलेट ट्रेन ने साधारण एक तास. शांघाई हुन सतत ट्रेन्स आहेतच. म्हणजे समजा तुम्ही एका दिवसात जाऊन यायचे ठरवलेत आणि अगदी लवकर शांघाई वरून निघालात तरी चालू शकते. पण मी म्हणेन कि किमान दोन दिवस तरी हांगचो (Hangzhou) साठी ठेवाच. म्हणजे अगदी आरामात हांगचो (Hangzhou) पाहता येईल, मनात साठवता येईल. 

हांगचो (Hangzhou) हे खूप वेगाने वाढणारे शहर आहे. चीन मधले, उद्योगांच्या दृष्टीने सर्वात चांगले शहर म्हणून मानाचे स्थान पटकावून आहे. महाबलाढ्य अशा अलीबाबा कंपनीचे मुख्य कार्यालय ह्याच शहरात आहे. इतरही अनेक उद्योग ह्या शहराला भरभराटीला आणत आहेत. इथे अनेक आधुनिक इमारती, तंत्रज्ञानाचे आणि बांधकामाचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. एक दीड वर्षातच तुम्ही सदासर्वकाळ ह्याच शहराचे नाव ऐकत असाल!! कारण इथे २०२२ चे आशियाई क्रीडास्पर्धा होणार आहेत. 

पण आज आपण हे अत्याधुनिक शहर बघणार नाही आहोत, तर आपण ह्या शहरातील तो भाग बघणार आहोत, ज्याच्यामुळे ह्या शहराला युनेस्कोच्या विश्व वारसास्थळ यादीत जागा मिळाली आहे.

ह्या भागात झालेल्या उत्खननानुसार आणि त्यात सापडलेल्या पुराव्यांनुसार हांगचो (Hangzhou) च्या परिसरात ७००० वर्षांपूर्वी देखील मानवी वस्ती होती. ऐतिहासिक पुरावे देखील २०० बी.सी. पासूनचे म्हणजे २२०० वर्षांपासूनचे सापडतात. मार्को पोलो ( तेरावे शतक), इब्न बतूता (चौदावे शतक), Odoric of Pordenone (तेरावे शतक) असे अनेक प्रवासी हांगचो (Hangzhou) ला जाऊन आले होते आणि त्यांनी देखील हे जगातील सर्वात सुंदर, भव्य शहर - जणू नंदनवनच असे वर्णन केले आहे.

सिल्क रूट वरील एक महत्वाचे शहर असल्याने जगभरातील प्रवासी आणि व्यापारी इथे येत असत. बीजिंग शी ग्रँड कॅनॉल ने जोडलेले असल्याने सतत वर्दळीचे शहर होते. 

हांगचो (Hangzhou) ला खूप सुंदर फुले,झाडे आणि शिल्पाकृती असलेली उद्याने आहेत. 

Musical Fountain Show

Statue of Chinese soldier 

Farewell to governor and great poet Bai Juyi(772-846)

Human touch!

Studies, a ' pretty ' serious way!

Discussion

वेस्ट लेक हि हांगचो (Hangzhou) ची ओळख आहे आणि युनेस्को ने घोषित केलेलं विश्व वारसा स्थळ आहे. अगदी प्राचीन काळापासून वेस्ट लेक त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. वेस्ट लेक हे नक्कीच चीनमधील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. त्याच्या सौंदर्याने अनेक कलाकारांना मोहित केलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला हांगचो (Hangzhou)च्या वेस्ट लेकचा उल्लेख असलेल्या शेकडो कविता, अनेक कादंबऱ्या, रोमांचक तसेच प्रणयरम्य कथा, कादंबऱ्या, लोककथा वाचायला मिळतील.

Boating around West lake

वेस्ट लेक हे एक गोड्या पाण्याचे तळे आहे. त्यात अनेक पूल, बंधारे, मंदिरे, पॅगोडा, बेटं आणि मंडप आहेत. कोणताही ऋतू इथे जाण्यासाठी उत्तमच आहे. कारण बदलणाऱ्या ऋतूनुसार दृश्य बदलले जाते आणि वेस्ट लेक कायम सुंदरच दिसत राहते. 

Baochu Pagoda as seen from the boat.


वेस्ट लेक मध्ये अनेक बेटं आहेत. त्यातील एक बेट, म्हणजे त्या बेटावरचे संपूर्ण गावच, हॉटेल मध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहे. एका बेटावर विविध कलाकौशल्य शिकवणारे वर्ग, दुकाने आहेत. प्राचीन काळी वेस्ट लेक त्यावरील भव्य प्रसादांसाठी, हवेल्यांसाठी प्रसिद्ध होते. 

From the boat

इथे दहा सुंदर स्थळांची यादी केलेली आहे. आपण त्यातील काही ठिकाणे बघू या. Three pools mirroring the moon हे एक मोठे बेट आहे ज्यावर अनेक दालने, मंडप, मंदिरे, पूल बांधलेले आहेत.

One of the three pagodas in the lake.

असे तीन पॅगोडाज पाण्यात आहेत. ह्यांचे चित्र चीनमधील नोटांवर दिसते. अंधाऱ्या रात्री जेव्हा ह्यात दिवा लावला जातो, तेव्हा त्या दिव्याचा प्रकाश पॅगोडाला असलेल्या छिद्रांच्या नक्षीतून पाण्यावर पडेल. पाण्यात ही प्रतिबिंबे हिंदकळत राहतील. पाण्यात जणू अनेक चंद्र आहेत असाच भास होत राहील. इतकी सुंदर कल्पना दुसऱ्या कोणाला सुचणार? अर्थातच एका कवीला अशी कल्पना सुचू शकते. हांगचो (Hangzhou) खूप सुदैवी आहे कि वेगवेगळ्या काळात दोन कवी इथे प्रशासक म्हणून आले आणि त्यांचा ठसा ह्या स्थानावर कायमचा उमटला आहे. 

हे पॅगोडाज आणि सु बांध हा सु शी (Su Shi) ह्या कवी असलेल्या प्रशासकाने त्याच्या कार्यकाळात म्हणजे १०८६-१०९४ मध्ये बांधले. अर्थातच त्यानंतर अनेकदा परत बांधणे किंवा नूतनीकरण करणे असे चालू राहिले. 


Pavilions

Dongpu Bridge on Su Causeway


Causeway

"एक असते तळे, त्यावर असते एक बेट, त्या बेटावर असते एक तळे आणि त्या तळ्यात असते एक बेट" असे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही, मी तुम्हाला कोडे घालत नाहीये, पण वेस्ट लेक मध्ये खरोखरच असे पाहायला मिळते!

An Island in the lake, lake on that island and a small island in that lake!

Wanzi मंडप त्याच्या १८७५ मध्ये असलेल्या मूळ आराखड्यानुसार पुन्हा २००५ मध्ये बांधण्यात आला. ह्याचा आकार स्वस्तिकासारखा आहे. स्वस्तिकाचा अर्थ बौद्ध धर्मात देखील, सगळीकडे शांती आणि कल्याण आहे असाच आहे. 
 
Wanzi Pavilion

पाणी, टेकड्या, डोंगर, सुंदर बेटं, पूल, बांध, मंडप, चबुतरे, फुले आणि विलो वृक्षांच्या ओळी ह्या सगळ्यामुळे वेस्ट लेकचे सौंदर्य आणि मोहकता वाढली आहे.

The exquisite color palate

Lotus

Lotus in West Lake - an inspiration for thousands of poems!

Flowers.. Flowers..everywhere



West lake and it's famous willows 


Famous Water Gardens in West lake.


Gardens on West lake


Where Bridge Meets It's Reflection!


Yue Fei हा अत्यंत शूर सरदार होता. त्या वेळी म्हणजे सॉंग घराण्याची राजवट असताना, हांगचो (Hangzhou) हि चीनची राजधानी होती. त्याचे स्मृतिस्थळ, बाग आणि मंदिर हे वेस्ट लेक वरील महत्वाच्या ठिकाणांमध्ये समाविष्ट आहेत. 

Yue Fei

Yue Fei हा त्याच्या शौर्यासाठी आणि निष्ठेसाठी प्रसिद्ध होता. असे म्हणतात कि त्याच्या आईने त्याच्या पाठीवर," पूर्ण निष्ठेने देशसेवा "हि अक्षरे गोंदवूनच घेतली होती.
 
Jinzhong Baoguo- Serve the nation with full loyalty


Traditional entrance.

Zonglie Temple.

मी तुम्हाला म्हणाले होते कि दोन कवी वेगवेगळ्या काळात हांगचो (Hangzhou)ला प्रशासक म्हणून लाभले होते. त्यातला एक होता Su Shi आणि दुसरा होता Bai Juyi (७७२-८४०). जेव्हा Bai Juyi,हांगचो (Hangzhou) ला प्रशासक म्हणून आला तेव्हा आधीच तो कवी म्हणून सुप्रसिद्ध होताच. इथे आल्यावर त्याने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे, एक धरण आणि बंधारा बांधून शेतकऱ्यांना दुष्काळापासून वाचवल्याने, एक उत्तम प्रशासक म्ह्णून देखील प्रसिद्ध झाला. 

 तळ्यावरून फेरफटका मारण्यासाठी दर वेळी बोटीने जायला लागायचे. त्याला कंटाळून त्याने एक बांध बांधण्याचे आदेश दिले अगदी सुरुवातीला तो साधा पांढऱ्या वाळूचा बांध होता असा उल्लेख आहे. त्यावरून दिसणाऱ्या दृश्याविषयी Bai Juyi म्हणतो, "The east of the scenic west lake I love best, strolling the willow shaded white sand dike I enjoy most." आज हा एक चांगला प्रशस्त पक्का रस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, आणि विलो आणि पीच चे वृक्ष आहेत. जेव्हा पीच चे वृक्ष बहरत असतील तेव्हा त्या फुलांमुळे सगळेच दृश्य किती सुंदर दिसत असेल?



Bai Causeway

No caption needed!


वेस्ट लेक परिसरात फिरताना आपल्याला Jiuzi villa, Yi Yun Ji Lu Villa असे अनेक प्रासाद दिसतात. ते प्रासाद नयनरम्य स्थानासाठी आणि उत्कृष्ट वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात कि इथल्या उद्यानांमुळे अनेक जपानी आणि कोरियन बागांसाठी प्रेरणा मिळाली आहे.

कमळे, पीच, प्लम ची फुले आणि इतर अनेक फुलांसाठी वेस्ट लेक प्रसिद्ध आहे. Quianlong राजा ( १७३५-१७९५) वेस्ट लेक वर अधूनमधून राहायला यायचा. त्या साठी इथे Jiuxiang yard नावाचा राजवाडा बांधला होता. त्याचे नावच मुळी त्याने सुवासिक, सुरंगीच्या कुळातल्या Laurel flowers फुलांवरून ठेवले होते!

चिनी कथेनुसार हे वृक्ष ( Laurel trees ) गृध्रकूट पर्वतावर असतात. ह्या पर्वतावर ज्ञानप्राप्ती झाल्यावर बुद्ध राहिला होता असे मानले जाते. 



 
Pavilion in the Jiuxiang Yard

Laurel trees

 Leifeng Pagoda चा उल्लेख केल्याशिवाय वेस्ट लेक वरील कोणतीही पोस्ट लिहिताच येणार नाही. शाक्यमुनींचा पवित्र केस जपून ठेवण्यासाठी ९७७ A. D.मध्ये हा पॅगोडा उभारला गेला. हा अष्ट्कोनी पाच मजली पॅगोडा वेस्ट लेक च्या दक्षिण तटावर दिमाखात उभा आहे. मूळ पॅगोडा हा चिनी वास्तुरचनाशास्त्राचा एक अद्भुत अविष्कार होता. धर्म, वास्तुशास्त्र, निसर्ग आणि इतिहास ह्यांचे मिश्रण असलेला हा पॅगोडा अनेक कविता, कथा, दंतकथा, लोककथांमध्ये आलेला आहे. हजार वर्षे अनेक धक्के सोसूनही उभा असलेला हा पॅगोडा दुर्दैवाने १९२४ मध्ये कोसळला. मग त्यानंतर काही दशके वेस्ट लेक ह्यांच्याशिवाय सुनेच राहिले. पण मग १९२४ मध्ये,जुन्याच रचनेनुसार, पण बांधकामात धातू वापरून हा पॅगोडा उभारण्यात आला.

Leifeng Pagoda

Near the entrance.

भारतीय सम्राट आयु (अशोक) ह्याने दिलेला शुद्ध चांदीचा पॅगोडा, ड्रॅगन आणि कमळाच्या सिंहासनावर बसलेली बुद्धमूर्ती आणि बुद्ध धर्मातील काही पवित्र मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी तळघरात एक प्रासाद बांधण्यात आला होता. २०००-२००१ मध्ये जेव्हा उत्खनन झाले तेव्हा ह्या सगळ्या मौल्यवान वस्तू मिळाल्या. आता त्या पॅगोडातील वस्तू -संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.

Relics of the original Pagoda




Indian Emperor Ashoka's pure silver pagoda

Original Pagoda Model

Sakyamuni on Dragon Lotus Throne



Roof of the pagoda

Beautiful View from the top floor of the pagoda

वेस्ट लेक आणि हांग चो (Hangzhou ) मध्ये अजूनही अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक महत्वाच्या वास्तू होत्या. काही शतकांपूर्वी बांधल्या गेलेल्या ह्या वास्तू, काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही, (जरी त्यांच्या माहितीत लिहिलेले नसले तरी) सांस्कृतिक क्रांतीत नष्ट केल्या गेल्या. 

त्यातल्या काही नंतर परत बांधल्याही गेल्या. इथे काही पुरातन गुहा देखील आहेत. त्याविषयी बोलू या दुसऱ्या भागात. तोपर्यंत तुम्ही वेस्ट लेक च्या बांधांवरून, पुलांवरून फेरफटका मारून या. मग तुम्हालाही नक्की पटेल कि खरेच हे नंदनवन आहे!

#ParadiseInChina #WestLakeHangzhou #SuShi #BaiJuyi #LeiFengPagoda #SakymuniHair #IndianEmperorAyuAshoka #SuHang

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

मथुरेचे कृष्ण जन्मस्थान मंदिर: इतिहास, महत्त्व आणि दर्शन

  मथुरा म्हणजे कंस. मथुरा म्हणजे तुरुंग. हे खरे होतेच. पण मथुरा म्हणजे कृष्ण जन्म हे ही खरेच ना!  श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर  मथुरेच्या बाजाराला दही, दूध, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी तर अगदी बालवाडी पासूनच स्नेहसंमेलनात आपण सगळेजण पाहत आलो! पुढे नाटक, सिनेमा, वग या सगळ्यात या मथुरेने आपला पाठपुरावा केलेला असतो. शिवाय ‘अयोध्या केवल झांकी हैं ..काशी मथुरा बाकी हैं’ ही घोषणाही आपण ऐकलेली असतेच. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥  सप्तपुरी स्थान असलेली आणि श्रीकृष्णाच्या आधीपासून अगदी रामायण काळापासून असलेली ही मथुरा. शत्रुघ्नाने लवणासुराला मारून मथुरेची स्थापना केली असे पौराणिक कथांत वाचायला मिळते. वाल्मिकी रामायणांत देखील तसा उल्लेख आहे.  तर यमुनेच्या तीरावर असलेल्या या प्राचीन नगरी मथुरेला कृष्णजन्मभूमी पाहण्यासाठी आम्ही यावर्षीच्या श्रावणात म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला पोहोचलो. स्टेशनवर बाहेर पडताच अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले आपल्या भोवती गोळा होतात.  इथे ठाण्यात आपल्याला जिथे जायचे असेल तिथे यायला नकार देणारे रिक्षा...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...