माणसाला स्वर्गाच्या आणि नंदनवनाच्या कल्पनेचे कायमच आकर्षण वाटत राहिले आहे. म्हणूनच जेव्हा एखाद्या ठिकाणी त्याला खूप सुख वाटते, आनंद होतो तेव्हा त्या ठिकाणाला नंदनवन म्हटले जाते. प्रत्येक देशात असे किमान एक तरी नंदनवन असतेच असते! आज आपण जाणार आहोत हांगचो (Hangzhou) ला, सर्वात जास्त लोकसंख्या देशातील- चीन मधील हे नंदनवन.
चिनी भाषेत एक म्हण आहे कि वर स्वर्गात नंदनवन आहे तर इथे जमिनीवर सूहांग आहे. सूहांग हि दोन शहरे आहेत. सूचो (Suzhou) आणि हांगचो (Hangzhou). दोन्हीही शहरे फार सुंदर आहेत. दोन्ही शहरांसाठी स्वतंत्र ब्लॉग पोस्ट हवीच. म्हणून हि पोस्ट फक्त हांगचो (Hangzhou) बद्दल. तरी देखील नुसते हांगचो (Hangzhou) बद्दल लिहायचे म्हटले तरी दोन पोस्ट झाल्या!
हांगचो (Hangzhou) हे शांघाई पासून साधारण २०० किलोमीटर वर आहे. म्हणजे बुलेट ट्रेन ने साधारण एक तास. शांघाई हुन सतत ट्रेन्स आहेतच. म्हणजे समजा तुम्ही एका दिवसात जाऊन यायचे ठरवलेत आणि अगदी लवकर शांघाई वरून निघालात तरी चालू शकते. पण मी म्हणेन कि किमान दोन दिवस तरी हांगचो (Hangzhou) साठी ठेवाच. म्हणजे अगदी आरामात हांगचो (Hangzhou) पाहता येईल, मनात साठवता येईल.
हांगचो (Hangzhou) हे खूप वेगाने वाढणारे शहर आहे. चीन मधले, उद्योगांच्या दृष्टीने सर्वात चांगले शहर म्हणून मानाचे स्थान पटकावून आहे. महाबलाढ्य अशा अलीबाबा कंपनीचे मुख्य कार्यालय ह्याच शहरात आहे. इतरही अनेक उद्योग ह्या शहराला भरभराटीला आणत आहेत. इथे अनेक आधुनिक इमारती, तंत्रज्ञानाचे आणि बांधकामाचे चमत्कार तुम्हाला पाहायला मिळतील. एक दीड वर्षातच तुम्ही सदासर्वकाळ ह्याच शहराचे नाव ऐकत असाल!! कारण इथे २०२२ चे आशियाई क्रीडास्पर्धा होणार आहेत.
पण आज आपण हे अत्याधुनिक शहर बघणार नाही आहोत, तर आपण ह्या शहरातील तो भाग बघणार आहोत, ज्याच्यामुळे ह्या शहराला युनेस्कोच्या विश्व वारसास्थळ यादीत जागा मिळाली आहे.
ह्या भागात झालेल्या उत्खननानुसार आणि त्यात सापडलेल्या पुराव्यांनुसार हांगचो (Hangzhou) च्या परिसरात ७००० वर्षांपूर्वी देखील मानवी वस्ती होती. ऐतिहासिक पुरावे देखील २०० बी.सी. पासूनचे म्हणजे २२०० वर्षांपासूनचे सापडतात. मार्को पोलो ( तेरावे शतक), इब्न बतूता (चौदावे शतक), Odoric of Pordenone (तेरावे शतक) असे अनेक प्रवासी हांगचो (Hangzhou) ला जाऊन आले होते आणि त्यांनी देखील हे जगातील सर्वात सुंदर, भव्य शहर - जणू नंदनवनच असे वर्णन केले आहे.
सिल्क रूट वरील एक महत्वाचे शहर असल्याने जगभरातील प्रवासी आणि व्यापारी इथे येत असत. बीजिंग शी ग्रँड कॅनॉल ने जोडलेले असल्याने सतत वर्दळीचे शहर होते.
हांगचो (Hangzhou) ला खूप सुंदर फुले,झाडे आणि शिल्पाकृती असलेली उद्याने आहेत.
|
Musical Fountain Show
|
|
Statue of Chinese soldier
|
|
Farewell to governor and great poet Bai Juyi(772-846)
|
|
Human touch!
|
|
Studies, a ' pretty ' serious way!
|
|
Discussion
|
वेस्ट लेक हि हांगचो (Hangzhou) ची ओळख आहे आणि युनेस्को ने घोषित केलेलं विश्व वारसा स्थळ आहे. अगदी प्राचीन काळापासून वेस्ट लेक त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. वेस्ट लेक हे नक्कीच चीनमधील सर्वात सुंदर स्थळांपैकी एक आहे. त्याच्या सौंदर्याने अनेक कलाकारांना मोहित केलेले आहे आणि म्हणूनच तुम्हाला हांगचो (Hangzhou)च्या वेस्ट लेकचा उल्लेख असलेल्या शेकडो कविता, अनेक कादंबऱ्या, रोमांचक तसेच प्रणयरम्य कथा, कादंबऱ्या, लोककथा वाचायला मिळतील.
|
Boating around West lake
|
वेस्ट लेक हे एक गोड्या पाण्याचे तळे आहे. त्यात अनेक पूल, बंधारे, मंदिरे, पॅगोडा, बेटं आणि मंडप आहेत. कोणताही ऋतू इथे जाण्यासाठी उत्तमच आहे. कारण बदलणाऱ्या ऋतूनुसार दृश्य बदलले जाते आणि वेस्ट लेक कायम सुंदरच दिसत राहते.
|
Baochu Pagoda as seen from the boat.
|
वेस्ट लेक मध्ये अनेक बेटं आहेत. त्यातील एक बेट, म्हणजे त्या बेटावरचे संपूर्ण गावच, हॉटेल मध्ये रूपांतरित करण्यात आलेले आहे. एका बेटावर विविध कलाकौशल्य शिकवणारे वर्ग, दुकाने आहेत. प्राचीन काळी वेस्ट लेक त्यावरील भव्य प्रसादांसाठी, हवेल्यांसाठी प्रसिद्ध होते.
|
From the boat
|
इथे दहा सुंदर स्थळांची यादी केलेली आहे. आपण त्यातील काही ठिकाणे बघू या. Three pools mirroring the moon हे एक मोठे बेट आहे ज्यावर अनेक दालने, मंडप, मंदिरे, पूल बांधलेले आहेत.
|
One of the three pagodas in the lake.
|
असे तीन पॅगोडाज पाण्यात आहेत. ह्यांचे चित्र चीनमधील नोटांवर दिसते. अंधाऱ्या रात्री जेव्हा ह्यात दिवा लावला जातो, तेव्हा त्या दिव्याचा प्रकाश पॅगोडाला असलेल्या छिद्रांच्या नक्षीतून पाण्यावर पडेल. पाण्यात ही प्रतिबिंबे हिंदकळत राहतील. पाण्यात जणू अनेक चंद्र आहेत असाच भास होत राहील. इतकी सुंदर कल्पना दुसऱ्या कोणाला सुचणार? अर्थातच एका कवीला अशी कल्पना सुचू शकते. हांगचो (Hangzhou) खूप सुदैवी आहे कि वेगवेगळ्या काळात दोन कवी इथे प्रशासक म्हणून आले आणि त्यांचा ठसा ह्या स्थानावर कायमचा उमटला आहे.
हे पॅगोडाज आणि सु बांध हा सु शी (Su Shi) ह्या कवी असलेल्या प्रशासकाने त्याच्या कार्यकाळात म्हणजे १०८६-१०९४ मध्ये बांधले. अर्थातच त्यानंतर अनेकदा परत बांधणे किंवा नूतनीकरण करणे असे चालू राहिले.
|
Pavilions |
|
Dongpu Bridge on Su Causeway
|
|
Causeway
|
"एक असते तळे, त्यावर असते एक बेट, त्या बेटावर असते एक तळे आणि त्या तळ्यात असते एक बेट" असे तुम्ही कधी ऐकले आहे का? नाही, मी तुम्हाला कोडे घालत नाहीये, पण वेस्ट लेक मध्ये खरोखरच असे पाहायला मिळते!
|
An Island in the lake, lake on that island and a small island in that lake!
|
Wanzi मंडप त्याच्या १८७५ मध्ये असलेल्या मूळ आराखड्यानुसार पुन्हा २००५ मध्ये बांधण्यात आला. ह्याचा आकार स्वस्तिकासारखा आहे. स्वस्तिकाचा अर्थ बौद्ध धर्मात देखील, सगळीकडे शांती आणि कल्याण आहे असाच आहे.
|
Wanzi Pavilion |
पाणी, टेकड्या, डोंगर, सुंदर बेटं, पूल, बांध, मंडप, चबुतरे, फुले आणि विलो वृक्षांच्या ओळी ह्या सगळ्यामुळे वेस्ट लेकचे सौंदर्य आणि मोहकता वाढली आहे.
|
The exquisite color palate
|
|
Lotus
|
|
Lotus in West Lake - an inspiration for thousands of poems!
|
|
Flowers.. Flowers..everywhere
|
|
West lake and it's famous willows
|
|
Famous Water Gardens in West lake.
|
|
Gardens on West lake
|
|
Where Bridge Meets It's Reflection!
|
Yue Fei हा अत्यंत शूर सरदार होता. त्या वेळी म्हणजे सॉंग घराण्याची राजवट असताना, हांगचो (Hangzhou) हि चीनची राजधानी होती. त्याचे स्मृतिस्थळ, बाग आणि मंदिर हे वेस्ट लेक वरील महत्वाच्या ठिकाणांमध्ये समाविष्ट आहेत.
|
Yue Fei
|
Yue Fei हा त्याच्या शौर्यासाठी आणि निष्ठेसाठी प्रसिद्ध होता. असे म्हणतात कि त्याच्या आईने त्याच्या पाठीवर," पूर्ण निष्ठेने देशसेवा "हि अक्षरे गोंदवूनच घेतली होती.
|
Jinzhong Baoguo- Serve the nation with full loyalty
|
|
Traditional entrance.
|
|
Zonglie Temple.
|
मी तुम्हाला म्हणाले होते कि दोन कवी वेगवेगळ्या काळात हांगचो (Hangzhou)ला प्रशासक म्हणून लाभले होते. त्यातला एक होता Su Shi आणि दुसरा होता Bai Juyi (७७२-८४०). जेव्हा Bai Juyi,हांगचो (Hangzhou) ला प्रशासक म्हणून आला तेव्हा आधीच तो कवी म्हणून सुप्रसिद्ध होताच. इथे आल्यावर त्याने केलेल्या जलसंधारणाच्या कामामुळे, एक धरण आणि बंधारा बांधून शेतकऱ्यांना दुष्काळापासून वाचवल्याने, एक उत्तम प्रशासक म्ह्णून देखील प्रसिद्ध झाला.
तळ्यावरून फेरफटका मारण्यासाठी दर वेळी बोटीने जायला लागायचे. त्याला कंटाळून त्याने एक बांध बांधण्याचे आदेश दिले अगदी सुरुवातीला तो साधा पांढऱ्या वाळूचा बांध होता असा उल्लेख आहे. त्यावरून दिसणाऱ्या दृश्याविषयी Bai Juyi म्हणतो, "The east of the scenic west lake I love best, strolling the willow shaded white sand dike I enjoy most." आज हा एक चांगला प्रशस्त पक्का रस्ता आहे. त्याच्या दोन्ही बाजूला हिरवळ, आणि विलो आणि पीच चे वृक्ष आहेत. जेव्हा पीच चे वृक्ष बहरत असतील तेव्हा त्या फुलांमुळे सगळेच दृश्य किती सुंदर दिसत असेल?
|
Bai Causeway
|
|
No caption needed!
|
वेस्ट लेक परिसरात फिरताना आपल्याला Jiuzi villa, Yi Yun Ji Lu Villa असे अनेक प्रासाद दिसतात. ते प्रासाद नयनरम्य स्थानासाठी आणि उत्कृष्ट वास्तुरचनेसाठी प्रसिद्ध आहेत. असे म्हणतात कि इथल्या उद्यानांमुळे अनेक जपानी आणि कोरियन बागांसाठी प्रेरणा मिळाली आहे.
कमळे, पीच, प्लम ची फुले आणि इतर अनेक फुलांसाठी वेस्ट लेक प्रसिद्ध आहे. Quianlong राजा ( १७३५-१७९५) वेस्ट लेक वर अधूनमधून राहायला यायचा. त्या साठी इथे Jiuxiang yard नावाचा राजवाडा बांधला होता. त्याचे नावच मुळी त्याने सुवासिक, सुरंगीच्या कुळातल्या Laurel flowers फुलांवरून ठेवले होते!
चिनी कथेनुसार हे वृक्ष ( Laurel trees ) गृध्रकूट पर्वतावर असतात. ह्या पर्वतावर ज्ञानप्राप्ती झाल्यावर बुद्ध राहिला होता असे मानले जाते.
|
Pavilion in the Jiuxiang Yard
|
|
Laurel trees
|
Leifeng Pagoda चा उल्लेख केल्याशिवाय वेस्ट लेक वरील कोणतीही पोस्ट लिहिताच येणार नाही. शाक्यमुनींचा पवित्र केस जपून ठेवण्यासाठी ९७७ A. D.मध्ये हा पॅगोडा उभारला गेला. हा अष्ट्कोनी पाच मजली पॅगोडा वेस्ट लेक च्या दक्षिण तटावर दिमाखात उभा आहे. मूळ पॅगोडा हा चिनी वास्तुरचनाशास्त्राचा एक अद्भुत अविष्कार होता. धर्म, वास्तुशास्त्र, निसर्ग आणि इतिहास ह्यांचे मिश्रण असलेला हा पॅगोडा अनेक कविता, कथा, दंतकथा, लोककथांमध्ये आलेला आहे. हजार वर्षे अनेक धक्के सोसूनही उभा असलेला हा पॅगोडा दुर्दैवाने १९२४ मध्ये कोसळला. मग त्यानंतर काही दशके वेस्ट लेक ह्यांच्याशिवाय सुनेच राहिले. पण मग १९२४ मध्ये,जुन्याच रचनेनुसार, पण बांधकामात धातू वापरून हा पॅगोडा उभारण्यात आला.
|
Leifeng Pagoda
|
|
Near the entrance.
|
भारतीय सम्राट आयु (अशोक) ह्याने दिलेला शुद्ध चांदीचा पॅगोडा, ड्रॅगन आणि कमळाच्या सिंहासनावर बसलेली बुद्धमूर्ती आणि बुद्ध धर्मातील काही पवित्र मौल्यवान वस्तू ठेवण्यासाठी तळघरात एक प्रासाद बांधण्यात आला होता. २०००-२००१ मध्ये जेव्हा उत्खनन झाले तेव्हा ह्या सगळ्या मौल्यवान वस्तू मिळाल्या. आता त्या पॅगोडातील वस्तू -संग्रहालयात ठेवण्यात आल्या आहेत.
|
Relics of the original Pagoda
|
|
Indian Emperor Ashoka's pure silver pagoda
|
|
Original Pagoda Model
|
|
Sakyamuni on Dragon Lotus Throne
|
|
Roof of the pagoda
|
|
Beautiful View from the top floor of the pagoda
|
वेस्ट लेक आणि हांग चो (Hangzhou ) मध्ये अजूनही अनेक ऐतिहासिक, सांस्कृतिक, धार्मिक महत्वाच्या वास्तू होत्या. काही शतकांपूर्वी बांधल्या गेलेल्या ह्या वास्तू, काही काळाच्या ओघात नष्ट झाल्या तर काही, (जरी त्यांच्या माहितीत लिहिलेले नसले तरी) सांस्कृतिक क्रांतीत नष्ट केल्या गेल्या.
त्यातल्या काही नंतर परत बांधल्याही गेल्या. इथे काही पुरातन गुहा देखील आहेत. त्याविषयी बोलू या दुसऱ्या भागात. तोपर्यंत तुम्ही वेस्ट लेक च्या बांधांवरून, पुलांवरून फेरफटका मारून या. मग तुम्हालाही नक्की पटेल कि खरेच हे नंदनवन आहे!
#ParadiseInChina #WestLakeHangzhou #SuShi #BaiJuyi #LeiFengPagoda #SakymuniHair #IndianEmperorAyuAshoka #SuHang
मस्त 😍 अभ्यासपूर्ण 👍👍
ReplyDelete