मथुरा म्हणजे कंस. मथुरा म्हणजे तुरुंग. हे खरे होतेच. पण मथुरा म्हणजे कृष्ण जन्म हे ही खरेच ना! श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर मथुरेच्या बाजाराला दही, दूध, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी तर अगदी बालवाडी पासूनच स्नेहसंमेलनात आपण सगळेजण पाहत आलो! पुढे नाटक, सिनेमा, वग या सगळ्यात या मथुरेने आपला पाठपुरावा केलेला असतो. शिवाय ‘अयोध्या केवल झांकी हैं ..काशी मथुरा बाकी हैं’ ही घोषणाही आपण ऐकलेली असतेच. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥ सप्तपुरी स्थान असलेली आणि श्रीकृष्णाच्या आधीपासून अगदी रामायण काळापासून असलेली ही मथुरा. शत्रुघ्नाने लवणासुराला मारून मथुरेची स्थापना केली असे पौराणिक कथांत वाचायला मिळते. वाल्मिकी रामायणांत देखील तसा उल्लेख आहे. तर यमुनेच्या तीरावर असलेल्या या प्राचीन नगरी मथुरेला कृष्णजन्मभूमी पाहण्यासाठी आम्ही यावर्षीच्या श्रावणात म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला पोहोचलो. स्टेशनवर बाहेर पडताच अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले आपल्या भोवती गोळा होतात. इथे ठाण्यात आपल्याला जिथे जायचे असेल तिथे यायला नकार देणारे रिक्षा...
'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.