आता आपण भेट देणार आहोत Lingyin मंदिराच्या निसर्गरम्य भागाला. वेस्ट लेक मधील सर्वोत्तम सुंदर स्थळांपैकी एक असा हा भाग आहे. कडक ऊन असलेल्या एका दुपारी आम्ही इथे गेलो होतो. मात्र इकडे गेल्यावर ऊन अजिबात जाणवले नाही. शतकांपासून तिथे उभे असलेले मोठे मोठे वृक्ष आणि डोंगर उतारावरून झुळझुळ वाहणारे झरे ह्यामुळे वातावरण अगदी प्रसन्न होते.
Lingyin मंदिराच्या परिसरात जाताच, आपण ह्या परिसराच्या प्रेमातच पडतो. अगदी प्रथम दर्शनी प्रेम म्हणतात तसेच काहीसे! त्या परिसरातील निर्मल शांतता तुम्हाला काही पावलातच काही शतके मागे घेऊन जाते. उगीच नाही ह्या मंदिराला 'temple of the soul's retreat' म्हटले जात!!.
बौद्ध धर्मातील चान पंथाचा हा मठ आहे. चीनमधील जवळपास सर्वात मोठा मठ म्हणा ना. जेव्हा सांस्कृतिक क्रांतीच्या नावाने रेड आर्मी, देशातील इतिहास आणि संस्कृतीच्या सगळ्या खुणा नष्ट करत होती, तेव्हा देखील हे ठिकाण अगदी थोड्या विध्वंसावर बचावले. कोणा उच्च पदस्थ भक्तामुळे हे शक्य झाले असे म्हणतात.
हुई ली (Hui Li ) नावाच्या एका भारतीय भिक्षूने चौथ्या शतकात ह्या मठाची स्थापना केली. अर्थात हुई ली हे त्याने चीनमध्ये धारण केलेले नाव होते. त्याचे मूळ भारतीय नाव होते मतियुक्ती. ( संदर्भ - १. Himalaya Calling - The Origins of China and India- Chung Tan. Chung Tan हे एक विद्वान लेखक, इतिहास अभ्यासक आहेत. चीनचा इतिहास आणि भारत चीन संबंध ह्या विषयात त्यांचा विशेष अभ्यास आहे. २०१० मध्ये त्यांना पद्मभूषण पुरस्काराने गौरवण्यात आले होते. २. शोधगंगा-Shodhganga )
जेव्हा मतियुक्ती ह्या सुंदर ठिकाणी आले, तेव्हा त्यांना बाकी पर्वत शिखरांपेक्षा अगदी वेगळे दिसणारे एक शिखर दिसले. चुनखडीच्या दगडाचे. त्यांना खूप आनंद झाला आणि आश्चर्य देखील वाटले. ते शिखर त्यांच्या मातृभूमीतील, भारतातील एका शिखरासारखे दिसत होते. मध्य भारतातील गृध्रकूट शिखरासारखे दिसले. गृध्रकूट ह्या शिखराचा उल्लेख बौद्ध साहित्यात खूपदा केला गेलेला आढळतो. भारतातील, बिहार मधील राजगीर येथे हे शिखर आहे. मग त्या जागेचे नाव पडले Feilai Feng- भारतातून उडून आलेले शिखर!
हा मठ दोन डोंगरांच्या मध्ये वसलेला आहे. ७० हुन अधिक गुंफा आणि लेणी ह्या परिसरात आहेत. शेकडो बुद्ध मूर्ती तिथे बघायला मिळतात. ह्या परिसरात शिरताच डाव्या हाताला तुम्हाला एक दगडी पॅगोडा दिसेल, साधारण ८ मीटर उंचीचा ह्या षट्कोनी पॅगोडाचे सात थर आहेत, ज्यावर काही बुद्ध वचने आणि आकृती कोरलेल्या आहेत. भारतीय भिक्षु Hui Li/ मतियुक्ती ह्यांच्या स्मरणार्थ हा पॅगोडा बांधला गेला आहे. ह्याला Ling Jiu पॅगोडा असेही म्हटले जाते. इथे त्यांची राख पुरलेली आहे. चौथ्या शतकात बांधल्या गेलेल्या ह्या पॅगोडाचे ९७५ मध्ये आणि परत १५९० मध्ये नूतनीकरण करण्यात आले.
|
Li Hui/ Matiyukti Pagoda
|
पॅगोडाच्या जवळच मागच्या खडकावर आपल्याला संस्कृत अक्षरे कोरलेली दिसतात. ओम माणिपद्मे हं! बौद्ध जप मंत्र आहे हा. अनेक शतके जुनी संस्कृत अक्षरे अचानक चीन मध्ये पाहताना खूपच रोमांचक वाटते!
|
Om Mani Padme Ham - Sanskrit inscription
|
ह्या गुंफातून अनेक शतके वेगवेगळ्या वेळी अनेक बुद्ध मूर्ती कोरल्या गेल्या. आपल्याला पाहताना त्यामुळे कोरीवकामाची वेगवेगळी शैली लक्षात येते.
|
The different Hast mudras- Hand gestures of Buddha.
|
Li gong गुहा - जिला व्याघ्र गुंफा असे सुद्धा म्हणले जाते. तिचे प्रवेशद्वार कोणाला वाघाच्या जबड्यासारखे वाटले म्हणून. दहाव्या शतकातील सुमारे १७८ बुद्ध मूर्ती इथे आहेत. काही ठिकाणी काही अक्षरे पण कोरलेली आहेत.
|
Tiger cave
|
|
18 Arhats Staues
|
हे Huayan हुन किंवा पश्चिमेकडून आलेल्या तीन संतांचे पुतळे आहेत. पण प्राचीन चिनी साहित्यात जेव्हा पश्चिमेकडून म्हणले जाते तेव्हा ते म्हणजे भारतातून असे असते. मग हे साधू देखील भारतीय साधू असतील का? नक्की माहिती नाही, पण बहुतेक भारतीय साधूच असतील.
|
Three Saint Statue With inscription
|
ह्या डोंगरात अनेक गुंफा आढळतात.
|
Inside the cave.
|
|
Amitabh buddha
|
|
See the plates on his clothing
|
Guanyin गुंफेमध्ये वर एका कोपऱ्यात दगडाच्या दोन थरात छोटी फट आहे. तिथून नैसर्गिक सूर्यप्रकाश दिसतो. हा जणू आकाशाला जोडणारा चंदेरी धागाच. ह्या गुहेच्या नावाचा अर्थ आहे स्वर्गाकडे जाणारी गुंफा.
|
Silver thread of sky
|
दुसऱ्या एका गुंफेत काही गोष्टी चित्रित केलेल्या आहेत. त्यातील एक गोष्ट आहे पहिल्या शतकातील. भारतीय भिक्षु मातंग आणि धर्मरत्न पांढऱ्या घोड्यावर अनेक बौद्ध धर्मग्रंथ घेऊन येत आहेत अशी.
दुसरी गोष्ट चित्रित केलेली आहे ती Zhu Shixing ह्या चिनी भिक्षूची. धर्माच्या अभ्यासासाठी पश्चिमेकडे प्रवास करणारा पहिला भिक्षु असे त्याला म्हटले जाते. संस्कृतातील अनेक बौद्ध सूत्रे त्याने उतरवून घेतली.
ह्या दोन्हीचे फोटो मात्र नाहीत माझ्याकडे.
सर्वात मोठी मूर्ती आहे ती मैत्रेय बुद्धाची.. त्याला Fat belly Buddha किंवा Laughing Buddha असे देखील म्हटले जाते. त्याच्या सोबत १८ अरहत आहेत.
|
Maitreya Buddha
|
|
Steps going to some more caves
|
मंदिराकडे जाण्याच्या रस्त्यावर, डावीकडे तुम्हाला काही झरे दिसतील. पाणी अगदी नितळ आहे. त्या झऱ्यांचा ताजेपणा, गारवा, वाहणाऱ्या पाण्याचा मंद आवाज ह्यामुळे Lingyin मंदिर परिसराचे सौंदर्य आणखीनच खुलले आहे.
|
Pavilion for enjoying the springs
|
अगदी प्राचीन काळापासूनच Ling Yin मंदिर हे चीनमधील सर्वात मोठ्या आणि श्रीमंत मंदिरामध्ये अग्रभागी आहे. अनेक मोठाली सभागृहे, पॅगोडाज, वाचनालय असे आपल्याला ह्या आवारात आढळते. हजारो बौद्ध भिक्षूंनी इथे राहून बुद्ध सूत्रांचा अभ्यास केलेला आहे आणि करत आहेत. सांस्कृतिक क्रांतीच्या काळात देशभरातील बौद्ध भिक्षूंचे हे आश्रयस्थान बनले होते.
बौद्ध मंदिरात प्रवेश करताच तुम्हाला अशी सुंदर मोठी पात्रे दिसतात. तिथे उदबत्त्यांचे जुडगेच जाळले जातात. भक्तांची अशी समजूत आहे की हा धूर आपले शरीर स्वच्छ करतो आणि आरोग्यदायी आहे.
|
Large incense Burners
|
मंदिराच्या आवारात दोन स्तंभ आहेत. ह्यांना सूत्र स्तंभ असे म्हणले जाते कारण ह्यावर धर्म सूत्रे लिहिलेली असतात. हे अष्टकोनी आहेत, दोन थरांचा पायाचा भाग आहे. ह्या स्तंभांचे एकूण तीन भाग असतात. पाया, स्तंभ आणि शिखर. विशेष गोष्ट म्हणजे हे स्तंभ उभारले गेले ते Fengxian मंदिरात ९६९ मध्ये. कालांतराने ते मंदिर पडले. मग हे स्तंभ इथे आणण्यात आले.
|
Sutra Pillar
|
|
Burning Of incense sticks- an important ritual
|
पूर्वी मंदिराच्या आवारात चार दगडी पॅगोडा होते. आता मात्र त्यातील दोनच उरले आहेत. ९६० मध्ये उभारले गेलेले हे पॅगोडाज चीन मधील सर्वात जुने दगडी पॅगोडाज मानले जातात.
|
Ancient Stone Pagodas
|
|
In front of the temple halls
|
|
Hall of medicine Buddha
|
|
Decorated wall
|
|
Buddha idols
|
|
Hui Li/ Matiyukti?? well..may be! I can't read Chinese script
|
|
Snowball flowers
|
ह्या सोबतच West Lake- Hangzhou पोस्ट पूर्ण करते. West lake च्या बांधावरून रमत गमत फिरणे किंवा Lingyin मंदिरात ऊन सावलीचा खेळ पाहत झाडाच्या सावलीत बसून झऱ्यांचे मंद संगीत ऐकणे हे अविस्मरणीय अनुभव आहेत.
ह्या परिसराचे नैसर्गिक सौंदर्य शरीर, मन आणि आत्म्याला भावणारे असेच आहे. तेव्हा कबुल करावेच लागते की खरोखरच हे नंदनवन आहे!!
#wealthiestBuddhistMonasteryChina #IndianMonkInChina #AroundLingyin #ParadiseInChina #HuiLiMatiyukti #WestLakeHangzhou #LingyinTempleScenicArea #FeilaiFengPeakGrottoescaves
#SuHang
Comments
Post a Comment