मुख्य सामग्रीवर वगळा

बृहदेश्वर - एक अलौकिक खजिना

ह्या आधी एका पोस्टमध्ये आपण तंजावरच्या बृहदेश्वर मंदिराबद्दल वाचले आहे. त्या पोस्टची लिंक येथे आहे.https://silvervegantravels.blogspot.com/2020/10/blog-post_24.html 

त्या पोस्टमध्ये मी बृहदेश्वर मंदिराचा इतिहास आणि सर्वसाधारण रचना याबद्दल लिहिले होते. या पोस्टमध्ये मी मंदिरातील काही गोष्टींविषयी, काही शिल्पाकृतींविषयी विस्ताराने व तपशीलवार लिहावे असा विचार करत आहे. 
पहिल्या पोस्टमध्ये, जर तुम्हाला आठवत असेल, तर मी तंजावरच्या मराठा शासकांबद्दल आणि बृहदेश्वर मंदिरातील त्यांच्या योगदानाबद्दल लिहिले होते. मंदिराच्या मराठा प्रवेशद्वाराचे छायाचित्र येथे देते आहे. मंदिराचे हे पहिले गोपुर/प्रवेशद्वार आहे. आतल्या गोपुरांचे संरक्षण व्हावे म्हणून हे उभारले गेले होते. विटा व चुनखडीने बांधलेले हे प्रवेशद्वार आहे.

मराठा द्वार 
📷जयंत अभ्यंकर 

मराठा राज्यकर्त्यांच्या मंदिरांमधील सहभागाविषयी सांगणारे देवनागरी लिपी आणि मराठी भाषेतील शिलालेख ह्या मंदिरातच कोरलेले दिसतात. 
मराठी 
📷अनिरुद्ध अभ्यंकर 
मी येथे मंदिराचा आराखडा देत आहे, म्हणजे तुम्हाला मंदिर रचनेची संपूर्ण कल्पना येईल. 

मंदिर आराखडा 
📷जयंत अभ्यंकर 

नंदी मंडपासमोर एक अतिशय सुंदर सुशोभित असा जयस्तंभ किंवा ध्वज स्तंभ आहे.  

ध्वजस्तंभ 
📷जयंत अभ्यंकर 

ध्वजस्तंभ हा नेहमीच मंदिर रचनेचा महत्वाचा भाग असतो. येथे आपण वरच्या बाजूला तीन पताकांसारखे भाग किंवा प्लेट्स पाहू शकता. त्यांना मेखला असे म्हणतात. मेखलांना लहान लहान घंटा लटकवलेल्या असतात. वाऱ्याने त्या हलतात आणि मधुर आवाज करतात. 

ध्वजस्तंभ 
📷विकिपीडिया 

घंटा आणि मेखला दाखविण्यासाठी मी छायाचित्राचा काही भाग येथे झूम करुन दाखविला आहे. ध्वज स्तंभाच्या शीर्षस्थानी आपण एक नंदी पाहू शकता. सहसा ध्वजस्तंभाच्या सर्वात वर मंदिराच्या मुख्य दैवताचे वाहन असते. येथे मंदिराची मुख्य देवता शिव आहेत, म्हणून त्यांचे वाहन असलेला नंदी ध्वजस्तंभाच्या शिखरावर बसलेला आहे. स्तंभ खूपच उंच आहे आणि तो वेगवेगळ्या आकार आणि रचनांनी तोलून धरलेला आहे. 

ध्वजस्तंभ पायथा 
📷अनिरुद्ध अभ्यंकर 
पायथ्याच्या बाजूला गणेश, शिव + पार्वती, कार्तिकेय / सुब्रमण्यम यांच्या प्रतिमा कोरल्या आहेत.

ध्वजस्तंभावरील गणेश 
📷यशवंत काकड 

ध्वजस्तंभावरील शिव पार्वती 
📷जयंत अभ्यंकर 
कमळाच्या फुलाच्या पायथ्यावर, ध्वजस्तंभाच्या वरच्या थरांचे वजन उचलणार्‍या काही सशक्त स्त्रिया तुम्ही पाहू शकता. कमळांच्या आकाराचे आणि पाकळ्यांचे पाकळ्याचे डिझाईन वरच्या थरांवर देखील कायम ठेवलेले आहे. 
आपण देवतांच्या प्रतिमांच्या वर पाहिले तर आपल्याला कमळाच्या फुलांच्या मध्यभागाचे किंवा बियांच्या सारखे डिझाइन दिसेल.
बृहदेश्वर मंदिर हे मूर्तिशास्त्र प्रेमींसाठी, अभ्यासकांसाठी एक नंदनवन आहे. तेथे हजारो सुंदर आणि बारकाईने कोरलेल्या मानव, देवदेवता तसेच प्राण्यांच्या मूर्ती बघायला मिळतात. 
जर आपण केवळ हत्तीच बघायचे म्हटले तरी तिथे विविध पोझेसमध्ये असंख्य हत्ती आहेत. हत्ती जिथे जिथे जे जे काम करत आहेत त्यानुसार त्यांची पोझ दाखवली आहे.
ध्वजस्तंभावर, तुम्ही हत्तींना, उंचावलेल्या सोंडेने ध्वजस्तंभाचे वजन तोलताना पाहिले आहे. येथे आणखी काही हत्ती आहेत.

पायऱ्या 
📷जयंत अभ्यंकर 
येथे हत्तीची सोंड पायऱ्यांसाठी कठडा म्हणून वापरली गेली आहे. येथे ते स्थिर आहेत, परंतु तरीही त्यांच्या देहबोलीत गती दर्शविण्यात कलाकार यशस्वी झाला आहे. चालत असताना हत्तीने एका माणसाला खाली पाडले आहे की काय? खाली एक मानवाकृती पडलेली दिसते आहे.
हत्ती 
📷जयंत अभ्यंकर 

येथे आपण पाहू शकता की हत्ती संतप्त झालेला आहे आणि वेगाने चालत आहे, जवळजवळ पळतच आहे म्हणा ना! त्याचा पुढचा डावा पाय आणि उजवा मागचा पाय हवेत आहेत. त्याने कान पसरले आहेत. त्याची शेपटी वळलेली आहे. सोंडेत एका माणसाला धरले आहे. तो माणूस बहुतेक आधी घोड्यावर बसलेला असावा. हत्तीच्या सोंडेत तो माणूस अक्षरश: पिळला जात आहे. अनेक शतके लढाईसाठी हत्तींचा वापर केला जात असे. हे अशाच एखाद्या युद्धाच्या वेळचे दृश्य दिसते आहे. 
बृहदेश्वर मंदिरातील शिल्पांमध्ये बरेच हत्ती आहेत हे अगदी मान्य, परंतु आणखी एक प्राणीदेखील बर्‍याच वेळा दिसतो. त्याचे नाव व्याल किंवा यली आहे. हे काल्पनिक संमिश्र प्राणी आहेत, ज्यांचे शरीर वाघ, सिंह, घोडा, हत्ती, बैल आणि बरेच वेगवेगळे प्राणी असे मिळून बनलेले दाखवलेले असते. 
काही वेळा त्यांना ते मकर नावाचे दुसरे काल्पनिक प्राणी आहेत असे गैरसमजाने म्हटले जाते. पण मकर प्राण्याचे तोंड मगरीचे आणि शरीर माशाचे असते.  

व्याल 
📷जयंत अभ्यंकर 
इथे मगरीचे तोंड असणारे व्याल दाखवलेले आहेत. 

खांबावरील व्याल 
📷जयंत अभ्यंकर 
क्लोज अप !
📷जयंत अभ्यंकर 


व्याल किंवा यली हे मंदिरांचे रक्षक मानले जातात आणि म्हणून स्तंभांवर आणि मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्यांवर कोरले जातात.
मंदिरातून अभिषेक जल किंवा पाणी वाहून नेण्यासाठी ही यंत्रणा कार्यरत आहे. ती हत्तीची सोंड आहे का? चेहरा मगरीसारखा दिसत आहे.

अभिषेक जल इथून बाहेर येते. 
📷जयंत अभ्यंकर 
हौद 
📷जयंत अभ्यंकर 
अभिषेक जल एका हौदामध्ये पडते. हा हौद किंवा टाके एका दगडातून कोरलेले आहे. हा हौद सिंहावर विराजमान झालेला आहे. 
आपण प्राण्यांबद्दल खूप बोललो, आता आपण देवांच्या शिल्पांबद्दल बोलू या! 
मंदिरात गणेशमूर्ती अनेक रूपात दिसते. कधी बसलेल्या स्थितीत, कधी उभ्या स्थितीत, काही वेळा चार हातांची तर काही वेळा आठ हातांची.
दशहस्त गणपती 
📷अनिरुद्ध अभ्यंकर 
ही शिल्पाकृती अतिशय विलक्षण आहे. आपल्याला, दहा हातांची गणेशमूर्ती सहसा पाहायला मिळत नाही. मंदिराचे पहिले गोपूर असलेल्या मराठा वेशीवर ही आकृती कोरलेली आहे. 
उजवीकडील दोन हात तुटलेल्या अवस्थेत आहेत. एक उजवा हात मांडीवर ठेवलेला आहे. डावीकडच्या हातापैकी, एक हात गणेशाने मांडीवर बसलेल्या शक्तीला वेढून ठेवला आहे. बाकी हातांत मला जे दिसले ते म्हणजे शंख, फूल, धान्याच्या ओंब्या, पाश आणि अंकुश. बहुधा हा महागणपती रूपातील गणेश आहे.
चतुर्हस्त गणेश 
📷अनिरुद्ध अभ्यंकर

इथे वरील छायाचित्रात तुम्हाला तीन गणेशमूर्ती दिसतील. तिन्हीही मूर्ती चार हात असलेल्या आहेत. साधारणपणे सारखीच आयुधे व मोदक तिन्ही मूर्तींच्या हातात आहेत. 
एका मंदिरातील गणेश 
📷अनिरुद्ध अभ्यंकर
मंदिरातील गणेश 
📷अनिरुद्ध अभ्यंकर
उभी गणेशमूर्ती 
📷जयंत  अभ्यंकर
भावंडे - गणेश आणि कार्तिकेय 
📷जयंत अभ्यंकर 

येथे आपण दोन भावंडे बघत आहोत. उंदरावर बसलेला गणेश आणि मोरावर बसलेला त्याचा भाऊ कार्तिकेय किंवा सुब्रमण्यम असे दोघे इथे दिसत आहेत. या मंदिराबद्दल अजून बरेच काही लिहायचे आहे. शिल्प, चित्र, वास्तूकला किती किती आहे लिहिण्याजोगे!

शिव मंदिर असल्याने अनेक प्रकारच्या शिव मूर्ती आहेत, देवी, कार्तिकेय, योगीजन, नर्तकी, नृत्यमुद्रा आणि अजून कितीतरी. द्वारपाल मूर्तीदेखील आवर्जून दखल घ्यावी अशाच आहेत. मला माहित नाही की मी या सर्वांबद्दल कधी लिहिणार आहे! पण आजची पोस्ट मात्र मी मानवी शिल्पाकृतींच्या वर्णनाने संपवत आहे. 

हे गोपी वस्त्रहरणाचे दृश्य आहे. किती सुंदर कोरीव काम आहे! पायथ्याशी आपल्याला दोन मकराचे चेहरे दिसू शकतात. हे चेहरे दर्शवितात की ही पाण्याजवळची जागा आहे. 

डावीकडच्या दोन स्त्रिया प्रौढ तर उजव्या दोन तरुण मुली आहेत. आपण त्यांच्या केशरचना आणि देहबोली मधला फरक पाहू शकता. डाव्या दोघीजणींनी आपले केस अंबाडा घालून गुंडाळून ठेवले आहेत. तर तरुण मुलींनी आपले केस मोकळे सोडले आहेत!!! 

अंगावर काहीच कपडे नसल्यामुळे डाव्या कोपऱ्यातील बाईला लाज वाटते आहे. तिने तोंडाला हात लावला आहे. दुसरी बाई आपले कपडे घेण्यासाठी झाडावर चढण्याचा प्रयत्न करीत आहे. तरुण मुली काय होत आहे त्याचा फार त्रास करून न घेता आरामात इकडे तिकडे पाहत बसल्या आहेत!!

त्यांचे विविध प्रकारचे दागदागिने- हस्तभूषणे, कर्णभूषणे, पैंजण, कंठहार अतिशय सुंदर दाखवले आहे. सगळे दागदागिने निरनिराळे. ज्वेलरी डिझाईन करणाऱ्या लोकांनी खास नोंद घ्यावी असे! 

ह्या शिल्पात फांद्या, पाने, फुले, खडबडीत पण भक्कम खोड असे झाड खूप छान दाखवले आहे. 

झाडावर खोडकर, खट्याळ कृष्ण बसलेला आहे. नदीत स्नान करणाऱ्या गोपींची वस्त्रे त्याने पळवली आहेत, ती त्याच्या हातात दिसत आहेत. इतके सगळे वाचून होईपर्यंत सगळ्यांच्या मनात,"दे रे कान्हा.. चोळी अन लुगडी.. " हे गाणे वाजायला लागले असेल. पण आश्चर्य म्हणजे गोपी वस्रहरणाच्या इतर शिल्पांत दाखवतात तसे इथे ह्या गोपींनी हात जोडून विनवणी केलेली नाही. 

कुशल कारागिराने हा प्रसंग दगडाच्या शिल्पामध्ये अगदी जिवंत केला आहे. ग्रॅनाइटचे झाड देखील अगदी खरे झाड वाटते आहे आणि असे केवळ प्रेक्षकांनाच नाही तर एका जिवंत पोपटाला पण वाटते आहे! आपण चित्र झूम केल्यास, आपण झाडाच्या पानात एक खरा, जिवंत पोपट बसलेला पाहू शकता. एखाद्या कलाकाराला मिळालेली यापेक्षा चांगली दाद ती काय असणार?!!

गोपी वस्त्रहरण 
📷यशवंत काकड 

मंदिर 
📷अनिरुद्ध अभ्यंकर



#HinduIconography #BrihadeshwarIconography #WondersOfIndia #MostbeautifulTemple #GrandestTemple #WhatToSeeInThanjavur #UnderstandingBrihadeshwar #TallestTempleInTheWorld #BrihdeshwarTempleFacts #TallestShivTemple #TheBigTemple

#TamilnaduTemples #HinduShivTemple #11thCenturyTemple #TallShivling




टिप्पण्या

  1. सूक्ष्म निरीक्षण आणि शब्दांकन मस्त 👌👌

    उत्तर द्याहटवा
  2. किती बारकाईने पाहते नी लिहतेस तू खूप

    उत्तर द्याहटवा
  3. कृष्ण हा वैश्णव देव आहे. शैव संकुलात असणे शक्य नाही.

    उत्तर द्याहटवा

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...