Skip to main content

उदगमंडलम! उटी - क्वीन ऑफ हिल्स 

उदगमंडलम!! किती सुंदर नाव! उदग - उदक (संस्कृत) म्हणजे पाणी आणि मंडलम (संस्कृत) म्हणजे प्रदेश आहे. पाण्याचा प्रदेश! जर तुम्ही उदगमंडलमला भेट दिली तर लगेच तुम्हाला कळेलच की हे नाव किती योग्य आहे! या प्रदेशात आणि आजूबाजूला अनेक तलाव आहेत. आकाशात पाणी भरलेले, कधीही बरसायला तयार असणारे ढग आणि धुके..खरोखर उदगमंडलम नाव सार्थ आहे!

तामिळनाडू सीमेवरील, नीलगिरी डोंगरभागात राहणारे तोडा लोक हे त्या भागाचे मूळ रहिवासी होते. तोडा भाषेत ह्या ठिकाणाचे नाव 'ओथकल मुंड' होते, ज्याचा अर्थ विकिपीडियानुसार ओथकल म्हणजे पर्वत आणि मुंड म्हणजे घर आहे. अजून एक धारणा अशीही आहे की टोडा भाषेतील, ह्या गावाच्या नावाचा अर्थ म्हणजे ओथका - एक दगड आहे आणि मुंड म्हणजे गाव आहे!! 

बाकी सगळी कथा नेहमीप्रमाणेच आहे. काही ब्रिटीश अधिकारी या ठिकाणी आले होते, त्यांना हे ठिकाण खूप आवडले. त्यांनी कोईमतूरच्या जिल्हाधिकाऱ्यांना लिहिले की ही जागा स्वित्झर्लंडसारखी आहे! त्यावेळी जॉन सुलिवान हे कोईमतूरचे जिल्हाधिकारी होते. ते आले, त्यांनी पाहिले आणि ते ह्या गावाच्या प्रेमात पडले. 

त्यांनी तोडा लोकांकडून ही जागा मिळविली आणि तेथे त्यांनी एक बंगला बांधला. ब्रिटिश लोकांना उदगमंडलम किंवा ऊटकमंड असे उच्चार करता येत नव्हते म्हणून त्यांनी त्या जागेचे नाव ऊटी असे ठेवले. हे ठिकाण लवकरच ब्रिटीश शासकांसाठी, उन्हाळ्या सुट्टीतील आवडते विश्रांतीस्थान ब नले.

होईसळा राजांच्या, विशेषतः विष्णुवर्धनच्या काळात, बाराव्या शतकात देखील या शहराचे संदर्भ सापडतात. 

तामिळनाडूच्या नीलगिरी जिल्ह्यातील, उदगमंडलम हे भारतीय पर्यटक तसेच आंतरराष्ट्रीय पर्यटकांचेही आवडते ठिकाण आहे.ते का? त्याचे अगदी नेमके कारण सांगायचे तर वर्षभर आनंद देणारे नैसर्गिक सौंदर्य, पर्वत आणि टेकड्या, तलाव, नद्या, झाडे आणि फुले आणि ह्यामुळे होणारे आनंददायी वातावरण असे देता येईल.

उडगमंडलम हे आरामात बघण्याचे ठिकाण आहे. घाईगडबडीने पाहण्याजोगी अनेक पर्यटनस्थळे इथे नाहीत. फक्त बोटॅनिकल गार्डन, गुलाबाच्या बागेतून फिरा, तलावांमध्ये नौकाविहारासाठी जा किंवा जंगलात चालत जा आणि पर्वतांवर ट्रेक करा!! 
 
सर्वात जवळचा विमानतळ कोईमतूर आहे. म्हणून आम्ही जानेवारी २०१९ मध्ये उदगमंडलमला गेलो होतो तेव्हा मुंबईहून कोइमतूर विमान घेतले आणि मग टॅक्सीने उदगमंडलमला गेलो. रस्त्याची अवस्था चांगली आहे. रस्त्याने जाताना दिसणारे दृश्य साधारण असे आहे!


Coimbatore To Udagamandalam 




Coimbatore To Udagamandalam 



Coimbatore To Udagamandalam 




प्याकरा तलाव बोटिंग 

प्याकरा नदीवर असलेल्या धरणामुळे प्याकरा तलाव तयार झाला आहे. तेथे एक जलविद्युत केंद्र देखील आहे आणि अनेक धबधबे पाहायला मिळतात. या प्रदेशात जवळपास ९ महिने पाऊस पडतो. प्याकरा तलावामध्ये नौकाविहार करणे किंवा त्याच्या आजूबाजूला असलेल्या बागेत फिरणे, दुकानात खरेदी करणे म्हणजे उदगममंडलला भेट देणार्‍या पर्यटकांचे आवडते काम आहे.

 


















Pyakra Lake 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

तलावाभोवती उंच झाडे अगदी दाट जंगल असावे तशीच आहेत. तलावामध्ये मातकट रंगाचे पाणी आहे. बोटीच्या इंजिनचा आवाज खूप येतो व आजूबाजूच्या शांततेवर ओरखडे उमटवतो.

 उदगमंडलममध्ये दोन किंवा तीन मेणाच्या पुतळ्यांची संग्रहालये आहेत. आमचा ड्रायव्हर आम्हाला वॅक्स प्लॅनेटमध्ये घेऊन गेला होता. त्यावेळी ते एक लहानसे ठिकाण होते. आपण ते १५ - २० मिनिटांत पाहू शकतो.

































दोडाबेटा शिखर

 नीलगिरी पर्वतरांगांमधील हे सर्वोच्च शिखर आहे! ट्रेकर आणि छायाचित्रकारांच्या साठी तर हे स्वप्न आहे. पण इतरांसाठी देखील काळजीचे कारण नाही. कारण आपण कारने अगदी वरपर्यंत जाऊ शकता! आजुबाजूचा परिसर खूपच सुंदर आणि निसर्गरम्य आहे.

Near Dodabetta  👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!






















हे पर्यटक तसेच स्थानिकांचे आवडते ठिकाण आहे. म्हणूनच, जर तुम्हाला गर्दी टाळायची असेल, तर तुम्हाला सकाळी लवकर जावे लागेल. वेधशाळेमध्ये दुर्बिणी आहेत, परंतु दुर्बिणीतून पहाण्याची संधी मिळाली नाही तरीसुद्धा निराश होण्याचे कारण नाही. इथून नुसत्या डोळ्यांनी दिसणारे दृश्य देखील अप्रतिम आहे! 

Dodabetta  👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!


समुद्र सपाटीपासूनची उंची आणि सभोवतालच्या डोंगरामुळे खुपदा थंडगार वारा वाहत असतो. अगदी भरदुपारी ऊन असतानाही, हवामान खरोखर थंड होऊ शकते. म्हणून त्यासाठी तयार रहा. 

येथे एक रेस्टॉरंट आहे जेथे आपण पकोडा आणि चहा, कॉफी सारख्या गोष्टी  खरेदी करू शकता.

उदगमंडलम वनस्पति उद्यान 

ही प्रचंड मोठी बोटॅनिकल गार्डन म्हणजे  बागकाम विभागाने देखभाल केलेले एक सरकारी उद्यान आहे. ह्या उद्यानाचे एकूण क्षेत्र ५५ एकर आहे. १८४० मध्ये भाजीपाला लागवड म्हणून सुरू झालेला हा उपक्रम, हळूहळू १८४७ मध्ये एका सार्वजनिक बागेत परिवर्तित झाला. तेथे हजारो प्रकारच्या वनस्पती आणि फुले आहेत. एका दिवसात संपूर्ण बाग पाहणे अशक्य आहे.

येथे विस्तीर्ण लॉन, कन्झर्व्हेटरी, ग्लास हाउसेस, नर्सरीज आहेत. मे मध्ये वार्षिक फ्लॉवर शो आयोजित केला जातो, जो वनस्पतीशास्त्र अभ्यासक आणि वनस्पती प्रेमींसाठी ही एक पर्वणीच असते. बागेतील काही दृश्ये अशी आहेत.


 




















































Government Botanical Garden 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

उद्यानाच्या प्रवेशद्वारासमोरचा रास्ता संध्याकाळी गजबजलेला असतो. रस्त्याच्या दोन्ही बाजूला दुकाने आणि रेस्टॉरंट्स आहेत. 




उदगमंडल रोज गार्डन 

उदगमंडलममधील आणखी एक आकर्षण म्हणजे गुलाबांचे उद्यान. हे एल्क हिलच्या उतारावर वसलेले आहे. हे भारतातील सर्वात मोठ्या रोझ गार्डनपैकी एक आहे आणि ह्या उद्यानाला वर्ल्ड फेडरेशन ऑफ रोज सोसायटीजकडून गार्डन ऑफ एक्सलन्स पुरस्कार प्राप्त झाला आहे.

या उद्यानाला भेट दिल्यावर डोळे तसेच मनदेखील सुखावून जाते. गुलाबांचे रूप, रंग, गंध विविध प्रकारचे आणि आनंददायी! या उद्यानात गुलाबांचे 20000 हून अधिक प्रकार आहेत. 

छायाचित्रकारांसाठी एक छोटीशी सूचना - सकाळी लवकर बागेला भेट द्या. अन्यथा दिवस मध्यान्हीकडे झुकायला लागला की सूर्यप्रकाशाने फोटो न्हाऊन मग उजेडामुळे वाहून जातात!! डोंगरउतारावर असल्याने, संध्याकाळी लवकर अंधार पडत असणार!

फुलांची नावे अतिशय मनोरंजक अशी दिलेली आहेत आणि ती वाचून आपल्या चेहऱ्यावर नक्की हास्य उमटेल! बागेत सुंदर सजावट केलेली आहे. पर्गोला आणि गुलाबवेलींच्या कमानी आहेत. माझ्याकडे या बागेची अनेक छायाचित्रे आहेत! त्यापैकी काही येथे देते आहे. 




































































































आम्ही क्लब महिंद्रा, डर्बी ग्रीन, उटी इथे राहिलो होतो. ह्या रिसॉर्टमध्ये खूप सुंदर फुले आणि सक्युलंटस आहेत, जागेची रचना उत्तम आणि सौंदर्यपूर्ण आहे. रेस्टॉरंट मध्ये मिळणारे अन्न चविष्ट आहे तसेच रिसॉर्टमध्ये एक छोटेसे दुकान देखील आहे. 

 














































 

त्यांच्याकडे रेस्टॉरंट मध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारचे खाद्यपदार्थ असतातच. पण जर का तुमची काही खास गरज वा पथ्य असेल आणि ते तुम्ही पुरेसे आधी सांगितले, तर नक्की त्याप्रमाणे ते तुम्हाला अन्न तयार करून देतात. आम्ही विगन आहोत असे सांगितल्यावर त्यांनी आमच्यासाठी फार चांगले विगन पदार्थ आणि पक्वान्ने केली होती. 










जेव्हा आपण उदगमंडलममध्ये असाल तेव्हा आपण नैसर्गिक तेले आणि अर्क अवश्य खरेदी करा. आम्ही लेमनग्रास- गवती चहाचा अर्क विकत घेतला होता आणि तो फारच चांगला होता.

येथे अनेक चॉकलेटचे कारखाने आहेत. आपल्याला हाताने तयार केलेली, विविध प्रकारची चॉकलेटस देखील मिळू शकतात. शहरात आणि आजूबाजूला चहाचे कारखाने आहेत. शहराच्या बाहेर, डोंगर उतारांवर अनेक चहाच्या बागा दिसतात. 

नीलगिरी माउंटन रेल्वे 

 १९०८ पासून कार्यरत असणारी ही सिंगल ट्रॅक ट्रेन आहे. हा खूपच संस्मरणीय व गतकाळाच्या स्मृती जागवणारा प्रवास आहे. हा प्रवास करताना, आपण टाइम मशीन मध्ये बसून ७०-८० वर्षे मागे गेलो आहोत असे वाटू लागते. 

नीलगिरीचे चढ-उतार, बोगदे आणि वळणे ह्या सगळ्यामुळे हा प्रवास रोमांचक होतो. आपण ट्रेनमधून दिसणारी दृश्ये कधीच विसरणार नाही इतकी ती सुंदर आहेत. घनदाट जंगले, हिरव्यागार गवताने आणि झाडांनी आच्छादित उतार आणि धुक्यात दडलेल्या दऱ्या आणि डोंगर.. हा प्रवास खूप सुंदर आहे! 

उदगममंडलम ते मेट्टुपालम पर्यंतचे अंतर ४६ कि.मी. आहे आणि डोंगर चढ उतारांमुळे ते पार करण्यासाठी जाताना ५ तास आणि परत येताना ३ तास ३० मिनिटे लागतात. ऊटी टुरिझम- नीलगिरी रेल्वेच्या संकेतस्थळाच्या म्हणण्यानुसार, मार्गावर १६ बोगदे, २५० पूल आणि २०८ वळणे आहेत!

दार्जिलिंग हिमालयन रेल्वे आणि कालका शिमला या दोन इतर रेल्वेबरोबरच ही रेल्वेगाडी, जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. 

या प्रवासासाठी तुम्ही ऑनलाईन बुकिंग करू शकता. आपल्याला खूप अगोदरच बुकिंग करावे लागेल, प्रवासाच्या दोन किंवा तीन महिन्यांपूर्वीच करावे लागेल.ती तिकिटे अगदी पटकन, संपूर्ण बुक होऊन जाऊ शकतात. 










Entry! 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!




























 
View From The Train 👈 विडिओ पाहण्यासाठी इथे क्लिक करा!

उदगमंडलम हुन आम्ही ह्या ट्रेन ने कुन्नूर ला गेलो आणि तिथून मग टॅक्सी ने कोडाईकनाल ला गेलो. निलगिरी पर्वताला निळेपण देणाऱ्या कुंजीर फुलांविषयी तर मी सांगितलेच नाही. ते आता कोडाईकनाल च्या पोस्ट मध्ये लिहीन. तोपर्यंत काळजी घ्या, सुरक्षित राहा, कोविड लस मिळायची वाट पहा!!

#ClubMahindraOoty #ToyTrainOoty #BotanicalGardenOoty #WaxPlanet #WhatToSeeInOoty #OotyTrip #UdagmandalamTrain #InAndAroundOoty #KunjirFlowersOoty

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...