गेल्या आठवड्यातल्या पोस्टमध्ये आपण शांघाय येथे होतो! या आठवड्यात आपण शांघायच्या आजुबाजूला फिरू या!
शांघायपासून सुमारे 100 कि.मी. अंतरावर सुझाऊ किंवा सूचो नावाचे एक सुंदर प्राचीन शहर आहे.
आज सूचो हे पूर्व चीनमधील महत्वाचे औद्योगिक शहर आहे आणि विज्ञान संशोधन आणि विकास संस्था आणि उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. हे शहर उद्योग आणि प्राचीन वारसा यांचे अप्रतिम मिश्रण म्हणून देखील ओळखले जाते. हे शहर युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांचा एक भाग आहे.
सूचोचा सुमारे २५०० वर्षांचा इतिहास आहे. काळाच्या ओघात शहराचे नाव बर्याच वेळा बदलले गेले. अनेक शतके हे देशातील सर्वात प्रमुख शहर होते. सूचो किंवा सुझाऊ हे नाव ५८९ ए.डी. मध्ये शहराला दिले गेले आहे. ह्या शहरामध्ये बऱ्याच प्रसिद्ध बागा होत्या. परंतु त्यातील बऱ्याच बागा, वेगवेगळी बंडे, उठाव, युद्धे आणि परदेशी आक्रमक राजवटीच्या काळात नष्ट झाल्या. त्यातील दोन उद्याने पूर्ववत करायचा उत्तम प्रयत्न केलेला आहे.
'Humble Administrator's garden' सर्वात प्रसिद्ध आहे. 1000 वर्षांपूर्वी तयार केली गेलेली ही बाग आहे. काळाच्या ओघात तिचे स्वरूप कितीदा तरी बदलले आहे आणि बदलणार्या मालकांसह बर्याच वेळा बागेचा नकाशा देखील बदलला आहे. बागेचे नाव प्राचीन चीनी अभिजात साहित्यातील काही ओळींवरून घेतले आहे असे म्हणतात.
बागेचे एकूण क्षेत्रफळ सुमारे १२ एकर इतके आहे. ही बाग सूचो मधील सर्वात मोठी बाग आहे ह्यात काहीच आश्चर्य नाही!
|
Lotus pond |
|
At the entrance |
|
Map of the Garden |
|
Restoration work going on! With a little break! |
|
Beautiful Pavilions |
|
Nature, Architecture and Reflection |
वनस्पती, वास्तुशास्त्र, खडक आणि पाणी ह्या चार घटकांच्या समन्वयासाठी बाग प्रसिद्ध आहे. बागेत काही अतिशय उल्लेखनीय हॉलस आहेत. हॉल पाहताना चिनी पेंटिंग्ज, कॅलीग्राफी, कोरीवकाम, सुंदर लाकडी फर्निचर आणि उत्तम चीनीमातीची भांडी, फुलदाण्या हे काही विशेष लक्ष देण्याजोगे, उल्लेखनीय मुद्दे आहेत.
|
The Mural |
हे शिल्प एका प्रवेशद्वारावर कोरलेले होते. मला आश्चर्य वाटले. काय अर्थ असू शकेल ह्या शिल्पाचा असे वाटले आणि म्हणून त्याचा फोटो घेतला. हे शिल्प अनेक पिढ्या दर्शविते आहे की मानवजन्माच्या विविध अवस्था ?
बागेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे खिडक्यांच्या सुंदर चौकटी! खिडक्या अशा प्रकारे केलेल्या आहेत की बाहेरील झाडे, पाणी आणि खडकांचे वेगवेगळ्या ऋतूंत, दिवसाच्या वेगवेगळ्या प्रहरात, बदलते सौंदर्य पाहता येईल. त्यांना असलेली चौकट बाहेरील दृश्याला एक वेगळेच परिमाण देते आणि बाहेरील देखावा, भिंतीवर टांगलेल्या एखाद्या पेंटिंगसारखा दिसतो.
|
View of the windows from Outside |
|
The most spectacular! |
बागेत खडकांच्या सुंदर शिल्पाकृती आणि विविध रचना केलेल्या आहेत.
|
Children will be children!! |
बागेत फिरताना बरोबर गाईड मात्र नक्की घ्यायला हवा. इतक्या अवाढव्य बागेतले, आपल्याला उपलब्ध असलेल्या वेळेत, काय प्राधान्याने पाहायला हवे, हे तो नीट सांगू व दाखवू शकतो. मी शांघायहुन गाईडेड टूर घेतली असल्याने सोबत इंग्रजी जाणणारा गाईड होता ते उत्तम झाले.
सुचो शहर, विशेषतः शहराचा जुना भाग खूपच सुंदर आहे. जुन्या वास्तुशास्त्रातील शक्य तेवढ्या सौंदर्यपूर्ण रचना त्यांनी जतन केल्या आहेत व नवीन बांधकामात देखील त्यातले काही आकार वापरले आहेत. अगदी शहरातले बस स्टॉप देखील बघा, किती सुंदर केले आहेत.
|
Bus stop! |
जुन्या घरांची रचना आणि वास्तुशैली जतन केलेली आहे. अशा काही गल्ल्या पर्यटकांसाठी मोठे आकर्षण बनल्या आहेत.
अनेक शतके सूचो भोवती एक तटबंदी होती, भिंत होती. भिंतीची लांबी सुमारे 15000 मीटर होती. त्याभोवती पाण्याचे खंदक आणि कालवे होते. म्हणूनच शहरात येण्यासाठी संरक्षित दारे होती ती, जमीन आणि पाण्यातली!! ह्या दरवाज्यांसाठी सूचो प्रसिद्ध आहे.
'पैनमेन निसर्गरम्य क्षेत्र' पर्यटन विभागाने उत्तम रित्या विकसित केलेले आहे. ह्या क्षेत्रातील रुईरंग पॅगोडा, जमीन आणि पाण्यातील दारे, बागा, अनेक पूल, सगळेच खूप सुंदर आहे.
|
Bull in the temple |
ही तेथील मंदिरातील गंमतशीर प्रथा! तिथे असे मानले जाते की तुम्ही मनात एखादी इच्छा धरून, ह्या बैलाच्या पुतळ्याची शेपटी धरलीत तर तुमची इच्छा पूर्ण होते!! ह्या चीनी ताईंना विचारायला हवे, त्यांची इच्छा पूर्ण झाली का ते!
|
Panmen gate |
|
The beautiful descend in he scenic area |
|
The ancient system to open the water gate |
|
View from the height |
|
Beautiful lamps and the surveillance camera! |
|
Description of the area |
|
Ruiguang pagoda |
सूचो विणकामाच्या फ्रेम्स साठी प्रसिद्ध आहे. मला माझ्या नंतरच्या ट्रिप मध्ये म्हणजे नोव्हेंबर २०१३ मध्ये काही फ्रेम खरेदी करायची संधी मिळाली.
सूचोच्या जवळच, साधारण ३० किलोमीटर अंतरावर चीनमधील सर्वात प्रसिद्ध जल शहर आहे. 'झाउझुआंग( झौझंग/ चाऊचन्ग )' असे या शहराचे नाव आहे. झाउझुआंग ह्या शहराला सुमारे २७०० वर्षांचा इतिहास आणि सांस्कृतिक पार्श्वभूमी आहे. शहरातील अनेक जलमार्ग आणि चांगल्या प्रकारे संरक्षित व जतन केलेली, जलमार्गाच्या दोन्ही बाजूला असलेली प्राचीन घरे, जलमार्ग सुशोभित करणाऱ्या वेली आणि झाडे, अनेक सुंदर दगडी पुल ...ह्यातील प्रत्येक गोष्ट तेथील वातावरण जादुई आणि स्वप्नवत होण्यासाठी कारणीभूत आहे.
ह्या शहराला 'व्हेनिस ऑफ ईस्ट' म्हणून ओळखले जाते. हे शहर पर्यटकांचे अतिशय लोकप्रिय आकर्षण आहे आणि चीन राष्ट्रीय पर्यटन प्रशासनाने या शहराला AAAAA निसर्गरम्य परिसर म्हणून वर्गीकृत केलेले आहे.
मी भाग्यवान होते की मी एप्रिल २०१३ मध्ये वसंत ऋतूत झाउझुआंगला भेट दिली. तेव्हा हवा खूपच छान, प्रसन्न होती आणि रंगीबेरंगी फुले पूर्ण बहरली होती. कालवे आणि जलमार्ग स्वच्छ ठेवलेले होते. त्यामुळे गोंडोला किंवा बोटची सफर फारच आनंददायक झाली.
मी शांघायहून एक दिवसाची टूर घेतली होती. त्यामुळे संध्याकाळपूर्वी तिथून शांघायला जाण्यासाठी निघावे लागले. परंतु मला वाटते की रात्रीचे दृश्य देखील खूपच सुंदर आणि नेत्रदीपक असेल. संध्याकाळी गावात एक सांस्कृतिक कार्यक्रम होतो असे म्हणतात, जो मला बघता आला नाही. तुम्ही कोणी जाल तेव्हा हे दोन्ही नक्की बघा आणि मला फोटो आणि व्हिडिओज पाठवा!!
ह्या शहरातील जीवन खरोखर अगदी शांत आहे. सर्व गोंडोलिया स्त्रियाच होत्या. त्यांची गोंडोलाची वेळ येईपर्यंत त्या शांतपणाने वाट पाहत होत्या.
ह्या शहराच्या, गेल्या काही दशकातील, अगदी सुरुवातीच्या काळातील आंतरराष्ट्रीय प्रसिद्धीस, प्रसिद्ध चीनी चित्रकार चेन यिफेई कारणीभूत आहेत. न्यूयॉर्कमधील त्यांच्या चित्रकला प्रदर्शनात झाउझुआंगची काही चित्रे होती आणि त्यामुळे जगाला झाउझुआंगबद्दल माहिती मिळाली. शांघाय आणि सूचोच्याजवळ असल्यामुळे, प्रवासाचे जलद मार्ग उपलब्ध असल्याने आंतरराष्ट्रीय पर्यटकांना झाउझुआंगला, एक दिवसात येऊन जाणे सोपे झाले आहे.
|
Ancient Houses and stone bridges |
|
Residents washing clothes |
|
One more bridge |
|
Knitting away the time!! |
|
Spring is here! The Cherry blossoms! |
|
The dream come true! |
|
Singing a song!! |
जलमार्गाने भरपूर वेळ प्रवास केल्यावर आम्ही जमिनीवरील रस्ते पण पाहिले!!
तिथे एक प्रदर्शन भरलेले होते. जुन्या खोक्यांपासून नवीन वस्तू, शहरातील प्राचीन इमारतींच्या प्रतिकृती केलेल्या होत्या. खूप सुंदर आणि सफाईदार काम केलेले होते.
खूप आवडलेले एखादे ठिकाण सोडणे, कदाचित आपण जन्मात इथे परत येणार नाही आहोत हे माहिती असताना, अवघडच असते. बरं, अशी आवडलेल्या आणि मनात रुतून बसलेल्या ठिकाणांची यादी पण मोठी. एक जन्म कसा पुरे पडणार??!!!
अच्छा झाउझुआंग!! मला तेव्हा निघतानाच माहिती होते की हे ठिकाण माझ्या कायम लक्षात राहणार आहे. आज, जवळपास आठ वर्षांनी पण, मला ते सगळे आठवते आहे. भुरळ पडणारी गोंडोला सफर, फुलून पुलावर ,पाण्यावर वाकलेले चेरी ब्लॉसम्स, जलमार्गावर चवऱ्या ढाळणाऱ्या लोंबत्या पोपटी वेली, ते दगडी पूल आणि कमानी, प्रसन्न हवा आणि आनंदात असलेली तृप्त,निवांत मी! #ClassicalGardensInChina #OneDayTourFromShanghai #No1WaterTownInChina #SilkThreadEmbroidary #VeniceOfEast #GondolaRideInChina #NatureAndArchitectureInChina
Mavshi, Sucho pravas varnan masta photos mule ajun masta vatla.
ReplyDeleteThanks Deepika!
Delete