Skip to main content

मोरबे धरण -वावर्ले गाव

 रोज सूर्योदय आणि सूर्यास्त होतो आणि विशेष म्हणजे तो सर्वांसाठी फुकटात उपलब्ध असतो! तेव्हा तो चुकवू नका. प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर प्रवासात मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. तुम्ही हे दोन्ही,आधी कधी ऐकले होते का? 

मोरबे 
त्या दिवशी सुखद गार हवेने आमचे स्वागत केले. डोंगर, जंगल, तलावातील पाणी आणि ताजी हवा ..दिवसाची प्रसन्न सुरुवात व्हायला अजून काय हवे? माझी खात्री आहे, सूर्यदेखील इथे उगवताना मनात असेच म्हणत असेल!!

मोरबे धरणाच्या बांधावरून 
आम्ही मोरबे धरणाच्या बांधावर होतो. चालण्यासाठी, धावण्यासाठी हा उत्तम रस्ता आहे. इथे दिवसभर पर्यटकांना परवानगी नाही. फक्त सकाळी फिरायला येणाऱ्या लोकांसाठी सकाळी साधारण ८ वाजेपर्यंत हा परिसर सार्वजनिक वापरासाठी खुला असतो. आम्ही तिथे सकाळी खूप लवकरच पोचलो होतो. 
 महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खालापूरजवळ धावरी नदीवर बांधलेले हे धरण आहे. मोरबे हे तसे अलिकडच्या काळात बांधले गेलेले भारस्थायी धरण आहे. 
आधुनिक युगातील नोंदी बघितल्या तर लक्षात येते की सिंधुदुर्ग जिल्ह्यातील धामापूर हे धरण महाराष्ट्रातील सर्वात जुने धरण आहे. धामापूर धरणाचे बांधकाम १५३० मध्ये सुरु झाले आणि १६०० मध्ये ते पूर्ण क्षमतेने काम करत होते. पण ते मातीचे धरण होते. धामापूर म्हटल्यावर सुनीताबाईंची आठवण होते. सुनीताबाई देशपांडे ह्यांनी एका पुस्तकात धामापूर धरणावर लेख लिहिला आहे. ते चित्र डोळ्यांपुढे उभे राहते. 
प्राचीन काळातल्या, भारतातील सर्वात जुन्या धरणाचा उल्लेख सापडतो तो चोला राजांनी बांधलेल्या कल्लनाई धरणाचा. ह्या धरणाचे बांधकाम इ.पूर्व १०० मध्ये सुरु झाले. पहिल्या शतकाच्या अखेरीस हे धरण बांधून पूर्ण झाले होते. तंजावर जवळ कावेरी नदीवर बांधलेले हे धरण अजूनही कार्यक्षम आहे. कावेरी नदीचे पाणी अडवून शेतीसाठी वापरले गेले व तो सर्व भूभाग समृद्ध झाला. 
आधुनिक काळातील जुने भारस्थायी धारण आहे ते तुळशी धरण. मुंबईजवळील तुळशी नदीवर हे धरण १८७९ मध्ये बांधले गेले. 
मोरबे धरण २००६ मध्ये कार्यान्वित झाले. भारस्थायी धरण बांधायचे तर तिथे पाया भक्कम व मजबूत होण्यासाठी, विशिष्ट संरचनेची, खडकाळ जमीन आवश्यक असते. त्यावर मग दगडांच्या राशी व दगड, काँक्रीटचे बांधकाम केले जाते. मोरबे येथे पण आपल्याला दगडांच्या राशी व दगडी बांधकाम दिसते. अशी भारस्थायी धरणे ही स्वतःच्या वजनामुळे व विशिष्ट रचनेमुळे पाण्याच्या धडका वर्षानुवर्षे सहन करू शकतात. 
मोरबे धरण नवी मुंबईला पाणीपुरवठा करते. ह्या धरणाची मालकी नवी मुंबई महानगर पालिकेकडे आहे. एक धरण मालकीचे असणारी अशी, मला वाटते, ही एकमेव महानगर पालिका असेल. 

धरणाची सविस्तर माहिती 
📷 Wikimedia Commons

 चंद्रास्त 01/11/20
कोजागिरीचा पूर्ण चंद्र मावळण्याच्या तयारीत होता. हा फोटो सकाळी ६. २६ ला घेतलेला आहे. ह्या फोटोत तुम्हाला धरणाचा दगडी बांध दिसेल. दुसऱ्या बाजूला दिशा उजळू लागल्या होत्या. सूर्य उगवण्याच्या तयारीत होता. ती नक्कीच एक अप्रतिम सुंदर सकाळ होती.

सूर्योदय 01/11/20
ते सुखद सुंदर वातावरण कोणत्याच कॅमेऱ्याने टिपता येणार नाही. तरीही मी माझ्या साध्या मोबाईल कॅमेऱ्याने टिपण्याचा प्रयत्न केला आहे. 

हे पहाटेचे दृश्य अनुभवण्यासाठी आम्ही आदल्या दिवशीच जवळच्या वावर्ले गावात जाऊन राहिलो होतो. मोरबे धरणापासून कारने दहा मिनिटांच्या अंतरावर असलेले ते एक छोटेसे गाव आहे. 

खालापूर जिल्ह्यात चौक कर्जत रस्त्यावर ह्या वावर्ले गावात आम्ही राहिलो होतो साठे फार्म वर. खूप मोठाली झाडे असलेली ही शांत जागा जणू ऑक्सिजन बँकच आहे. प्रशस्त आवार असल्याने, सध्याच्या दिवसात आवश्यक असणारी 'दो गज की दूरी' पण सहज शक्य होते. 

साठे फार्म वरील फुले 
हिरवाई 
ऊन सावल्या इथे खेळती, झाडांसंगे त्याही हिरवळती!

वावर्ले गाव आणि एकूणच हा सर्व परिसर टेकड्या, डोंगर, पाझरतलाव, ओढे, धबधबे, झाडे ह्या सगळ्यांमुळे निसर्गसमृद्ध आहे. दहा पंधरा मिनिटे चाललात आणि एक छोटासा चढ चढलात की तुम्ही ह्या तलावापाशी पोचता. पावसाचे पाणी इथे ह्या तलावात साठते. ह्या भागात भरपूर पाऊस असल्याने पावसाळ्यात खूप धबधबेदेखील असतात.
रस्त्याची सुरुवात आमराईतून होते आणि रानातील वळणवाटांनी आपण तलावापाशी पोचतो. इतकी शुद्ध मोकळी हवा शहरांत नक्कीच मिळत नाही.


तलावाचे विहंगम दृश्य
जेव्हा तुमच्या नजरेला असे विस्तीर्ण मोकळे रान, डोंगर आणि पाणी दिसते तेव्हा एका अवर्णनीय स्वातंत्र्याचा अनुभव येतो. 
वाऱ्याने हलते रान, बाकी सुनसान, जग हे सारे! 
जवळच एक लहानसे गणेश व शिवमंदिर आहे. जरी मंदिराचे बांधकाम नवे असले तरी शिव पिंडी आणि गणपती मात्र अनेक दशके पाहिलेले जुने जाणते दिसतात. काळाच्या धडका सोसून, त्या खुणा अंगाखांद्यावर वागवत आहेत.
मंदिर 
अजून मावळायला वेळ आहे, सूर्य नुसता डोंगराच्या मागे जाऊन बघतो आहे!
सूर्य मावळण्याच्या तयारीत !! 31/10/20
उगवता पूर्ण चंद्र दिसणे ह्यापेक्षा वेगळी, अशी एखाद्या दिवसाची काय सुंदर अखेर असू शकते?
रिसॉर्टच्या जेवणघरातून दिसलेला उगवता पूर्ण चंद्र! 31/10/20
स्वादिष्ट व्हीगन अन्नाचा आस्वाद घेता घेता कोजागिरीचा उगवणारा पूर्ण चंद्र दिसणे हा अपार आनंद होता. 
साठे फार्मपासून जवळच सोंडाई किल्ल्याचा ट्रेक करता येतो. मध्यम अवघड असा हा दोन तासांचा ट्रेक आहे. कोंढाणे बुद्ध लेणी देखील साठे फार्म पासून कारने अर्ध्या तासाच्या अंतरावर आहेत. ही दोन्ही ठिकाणे पुढच्या ट्रीपला जाण्या साठी राखून ठेवली आहेत. 
जसे मी सुरुवातीला म्हणाले तसे, प्रवास हा किलोमीटर मध्ये नव्हे तर मिळालेल्या आनंदात मोजायला हवा. घरापासून साधारण ५० किलोमीटर वर असणाऱ्या ठिकाणाची दीड दिवसाची एक लहानशी ट्रिप देखील तुम्हाला ताजेतवाने करून टाकते!  

#ShortTripFromMumbai #ShortTripFromThane #ShortTripFromPune #SatheFarmsSatishSathe07738342820 #PlacesToVisitNearKarjatKhopli

Comments

  1. अप्रतिम पुढच्या वेळी आम्हाला पण घेऊन चल😍
    फोटो खूप छान 👌👌👌

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...