Skip to main content

चला पक्षीजगताच्या प्रवासाला.

आजदेखील सफरच आहे ... पण पक्षीराज्याची. हे सगळे पक्षी टिपायला कुठे जंगलात किंवा पक्षी अभयारण्यात जावे नाही लागले. हे आहेत भर मुंबईत, नागरी वस्तीत दिसलेले पक्षी. 

तसे तर आपल्या सगळ्यांनाच पक्षी दिसतात. पण त्यांच्या येण्याजाण्याच्या वेळा लक्षात ठेवून, कॅमेरा सज्ज ठेवून त्यांची छायाचित्रे घेणे काही प्रत्येकाला जमत नाही. त्यासाठी पारखी नजर आणि आवड हवी. ह्या सर्व सुंदर छायाचित्रांचे छायाचित्रकार आहेत डॉ. प्रफुल्ल चितळे.

प्रत्येक छायाचित्र सुंदर आणि बारकावे टिपणारे. साधारणपणे, ' वा! छान!!" म्हणून आपण थांबतो. पण शब्दांचे ज्यांना वरदान असते ते जणू त्या छायाचित्रातील भाव शब्दात उतरवतात. प्रत्येक छायाचित्राला समर्पक ओळी लिहिल्या आहेत अंजली चितळे ह्यांनी. 

चला तर मग पक्षीजगताच्या प्रवासाला. मी म्हटले की हा पक्षीजगताचा प्रवास.. पण हा तर ठरला कलाजगताचा प्रवास. छायाचित्रकाराने काढलेली पक्ष्यांची सुंदर छायाचित्रे, ती पाहून कवयित्रीला सुचलेले शब्द आणि तेच पाहून कलावंतांना काढावीशी वाटलेली रांगोळी. आता ह्या पोस्टमध्ये काही रांगोळ्या पण समाविष्ट झाल्या आहेत! रांगोळ्या काढणाऱ्या शुभदा बर्वे आणि प्रज्ञा खरे ह्या काही प्रशिक्षण घेतलेल्या किंवा व्यावसायिक  रंगावलीकार नाहीत. पण अंगात असलेली कला आणि सत्तरी पंचाहत्तरीच्या वयात देखील असलेला अपार उत्साह त्यांच्या रांगोळीत दिसतो. तेव्हा आता पक्ष्यांच्या रांगोळ्यांचादेखील आनंद घेऊ या!

हळद्या

रंगावली - शुभदा बर्वे 

हळद्या
पिवळे अंग, काळे पंख
डोळ्यांत काजळ, लाल चोच
किती रे तुला रंगांचा सोस?
 
कोकिळा 

कोकिळा
ठिपक्या ठिपक्यांची पांघरून शाल
लाल डोळ्यांनी किती पहाल?
यायचाय अजून आंब्याला मोहर
कोणत्या झाडावर बसाल तंवर?
 
फुलचूखी 

फुलचुखी
एवढंसं पाखरू, 
लागलं भिरभिरु
प्रत्येक फुलात खुपशी चोच
मधाचा याला भारीच लोभ
 
कबुतर 
 
रंगावली - शुभदा बर्वे 

कबुतर
काँग्रेसचा दिलाय राजीनामा,
करतात सगळे खाणाखुणा
पण कोणीच राजरोस पक्षात घेईना!
 
साळुंकी 

साळुंकी
तू तर आमची चित्रनेत्रा
मेक अप केलाय काय
भरतनाट्यमकरिता!
 
साळुंकी जोडी 

साळुंकी जोडी 
थंडीचा पडलाय कडाका,
ऊन खायाला येताय् का?
 
कोतवाल 

कोतवाल
मी आहे कोतवाल,
नजर माझी भारी
लहान लहान पाखरांवर 
करतो दादागिरी.

सुतार पक्षी 

सुतार पक्षी
पिवळे केशरी घातले टोपडे
काळे पांढरे माझे झबले
लांब करडी मोठी चोच
लाकडात खुपसू बघतोय बघ.
 
शिंपी 

शिंपी
मी आहे शिंपी,
करतोय गणती,
 'Mask' शिवायला 
पानं लागतील किती?

पोपट 

पोपट
लाल टोपी, हिरवा कोट,
गळ्यात बांधलाय काळा गोफ
पाहून घ्यावा नोक,झोक
उणे काढायला नाहीच स्कोप.

तांबट 

तांबट
निळी चोच,पोपटी गळा
खाली,वर केशराचा मळा
हिरवे पंख,करड्या अंगी
पायांना लावलीय चुटुक मेंदी
रंगीबेरंगी माझे पिवळे अंग
सांगा,कोणता उरलाय रंग?

रंगावली - प्रज्ञा खरे 

नुकतेच कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू 

 नुकतेच कोषातून बाहेर पडलेले फुलपाखरू
  चिकटलेले पंख चिमुकले
प्रकाशात येता झगमगले
फुला फुलांवर राहीन विहरत 
आनंदाने वेचिन  मधुकण

जन्माची तयारी 

जन्माची तयारी
एवढासा जीव,पण म्हणतोय कसा
जाताना सोडून जाईन ठसा
रंगांची नाजुक नक्षी
ठेवीन मी बाळांसाठी.



इतके पक्षी आपल्या अवतीभोवती असतात. त्यांना पाहण्याची दृष्टी मात्र हवी.
पक्ष्यांकडून आपल्याला खूप शिकतादेखील येईल.  इथे आठवते आहे बालकवींची कविता -आनंदी पक्षी.

आनंदी पक्षी
केव्हां मारुनि उंच भरारी । नभांत जातो हा दूरवरी,
आनंदाची सृष्टी सारी । आनंदें भरली.

आनंदाचे फिरती वारे। आनंदानें चित्त ओसरे,
आनंदें खेळतो कसा रे । आनंदी पक्षी!

हिरवें हिरवें रान विलसतें। वृक्षलतांची दाटी जेथें,
प्रीती शांती जिथें खेळते । हा वसतो तेथें.

सुंदर पुष्पें जिथें विकसलीं। सरोवरीं मधु कमलें फुललीं
करीत तेथें सुंदर केली । बागडतो छन्दें.

हासवितो लतिकाकुंजांना। प्रेमें काढी सुंदर ताना,
आनंदाच्या गाउन गाना । आनंदें रमतो.

जीवित सारें आनंदाचें । प्रेमरसानें भरलें त्याचें;
म्हणोनिया तो रानीं नाचे । प्रेमाच्या छन्दें!

आम्हांकरितां दुर्धर चिंता। नाना दु:खें हाल सभोंता,
पुरे! नको ही नरतनु आताम । दु:खाची राशी!

बा आनंदी पक्ष्या, देई । प्रसाद अपुला मजला कांहीं,
जेणें मन हें गुंगुन जाई । प्रेमाच्या डोहीं.

उंच भरार्‍या मारित जाणें । रूप तुझें तें गोजिरवाणें!
गुंगुन जाइल चित्त जयानें । दे, दे तें गाणें!

- बालकवी


# birds #Birdwatching #BirdsInMumbai # Balkavi #Happybirds

Comments

  1. फोटोज आणि आोळी दोन्ही सुंदर 👌
    कबुतर जास्त आवडल 🙂

    ReplyDelete
  2. सुंदर फोटो व कविता

    ReplyDelete
  3. फारच छान सफर झाली पक्षांच्या आणि काव्याच्या दुनियेची.

    ReplyDelete
  4. चारोळ्यांसह पक्षी जगताची मौजदार सफर

    ReplyDelete
  5. प्रफुल्लची पक्ष्यांची फोटोग्राफी तसेच अंजलीवहिनींची साजेशी कविता व नेमके रंग व गुणांचे चपखल वर्णन.खूप अभिनंदन दोघांचे.

    ReplyDelete
  6. डॉक्टर प्रफुल यांनी काढलेली सर्व छायाचित्रे अप्रतिम तर आहेतच पण अंजली यांनी प्रत्येक पक्षांची काव्यातून करुन दिलेली ओळख खूपच छान आहे.दोघांचेही अभिनंदन!

    ReplyDelete
  7. Photo baghoon and kavita wachoon chan waTla - Vrunda T, Prafull Chitale.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

महेश्वर

महेश्वर हे मध्यप्रदेश पर्यटन निगमच्या पर्यटन स्थळांमधले एक महत्वाचे नाव आहे. पण करोडो भारतीयांसाठी ते केवळ एक पर्यटन स्थळ नाही तर एक तीर्थस्थान असते. लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या वास्तव्याने पुनीत झालेले स्थान आहे.  महेश्वर किल्ला प्रवेशद्वार  राजवाडा प्रवेशद्वार  बाह्यरूप  पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर  राजवाडा प्रवेशद्वार  अहिल्याबाई होळकर हे केवळ भारताच्याच नव्हे तर विश्वाच्या इतिहासातील एक सोनेरी पान. संपूर्ण मानव विश्वातील यशस्वी स्त्री राज्यकर्त्यांची सूची करायची झाली तर अहिल्याबाई होळकरांचे नाव ठळकपणे लिहायला लागेल.   31 मे 2025 ला त्यांची तीनशेवी जयंती आहे. पण 300 वर्षांपूर्वी होऊन गेलेल्या अहिल्याबाईंचे आयुष्य अगदी आजच्या आधुनिक काळातल्या आव्हानातही मार्गदर्शक ठरावे असेच आहे.  त्यांच्याविषयीचा आदर मनात घेऊनच आपण महेश्वरला जातो आणि त्या भावनेच्या प्रकाशात महेश्वर पाहतो. महेश्वरला फार मोठी प्राचीन परंपरा आहे. स्कंद पुराणाच्या रेवा खंडात आणि वायू पुराणाच्या नर्मदा रहस्य मध्ये महिष्मती म्हणजे महेश्वरचे वर्णन आलेले आहे. 'गुप्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

Prashanti Kutiram, Bangalore

I am happy to write my first post of 2022!! I am here with a really very special post! This is not a tourist place and still it holds a special place in each and every visitor’s mind. This is Prashanti Kutiram of Bangalore. Prashanti kutiram as the name suggests, surely makes your mind peaceful. It's around 70-80 kms from Bangalore airport but with the famous traffic jams of Bangalore, it may take two and half hours by taxi.  This is the place where The Swami Vivekananda Yoga Anusandhan Sansthan is situated on a sprawling 100 acres. Swami Vivekanand  Swami Vivekanand  Ramakrishna Paramahans and Sharada Mataji  SVyasa Founded in 1986, Svyasa follows Swami Vivekanand's teachings and combines best of east and West. So it combines Yoga and spirituality with modern sciences.  The first thing you will notice about Vyasa is the greenery. The campus is having umpteen trees. It's hilly area. The steep paths and slopes offer you the much needed exercise!! The Green Umbre...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...