'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.
हा ब्लॉग शोधा
चेरापुंजी की सोहरा??? ते सोहराच आहे!
रिकाम्या जागा भरा, जोड्या लावा, एका वाक्यात उत्तर द्या, कारण सांगा.. आपण शाळेच्या प्रश्नपत्रिकेतील, ह्यातील प्रत्येक प्रकारच्या प्रश्नाचे नाव घेतले की आपल्याला आठवेल, भारतात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या जागेबद्दल प्रश्न होता. उत्तर नक्कीच चेरापुंजी होते. चेरापुंजीला एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा गिनीज रेकॉर्ड आहे. जुलै 1861 मध्ये चेरापुंजीला एका महिन्यात 30.5 फूट पाऊस पडला!!!! ह्यामुळे चेरापुंजी गावाचे नाव - पृथ्वीवरील सर्वात जास्त ओली जागा असे पडले. परंतु सध्या सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे जवळचेच Mawsynram नावाचे गाव.
म्हणूनच आता हे ठिकाण सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणही नाही आणि त्या गावाचे आता चेरापूंजी असे नावदेखील नाही!! आता त्याला 'सोहरा' असे म्हणतात, जे खरे तर त्या गावाचे मूळ नाव आहे. मूळ नाव सोहरापूनजी होते, जे ब्रिटिश राज्यकर्ते उच्चारू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी त्याला चेरापुंजी म्हटले. या जागेचे मूळ नाव पुन्हा ठेवले जावे म्हणून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अनेक वर्षे स्थानिक लोकांना प्रयत्न करावे लागले. 2007 मध्ये मेघालय सरकारने ठरविले की आता ह्यापुढे या जागेचे नाव सोहरा असे असेल.
पर्वतरांगा, डोंगर, ढग, धुक्यामुळे आणि पावसामुळे ब्रिटीशांनी या जागेला 'पूर्वेचे स्कॉटलंड' म्हणून संबोधले आणि हे ठिकाण उत्तर-पूर्व भारतातील त्यांचे प्रशासकीय मुख्यालय बनविले.
या प्रदेशात होणाऱ्या मुसळधार पावसामुळे दरवर्षी सर्वात वरची माती वाहून जाते आणि शेती करणे अवघड होते. पावसाळ्यामध्ये मुसळधार पाऊस असूनही, या प्रदेशात हिवाळा आणि उन्हाळ्यात दुष्काळाचा सामना करावा लागतो. अलीकडेच ही वाईट परिस्थिती सुधारण्यासाठी पावसाच्या पाण्याचे संकलन, जतन आणि संवर्धन करण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही जेव्हा सोहराला गेलो होतो, तेव्हा इतका पाऊस पडणाऱ्या शहरात सगळीकडे हिरवेगार असेल अशी आम्ही अपेक्षा केली होती. आमची निराशा झाली. शहरात सगळीकडे एकतर पिवळे सुकलेले गवत किंवा ओसाड जमीन होती. पण गावाच्या बाहेर, जवळपास मात्र घनदाट जंगले होती आणि त्यामुळे हिरवाई टिकून होती!! मेघालयातील रस्ते खूपच चांगल्या स्थितीत आहेत. सुंदर निसर्ग, ढग आणि उत्कृष्ट रस्ते यांच्यामुळे प्रवास अगदी आनंददायी झाला.
सोहराकडे जाताना आम्ही 'उमियम तलाव' पाहण्यासाठी गेलो. स्थानिक लोक त्याला 'बरापानी तलाव' म्हणतात. बरापानी म्हणजे बडा पानी.. भरपूर पाणी असे असेल का? मला माहित नाही.
हा तलाव गुवाहाटी ते सोहराकडे जाणार्या महामार्गाजवळ आहे आणि शिलाँगपासून सुमारे 15 कि.मी. अंतरावर आहे. हा जलाशय म्हणजे उमियाम नदीवर बांधलेल्या धरणामुळे बनलेला एक कृत्रिम तलाव आहे. साठविलेले पाणी जलविद्युत निर्मिती केंद्रासाठी वापरले जाते. हा तलाव पर्यटकांसाठी मेघालयमधील एक मोठे आकर्षण आणि जल क्रीडा केंद्र आहे. नुसते तलावाभोवती आरामात फिरणे हे देखील खूप शांतवणारे आणि सुखद आहे. सततच्या आणि प्रदीर्घ प्रवासानंतर तर असे फिरणे विशेष आवश्यक आहे.
Umiam Lake 2.09p.m.
Umiam Lake 2.10 p.m.
Umiam Lake 2.10 p.m.
Umiam Lake 2.48p.m.
Umiam Lake 2.46 p.m.
Umiam Lake 2.44 p.m.
Umiam Lake 2.50 p.m.
तुम्हाला आश्चर्य वाटले असेल की त्याच एका तळ्याची इतकी छायाचित्रे का दिली आहेत?!! इतकी सगळी छायाचित्रे दिली आहेत ते तुम्हाला मेघालय ह्या नावाला साजेसा मेघांचा-ढगांचा खेळ तिथे कसा अखंड चालू असतो ते लक्षात यावे म्हणून! अवघ्या काही मिनिटांच्या अवकाशाने सगळे चित्र अगदी बदलून जाते. केव्हा ढग येतील, केव्हा सूर्यकिरण दिसतील, कधी धुके असेल काहीच सांगता येत नाही. आपल्याला प्रकाश व सावलीचे नृत्य सतत बघायला मिळते.
मेघालय म्हणजे ढगांचे माहेरघर. ह्या राज्याचा भूभाग सगळा डोंगराळ प्रदेश आहे आणि देशात सर्वाधिक पाऊस जिथे पडतो असे हे राज्य आहे.
सोहराकडे जाताना लागते असे आणखी एक पर्यटन स्थळ म्हणजे 'हत्ती धबधबा, एलिफन्ट फॉल्स'. स्थानिक भाषेत त्याला तीन चरण किंवा तीन पायऱ्यांचा धबधबा म्हणत असत. पण सध्या प्रचलित आणि लोकप्रिय असलेले नाव एलिफंट फॉल्स आहे.
घनदाट हिरवेगार जंगल, थंड हवामान आणि झुळझुळ वाहणाऱ्या पाण्याच्या आवाजामुळे ह्या ठिकाणचे सौंदर्य वाढले आहे. धबधब्याच्या तळाशी जाण्यासाठी बर्याच पायऱ्या आहेत.
Elephant Falls 📷Wikimedia Commons
Elephant Falls
Elephant Falls
Elephant falls
In case you are wondering!!!
पायर्या चांगल्या बांधलेल्या आहेत आणि खाली उतरणे फार कठीण नाही. चढताना मात्र काही पायऱ्यांची उंची ज्येष्ठ नागरिकांना त्रास देऊ शकते. थोड्या थोड्या पायर्या झाल्या की बसण्यासाठी बेंच ठेवलेले आहेत. तिकिट कार्यालयाजवळ, प्रवेशद्वाराशी सुखद थंडीत आवश्यक अशी गरमागरम चहा, स्नॅक्सची आणि हस्तकलेच्या वस्तू, शाली, स्टोल्स,स्वेटर्स विक्री करणारी अनेक दुकाने आहेत. आपण तिथून काहीही न खरेदी करता परत आलात तर मग आपले नाव अनासक्त लोकांच्या यादीतच समाविष्ट करावे लागेल!!
मी केलेली खरेदी
मेघालयातील खासी डोंगराळ प्रदेशात, जिथे सोहरा आहे, तेथे बरीच पवित्र संरक्षित वने आहेत. महाराष्ट्रात देवराईची संकल्पना आहे तशीच काहीशी ही संकल्पना आहे. पूर्वापार चालत आलेल्या स्थानिक धार्मिक श्रद्धा आणि आता 2002 पासून अंमलात आलेल्या, वन्यजीव संरक्षण कायद्यामुळे ही सर्व वने संरक्षित आहेत. ह्या पवित्र जंगलात काही मोनोलिथस/ दगडरूपी स्मारके देखील आहेत. कोणी म्हणतात की त्यांचा उपयोग प्राचीन काळी बलिवेदी म्हणून केला जात असे. काहीजण म्हणतात की ती सगळी पूर्वजांची स्मारके व आठवण आहेत.
The Sacred Groves 📷Wikimedia Commons
वेळेअभावी आम्ही ह्या देवराईंना, पवित्र जंगलांना भेट देऊ शकलो नाही. सोहरा प्राचीन गुहांसाठी प्रसिद्ध आहे. आम्ही त्यापैकी दोन गुहा बघू शकलो.
पहिली गुहा 'अरवाह लुमश्यान' गुहा होती. ही एक अवश्य भेट द्यावी अशीच गुहा आहे. गुहांकडे जाण्याचा मार्ग फार सुंदर आहे. मेघालय शासनाने अतिशय निगा राखलेले आणि सुस्थितीत ठेवलेले असे हे ठिकाण आहे.
He must be tired..so taking rest!
Some distinguished visitors
गुहेकडे जाण्याच्या रस्त्यावर एक छान उद्यान केलेले आहे. बसायला बाक आहेत, झोपाळा आहे. त्या उद्यानातून आजुबाजूच्या डोंगरदऱ्यांचे, घनदाट जंगलाचे विहंगम दृश्य दिसते.
आम्ही नंतर भेट दिली त्या mawsmai गुहेपेक्षा, ह्या Arwah गुहेत जाणे खूप सोपे होते. या अरवाह गुंफा मोलस्कच्या जीवाश्मांसाठी प्रसिद्ध आहेत. ते जीवाष्म प्रागैतिहासिक कालखंडातील आहेत, म्हणजे जवळजवळ 5 ते 6 कोटी वर्षांपूर्वीचे! इतके पुरातन जीवाश्म पाहून खरोखर खूप आनंद झाला.
गुहेच्या छतावरून ओघळून आता खडक झालेले Stalactites आणि गुहेच्या जमिनीवर उभे असलेले Stalagmites गुहेच्या सौंदर्यात भर घालतात.
The entrance of the Arwah Lumshyanna caves
Stalactite
Stalactites
Fossils
Large portion with fossils
गुहेच्या आत एक लहानसा पाण्याचा प्रवाह वाहत आहे, त्यामुळे गुहेच्या जमिनीचा काही भाग थोडा निसरडा आहे. काही भागात गडद अंधार आहे. म्हणून सोबत एक शक्तिशाली टॉर्च अवश्य ठेवावा आणि योग्य, घट्ट पकड असलेले आरामदायक चपला/बूट घालावे. गुहेच्या सभोवतालची जागा ह्या व्हिडिओत दिसते आहे अशी आहे.
सोहरा धबधब्यांसाठी देखील प्रसिद्ध आहे. भारतातील सर्वात उंच धबधब्यांपैकी एक म्हणजे 'नोहकालिकाई धबधबा'. तो 1100 फूट उंचीवरून खाली पडतो. इतक्या उंचीवरून पडणारा जलप्रपात पाहणे हे पावसाळ्यात नक्कीच एक अद्भुत दृश्य असेल.
Nohkalikai Waterfall
आम्ही धबधबा पाहिला आणि अवघ्या पाच मिनिटात ती दरी संपूर्णपणे धुके आणि ढगांनी आच्छादली गेली. हे असे मेघालयात नेहमीच होते असे कळले. आम्ही सुदैवी म्हणून वेळेत पोचलो. नाहीतर इतक्या लांबून जाऊन धबधबा बघायला मिळाला नसता तर वाईट वाटले असते.
आम्ही सोहरा येथील 'रामकृष्ण मिशन स्कूल' कॅम्पसला भेट देऊ शकलो. ही जवळपास शंभर वर्षे जुनी संस्था असून इथे विविध प्रकारचे अभ्यासक्रम शिकवले जातात. येथे विद्यार्थ्यांनी बनवलेल्या साहित्य विक्रीचे दुकान देखील आहे.
Beautiful old building
शाळेच्या खेळाच्या मैदानाजवळ एक मंदिर आणि प्रार्थना हॉल आहे. शाळेत नियमित शाळेव्यतिरिक्त संगणक प्रशिक्षण केंद्र, एक व्यावसायिक प्रशिक्षण शाळा, आदिवासी मुलांसाठी वसतिगृह, गरजू मुलांसाठी गदाधर अभ्युदय प्रकल्पाचे संचालन देखील केले जाते. रामकृष्ण मिशन सेवाभावी वृत्तीने रुग्णालये तसेच मोबाइल मेडिकल व्हॅन चालवित आहे. रामकृष्ण मिशन खरोखरच त्या क्षेत्रात अतिशय स्तुत्य काम करत आहेत.
सोहरामध्ये आणखी एक प्रसिद्ध धबधबा आहे. नाव आहे 'सेवन सिस्टर्स धबधबा'. सुमारे हजार फुटांवरून पडणारा हा सात लहान धबधब्यांचा मिळून बनलेला धबधबा पावसाळ्यात नक्कीच सुंदर दिसत असणार.
Seven sisters waterfall in rainy season 📷Wikimedia Commons
सगळ्याच्या सगळ्या, सातही बहिणींना भेटता येईल इतके आम्ही सुदैवी नव्हतो. जेव्हा नोव्हेंबर २०१९ मध्ये आम्ही सोहराला गेलो होतो तेव्हा ह्यातल्या काही धाकट्या बहिणी गायब होत्या, बहुतेक खेळायला गेल्या असणार!! मोठ्या दोघीतिघी बहिणी मात्र, असेल नसेल त्या शक्तीनिशी, अतिशय दक्षतेने मोर्चा सांभाळत होत्या!
Seven Sisters waterfall
असंख्य भूमिगत लेण्यांच्या चक्रव्यूहासाठी मेघालय प्रसिध्द आहे. बऱ्याच लेण्यात अद्याप कोणी गेलेले नाही, त्याविषयी संशोधन चालू आहे. भारतातील सर्वात लांब गुहा जंटीया टेकड्यांच्या भागात, मेघालयात आहे. तिची लांबी 31 किमी आहे, जी जगातील सर्वात लांब गुहांपैकी एक आहे.
सोहराजवळील 'Mawsmai' गुंफा ही एक भव्य गुहा आहे. शतकानुशतके जुनी अशी ही गुहा प्रचंड मोठ्या, अवाढव्य आणि चित्रविचित्र अशा Stalctites आणि Stalgmites नी भरलेली आहे. ह्या गुहेत चांगला उजेड आहे आणि म्हणून आपण निसर्गाचे हे सर्व चमत्कार पाहू शकतो.
गुहेपर्यंत जाण्याचा रस्ता तसा सोपा आहे. थोड्या पायऱ्या आहेत. गुहेच्या आत काही जागा आहेत ज्या खरोखरच अतिशय अरुंद आहेत. तिथे आपल्याला अगदी कसे बसे अंग चोरून जाता येते. गुहेत अशाही काही जागा आहेत जिथे आपल्याला पुढे जाण्यासाठी जवळपास रांगत जावे लागते.
या सर्व कारणांमुळे ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग लोक आणि स्थूल लोकांना गुहेत आत जाणे कठीण आहे. त्यांनी जाऊ नये असेच मी सुचवेन. गुहेचा फक्त एक लहानसा भाग लोकांसाठी खुला आहे.
पावसाळ्यात गुहेत पाणी भरते आणि त्यामुळे त्यावेळी लोकांना गुहेत जाण्याची परवानगी नाही.
ही चुनखडीची गुहा आपल्याला त्यातील नैसर्गिक रित्या तयार झालेल्या विविध आकृतींमुळे आश्चर्यचकित करते.
लेण्या, धबधबे, ढग आणि घनदाट जंगले आणि चांगल्या स्वभावाचे लोक आणि हस्तकला - आणखी किती कारणे हवीत- मेघालयात जाण्याचे ठरवण्यासाठी?!!!
सोहरामध्ये बरीच रिसॉर्ट्स आणि हॉटेल्स आहेत. आम्ही आमच्या प्रवासाच्या दोन महिने आधी ओयोवर हॉटेल बुक केले होते. ओयोच्या ईशान्य हॉटेल्स असोसिएशनशी झालेल्या वादाला धन्यवाद!! कारण त्यामुळे ऐनवेळी तिथे गेल्यावर त्या हॉटेलने जागा दिली नाही आणि रात्रीच्या वेळी, रस्त्यांवर दिवे नसलेल्या एका नव्या गावात, पुन्हा हॉटेल शोधण्याचा थरार आम्हांला अनुभवता आला.
परंतु आमचा ड्रायव्हर खरोखर शांत आणि धीराचा होता. बरेच फिरल्यावर आणि नेटवर शोधल्यावर आम्हाला एक सुयोग्य हॉटेल मिळू शकले.
हॉटेलचे नाव 'कोनिफेरस रिसॉर्ट' होते. नाव रिसॉर्ट असले तरी हॉटेलच आहे हे. जवळ एक लहानसा पाण्याचा प्रवाह, झरा वाहत होता. हॉटेलचे रेस्टॉरंट आम्ही गेलो तेव्हा ठीक ठीकच होते. मला वाटते त्यांचा नेहमीचा स्टाफ तेव्हा नव्हता. त्यामुळे गेलो त्या रात्री बाहेर जेवायला जायला लागले नाही इतकी सोय होण्यापूरेसाच आम्ही त्या रेस्टॉरंटचा लाभ घेतला.
Coniferous resort
Sunrise viewed from the balcony
सोहरा बघण्यासाठी, एकतर आपण शिलॉंगहून एक दिवसाची सहल करू शकता किंवा सोहरामध्ये राहू शकता. आम्ही दोन रात्री आणि दोन दिवस सोहरामध्ये थांबलो होतो.
सोहरा येथे शाकाहारी जेवणासाठी माझी शिफारस 'ऑरेंज रुट्स' हॉटेल असेल. ऑरेंज रूट्स ह्या नावाचे मूळ चेरापुंजी.. ऑरेंज ग्रोव्ह - संत्र्यांची बाग या शब्दात सापडते.
रेस्टॉरंट अतिशय स्वच्छ आहे, जेवण चवदार आहे आणि रेस्टॉरंटमधून दिसणारे दृश्य अप्रतिम आहे!
View from the restaurant
जेवणाची अमर्यादित थाळी पण चांगली होती. पण दुर्दैवाने माझ्याकडे त्याचे फोटो नाहीत. बहुधा जेवण आल्यावर फोटो काढण्याइतका संयम उरला नसेल!!
सोहरामध्ये इतके सगळे बघण्याजोगे आहे, आनंद अनुभवण्याजोगे आहे. त्यामुळे शिलॉंग हुन एक दिवसाची ट्रिप घाईघाईत उरकू नये असेच मी सुचवेन. सोहरा मध्ये किमान दोन दिवस तरी राहायलाच हवे.
मस्त मजा आली लेख वाचून. उमीअम्ं लेक चे फोटो आंणि त्यातील ढगांच खेळ पाहून मजा वाटली. Lockdown मधे प्रवासासाठी डोळे लावून बसल्रेल्या मनाला थोडी तरी शांतता लाभली. पण त्याचबरोबर प्रवासाची आणि खसकरूना सोहराची ओढ लावून गेली.
कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे. उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच. फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच 📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना. मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...
१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल. काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते? ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी. हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते. ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात. शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...
पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच. गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे. रानी की वाव रानी की वाव रानी की वाव रानी की वाव रानी की वाव 'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल. जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे. राणी उदयमती हिने तिचा पती राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...
एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे. कवी केशवसुत जन्मस्थान मार्गावरील फलक प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे. एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे. कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत. घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे . माजघर घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...
कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते. चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे. श्री गणपतीपुळे देवस्थान ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते. समाधी पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...
काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते. आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले. त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे. ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला. बर्वे वाडा अवघ...
मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे. मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच. हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत. जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...
कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही. गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात. गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....
कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून? ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर पाहणार आहोत. दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही इथले वातावरण फार सुखद आहे. रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे 'कड्यावरचा गणपती.' पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता. आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...
आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते. नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते. मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात. काद्री मंजुनाथ मंदिर का...
मस्त मजा आली लेख वाचून. उमीअम्ं लेक चे फोटो आंणि त्यातील ढगांच खेळ पाहून मजा वाटली. Lockdown मधे प्रवासासाठी डोळे लावून बसल्रेल्या मनाला थोडी तरी शांतता लाभली. पण त्याचबरोबर प्रवासाची आणि खसकरूना सोहराची ओढ लावून गेली.
उत्तर द्याहटवाखूपच सुंदर आहे. तू तर कितीतरी सुंदर सुंदर फोटो काढशील!
हटवाVideo कुठेय
उत्तर द्याहटवाOh.. web version try कर. मोबाईल वर नाही दिसल्या का?
हटवाviewed description of Beautiful Meghalaya. Felt like visiting .
उत्तर द्याहटवाThanks! Yes..a must visit place!
हटवामस्त आहे लेख...प्रत्यक्ष तिकडे गेल्यासारखे वाटले
उत्तर द्याहटवाधन्यवाद प्रतिमा!
हटवा