मुख्य सामग्रीवर वगळा

सिंगापूर- नित्यनूतन नगर

फारा वर्षांपूर्वीची गोष्ट! 'संग नील उत्तम' शिकारीला निघाला होता. शिकारीसाठी पुढे जात जात तो एका नव्या प्रदेशात येऊन पोचला. तिथे त्याला एक अगदी वेगळाच प्राणी ओझरता दिसला. त्याला वाटले तो सिंहच आहे आणि म्हणून त्याने त्या नव्या प्रदेशाला नाव दिले 'सिंगापुरा '. 

हे नाव आले होते संस्कृत शब्द सिंह आणि पुरा म्हणजे गाव, शहर ह्यावरून. सिंहपुर, सिंगापुरा!

'संग नील उत्तम' होता श्रीविजय साम्राज्याचा राजपुत्र. इतिहासाला तो 'श्री त्रि बुआना' म्हणून देखील ज्ञात आहे. श्री त्रि बुआना ही त्याची पदवी होती, अर्थ होता श्री त्रिभुवना - स्वामी तिन्ही जगांचा!

शतके लोटली. राज्यकर्ते बदलले. अनेक राजवंश प्रसिद्ध झाले आणि लुप्तदेखील झाले. सिंगापुरा अगदी मोक्याच्या जागी असल्याने मालवाहतुकीसाठी, व्यापारासाठी महत्वाचे बंदर म्हणून नावारूपाला आले. 

मग सिंगापुराचे सिंगापूर कसे झाले? नेहमीप्रमाणे ह्या बदलाचे कारण होता एक ब्रिटिश अधिकारी सर थॉमस रॅफल्स. त्याने १८२२ मध्ये सिंगापुरा जिंकले आणि ब्रिटिश साम्राज्यासाठी एक व्यापारी बंदर म्हणून हा देश विकसित केला. जेते आपल्याला हवे तसे जिंकलेल्या देशाचे नाव बदलतात हे जगजाहीर आहेच.. तर असे झाले सिंगापुराचे सिंगापूर. 

त्या नंतर सिंगापूरने अनेक उतार चढाव अनुभवले. दुसऱ्या महायुद्धात जपान्यांनी आक्रमण केले आणि ब्रिटिशांकडून फेब्रुवारी १९४२ मध्ये सिंगापूर हिसकावून घेतले. तीन वर्षांनी चक्र फिरले, जपानला शरणागती पत्करावी लागली आणि सिंगापूर पुन्हा एकदा ब्रिटिश अंमलाखाली आले. 

परिस्थिती सतत बदलत राहिली आणि अखेरीस ९ ऑगस्ट १९६५ ला सिंगापूर स्वतंत्र झाले. जरी स्वतंत्र देशाचे नाव अजूनही सिंगापुरा नसून सिंगापूरच असले तरी राष्ट्रगीतात मात्र बेरजया सिंगापुरा ( सिंगापुरा यशस्वी होवो. ) 'बेरजाया 'मलेशियन भाषेतील शब्द असून त्याचे मूळ बहुतेक संस्कृत मधील 'विजयी ' हा शब्द असावे. सिंगापुरा हा उल्लेख अजूनही एकदा येतो राष्ट्रगीतात, तो म्हणजे 'मजुला सिंगापुरा '. त्याचा अर्थ आहे सिंगापुरा सतत पुढे जात राहो, विकासमान होवो. सिंगापुरा हे नाव अशा रीतीने नागरिकांच्या मनात रुळत राहते. 

स्वातंत्र्यप्राप्तीपासून ते आजपर्यंत सिंगापूरने खूप मोठा पल्ला गाठला आहे. आज सर्व उद्योगांना आपले ऑफिस सिंगापूरमध्ये असावे अशी निकड भासते. जगातील सर्वात मोठ्या मालवाहू बंदरांपैकी एक, जगभरातील प्रवाशांचे आवडते ठिकाण अशी आणि अश्या अनेक ओळखी निर्माण करून सिंगापूर, हा छोटासा लाल ठिपका जगाच्या नकाशावर अभिमानाने झळकत आहे. 

सिंगापूर असा देश किंवा खरे तर असे शहर आहे, जिथे सतत काहीतरी बांधकाम चालू असते. मग ती नवीन रेल लाईन असेल, नव्या इमारती असतील किंवा प्रवाश्यांसाठी नवी आकर्षणे निर्माण करणे असेल, बांधकाम सतत चालू असते. सतत बदल हीच इथली न बदलणारी गोष्ट आहे! 

आम्ही जेव्हा सिंगापूरला २००५ मध्ये आलो होतो तेव्हा मरिना बे सँड्स आणि गार्डन्स बाय द बे दृष्टीपथात पण नव्हते. तेव्हा सिंगापूरचे चिन्ह असायचे मर्लायन आणि एस्प्लनेड. चला सिंगापूरच्या सफरीला अशी प्रवासी कंपन्यांची पत्रके असायची त्यावर देखील ह्याच दोन्हीचे फोटोज असायचे!! 

Esplanade
P.C. Sneha Tilak 

Merlion
P.C. Sneha Tilak 

आता सिंगापूर फ्लायर - जायन्ट व्हील, मरिना बे सँड्स, स्काय पार्क, इन्फिनिटी पूल, गार्डन्स बाय द बे, आर्टस् अँड सायन्स म्युझियम्स... इतकी सारी नवी आकर्षणे आहेत. प्रवासी कंपन्यांना सतत आपली सिंगापूर माहितीपत्रके बदलत राहायला लागत असणार!! 
ही सध्याची म्हणजे फेब्रुवारी २०२२मधील सिंगापूरची स्कायलाईन.
 
Trying to capture Singapore Skyline
P.C. Sneha Tilak 

 
खूप जोरदार वाऱ्याचा आणि ढगाळ आकाशाचा दिवस होता तो. पण वातावरण मात्र अगदी प्रसन्न होते. वरच्या फोटोत मी जो विडिओ काढते आहे तो हा - 


Merlion


Reflections! 

Near Arts and Science Museum. 

Marina Bay 

Arts and Science museum and Marina Bay Sands ( 2015)

Cloud Forest and Singapore Flyer ( 2015)

Cloud Forest and Flower Dome 
Gardens By the Bay 2015

Making Of Super Tree Grove (2015)

Super Trees Grove ( 2022) 

जगभरातून येणाऱ्या पर्यटकांना सतत नवनवीन पर्यटन केंद्रे तयार करणारे, नित्यनूतन भासणारे सिंगापूर भुरळ पाडते ह्यात शंकाच नाही. ह्या आकर्षणाखेरीज आणखी सिंगापूर ज्यांना पाहायचे आहे अशा निसर्गप्रेमींसाठी अनेक तलाव आहेत, बागा आहेत. ज्यांना इतिहासाची आवड आहे त्यांच्यासाठी दुसऱ्या महायुद्धाशी संबंधित अनेक ठिकाणे आहेत. काही अनेक शतकांपूर्वीचे सापडलेले अवशेष आहेत. 

काही कॅसिनोज आहेत, अनेक मॉल्स आहेत, शेकडो बार आहेत आणि हजारो उपहारगृहे आहेत! थोडक्यात काय तर प्रत्येकाला आपापल्या आवडीप्रमाणे बघायला, आनंद उपभोगायला सिंगापूरमध्ये काहीतरी आहेच! 

जेव्हा सिंगापूरवर इतक्या सगळ्या ब्लॉग पोस्ट्स आत्तापर्यंत लिहिल्या गेल्या आहेत, पर्यटकांनी लिहिलेले लेख आहेत, अनेक व्हिडिओज आणि फिल्म्स आहेत, अनेक चित्रपटांतून सिंगापूर दिसलेले आहे, तेव्हा मी माझ्या ह्या सिंगापूर सिरीज मध्ये नवे काय लिहिणार असा प्रश्न पडला असेल ना?! तर मी लिहिणार आहे, माझ्या नजरेला दिसलेल्या प्रसिद्ध सिंगापूराविषयी तसेच त्यातील काही कमी प्रसिद्ध ठिकाणांविषयी... तेव्हा वाचत राहा - सिंगापूर सिरीज. 

#WhatToSeeInSingapore #SingaporeTravel #GoSg #SingaporeAttractions #ExploreSingapore


टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...