मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

नोव्हेंबर, २०२६ पासूनच्या पोेस्ट दाखवत आहे

झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे जन्मस्थान - अस्सी, वाराणसी

मनाला वाराणसीला जाण्याची ओढ अनेक कारणांसाठी वाटते.. तशी ती ओढ प्रत्येक भारतीयाला वाटतेच. वाराणसी तुम्हाला बोलावून घेते आणि एका भेटीनंतरही सतत आकर्षित करत राहते.. खुणावत राहते. धर्म, श्रद्धा, संस्कृती, कला, इतिहास आणि इतर कितीतरी कारणे!  वाराणसीच्या भेटीत मी बनारसी साडी खरेदी केली नाही, एकाही दुकानात गेले नाही, पान खाल्ले नाही, चाट खाल्ली नाही, पुरामुळे घाटाघाटावरून चालता आले नाही, नावेतून शहर पाहता आले नाही.. मग अनेकांच्या मनात प्रश्न येईल ..हे काही करायचे नव्हते तर गेलातच कशाला? आणि इतके दिवस तिथे राहून केले काय?  आम्ही काय केले? तर आम्ही दोन वेळा विश्वनाथाचे मनभरून दर्शन घेतले, मंदिर परिसरात जितका जास्तीत जास्त वेळ घालवता येईल तितका घालवला, अनेक लहानमोठी मंदिरे पाहिली, अन्नपूर्णेचे दर्शन घेतले, तासंतास गंगेचे सान्निध्य अनुभवले, बनारस हिंदू विद्यापीठ, वस्तू संग्रहालय पाहिले आणि ... झाशीची राणी लक्ष्मीबाईंचे जन्मस्थान पाहिले! राणी लक्ष्मीबाई जन्मस्थान  अस्सी परिसरात कुठेतरी हे स्थान आहे असे माहिती होते. गुगलच्या मदतीने ठिकाण तर कळले. पण वाराणसीच्या गल्ल्यात गुगलपेक्षा स्थ...