गोष्ट आहे १९४२ मधील. तेव्हा सिंगापूर ब्रिटिश साम्राज्याचा मुकूट मणी मानला जात असे. सिंगापूर अभेद्य किल्ला आहे, शत्रू तो जिंकूच शकत नाही अशीच दुसऱ्या महायुद्धाच्या सुरुवातीला सर्वांची समजूत होती. ब्रिटीश लेफ्टनंट जनरल आर्थर पर्सिव्हल यांच्या नेतृत्वाखालील मित्र सैन्याने सिंगापूरला मजबूत सागरी संरक्षण दिले होते. त्यामुळे सिंगापूर अगदी सुरक्षित आहे असे मित्र राष्ट्रांना वाटले होते.
पण हा समज खोटा ठरवला जपानी लेफ्टनंट जनरल तोमोयुकी यामाशिताने. त्याने समुद्राच्या बाजूने हल्ला न करता, जमिनीच्या बाजूने हल्ला केला. खरे तर त्या आधीच मलेशिया आणि सिंगापूरला जोडणारा कॉजवे मित्र राष्ट्रांनी उद्ध्वस्त केला होता. त्यामुळे जपान या बाजूने हल्ला करेल असे त्यांना कधीच वाटले नव्हते. पण जपानी सैन्य मलायाच्या सीमेपासून निघाले आणि सिंगापूरच्या वायव्य किनार्यावरील 'सारिंबून' येथे लहान लहान बोटीतून, गटागटाने आले.
ती ८ फेब्रुवारी १९४२ ची अंधारी रात्र होती. सिंगापूरच्या वायव्य सीमेचे रक्षण करणार्या ऑस्ट्रेलियन सैन्याने या बाजूने हल्ला होऊ शकतो अशी कल्पना केलेली नसल्याने त्यामुळे कदाचित ते जरा बेसावध होते.
घमासान लढाई सुरू झाली. खरे तर जपानी सैन्य संख्येने कमी होते. पण ते युद्धाच्या पुरेपूर तयारीने आले होते. शिवाय जपानी सैन्याच्या तुकड्या सतत, केवळ रात्रभरच नव्हे तर दुसऱ्या दिवशीही येत राहिल्या. जपानी सैन्याला तेंगाह एअरफील्ड ताब्यात घ्यायचे होते आणि ते त्यांनी ९ फेब्रुवारी १९४२च्या मध्यरात्री साध्य केले. सिंगापूरवरील जपानी वर्चस्वाला सुरुवात झाली. त्यापुढचे सात दिवस सिंगापूरमध्ये जपान आणि मित्रराष्ट्रांच्या सैन्यामध्ये चकमकी चालू राहिल्या. १५ फेब्रुवारीला मित्र राष्ट्रांनी शरणागती पत्करली व त्या पुढील तीन वर्षे सिंगापूर जपानी अधिपत्याखाली होते.
दुसऱ्या महायुद्धात, ज्या ठिकाणी सिंगापूरवरील प्रत्यक्ष हल्ल्याला सुरुवात झाली ते ठिकाण कुठे आहे? कुठे आहे हा सारिंबून बीच? जर तुम्हाला तो पहायचा असेल तर तुम्हाला सिंगापूरच्या वायव्येकडील 'लिम चू कांग' भागात जावे लागेल.
बहातेरा ट्रॅक तुम्हाला लिम चू कांग रोडपासून समुद्र किनाऱ्याच्या दिशेने घेऊन जातो. हा एक अतिशय वेगळा रस्ता आहे, सिंगापूरमधील कदाचित एकमेव! कारण हा खडबडीत असा, माती, खडीचा रस्ता आहे, कच्चा रस्ता आहे. शिवाय ह्या रस्त्यावर लाईट्स नाहीत. हा रस्ता शेवटी सारिंबूनला पोचतो. हा परिसर खरोखरच एखाद्या ग्रामीण भागासारखा वाटतो. अर्थात अत्याधुनिक सिंगापूरमधला ग्रामीण भाग म्हटला तरी तो असा कितीसा ग्रामीण असणार ह्याची तुम्ही कल्पना करू शकता!
सिंगापूरच्या अगदी टोकाला असल्याने आणि वेगळा असल्यानेही हा रस्ता १००कि.मी. किंवा २०० कि.मी. ड्रायविंग /सायकलिंग रुटवर नक्की असतो!
|
Sarimbun Landing site on Google Map |
|
Bahatera Track |
|
Bahatera Track P.C. Sneha Tilak |
|
Sarimbun Landing Site |
आजकाल हे फाटक सुरक्षेच्या कारणांमुळे बंद ठेवतात. त्यामुळे अगदी समुद्राच्या पाण्यापर्यंत आपण जाऊ शकत नाही.
|
Sarimbun Beach Landing site P.C. Sneha Tilak |
|
Sarimbun Beach Landing Site |
|
Sarimbun Beach Landing Site |
सध्या हा भाग सिंगापूर स्काऊट असोसिएशनची शिबिरे घेण्याची जागा, प्रशिक्षण स्थान म्हणून वापरला जातो.
|
Scout Camp Site |
|
Scout Camp Site |
|
Scout Camping Site |
हे ठिकाण तुम्हाला सांगते की कोणतीही गोष्ट नगण्य नाही. ब्रिटीश लेफ्टनंट जनरल पर्सिव्हलने या किनारपट्टीच्या सुरक्षेकडे पुरेश्या गांभीर्याने लक्ष दिले नाही का?केवळ सागरी सुरक्षेकडेच जास्त लक्ष दिले का? त्यामूळे खूप मोठा परिणाम भोगावा लागला. अगदी लहान वाटणाऱ्या घटनांचेही मोठे आणि व्यापक परिणाम होऊ शकतात, हेच ह्या घटनेमुळे लक्षात येते.
हे ठिकाण सिंगापूरच्या आणि दुसऱ्या महायुद्धाच्या इतिहासात खूप महत्वाचे आहे. मला खात्री आहे की तुम्हाला या ऐतिहासिक महत्वाच्या भागाला भेट द्यायला नक्कीच आवडेल.
#WWII #JapaneseOccupation #SingaporeInWWII
#BritishSingapore
Comments
Post a Comment