मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक ७ - मिर्जन किल्ला

मिर्जन किल्ला

 आदल्या दिवशी शरावती नदीतील बोटिंग आणि शरावती कांडला मॅन्ग्रोव्हना भेट दिल्यावर आम्ही विश्रांती घेऊन ताजेतवाने झालो. दुसऱ्या दिवशी लवकरच निघालो मिर्जन किल्ला बघायला. 

मिर्जन किल्ला हा होनावर गोकर्ण रस्त्यावरच आहे. कुमटा ओलांडून पुढे आलो की अघनाशिनी नदीच्या किनाऱ्यावर हा भुईकोट किल्ला आहे. 

मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
हा किल्ला बांधला होता राणी चेन्नभैरादेवी ही इतिहासाला ज्ञात आहे ती दीर्घकाळ म्हणजे तब्बल ५४ वर्षे राज्य करणारी राणी म्हणून. १५५२ ते १६०६ असा तिचा राज्यकाल होता. होनावर जवळच्या गिरसप्पा भागाची ती राणी होती. 

विजयनगर साम्राज्याशी मैत्रीपूर्ण संबंध ठेवत ती महामंडलेश्वरी म्हणून राज्य करत होती. आजूबाजूच्या शत्रूंच्या कारवायांना जशास तसे उत्तर देत तिच्या दीर्घ राज्यकारभारात तिने प्रजेला शांती आणि सुबत्ता दिली. पोर्तुगीजांना देखील तिने दोन युद्धांत १५५९ आणि १५७० मध्ये पराभव चाखायला लावला. 

आधी केवळ रानटी पीक असणाऱ्या मिरीची लागवड करण्यासाठी तिने शेतकऱ्यांना प्रोत्साहन दिले. पण नुसते उत्पादन वाढवून काय फायदा? त्या मालाला बाजारपेठ देखील हवी. इथेच तिची व्यवहारकुशलता आणि दूरदृष्टी दिसून येते. 

तिने मिरी, दालचिनी, सुंठ, वेलची, चंदन, तांदूळ, गूळ, सुपारी अशा पदार्थांच्या निर्यातीला सुरुवात केली. भटकळ आणि होनावर बंदरांतून जगभरात होणारी निर्यात भरपूर विदेशी मुद्रा मिळवून देत होती आणि राज्याच्या महसुलात भर पडत होती. तिची प्रसिद्धी इतकी की तिचे शत्रू असलेल्या पोर्तुगीजांनी देखील तिला ' रैना दा पिमेन्टा' अशी पदवी दिली. त्याचा अर्थ आहे 'काळ्या मिरीची राणी. '

गोव्यात पोर्तुगीजांच्या जुलुमांना कंटाळून आणि जबरदस्तीने केल्या जाणाऱ्या धर्मांतरांमुळे गोव्यातून आलेल्या अनेक लोकांना तिने आपल्या राज्यात आश्रय दिला होता. त्यांना उत्पन्नाची साधने दिली होती. 

राणी चेन्नभैरादेवी हिची राष्ट्रनिष्ठा, व्यावहारिक कुशलता आणि शौर्य ह्या साऱ्यांचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारने एक स्मरणीय डाक तिकीट जुलै २०२५ मध्ये प्रकाशित केले आहे. माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू ह्यांच्या हस्ते ते प्रकाशित झाले. 

२४/०७/२५ 
तिने बांधलेला मिर्जन किल्ला हा जाड भिंतींचा, अनेक बुरुज असलेला, सभोवताली संरक्षणासाठी पाण्याचे खंदक असलेला असा भक्कम किल्ला आहे. त्यामुळे शत्रूच्या हातात तो अनेक वर्षे लागला नाही.
आक्रमण झालेच तर किल्ल्यावर पिण्याच्या पाण्यासाठी अनेक विहिरी होत्या. त्यामुळे पाण्याची टंचाई व्हायची नाही. किल्ल्यावर पाणी खेळते राहण्यासाठी जलव्यवस्थापन यंत्रणा होती. अशीच एक पाणी वाहून नेऊन लहानशा साठवणुकीच्या कुंडात सोडणारी नलिका तिथे पाहायला मिळाली. अशाच नलिकांचे जाळे सर्वत्र असणार. 
किल्ल्याला एक मुख्य द्वार तसेच तीन उपद्वारे आहेत. काही भुयारी मार्ग आहेत. 

मिर्जन किल्ला
भुयारी मार्ग 
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
बंद केलेली भुयारे 
मिर्जन किल्ला
तटबंदी 
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
विहीर 
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
मिर्जन किल्ला
भुयारे 
भुयारे
किल्ला पर्यटकांसाठी सकाळी आठ वाजता उघडतो. संध्याकाळी पाच की साडेपाच वाजेपर्यंत पाहू शकतो. आम्ही गेलो तेव्हा तरी गाईड उपलब्ध नव्हता.
सकाळचे साडेआठ नऊच वाजले होते तरी ऊन जाणवत होते. दूर अंतरावर एक चांगले डेरेदार झाड दिसले. पावले आपोआप तिकडे वळली. 
सावलीच्या शोधात 
तिकडे जाताना वाटेत चिमुकली रानफुले दिसत होती. 
रानफुले 
हे पक्षीराव एकटेच ऐटीत बसले होते झाडावर. सगळ्या परिसरावर नजर ठेवत होते. 
पक्षी 
तज्ज्ञांना नाव सांगता येईल!!
कोणाला नाव माहिती असेल तर कॉमेंट्स मध्ये अवश्य लिहा.
झाडाला टेकून काही शिल्पपट्टिका ठेवलेल्या होत्या. त्यातल्या एकावर शंकराची पिंड, पूजा करणारे भाविक आणि देवी दिसत होती. एक वीरगळ असावी बहुधा. तिथे किल्ल्याची माहिती सांगणारा गाईड असता तर किती चांगले झाले असते असे वारंवार वाटत होते.
उत्खननात सापडलेले काही 
महिषासुर मर्दिनी 
महिषासुरमर्दिनी 
उत्खननात सापडलेले काही भाग झाडाखाली मांडून ठेवले होते. तिथेच होती एक अतिशय प्रमाणबद्ध आणि सुंदर अशी महिषासुरमर्दिनीची मूर्ती. 
महिषासुरमर्दिनी 
वाटले, 'आज अशा ओसाड माळरानात कशी अचानक भेटलीस माय?' शौर्याची देवता असलेली महिषासुर मर्दिनी रानी चेन्नभैरदेवीने बांधलेल्या किल्ल्यात असणे अतिशय औचित्यपूर्ण आहे. 

शिशिरातील ती पानगळ, पिवळे पडलेले गवत ह्या कशालाही न जुमानता हिरवेगार राहिलेले ते डेरेदार झाड आणि त्या खालची झाडाच्या सावलीत असलेली सुबक सुंदर देवीची मूर्ती कायम लक्षात राहील. देवी देवता नेहमी मंदिरात पाहण्याची आपल्याला सवय असते. अशा उघड्यावर पाहायला वेगळेच वाटते. 

हा किल्ला पावसाळ्यात फार सुंदर दिसतो असे ऐकले आहे. त्याचे शेवाळ्याने हिरवेगार झालेले रूप फोटोत पाहिले आहे. तुम्हाला देखील ड्रोनने काढलेला पावसाळ्यातील निर्जन किल्ल्याचा फोटो आंतरजालावर पाहायला मिळेल. अवश्य बघा, फार सुंदर दिसतो. 

काय योगायोग बघा! आमच्या मार्चच्या पहिल्या आठवड्यातील मिर्जन भेटीवर लिहिलेला ब्लॉग मी आज शेअर केला आणि सुप्रसिद्ध विज्ञानकथालेखक क्षितिज देसाई गोकर्णहुन आजच परत आले. त्यांनी दोन दिवसांपूर्वी मिर्जन किल्ला पाहिला. त्यांनी फोटो पाठवले आहेत. ते आपल्याला सगळ्यांना बघण्यासाठी इथे चिकटवत आहे. धन्यवाद क्षितिज!

आज दिनांक ०८/०६/२६. ठाणे मुंबईत अजूनही कडक उन्हाळा असला तरी गोकर्ण महाबळेश्वरला नुकताच पावसाळा सुरु झाला आहे!! दोन दिवसांपूर्वीच्या फोटोत मिर्जन किल्ला बघा किती हिरवागार दिसतो आहे! 

मिर्जन किल्ला
📷क्षितिज देसाई 

मिर्जन किल्ला
📷क्षितिज देसाई 
किल्ल्यावरून पाहिले की सभोवतालचा परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. तिथे तर आता झालेल्या पावसाने अशी हिरवीगार मखमल दिसते आहे. 

मिर्जन किल्ल्यावरून दिसणारे दृश्य 
📷क्षितिज देसाई 
शासनाने किल्ल्याची डागडुजी करून त्याचे रूप चांगले ठेवले आहे. अनेक ऐतिहासिक चित्रपटांची, मालिकांची चित्रीकरणे ह्या किल्ल्यावर होत असतात. 

मिर्जन भेटीचा पुरावा 
किल्ला म्हटले की नेहमी मनात येतो तो देवगिरी आणि रायगड, त्यांच्या नंतर पाहिलेले, त्यांच्या इतिहासामुळे मनात रुतलेले चितोडगड, कुम्भलगड हे देखील आठवतात. आता त्याच ओळीत मिर्जन किल्लाही आठवेल हे निश्चित. 

त्या दिवशी नंतर आम्ही निघालो गोकर्ण महाबळेश्वरला. पण त्याविषयी वाचू या पुढच्या भागात! गोकर्ण महाबळेश्वरचा अनुभव लवकरच लिहीन. 


#MirjanFort #CoastalKarnataka #QueenChennabhairadevi #KarnatakaTourism #MarathiTravelBlog #IndianHistory #TravelKarnataka #SilverVeganTravels #HistoricForts #PepperQueen #VrundaTilak #Kshitij Desai 

 

टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

कोस्टल कर्नाटक ६ - अविस्मरणीय शरावती बॅकवॉटर बोटिंग, शरावती कांडला मॅन्ग्रोव्ह बोर्ड वॉक

मी आधीच्या पोस्टमध्ये सांगितले होते की आजचा सूर्यास्त समुद्रात होता तर उद्याचा सूर्योदय शरावती नदीत असणार आहे! तोच हा सूर्योदय शरावती नदीत, कमळांच्या मध्ये.  शरावती बॅकवॉटर बोटिंग  दुसऱ्या दिवशी सकाळी सव्वा सहापर्यंत आम्ही बोटिंगच्या ठिकाणी पोचलो. कारण आम्हाला सूर्योदय चुकवायचा नव्हता. होनावर जवळचे शरावती नदीतील बोटिंग हा एक अविस्मरणीय अनुभव आहे.  आजूबाजूची शांतता, संथ पाणी, स्वच्छ नितळ पाण्यात वाकून आपले प्रतिबिंब न्याहाळणारी नारळाची झाडे, पाण्यात अध्ये मध्ये असलेली लहानशी बेटे, खारफूटीची जंगले, कमळाची पाण्यावर तरंगणारी पाने, उगवत्या सूर्याची पाण्यात मिसळणारी किरणे, त्याने तांबूस झालेले पाणी .. एक वेगळेच जग असते ते. तुम्ही जितक्या वेळासाठी बोट ठरवलेली असेल.. तास दीड तास..  तो वेळ, तुमच्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षणांपैकी एक असणार हे मी अगदी खात्रीने सांगू शकते.  आपोआप जगाचा, आयुष्याचा कोलाहल मंद होत जातो. पहाटेचा मवाळ प्रकाश, पाण्यावर हेलकावणारी नाव, हवेतला अगदी किंचितसा सुखद गारवा आणि मुरत जाणारी शांतता ह्या सगळ्याने मन निवळत जाते.  आम्ही गेलो त्या दिवशी,...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

लोकमान्य टिळक जन्मस्थान, रत्नागिरी

लोकमान्य टिळक म्हणजेच   बाळ गंगाधर टिळक हे भारतीय स्वातंत्र्यसंग्रामातील एक महत्वाचे नाव.  केसरी आणि मराठाचे संपादक, गणित आणि कायदयाचे शिक्षक, स्वातंत्र्यसमराला दिशा देणारे एक प्रभावी राष्ट्रीय नेतृत्व, गीतेवर भाष्य लिहिणारे तत्वचिंतक, संशोधक अशा विविध रूपांत आपण त्यांना ओळखतो.  त्यांनी म्हटलेले 'स्वराज्य माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच ' हे नुसते वाक्य किंवा घोषणा राहिली नाही तर ती भावना प्रत्येक भारतीयाच्या मनात रुजली. स्वातंत्र्यसंग्रामाला ह्यातून ऊर्जा मिळाली.  वंदे मातरमचा घोष बंगालासोबतच संपूर्ण देशांत गुंजला आणि स्वातंत्र्याची प्रेरणा बनला. त्यात 'लाल बाल पाल' ह्या त्रयीचा मोठा वाटा होता.  ब्रिटिश सरकार त्यांना 'भारतीय असंतोषाचे जनक' असे म्हणत असे. निद्रिस्त समाजाला जागे करण्याचे श्रेय लोकमान्य टिळकांना जाते.  त्यांचा जन्म २३ जुलै १८५६ ला रत्नागिरी येथे झाला. आज आपण पाहणार आहोत ते जिथे त्यांचा जन्म झाला ते रत्नागिरीमधील घर. आता तिथे स्मारक केलेले आहे.  वयाच्या साधारण दहाव्या वर्षापर्यंत लोकमान्य टिळक ह्या वास्तूत राहिले. ही वास्तू रत...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका

कोस्टल कर्नाटक ४ - शृंगेरी, मुकाम्बिका  आज उडुपीहून लवकर निघून शृंगेरीला पोचण्याचा बेत आखला होता. त्याप्रमाणे आम्ही सकाळीच निघालो. रस्ता खूपच छान होता. आता खरं सांगायचे तर कोस्टल कर्नाटक प्रवासात रस्ता सुंदर होता म्हणणे ही द्विरुक्तीच आहे.  सगळ्या सडका अगदी एका पातळीतील आणि गुळगुळीत आहेत. खड्डे खळगे, रस्ते वर खाली असणे असे काही नसल्याने महाराष्ट्रातून गेलेल्या आम्हाला थोडे चुकल्यासारखे वाटले खरे!!! शिवाय रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे, स्वच्छता ह्यामुळे प्रवास फार आनंदाचा होतो. उडुपी शृंगेरी रस्ता तर आगुंबे जंगलातून जातो. त्यामुळे दाट झाडी होती. रस्त्यात सुप्रसिद्ध आगुंबे घाटही येतोच. सकाळची प्रसन्न वेळ आणि इतका छान रस्ता..दिवसाची चांगली सुरुवात होण्यासाठी आणखी काय पाहिजे?!!  आम्हाला वाटले होते इतक्या लवकर फारसे कोणी श्रुंगेरीत आलेले नसेल. पण शृंगेरीला पोचल्यावर लक्षात आले की आमच्यासारखाच विचार अनेकांनी केला होता!  अनेक बस रात्रभराचा प्रवास करून सकाळी शृंगेरीला पोचल्या होत्या. त्या लोकांच्या प्रातर्विधी आणि अंघोळीसाठी अनेक ठिकाणी माफक पैसे घेऊन उत्तम सोय केलेली होती....

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

मथुरेचे कृष्ण जन्मस्थान मंदिर: इतिहास, महत्त्व आणि दर्शन

  मथुरा म्हणजे कंस. मथुरा म्हणजे तुरुंग. हे खरे होतेच. पण मथुरा म्हणजे कृष्ण जन्म हे ही खरेच ना!  श्रीकृष्ण जन्मभूमी मंदिर  मथुरेच्या बाजाराला दही, दूध, लोणी घेऊन जाणाऱ्या गवळणी तर अगदी बालवाडी पासूनच स्नेहसंमेलनात आपण सगळेजण पाहत आलो! पुढे नाटक, सिनेमा, वग या सगळ्यात या मथुरेने आपला पाठपुरावा केलेला असतो. शिवाय ‘अयोध्या केवल झांकी हैं ..काशी मथुरा बाकी हैं’ ही घोषणाही आपण ऐकलेली असतेच. अयोध्या मथुरा माया काशी कांची अवंतिका पुरी द्वारावती चैव सप्तैता मोक्षदायिकाः॥  सप्तपुरी स्थान असलेली आणि श्रीकृष्णाच्या आधीपासून अगदी रामायण काळापासून असलेली ही मथुरा. शत्रुघ्नाने लवणासुराला मारून मथुरेची स्थापना केली असे पौराणिक कथांत वाचायला मिळते. वाल्मिकी रामायणांत देखील तसा उल्लेख आहे.  तर यमुनेच्या तीरावर असलेल्या या प्राचीन नगरी मथुरेला कृष्णजन्मभूमी पाहण्यासाठी आम्ही यावर्षीच्या श्रावणात म्हणजे दिनांक १३ ऑगस्ट २०२६ ला पोहोचलो. स्टेशनवर बाहेर पडताच अनेक रिक्षावाले, टॅक्सीवाले आपल्या भोवती गोळा होतात.  इथे ठाण्यात आपल्याला जिथे जायचे असेल तिथे यायला नकार देणारे रिक्षा...