मुख्य सामग्रीवर वगळा

हम्पी- विठ्ठल मंदिर

तुंगभद्रा नदीच्या काठावर वसलेले हम्पी. तिसऱ्या शतकापासून ह्या शहराचे उल्लेख आहेतच. चौदाव्या शतकातल्या विजयनगर साम्राज्याची राजधानी असलेले हम्पीविजयनगर साम्राज्यासोबतच या शहराची देखील प्रगती झाली आणि जगातले एक अत्यंत श्रीमंत, भरभराटीला आलेले शहर म्हणून हम्पी मान्यता पावले. विदेशातून देखील व्यापारी हम्पीला येत असत. 

चौदाव्या शतकाच्या आधीदेखील तिसऱ्या शतकापासून इतकेच काय, अगदी रामायण कालात देखील हम्पीचे उल्लेख आपल्याला सापडतात. अजून देखील ऋष्यमुक सारखी पर्वतांची नावे असतील किंवा पम्पा सरोवर, किष्किंधा अशी ठिकाणांची नावे असतील, आपल्याला सतत रामायणाचा संदर्भ दिसत राहतो. हनुमानाचे जन्मस्थान, राम लक्ष्मण हनुमानाला भेटले ते ठिकाण देखील ह्याच परिसरात आहे. त्यामुळे अनेक भाविक नेहमीच हम्पीला भेट देत असतात.

इतिहास संशोधकांसाठी, कलेच्या अभ्यासकांसाठी देखील हम्पी फार महत्त्वाचे आहे ते त्यातील एकाहून एक सुंदर, कोरीव काम असलेल्या मंदिरांमुळे! युनेस्कोने देखील या संपूर्ण भागाला जागतिक वारसा स्थळ म्हणून मान्यता दिलेली आहे. 

हम्पीतील खरे तर सगळीच मंदिरे पाहण्याजोगी आहेत इतकेच काय तिथल्या मोठमोठ्या, अजस्त्र शिळा देखील पाहण्याजोग्या आहेत. पण आज मी इथे लिहीणार आहे ते हम्पीतील विठ्ठल मंदिरा विषयी. 

विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार व रथ 
📷 Commons Wikimedia 

महाराष्ट्रातल्या सगळ्यांना या मंदिराविषयी एक कथा ऐकलेली आठवत असेल. आपल्याकडे कथा सांगितली जाते की संत एकनाथांचे पणजोबा, संत भानुदास मोठे अभ्यासक, कीर्तनकार आणि ईश्वरभक्त होते. विजयनगरच्या राजाने, पंढरपूरहून आपल्या राजधानीत नेलेली विठ्ठलाची मूर्ती, राजा कृष्णदेवराय यांच्याकडून भानुदास यांनी आपल्या भक्तीने पुन्हा पंढरपुरात आणली. असे म्हणतात की राजाने हम्पी मध्ये अतिशय वैभवशाली मंदिर विठ्ठलासाठी बांधले होते. पण विठोबाला पंढरपूरच्या साध्या भोळ्या भक्तांचे प्रेम जास्त मोलाचे वाटले. 

तर हम्पीमध्ये विठ्ठलासाठी बांधलेले तेच हे विठ्ठल मंदिर. ' श्री विजय विठ्ठल मंदिर' असे देखील त्याला म्हटले जाते आणि शिल्पकलेचा एक उत्कृष्ट नमुना म्हणून ते प्रसिद्ध आहे.
 
अनेक शतके जुने असलेल्या त्या मंदिराचे जे अवशेष आज आपल्याला पाहायला मिळतात, तेदेखील इतके भव्य, इतके सुंदर आणि आपल्या कलेने तसेच तंत्रज्ञानातील परिपूर्णतेने भारावून टाकणारे आहेत की मुळात हे मंदिर कसे असेल, त्याची आपण नक्की कल्पना करू शकतो!

हम्पीतल्या अनेक सुंदर कलापूर्ण मंदिरांपैकी सर्वात सुंदर म्हणता येईल असे हे विठ्ठल मंदिर, तुंगभद्रेच्या काठावर खूप मोठ्या क्षेत्रात वसलेले आहे. राजा देवराया दुसरा याच्या काळात ह्या मंदिराचे बांधकाम सुरू झाले आणि मग कृष्णदेवराय, आणि नंतरच्याही सगळ्या राजांच्या काळात मंदिर रचनेत भर घालणे सुरू राहिले. सोळाव्या शतकात विजयनगर साम्राज्याचा अंत झाला, तेव्हाच हे काम थांबले. त्या वेळच्या वैभवाची अनेक वर्णने आपल्याला वाचायला मिळतात.

विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार 
📷 Aniruddha 

विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार 


विठ्ठल मंदिर प्रवेशद्वार 
📷 Aniruddha 

विठ्ठल रूपातील विष्णूला अर्पण केलेले असे हे मंदिर आहे. हंपी म्हंटल्यावर माहितीपत्रकावर किंवा कोणत्याही संस्थळावर जो फोटो येतो तो ह्या विठ्ठल मंदिरातील दगडी रथाचा! नव्या रुपये पन्नासच्या नोटेवर देखील ह्या मंदिराचा फोटो आहे!

दगडी रथ 

विठ्ठल मंदिर दगडी रथ 
📷 Aniruddha 

विठ्ठल मंदिर, दगडी रथ. 
📷 Commons Wikimedia 

विठ्ठल मंदिर, दगडी रथ. 
📷 Commons Wikimedia

ह्या रथावर कधीकाळी एक शिखर पण होते असे म्हणतात. याची काही दशकांपूर्वीपर्यंत चाके फिरत होती. एवढी भव्य दगडी चाके फिरणे हाच एक मोठा चमत्कार होता. लोकांनी सतत फिरवून ती चाके खराब व्हायला लागली तेव्हा शासनाने सिमेंट घालून ती चाके एकाजागी घट्ट बसवलेली आहेत. 

विठ्ठल मंदिर - दगडी रथ -चाक 

या दगडी रथाच्या वर एक सभामंडप आहे आणि असे म्हणतात विष्णूचे वाहन असलेल्या गरुडाचे हे मंदिर आहे. गरुडमंडपम असाही ह्या दगडी रथाचा उल्लेख केला जातो. 

मंदिराच्या आवाराची कल्पना येण्यासाठी पुढील लिंकवर विडिओ नक्की बघा. 

https://youtu.be/ob5wbvOtvEk

मंदिराच्या आवारात रंग मंडप, कल्याण मंडप, उत्सव मंडप अशा अनेक इमारती आहेत. शिल्पकलेचे सुंदर नमुने आपल्याला येथे बघायला मिळतात.

विठ्ठल मंदिर - शिल्पकला 


विठ्ठल मंदिर - शिल्पकला 

विठ्ठल मंदिर - शिल्पकला 

विठ्ठल मंदिर - शिल्पकला 

विठ्ठल मंदिर - शिल्पकला 

विठ्ठल मंदिर - शिल्पकला 

विठ्ठल मंदिर - शिल्पकला 
📷 Commons Wikimedia 

ज्या खांबांवर वाजवल्यावर संगीत उत्पन्न होते असे खांब आहेत. त्यातून निघणाऱ्या वेगवेगळ्या वाद्य यंत्रांचे आवाज हे देखील ह्या मंदिराचे प्रमुख आकर्षण आहे. या खांबांना सारेगम खांब म्हणून पण ओळखले जाते. सोळाव्या शतकात त्यात शंभर खांब होते असे म्हणतात. एक मुख्य खांब आणि त्याच्या बाजूला लहान लहान खांब अशी प्रत्येक खांबाची रचना आहे.

खांब वाजवून पाहणारे पर्यटक 

 

सारेगम 
📷 Commons Wikimedia 

इंग्रजांना या चमत्काराचा शोध घ्यावासा वाटला. दगडी खांबातून संगीत कसे उत्पन्न होते, ह्याच्याविषयी कुतूहल वाटले आणि म्हणून त्यांनी दोन खांब कापून ते उघडून पाहिले. आजही तिथे कापलेले खांब आपल्याला बघायला मिळतात. 

मंदिराच्या बाहेर बाजारपेठेचे, दुकानांचे अवशेष दिसतात. लांबच लांब खांबांच्या रांगा देखील दिसतात. त्यावरून आपण कल्पना करू शकतो की एके काळी हे मंदिर किती प्रसिद्ध असेल!



मंदिर आणि बाहेरचा परिसर बघण्यासाठी ह्या लिंक वर क्लिक करा. 

https://youtu.be/COsQX84VaCw

पेट्रोल,डिझेलने होणारे प्रदूषण टाळण्यासाठी,या मंदिराच्या आधीच एक किलोमीटर अंतरावर वर आपली वाहने ठेवायला लागतात. पण कर्नाटक पर्यटन महामंडळाने तिथे जायला एका बॅटरी कारची व्यवस्था केलेली आहे आणि तिकीट अगदी नाममात्र आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत सतत चालणाऱ्या ह्या कार खूपच सोयीच्या आहेत. 

विष्णूचे मंदिर आहे, विठोबाच्या रूपातील कृष्ण आहे ह्याची खात्रीच संध्याकाळी चरून परत येणाऱ्या गायी पाहिल्यावर पटली.

गाई घराकडे घेऊन निघालेला गुराखी 

सांज ये गोकुळी 

सांज ये गोकुळी 

महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेला विठ्ठल मूळचा महाराष्ट्रातील की कर्नाटकातील अशा चर्चा नेहमीच रंगतात. 'कानडा हो विठ्ठलु' सारखे अभंग अर्थाच्या अनेक छटा घेऊन येतात. पण त्या कोणत्याही चर्चेचा भाग न होता, हे विठ्ठल मंदिर, भारतीय शिल्पकलेचा एक अद्वितीय नमुना आहे इतके मात्र नक्की म्हणावेसे वाटते. 
 
आताही हम्पी पाहून आल्यावर ते आपल्या स्मरणात कायमचे राहते. पूर्वी जेव्हा त्याच्या वैभवशाली रूपात होते तेव्हा तर कित्येक परदेशी व्यापारी आणि प्रवाशांनी आपापल्या दैनंदिनीत आणि पुस्तकातून हम्पीचा उल्लेख केलेला आढळून येतो आणि त्यातल्या काहींच्या मते तर हे जगातले सर्वोत्तम शहर होते!

#Vijaynagar #Hampi #Vitthal Mandir #Stone Chariot # Musical Pillars # 50rsNote #PlacesToVisitInHampi #travelphotography #hampidiaries #travel #karnataka #karnatakatourism #incredibleindia #travelkarnataka #architecture #photography #history #travelindia #temple #solotravel #unesco #unescoworldheritage #travelgram #ancient #photooftheday #hampitourism #heritage #nammakarnatakaphotographers #traveling #trip #india #wanderlust #storiesofindia #roadtrip #explore

टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...