मुख्य सामग्रीवर वगळा

कोस्टल कर्नाटक ५ - मुर्डेश्वर, इडगुंजी गणेश, गुणवंतेश्वर, कासारकोड

कधी कधी मोठ्या ट्रिप्समध्ये काय होते की एखाद्या दिवशी एखादे ठिकाण खूप आवडते. त्यानंतर पुढच्या दिवसांत आपण पाहणार असतो त्या ठिकाणांची तुलना मग आपल्याला आवडलेल्या ठिकाणाशी व्हायला लागते. खरे तर असे व्हायला नको. प्रत्येक ठिकाणचे आपापले वैशिष्ट्य असते, पण मन नकळत तुलना करते हे खरे. 

माझे काय झाले ते सांगते. शृंगेरी आणि मुकाम्बिका मंदिरे, त्यातील अधोरेखित होणारे पावित्र्य हे मनाला खूप भावले होते. त्यानंतर पुढच्या दिवशी आम्ही गेलो मुर्डेश्वरला. 

मुर्डेश्वरचे मंदिर हे कोस्टल कर्नाटकातील सुप्रसिद्ध पंचलिंग क्षेत्रांपैकी एक. पंचलिंग क्षेत्रांची कथा तर आपल्याला सगळ्यांना माहिती असणारच . पण ज्या कोणाला माहिती नसेल त्यांच्यासाठी सांगते. 

रावणाने अमर होण्यासाठी तपश्चर्या करून शंकराला प्रसन्न करून घेतले. काय हवे ते माग म्हटल्यावर रावणाने मागितले शंकराचे आत्मलिंग. भोळ्या शंकराने ते दिले. पण त्याचवेळी हे सांगितले की वाटेत कुठे हे खाली ठेवू नकोस. 

आता अविवेकी रावणाला शिवशंकराचे आत्मलिंग मिळणे, तो अमर होणे म्हणजे सृष्टीत हाहा:कार माजला असता. त्यासाठी काहीतरी करायला हवे होते. . 

वाटेत संध्याकाळ झाली. रावणाची सायंसंध्येची वेळ झाली. आता हे आत्मलिंग ठेवायचे कुठे? इतक्यात गणपती एका बाल गुराख्याचे रूप घेऊन समोर आला. त्याला रावणाने विनंती केली की तू थोडावेळ हातात धरून ठेवशील का?

गणपती म्हणाला, "ठीक आहे. पण मी तीनदा हाक मारल्यावर त्याच्या आत, तुला यायला पाहिजे. नाहीतर मी हे आत्मलिंग खाली ठेवून देईन. "

झालेही तसेच. गणपतीने तीन हाका मारल्या. रावण काही आला नाही. गणपतीने लिंग खाली ठेवले. नंतर रावण आला. क्रोधाने वेडापिसा होऊन ते आत्मलिंग जमिनीतून बाहेर काढू लागला. पण ते कसले निघणार? शंकराने तसेच सांगितले होते. 

आपल्याला आत्मलिंग घेऊन जाता येणार नाही हे लक्षात आल्यावर रावणाने ते उपटून काढण्याचा, आपल्याला मिळत नाही तर नष्ट करून टाकण्याचा प्रयत्न केला. त्या भरात आत्मलिंगाचे काही तुकडे इतस्ततः उडाले. जिथे गणपतीने आत्मलिंग ठेवले होते ती मूळ जागा म्हणजे गोकर्ण महाबळेश्वर. 

असे सांगितले जाते की जिथे बाकी भाग उडाले त्या जागा म्हणजे मुर्डेश्वर, सज्जेश्वर, धारेश्वर आणि गुणवंतेश्वर. ह्याला म्हणतात पंचलिंग क्षेत्रे. भाविक लोक एका दिवसांत ह्या पाची ठिकाणांना भेट द्यायची अशी तीर्थयात्रा करतात. 

आता ह्यावरून तुमच्या लक्षात आले असेल की मुर्डेश्वर किती महत्वाचे स्थान आहे. मुर्डेश्वरला आम्ही गेलो ते मुर्डेश्वर शिव मंदिर फार सुरेख आहे. इतक्या प्राचीन ठिकाणी आपण आलो आहोत हे मनाला रोमांचक वाटतेच. शंकराच्या मंदिरातून नेहमीच जाणवणारी ऊर्जाही जाणवते. 

पण ते उंच प्रवेशद्वार, त्यातील लिफ्ट, त्या मागे असलेली जगातील तिसऱ्या क्रमांकाची अशी भव्य शिवमूर्ती, वॉटर स्पोर्ट्स ह्या सगळ्यांमुळे तिथे लोक शंकराच्या दर्शनाला न येता, सहलीला आले आहेत असेच वातावरण मंदिर परिसरात असते. ते मनाला खटकते. तुमच्यापैकी अनेक जण मुर्डेश्वरला गेले असतील. तुम्ही गेलात तेव्हाचा अनुभव कसा होता?

मुर्डेश्वर मंदिराचे प्रवेशद्वार म्हणजे एक २० मजली उंच असे राजगोपुरम आहे. त्यातच एक लिफ्ट आहे. त्या लिफ्टच्या तिकिटासाठी मोठी रांग असते. त्या तुलनेने मंदिरात दर्शनाला कमी रांग होती!!

लिफ्टमधून वर गेलो की अतिशय सुंदर दृश्य दिसते. इतक्या उंचावरून सर्व परिसर नजरेच्या टप्प्यात येतो. समुद्र, नारळीपोफळीच्या बागा, लोकांची गर्दी, रस्ते.. फार छान वाटते ते पाहायला.

मुर्डेश्वर 
मुर्डेश्वर 
मुर्डेश्वर 
मुर्डेश्वर 
मुर्डेश्वर 
सावलीच्या शोधात!!
मुर्डेश्वर 
मुर्डेश्वर 

मुर्डेश्वर 

लिफ्टमधून दिसणारे दृश्य तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये बघू शकता. 
https://youtu.be/YSwCnSRFA0M
राजगोपुरम 
भव्य प्रवेशद्वार, परिसरातल्या भव्य मूर्ती, भव्य शिवमूर्ती असे सगळे भव्य भव्यच आहे ह्या परिसरात!
किती भव्य होते ते ह्या व्हिडिओमध्ये पाहता येईल. 

त्या परिसरात मूळ मंदिराशिवाय आणखीही दोन मंदिरे आहेत, एक प्रदर्शनी आहे, फिरायला जागा आहे, खाण्यासाठी स्टॉल्स आणि रेस्टॉरंट आहे. थोडक्यात ट्रीपसाठी हे ठिकाण चांगले आहे.  

त्यानंतर आम्ही गेलो ते इडगुंजी गणेश मंदिरात. इडगुंजी हे होनावरजवळचे लहानसे गाव आहे. आम्ही पोचलो तेव्हा दुपार होती म्हणून गणेशमंदिर बंद होते. मग निवांत इकडेतिकडे फिरत, दर्शनासाठी आलेल्या इतर लोकांशी गप्पा मारत, मंदिर उघडेपर्यंत वेळ काढला. मुर्डेश्वराच्या सहलीला आल्यासारख्या गर्दीच्या पार्श्वभूमीवर इडगुंजीचे शांत मंदिर खूपच छान वाटले. 

मंदिर अगदी लहान गावात असावे तसेच घरगुती वातावरणाचे वाटले. इथली गणेशमूर्ती उभी आहे आणि दोनच हात असलेली आहे. दोनच हात असलेला गणेश पाहण्याची आपल्याला सवय नसते. त्यामुळे वेगळी वाटते. अशी मूर्ती गोकर्णला पूर्वी पाहिली होती. 

इडगुंजी गणेश मंदिर 
मंदिराचा रंग, बांधकाम, परिसर सगळेच वेगळे, त्याचे स्वतःचे व्यक्तिमत्व असणारे आणि वैशिष्ट्यपूर्ण वाटले. असे त्या परिसरातल्या मातीशी जवळीक असणारे मंदिर म्हणून हे मंदिर नेहमी लक्षात राहील. इडगुंजीला वाळा चांगला मिळतो म्हणतात.

होनावरला जाण्याआधी आम्ही आणखी एका ठिकाणी गेलो ते म्हणजे गुणवंतेश्वराला. गुणवंतेश्वर हे पंच शिवलिंगांपैकी एक आणि म्हणून त्या परिसरातील महत्वाचे मंदिर.

गुणवंतेश्वर 
गुणवंतेश्वर 
गुणवंतेश्वर 
सगळीकडे बांधकामाचे सामान, पराती म्हणजे बांबू बांधलेले असे असल्याने दर्शन झाले तरी मंदिर बघितल्यासारखे वाटलेच नाही. आम्ही परत गाडीत बसायला जाणार तो एकाने सांगितले की इकडे मागच्या बाजूला तळे आहे. ते तळे पाहिले आणि सगळे असमाधान वाहून गेले. त्या तळ्याजवळ जायचे असेल तर चपला काढून, हातपाय धुवून जावे लागते. हे ऐकल्यावर तर आणखीनच छान वाटले. 

हे मंदिर ८०० वर्षे जुने आहे म्हणतात. म्हणजे हे तळेही ८०० वर्षे जुने असेल. आपल्याकडे मंदिराजवळ पाण्याचे काहीतरी असतेच. मग ते तळे असेल, तलाव असेल, वाव असेल, कुंड असेल, बारव असेल..काहीतरी असतेच. तसेच हे ही असणार. 

गुणवंतेश्वर 
गुणवंतेश्वर 
हे गुणवंतेश्वर तळे पाहिल्याने शिव दर्शनाच्या अनुभवाला पूर्णता आली. 

नंतर आम्ही गेलो होनावरला. इथे आम्ही एका होमस्टे मध्ये राहिलो होतो. बंगल्यात खाली मालकांचे कुटुंब होते आणि वरच्या मजल्यावरच्या बेडरूम्स ते भाडयाने देतात. तिकडे सामान ठेवले. थोडी विश्रांती घेतली. आता उत्सुकता होती ती उन्हे उतरायची. 

कासारकोड बीच आणि तिथला सूर्यास्त प्रसिद्ध आहे. आम्ही उतरण्याचे ठिकाण होनावर शहरामध्ये न निवडता जरा दूर, कासारकोड इको बीचजवळ निवडले होते. त्यामुळे बीचला रिक्षाने अगदी दहा मिनिटांच्या आत पोचता आले. 

अतिशय सुंदर, स्वच्छ समुद्रकिनारा आहे हा. ह्या किनाऱ्याला ब्लू फ्लॅग प्रमाणपत्र मिळालेले आहे. शुभ्र मऊसूत वाळू, किनाऱ्यावरची झावळ्या हलवत असणारी झाडे, शांत समुद्र ..अगदी शहाण्या गुणी मुलासारखा वाटतो हा किनारा!

सुरक्षेसाठी गार्डस आहेत आणि त्यांचे सगळीकडे लक्ष असते. स्वच्छतागृहे, पाणी, फर्स्ट एड सर्व गोष्टींची सोय आहे इथे. 

कासारकोड इको बीच 
कासारकोड इको बीच 
कासारकोड इको बीच 
कासारकोड इको बीच 
आम्ही थोडावेळ समुद्रकिनाऱ्यावर फिरलो आणि ज्याची वाट पाहत होतो ती वेळ झाली!
कासारकोड बीच 
कासारकोड बीच 
कासारकोड बीच 
सूर्यास्त झाला. आता अगदीच अंधार झाल्यावर मग आम्ही तिथून निघालो. आजचा सूर्य मावळताना पाहिला होता समुद्रात आणि उद्याचा सूर्य उगवताना पाहणार होतो शरावती नदीत. त्या विषयी लवकरच लिहीन!!!

#मुर्डेश्वर मंदिर, #कोस्टल कर्नाटक सहल, #पंचलिंग क्षेत्र, #इडगुंजी गणपती, #गुणवंतेश्वर मंदिर, #कासारकोड बीच, #आत्मलिंगाची कथा, #कर्नाटक पर्यटन, #मराठी ट्रॅव्हल ब्लॉग, #Murdeshwar Temple, #Coastal Karnataka Trip, #Panchalinga Kshetra, #Idagunji Ganesh Temple, #Gunavanteshwar, #Kasarkod Beach, #Murdeshwar Shiva Statue, #Karnataka Tourism, #Atma Linga Story, #Marathi Travel Blogger, #SilverVeganTravels

 


 



टिप्पण्या

या ब्लॉगवरील लोकप्रिय पोस्ट

कोस्टल कर्नाटक ३. -कुरु बेट, अनेगुड्डे श्री विनायक मंदिर, मणिपाल लेक

  कोस्टल कर्नाटक सहलीचा आमचा तिसरा दिवस देखील फार आनंदात गेला. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे होऊ शकल्या. काही गोष्टी ठरवल्याप्रमाणे अजिबात झाल्या नाहीत. पण तरी जमेची बाजूच जड झाली हे खरे.  उडुपीला सकाळी गाडी बोलावली होती आणि ती आम्हाला काही तास फिरवून आणणार होती. पहिले ठिकाण होते त्रासी मारवंते बीच.  फोटो बघूनच हा बीच पाहण्याची खूप उत्सुकता वाटत होती. हा अत्यंत अनोखा बीच आहे. रस्त्याच्या एक बाजूला सौपर्णिका नदी, दुसऱ्या बाजूला अरबी समुद्र - सिंधूसागर! त्रासी मरवंथे बीच  📷https://karnatakatourism.org/en/destinations/udupi उडुपीपासून निघून इकडे येऊन पोचलो. एका बाजूला नदी दिसत होती. दुसऱ्या बाजूला समुद्र किनाराही दिसत होता. पण फोटोत दाखवल्याप्रमाणे ठिकाण काही दिसेना.  मग चौकशी केल्यावर कळले की असे फक्त ड्रोनने काढलेल्या फोटोत दिसते. डोळ्यांना असे दिसत नाही!! एरवी आपण म्हणतो की डोळ्यांना जितके सुंदर दिसते तितके फोटोत उतरत नाही. पण इथे उलटे झाले होते!फोटोतल्याइतके सुंदर डोळ्यांना दिसत नव्हते!! पण असे दिसले नाही म्हणून काय झाले? रस्त्याच्या एका बाजूला नदी वाहते आहे...

सोमनाथ - प्रभास पट्टण.

१९४७चे दीपावली पर्व. स्थळ होते सिंधुसागराच्या तीरावर असलेल्या सोमनाथ मंदिराच्या अवशेषांचे प्रवेशद्वार. तिथे उभे राहून सरदार वल्लभभाई पटेल यांनी दृढनिश्चय व्यक्त केला की भारतीय जनता आपले आराध्य दैवत असलेल्या सोमनाथ मंदिराला त्याची पूर्व प्रतिष्ठा आणि पूर्व वैभव प्राप्त करून देईल.  काय कारण होते ह्या प्रतिज्ञेचे? जर भारतीय जनतेचे आराध्य दैवत होते सोमनाथ तर आता मंदिराचे अवशेषच का उरले होते?  ह्या साठी आपल्याला जाणून घ्यावे लागेल सोमनाथ मंदिराच्या इतिहासाविषयी आणि सोमनाथच्या हिंदू जनमानसातील स्थानाविषयी.  हिंदूंन पूजनीय असलेल्या बारा ज्योतिर्लिंगापैकी सर्वात पहिले नाव असलेल्या आणि प्रथम स्थानी असलेले सोमनाथ. आपल्या सर्वाना माहिती असलेल्या स्तोत्राची सुरुवातच होते ती 'सौराष्ट्रे सोमनाथंच' पासून. त्यामुळेच त्याला 'आदि ज्योतिर्लिंग' म्हणून ओळखले जाते.  ऋग्वेदात तसेच अनेक पुराणात ज्याचा उल्लेख झाला आहे असे हे तीर्थधाम. ह्याविषयी आपल्याला अनेक कथा सापडतात.  शतकानुशतकांच्या मंदिराच्या इतिहासात नैसर्गिक रित्या पडझड झाल्यानंतर ते अनेक राजांकडून, भक्तांकडून सोने, च...

'रानी की वाव'

पाटण सर्वांना माहिती असते ते 'रानी की वाव' तिथे आहे म्हणून. भारतातील समृद्ध हातमाग कौशल्याचा उत्तम नमुना असलेली पटोला साडीदेखील पाटणचीच.  गुजराथमधील अहमदाबाद पासून साधारण दीडशे किलोमीटरवर असणारे पाटण जागतिक पर्यटनाच्या नकाशावर मानाचे स्थान पटकावून बसले आहे. युनेस्को चे जागतिक वारसा स्थळ म्हणून मानांकन मिळवलेले हे ठिकाण आहे.  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  रानी की वाव  'रानी की वाव' नावावरूनच आपल्या लक्षात येते की ही राणीने बांधलेली विहीर आहे. पण खरे तर ही नुसती वाव म्हणजे विहीर नसून  सुमारे 64 मीटर लांब, 20 मीटर रुंद आणि 27 मीटर खोल म्हणजे साधारण  सात मजल्यांइतकी खोली असलेले विष्णूचे मंदिर आहे असेच म्हणावे लागेल.  जमिनीपासून खोल खोल उतरत जाणारी अशी ही रचना आहे.  राणी उदयमती हिने तिचा पती  राजा भीमदेव पहिला याच्या स्मरणार्थ हे मंदिर बांधले म्हणून याचे नाव 'रानी की वाव' असे पडले. राजा भीमदेव पहिला म्हणजे अनहिलवाड किंवा अनहिल्लपूर पाटणच्या सोळंकी वंशाचा संस्थापक मुलराज ह्याचा मुलगा होता. ह्या वंशाने अनेक पराक्...

कवी केशवसुत स्मारक, मालगुंड

एका कवीचे स्मारक असावे आणि तेही कवीला साजेसे असावे ही दुर्मिळ गोष्ट आहे! पण असे एक स्मारक आपल्या महाराष्ट्रात आहे. रत्नागिरीजवळ मालगुंड येथे कवी केशवसुत म्हणजेच कृष्णाजी केशव दामले ह्यांचे एक सुंदर स्मारक उभारले आहे.  कवी केशवसुत जन्मस्थान  मार्गावरील फलक  प्रवेशद्वारातून दिसणारे दृश्य  कोकण मराठी साहित्य परिषदेने ज्येष्ठ साहित्यिक पद्मश्री मधू मंगेश कर्णिक ह्यांच्या संकल्पनेला प्रत्यक्षात उतरवले आहे.  एखाद्या कवीचे स्मारक कसे असावे हे एखाद्या साहित्यिकालाच चांगले कळू शकणार! स्मारकाच्या प्रवेशद्वारातून आपण आत गेलो की समोरच दिसते ते केशवसुत जन्मस्थान. हे जुने घर डागडुजी करून नीटनेटके ठेवले आहे. पडवीत मोठा झोपाळा आहे.  कवीच्या घरात कवीचे पुस्तक वाचताना  तिथेच केशवसुतांची काही पुस्तके तसेच को.म.सा.प.ची काही प्रकाशने विक्रीसाठी उपलब्ध आहेत.  घरातील आतल्या खोल्या तशा रिकाम्याच आहेत. काही थोडे जुने सामान तिथे ठेवले आहे .  माजघर  घराच्या मागच्या बाजूला कवीचे खरे स्मारक आहे. केशवसुतांनी त्या काळात म्हणजे दीडशे वर्षांपूर्वी कवितेत नवा प्रवाह आणला...

श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे जन्मस्थान - बर्वेवाडा, डुबेरे

काल दिनांक १८ ऑगस्ट २०२५. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे ह्यांची ३२५ वी जयंती. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पुतळा, बर्वेवाडा आता बाजीराव म्हटले की केवळ बाजीराव मस्तानीच आठवणाऱ्या लोकांसाठी बाजीराव कोण ते सांगायला हवे. छत्रपती शिवाजी महाराजांनी पाहिलेले हिंदवी स्वराज्याचे स्वप्न प्रत्यक्षात जगणारे आणि हिंदवी साम्राज्य निर्माण करणारे बाजीराव बाळाजी पेशवे/ विश्वनाथ बल्लाळ भट हे शाहूछत्रपतींचे पेशवे म्हणजेच पंतप्रधान होते.  आपल्या वीस वर्षांच्या पेशवे म्हणून कारकीर्दीत ते चाळीसहून अधिक लढाया लढले आणि त्या सर्व लढायांत ते अजिंक्य राहिले. त्यांनी आपल्या कर्तृत्वाने मराठ्यांचे वर्चस्व अखंड भारतावर प्रस्थापित केले.  त्यांचा जन्म १८ ऑगस्ट १७००, भाद्रपद पौर्णिमा ह्या दिवशी डुबेरे येथे झाला. डुबेरे आजच्या सिन्नर तालुक्यात नाशिक जिल्ह्यात आहे.  ह्या गावी बाजीरावांच्या मातोश्री राधाबाई ह्यांचे भाऊ मल्हारराव बर्वे राहत असत. त्या बर्वे वाड्यात बाजीरावांचा जन्म झाला.  बर्वे वाडा  अवघ...

गणपतीपुळे

कोकणच्या निसर्गाविषयी किती आणि कितीदाही लिहिले तरी कमीच आहे. कोकणातल्या नारळी पोफळीच्या वाड्या, आंब्याची फणसाची झाडे, केळीच्या बागा, कौलारू घरे ह्यांनी नटलेली धरती, सोनचाफा बकुळीच्या सुगंधाने घमघमणारा आसमंत आणि कानावर येणारी समुद्राची गाज सारेच कसे मन प्रसन्न करणारे असते.  चराचरात वसणारा परमतत्वाचा अंश ह्या भूमीत प्रकर्षाने प्रत्ययाला येतो. ह्या भूमीत अनेक देवस्थाने नसती तरच नवल होते. ह्या देवस्थानांच्या जागा विलक्षण सुंदर आहेत. गणपतीपुळे हे असेच एका सुंदर स्थानी वसलेले श्री गणेशाचे स्वयंभू मंदिर. सिंधुसागराचा किनारा, चमकदार वाळूची पुळण आणि पाठीमागे गार्ड हिरव्या वनराईने झाकलेला डोंगर असे ह्या मंदिराचे नयनमनोहर ठिकाण आहे.  श्री गणपतीपुळे देवस्थान  ह्या स्वयंभू मूर्तीचा दृष्टांत पाचशे वर्षांपूर्वी भिडे गुरुजींना झाला. तिथे त्यांनी साधे गवताचे छप्पर उभारून पूजेला सुरुवात केली. त्यांची समाधी आपल्याला मंदिराच्या आवारातच बघायला मिळते.  समाधी  पुढे मग वेळोवेळी निरनिराळ्या भक्तांनी ह्या वास्तूची पुनर्बांधणी आणि दुरुस्ती केली. छत्रपती शिवाजी महाराजांचे सचिव अण्णाजी दत्त...

कोस्टल कर्नाटक १ - मंगळुरू

  मंगळुरू- कुडला - मंगलोर - मंगलापूरम ही सगळी एकाच गावाची नावे. मंगलादेवी मंदिरावरून ह्या गावाचे नाव पडले मंगळुरू. दक्षिण कन्नड जिल्ह्याचे हे प्रमुख ठिकाण. सुंदर मंदिरे, स्वच्छ समुद्रकिनारे, नारळी-पोफळीची झाडे, आधुनिकतेच्या खुणा मिरवणारे मॉल्स आणि शहराबाहेरची पण तशी जवळच असणारी अनेक पर्यटन स्थळे.. ह्या साऱ्यामुळे मंगळुरु नेहमीच पर्यटकांचे आवडते राहिलेले आहे.  मंगळूरूला जाणारे आमचे विमान नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून होते. हा विमानतळ पाहण्याची उत्सुकता होतीच.  हा अतिशय भव्य आणि सुव्यवस्थित विमानतळ आहे. अनेक विमाने एकावेळी विमानतळावर आली तरी येणाऱ्या आणि जाणाऱ्या प्रवाशांच्यासाठी सर्व आवश्यक सुविधा केलेल्या आहेत.  जशी वर्दळ वाढेल तशी विमानतळावर जाण्यासाठी वाहतुकीची साधने देखील वाढतील अशी आशा आहे.  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ  लहानशा प्रवासानंतर विमान मंगळुरुला उतरले. मंगळुरु विमानतळ म्हणजे टेबलटॉप रनवेज असणाऱ्या भारतातील मोजक्या विमानतळ...

रवींद्रनाथ टागोरांनाही भुरळ घालणारे 'कारवार'

कारवार - पांढऱ्या वाळूचे स्वच्छ समुद्रकिनारे, हिरव्या झाडांनी नटलेले डोंगर, काळी नदी, लाल माती असलेले सुंदर शहर. शहर होऊ पाहणाऱ्या किंवा खरे तर आता शहर झालेल्या कारवारने अजून आपले गावपण थोडे तरी टिकवून ठेवले आहे. शहरी बकालपणा मात्र टाळता आलेला नाही.   गोवा, कर्नाटक आणि महाराष्ट्र असा तिन्हींचा संगम आपल्याला कारवारमध्ये दिसतो. मराठी बोलणारी माणसेही भेटत राहतात.  गोव्यासारखे पर्यटकांचे लोंढे दिसत नाहीत. कदाचित आम्ही मार्चच्या अगदी सुरुवातीला गेलो तेव्हा अजून पर्यटकांचा ऐन हंगाम सुरु झाला नसावा!! उत्तर कन्नड जिल्ह्याची जीवनरेखा असणारी काळी नदी सदाशिवगड जवळ समुद्राला मिळते. तिथे एक मोठा पूल बांधलेला आहे. कारवार आणि गोव्याला जोडणारा हा पूल आता एक पर्यंटनस्थळच झाला आहे. सूर्योदय बघण्यासाठी पादचारी पुलावर जमलेले तुरळक पर्यटक, धावण्याचा सराव करणारे धावपटू, सायकलस्वार ह्यांच्या खेरीज सकाळच्या वेळी तिथे कोणीही नसते. आपल्या निसर्ग सौदर्यामुळे आणि शांततेमुळे हे ठिकाण अवश्य भेट देण्याजोगे आहे. आमचे हॉटेल ह्या पुलाच्या अगदी जवळ असल्याने आम्ही सूर्योदय अगदी मनसोक्त वेळ देऊन पाहू शकलो....

'कड्यावरचा गणपती.' - आंजर्ले

कोकण सुंदर आहेच. कोकणावर निसर्गाची अपरंपार कृपा आहे. काय नाही कोकणात? डोंगर, दऱ्या, नद्या, समुद्र, नारळीपोफळीच्या वाडया, आंब्या फणसाची झाडे, केळीच्या बागा हे तर आहेच. इतर फुलेही कोकणच्या मातीत जास्तच बहरतात. बकुळ, चाफ्याचे सगळे प्रकार, जास्वंद किती नावे लिहावीत!! कौलारू घरे, लाल मातीचे रस्ते, ताजा खवलेला नारळ घातलेले अवीट चवीचे खाद्यपदार्थ .. कोकणांत जायची किती कारणे हवीत अजून?  ह्या सोबत किंवा खूप जणांसाठी ह्याच्याही आधी कोकणात जाण्याचे महत्वाचे कारण असते ते म्हणजे तेथील मंदिरे. तर आज आपण आंजर्ले येथील एक मंदिर  पाहणार आहोत.  दापोली, गुहागर,आंजर्ले हा सगळा परिसर तर निसर्गसौंदर्याने नटलेला आहे. शहरीकरण, पर्यटकांची अमर्याद संख्या, गल्लोगल्ली झालेले होमस्टे, रिसॉर्ट्स आणि खानावळी इतके सगळे पचवून सुद्धा अजूनही  इथले वातावरण फार सुखद आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात दापोलीजवळ आंजर्ले गाव आहे. त्या गावाच्या जवळ एका डोंगरावर असलेले मंदिर म्हणजे  'कड्यावरचा गणपती.'  पूर्वी पायऱ्या चढून जाणे हा एकमेव मार्ग होता.  आता चारचाकी गाडी सुद्धा आरामात मंदिरापर्यंत जाऊ श...

कोस्टल कर्नाटक- २ मंगळुरू, मुलकी, उचिल, उडुपी

  आमच्या कोस्टल कर्नाटक सहलीचा दुसरा दिवस सुरु झाला तो काद्री मंजुनाथ मंदिर भेटीने. हे मंदिर अतिशय प्राचीन आहे. भारद्वाज संहितेत ह्या मंदिराचा उल्लेख आहे. त्या काळात ह्या भागाला सुवर्ण कदलीवन म्हटले जात होते आणि ह्या मंदिराला सर्वसिद्धिमहास्थान किंवा सर्वसौभाग्यदायक महास्थान असे म्हटले जाई. परशुरामाच्या तपाने प्रसन्न होऊन ब्रह्म,विष्णू आणि महेश ह्यांनी एकत्रितपणे मंजूनाथाच्या रूपात स्वतःला प्रगट केले असे कथा सांगते.  नाथ संप्रदायाच्या गोरक्षनाथ आणि मच्छिन्द्रनाथ ह्यांनी देखील ह्या मंदिराला भेट दिली होती आणि ह्या भागात वास्तव्य केले होते असे सांगितले जाते.  मंदिर खूप भव्य आहे. मुख्य देवता शंकर - मंजुनाथ आहे. मंदिराच्या आवारात गणेश, दुर्गा, हनुमान,अय्यप्पा, नागदेवता अशी मंदिरे आहेत. जवळच एक तलाव आहे. हे मंदिर काद्री टेकडीवर वसलेले आहे. जवळच काद्री हिल पार्क नावाचे एक भव्य उद्यान आहे. एक लहानसे तळे देखील जवळच आहे. स्नानासाठी कुंड ह्या मंदिराच्या आवारातच आहेत. एकूणच परिसर रम्य आणि मंदिरातील ऊर्जेने भारलेला आहे. अनेक भाविक इथे भेट देत असतात.  काद्री मंजुनाथ मंदिर  का...