फेंचिहू हे गाव, १९व्या शतकाच्या सुरुवातीला अलीशान आणि चियायी दरम्यान अलीशान फॉरेस्ट ट्रेनच्या थांबा म्हणून विकसित केले गेले होते. रेल्वेमध्ये इंधन भरण्यासाठी किंवा माल वाहतूक करणाऱ्या गाड्यांमध्ये माल भरण्यासाठी हा थांबा फार उपयोगी व आवश्यक होता.
फेंचिहू हे डोंगराच्या उतारावर वसलेले एक लहान गाव आहे आणि समुद्रसपाटीपासून साधारण १४०० मीटर उंचीवर आहे. आता ते एक पर्यटन स्थळ म्हणून तसेच तिथल्या एका जुन्या रस्त्यासाठी प्रसिद्ध आहे.
हा जुना रस्ता डोंगराच्या उतारावर असल्याने, स्टेशनपासून इथे जाताना खूप चढ आहे. मागच्या शतकात हा रस्ता विविध उद्योगधंद्यांमुळे अतिशय भरभराटीला आलेला रस्ता होता. सध्या देखील विविध रेस्टॉरंट्स आणि स्मृतिचिन्हे, भेटवस्तू, कलावस्तू विकणारी दुकाने दोन्ही बाजूला असल्याने, रस्ता दुकानांनी आणि माणसांनी गजबजलेला असतो. ढगांनी त्या ठिकाणच्या सुंदर वातावरणात भर घातली आहे.
|
Abundant Bamboos in the region |
|
The famous Fenchihu Old Street |
|
Shops on Fenchihu Old Street |
|
The famous Fenchihu Old Street |
|
Plum/Cerries? |
|
Dancing dolls |
|
The famous Fenchihu Old Street |
|
Fenchihu |
|
Houses on the slope |
|
Clouds descending on the road |
|
Clouds !! |
फेंचिहू रेल्वे स्टेशन ट्रेन आणि बस दोन्हीसाठी महत्वाचा थांबा आहे.
तिथे जवळच एक रेल्वे संग्रहालय आहे. तिथे आपल्याला अलीशान वन रेल्वे ची सगळी जुनी माहिती, फोटोज, मॉडेल्स असे सगळे बघायला मिळते.
गेल्या शतकातील वास्तुशैली आणि सतत खाली उतरणारे ढग, ह्या दोन्हीमुळे ह्या गावाला खास व्यक्तिमत्व मिळाले आहे. इथे नेहमी सिनेमा आणि सिरियल्सची शूटिंग तर चालू असतातच पण प्री वेडिंग फोटो शूट साठी पण हे लोकप्रिय ठिकाण आहे.
|
Pre wedding photo shoot? |
|
Forest Train Museum |
लाँगयिन मंदिर
चुकौ गावातील लॉंगयिन मंदिर हे वैशिष्ट्यपूर्ण वास्तुकलेसाठी प्रसिद्ध आहे. हे मंदिर मास्टर दाओजीला समर्पित आहे आणि त्यामुळे भक्तमंडळी इथे नेहमी येतात.
हा भाग, अलीशान डोंगराळ प्रदेशाचे प्रवेशद्वार मानला जातो. त्यामुळे त्या भागात प्रवास करणारे लोक देखील, प्रवास सुरक्षित व्हावा म्हणून प्रार्थना करण्यासाठी ह्या मंदिरात येतात.
हे मंदिर दोन दूरचित्रवाणी मालिकांमधील सुमारे 1000 भागांमध्ये दिसले आणि खूप लोकप्रिय झाले! प्रार्थना आणि पूजा करताना धूप किंवा उदबत्ती जाळणे हे बहुतेक इथे अत्यंत महत्वाचे असते. मंदिरात सगळीकडे उदबत्तीचा धूरच धूर होता.
|
The Longyin Temple |
|
Bloom! |
|
Happy! |
|
Beautiful Surroundings |
येथे, ह्या फोटोत आपण मंदिराच्या मागे एक पूल पाहू शकता. मंदिराजवळ दोन सस्पेन्शन किंवा निलंबी पूल आहेत. दोरखंडांनी बांधलेले हे पूल जपानी सरकारच्या काळातले आहेत. हे पूल फानलु गावातील बझहांग नदी ओलांडण्यासाठी बांधले गेले होते. त्यामुळे अलीशान डोंगर भाग बाकी सर्व भागांना वाहतुकीने जोडण्यासाठी हे पूल महत्वाचे होते.
आता वाहतुकीसाठी महामार्ग बांधला गेला असला तरी हे जुने पूल पर्यटकांसाठी फोटो स्पॉट म्हणून अजूनही आकर्षणाचे केंद्र आहेत. पुलांची नावे ' इंटर्नल' आणि 'एव्हरलास्टिंग' पूल अशी आहेत.
वास्तविक जपानी राजवटीच्या काळात त्यांना जपानी सम्राट आणि राजकुमार यांच्या स्मरणार्थ तियांचांग आणि दिजौ पुल असे नाव देण्यात आले होते.
हिनोकी गाव
इथे कायम स्वरूपी सांस्कृतिक प्रदर्शनी उभारण्यात आली आहे. हे चियायी शहराच्या ईस्ट डिस्ट्रिक्ट ह्या भागात आहे.
जपानी राजवटीच्या काळात, या इमारती अलीशान वन रेल्वेच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांसाठी निवासस्थाने म्हणून बांधल्या गेल्या होत्या. आता या इमारती एका सांस्कृतिक प्रदर्शनासाठी उपयोगात आणल्या गेल्या आहेत. इमारतींच्या वास्तुशैलीमुळे आपण जपानमध्ये असल्यासारखे वाटते!
चियायी शहराच्या इतिहासाविषयी आणि जपानी आक्रमणाच्या आणि राजवटीच्या काळात काय बदल झाले त्या विषयी बरीच माहिती येथे दिली आहे.
या सायप्रस फॉरेस्ट लाइफ व्हिलेजमध्ये बरीच दुकाने आणि रेस्टॉरंट्ससुद्धा आहेत आणि ह्या सगळ्यामुळे ते चियायी शहरातील लोकप्रिय पर्यटन स्थळ बनले आहे.
तिथली सुंदर बाग, लहान लहान तळी, त्यातील विविध रंग छटांची वॉटर लिलीज सगळेच रमणीय होते.
|
Japanese ambience |
|
The old Japanese dormitories |
|
And now baseball is Taiwan's national sport |
|
Iconic Wood logs |
चियायी पासून, तैवानमधील बर्याच मोठ्या शहरांना जाण्याकरिता रेल्वेज उपलब्ध आहेत. हायस्पीड ट्रेनचे ताइपेईशीही कनेक्शन आहे.
ताइपेई बहुतेक सर्व प्रगत देशांच्या राजधानीच्या शहरांप्रमाणेच एक आंतरराष्ट्रीय शहर आहे, परंतु तैवानच्या ग्रामीण आणि वनपरिक्षेत्रात जाऊन आलात की आपल्याला तैवानची खरी ओळख होते. आपण तैवानचा आत्मा पाहू शकतो. अर्थात हे सगळ्याच देशांविषयी खरे आहे म्हणा!!
#PlacesToVisitInTaiwan #AroundChiyayi #WeekendInTaiwan #AlishanToChiyayi
खूप सुंदर ,ढगांच्या गावात जाऊन आलो असे वाटले
ReplyDelete