मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.
असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल.
परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात.
![]() |
परशुराम कोळिसरे रस्ता |
अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.
गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही.
![]() |
पार्किंग पासून उतरणाऱ्या पायऱ्या |
या पायऱ्या उतरताना अतिशय मनोहर असा मंदिर परिसर दृष्टीपथात येतो.
मंदिराच्या आवारात तीन मंदिरे आहेत. विष्णू म्हणजे लक्ष्मीकेशव, शंकर म्हणजे रत्नेश्वर आणि हनुमान मंदिर.पायऱ्या उतरताना डाव्या हाताला दिसते ते हनुमान मंदिर.
![]() |
हनुमान मंदिर |
![]() |
हनुमान मंदिर |
पायऱ्या उतरल्यावर अगदी समोर दिसते ती लक्ष्मीकेशव मंदिराची पाठीमागची बाजू. मंदिराचे प्रवेशद्वार दुसऱ्या बाजूला आहे.
प्रवेशद्वारातून आत जाण्याआधी थंडगार पाण्याचा झरा बघायचा असेल तर डावीकडे काही पायऱ्या खाली उतरावे लागेल. पूजेसाठी पाणी ह्याच झऱ्यातून येते. शतकानुशतके हा नैसर्गिक झरा वाहत आहे. असे म्हणतात की पावसच्या स्वरूपानंद स्वामींसाठी ह्याच झऱ्याचे पाणी नेत असत.
पाय धुण्यासाठी इथे वेगळी सोया केलेली आहे. त्यामुळे झऱ्याचे पाणी शुद्ध, पिण्याजोगे राहिले आहे. घनदाट झाडी, खळखळाट करणारा हा झरा आपण अगदी जंगलात आल्याची अनुभूती देतात.
![]() |
नैसर्गिक झरा |
![]() |
झऱ्याचा परिसर |
![]() |
झऱ्याची सुरक्षा |
पाय धुवून आपण पुन्हा वर आलो की समोरच मंदिराचे प्रवेशद्वार दिसते.
![]() |
श्री लक्ष्मीकेशव मंदिर |
![]() |
श्री लक्ष्मीकेशव मंदिर प्रवेशद्वार |
![]() |
मंदिर परिसर |
मंदिरात विष्णू अवताराविषयी, त्यातील आयुधांच्या क्रमानुसार ठरणाऱ्या मूर्तींच्या नावाविषयी अगदी सविस्तर माहिती दिलेली आहे.
![]() |
मंदिर व विष्णू मूर्ती माहिती |
उजव्या खालील हातात पद्म, वरील हातात शंख, डाव्या वरील हातात चक्र आणि खालील हातात गदा अशी ही केशव मूर्ती आहे.
श्री लक्ष्मीकेशवाची ही मूर्ती अखंड काळ्या शिळेतून घडवली गेली असून तिला गुळगुळीत केल्याने चमक वाढली आहे. पाहताना तिचे तेज जाणवते.
![]() |
श्री लक्ष्मीकेशव |
![]() |
श्री लक्ष्मीकेशव |
मंदिराच्या आवारात शंकराचे मंदिर आहे. रत्नेश्वराच्या ह्या मंदिरात आत फोटो काढण्याची परवानगी नाही.
![]() |
रत्नेश्वर |
![]() |
मंदिर परिसर |
मंदिर परिसर अगदी स्वच्छ, शांत आणि रमणीय आहे. घनदाट झाडी असल्याने हवा शुद्ध आहे.
मंदिरापासून काही अंतरावर राहण्याची व जेवण्याची चांगली सोय आहे. आधी कळवून गेल्यास उत्तम होईल. तिकडे फोनची रेंज अगदी कमी मिळते. त्यामुळे संपर्कासाठी संयम आणि सातत्याने प्रयत्न करावे लागतात!!
आम्ही गेलो त्या दिवशी संध्याकाळी मुंबईच्या सुप्रसिद्ध कीर्तनकार वंदना टिळक ह्यांची कीर्तनसेवा होती. त्यामुळे विष्णूची आयुधे ह्या विषयावर अतिशय रसाळ कीर्तन ऐकायला मिळाले.
![]() |
वंदना टिळक - कीर्तनसेवा |
![]() |
कीर्तन |
रात्री आम्ही श्री मराठे गुरुजी ह्यांच्या विश्रामगृहात मुक्काम केला. साध्या स्वच्छ खोल्या आणि सात्विक रुचकर जेवण मिळाले.
कोणत्याही कृत्रिम उजेडाशिवाय आणि वाहनांच्या आवाजाशिवाय रात्र किती सुंदर असू शकते, ते अनुभवले. गर्द काळोखात टिपूर चांदणे पाहिले. हे अनुभवण्यासाठी आणि सकाळी साग्रसंगीत पूजा करण्यासाठी एक रात्रीचा तरी मुक्काम आवश्यक आहे.
श्री लक्ष्मीकेशव देवस्थानचा वार्षिक उत्सव कार्तिक शुद्ध दशमी पासून पौर्णिमेपर्यंत असतो. या काळात विविध कार्यक्रमांचे आयोजन केलेले असते.
संपर्क - तिथे मराठे गुरुजी आणि तेरेदेसाई ह्यांच्याकडे व्यवस्थेची चौकशी करावी. श्री. मराठे यांचे फोन नंबर - ९६३७६९३४९३, ७०३८४३१४११
अभ्यासक, निसर्गप्रेमी आणि भाविक अशा सर्वानाच आनंद देणारे हे स्थान आहे. तेव्हा सर्वानी कोळीसरे येथे अवश्य भेट द्यावी.
शास्त्री नदीच्या काठावर वसलेल्या कोळीसरे गावाच्या विषयी म्हटले जाते,
Comments
Post a Comment