तैवानचे नाव सध्या चर्चेत आहे, सर्वत्र तैवानचे कौतुक होते आहे, ते तैवानने कोरोनाशी दिलेल्या अतिशय प्रभावी व यशस्वी लढतीमुळे!! जानेवारी २०२० पासून तैवानने, कोविड१९ विरूद्धच्या लढाईत परिणामकारक उपाययोजना केली आहे आणि आतापर्यंत म्हणजे फेब्रुवारी २०२१ पर्यंत कोविडमुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तींची संख्या एक आकडी म्हणजे ९ आहे.
तैवान हा एक विकसित देश आहे. तैवान स्वतःला आरओसी (ROC) म्हणवतो- रिपब्लिक ऑफ चायना, म्हणजेच चीनचे प्रजासत्ताक आणि स्वत: ला पीपल्स रिपब्लिक ऑफ चाइना म्हणजेच कम्युनिस्ट चीनपेक्षा वेगळे करू इच्छितो.
आम्ही एप्रिल २०१५मध्ये तैवानला गेलो होतो तेव्हा तैवानमधील सर्वोत्तम ऋतुंपैकी एक ऋतु होता. वसंत ऋतुची सुरुवात होती. त्यामुळे आम्हाला बरीच रंगीबेरंगी फुले दिसली. हवामान थंड होते पण थंडी असह्य होण्याइतकी नव्हती.
आज मी 'अलिशान राष्ट्रीय वन क्षेत्राबद्दल' लिहित आहे. अलिशान हे युशान जवळ, मध्य तैवानमध्ये असलेल्या एका पर्वतरांगेचे नाव आहे. युशान म्हणजे जेड पर्वत. हा तैवान मधील सर्वात उंच पर्वत आहे, समुद्रसपाटीपासून सुमारे 3000 मीटर उंचीवर.
अलिशान म्हणजे अली पर्वत. हा समुद्रसपाटीपासून २०००- २७०० मीटर उंचीवर असल्याने, अगदी उन्हाळ्यातही इथे थंड वातावरण असते.
अलिशान हे ढगांचा सागर, सायप्रसची जंगले, रंगीबेरंगी फुले आणि फॉरेस्ट ट्रेन यासाठी प्रसिद्ध आहे. आम्ही हे सर्व चमत्कार अनुभवू शकलो.
अलिशान राष्ट्रीय वन क्षेत्र तैवानच्या 'चियायी' काउंटीमध्ये आहे.
|
Chiyayi Train Station |
|
😊 |
फॉरेस्ट ट्रेनचा चियायी ते अलिशान हा मार्ग असला तरी दरड कोसळल्यामुळे ह्यातील बराच मार्ग बंद आहे. 2023 मध्ये ह्या मार्गाच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल.
आम्ही चियायीपासून अलीशानला जाण्यासाठी टॅक्सी केली. हा डोंगराळ प्रदेश असल्याने रस्ता खूप वळणांचा आणि निसर्गरम्य सौंदर्याने नटलेला आहे.
|
Along the road! |
|
Along the road! |
चियायी ते अलिशान प्रवासाला सुमारे दोन तास लागतात. जेव्हा आम्ही अलिशानला पोहोचलो तेव्हा नेमका अलिशानमध्ये पाऊस पडत होता. पाऊस, वारा आणि थंड हवा सगळे मिळून खरोखरच खूप थंडगार बनले!
मॅपलच्या सुंदर लाल पानांनी आणि अनेक प्रकारच्या रंगीबेरंगी फुलांनी आमचे स्वागत केले.
|
Maple leaves |
|
Cherry Blossom |
अलिशानमध्ये, तुम्हाला कुठेही जायचे असो, तिथे जाण्यासाठी एकतर काही पायर्या चढायला लागतात किंवा उतरायला लागतात!! थंड हवेमुळे थकवा मात्र जाणवत नाही.
पण हे सगळे चढउतार, न कंटाळता पार करण्याचे बक्षीस फारच छान होते! आम्हाला उत्कृष्ट शाकाहारी भोजन मिळाले. अलिशान हा भाग बांबूच्या शाकाहारी पदार्थांसाठी, आल्याच्या पेयासाठी आणि चहासाठी प्रसिद्ध आहे.
|
Bamboo stir fry |
|
Crispy puffs |
आमचे जेवण होण्याची वाट पाहत, पाऊस बाहेर उभा होताच! आम्ही बाहेर आलो तर समोर हे दृश्य!
दुपारी आम्ही जंगल टूर घेतली.
|
@4. 42 p.m. |
अजूनही पावसाची रिपरिप चालूच होती. सगळी फुले पावसाने गच्च भिजली होती. ह्या ट्रेल चे नावच साकुरा ट्रेल होते. त्यामुळे मला अगदी मनसोक्त, तृप्त होईपर्यंत साकुरा -चेरी ब्लॉसम बघता आले.
|
Part of the trail |
अलिशान हे मूलतः लाल सायप्रसच्या झाडांचे घनदाट जंगल होते. तिथे वनवासी लोकच मूळ रहिवासी होते. नंतर १९व्या शतकात चीनी लोक आले. जपानच्या आक्रमणानंतर, जपानी राज्यकर्त्या लोकांनी मोठ्या प्रमाणात झाडांची कापणी सुरु केली.
ही कापलेली लाकडे घेऊन जाण्यासाठी फॉरेस्ट ट्रेन सुरू झाली आणि हळूहळू लोकांच्या लहान लहान वस्त्या झाल्या आणि अशाप्रकारे जंगल परिसरात गावे वसवली गेली.
आम्ही एक अतिशय विलक्षण गोष्ट पाहिली, ती म्हणजे ट्री स्पिरिट पॅगोडा. हे १९३५ मध्ये बांधले गेले होते. अलिशान जंगलात काही हजार वर्षे जुनी झाडे आहेत. जेव्हा ती झाडे कापली गेली, तेव्हा त्यांच्या आत्म्यांना वंदन करण्यासाठी, पूजा करून त्यांना शांत करण्यासाठी हे मंदिर, तिथे जंगलात बांधले गेले होते.
|
📷 Commons Wikimedia |
|
📷 Commons Wikimedia |
ही वर्तुळे, वृक्षांच्या वार्षिक वाढीची जी वर्तुळे खोडावर असतात, त्याचे प्रतीक आहेत. प्रत्येक पायरी म्हणजे 500 वर्षांची कालगणना. अशी एकूण ३००० वर्षे इथे दाखवलेली आहेत. समोर एक मंदिर आहे. ते बंद होते म्हणून वरून पायऱ्यांवरूनच त्याचा एक फोटो काढला होता.
आम्ही तिथे एक सुंदर तळे पाहिले. त्याविषयी काही मनोरंजक लोककथा देखील आहेत. त्या वेळपर्यंत मुसळधार पाऊस पडायला लागला होता, म्हणून पोंचोच्या बाहेर मोबाईल काढून, तळ्याचे फोटो काढण्याची हिम्मत केली नाही.
दुसर्या दिवशी, पहाटे २.३० च्या सुमारास उठून यु शान पर्वतावर फेरफटका मारण्यासाठी व जंगलातील सर्वात उंच ठिकाणाहून दिसणारा सूर्योदय पाहण्यासाठी जायचे होते.
हवामान अनुकूल असेल, तर ढगांच्या सागरातून सूर्य उगवताना बघायला मिळतो.
यूशानच्या जंगलातील ह्या टूरने आम्हाला सुमारे 5000 वर्ष जुनी झाडे असलेल्या जंगलात नेले. पहाटे, अंधार आणि उजेडाच्या सीमारेषेवर, तिथे, त्या पुरातन किंवा (खरे तर नित्यनूतनही!) जंगलात असणे हा खरोखर एक जादूई अनुभव होता.
|
Yu Shan @5.14 a.m. |
|
@5.27a.m. |
|
The moon was still in the sky @5.29 a.m. |
|
Part of the trunk of a 5000 yrs old tree |
|
@5.46 a.m. |
|
Have to hurry for watching sunrise! |
|
Nearly 5000 year old tree |
|
@6.03 a.m. |
|
@ 6.14 a.m. |
|
@ 6.15a.m. |
|
6.23 a.m. |
|
Shopkeeper dressed like aborigines |
इतकी हजार वर्षे वयाची झाडे पाहून झाल्यावर, जेव्हा आम्ही जवळपास शंभर वर्षे वयाची झाडे पाहिली तेव्हा, ती अगदी लिंबू टिंबू वाटली. अगदी चिकूपिकूच म्हणाना!
अलिशान फॉरेस्ट रेल्वे हे अजून एक मोठे आकर्षण होते.
|
Alishan Railway station |
|
At the station gallery |
|
Upper floor of the station |
तो [प्रचंड मोठा लाल सायप्रसचा वृक्ष, दैवी वृक्ष म्हणून ओळखला जात असे. मेघगर्जना, सोसाट्याचा वारा व वीज कोसळल्यामुळे १९५३ आणि १९५६ मध्ये ह्या वृक्षाचे खूप नुकसान झाले. अखेर १९९७ मध्ये हा वृक्ष संपूर्ण कोसळला. म्हणून १९९८ मध्ये ह्या दैवी वृक्षासाठी एक निरोप समारंभ व पूजा पार पडली. ह्या वृक्षाला निसर्गाकडे परत जाण्याच्या यात्रेसाठी समारंभपूर्वक निरोप देण्यात आला. त्या जागेवर जंगलातील अक्षय जीवन परंपरा कायम ठेवण्यासाठी, लाल सायप्रसची काही रोपे लावली गेली. ही माहिती ह्रदयस्पर्शी होती.
दुरुस्ती आणि देखभालीसाठी बराचसा रेल्वे मार्ग बंदच असल्याने आम्ही फक्त आलिशान ते सॅक्रीड ट्री रुटवरच प्रवास करू शकलो.
|
Clear weather |
|
Engulfing clouds |
|
16 degrees at 10.45 a.m. |
माझ्या आठवणीत अलिशान कायमचे कोरले गेले आहे. हजार वर्षे वयाची जुनी झाडे, चेरी ब्लॉसम- फुलांनी बहरलेली असंख्य झाडे, ट्री स्पिरिट पागोडा आणि दैवी वृक्षासाठी साजरा केला गेलेला निरोप सोहळा ह्या अलि शानविषयीच्या संस्मरणीय गोष्टी होत्या.
अजून एक खूपच सुंदर गोष्ट म्हणजे जंगलात पाट्यांवर कविता लिहिलेल्या होत्या. गेल्या काही शतकांतील कवींच्या रचना होत्या त्या. त्यांच्या भाषेतून इंग्रजीत येताना, कदाचित अर्थाचा परिमळ थोडा कमीही झाला असण्याची शक्यता आहे. पण तरीही, दाट जंगलात आणि झाडाच्या सहवासात त्या काव्यरचना वाचणे खूपच आनंददायी होते. आता मला वाटतंय की मी त्या कविता लिहून घ्यायला हव्या होत्या.
अजूनही मला एका कवितेचा भावार्थ आठवतो. कवीने झाड किंवा जंगलातील अक्षय जीवनाविषयी सांगितले होते. कवीने लिहिले होते, 'जंगलाच्या जीवनात, काहीही कायम टिकत नाही परंतु सर्व काही अंतहीन आहे.'
आता अलिशानचा निरोप घेण्याची वेळ आली होती !! अच्छा आलिशान.. आत्तापुरते तरी!!
#ThingsToSeeInTaiwan #AlishanSightseeing #TreeSpiritPagoda #WhenInTaiwanMustSeeAlishan #chikupiku
Vrunda, Enjoyed tour in Taivan . Love your writing style.
ReplyDeleteसुंदरच 👌
ReplyDeleteVery engaging writing. I am a big fan of you and your writing!!!
ReplyDeleteA small typing error, temperature caption should be 16 degree. Thanks
ReplyDelete