प्रत्येक शहरात अशी काही ठिकाणे असतात की जिथला पत्ता सांगणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. असाच एक पत्ता म्हणजे दक्षिण मुंबईची जणू रक्तवाहिनी असलेला पेडर रोड. श्रीमंत उद्योजक, गुणवान आणि ऐश्वर्यसंपन्न कलावंत यांची निवासस्थाने असलेला पेडर रोड. ज्या रस्त्यावरून प्रतिदिनी लाखो वाहने जात असतात असा पेडर रोड. असे म्हटले जायचे की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आणि नंतर ह्या रस्त्यावरच्या मंगेशकरांच्या प्रभुकुंज मध्ये गानसरस्वती लता मंगेशकरांचे दर्शन घ्यायचे! त्याच रस्त्यावर लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न आहे असे अनेक लक्ष्मीपुत्र राहतात. नावेच घ्यायची झाली तर जिंदाल आहेत, अंबानी आहेत. अशा सुप्रसिद्ध, सुप्रतिष्ठित पेडर रोडच्या मुगुटातला हिरवा पाचू म्हणजे गुलशन महाल आणि त्याच्या आजूबाजूची हिरवाई.
|
गुलशनमहाल |
मोठाले वृक्ष, त्यांच्याभोवती बांधलेले पार, त्या शीतल सावलीत बसण्यासाठी कोणालाही मोहात पडतील.
|
गर्द सभोवती ... |
गुलशन महाल ह्या इमारतीचे पूर्वीचे नाव होते गुलशन आबाद - गुलशनाबाद. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर बांधला गेलेला, कच्छ चे व्यापारी पीरभाई फलकदिन यांचा हा बंगला. पाच एकरांच्या परिसरात असलेला, झाडांनी वेढलेला हा सुंदर बंगला. बंगल्यातून दिसणारा अरबी समुद्र बंगल्याच्या सौंदर्यात वाढ करीत असे.
काळ बदलला. पिढी दर पिढी बंगल्याचे मालक बदलले. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात तर राज्यकर्त्या ब्रिटिशांनी तिथे मिलिटरीचे हॉस्पिटल उभारले.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर 'डॉक्युमेंट्री फिल्म्स ऑफ इंडिया' आणि 'फिल्म डिव्हिजनचे' ऑफिस म्हणून हा बंगला वापरला गेला.
या बंगल्याच्या सिनेजगताशी तसा जुना संबंध होता. 1932 मध्ये या घराची मालकीण खुर्शीद हज यात्रेला गेली होती तेव्हा त्या प्रवासाचे चित्रण करून तिने एक माहितीपट तयार केला होता. म्हणूनच ती माहितीपट तयार करणारी पहिली भारतीय स्त्री ठरली होती. 1930 च्या सुमाराला त्या काळातील आघाडीची अभिनेत्री आणि निर्माती देविका राणी यांनी या गुलशनमहाल परिसरातले एक घर भाड्याने घेतले होते.
फिल्म्स डिव्हिजनचे ऑफिस नव्या इमारतीत गेल्यावर गुलशन महाल हा क्वचित कधी सिनेमाच्या चित्रीकरणासाठी भाड्याने दिला गेला.
आणि आता २०१९ पासून तिथे उभे आहे भारतातील पहिले सिनेमा म्युझियम- चित्रपट संग्रहालय. NMIC- National Museum Of Indian Cinema. |
तिकीट खिडकी |
|
प्रवेशद्वार |
NMIC च्या फलकाशेजारी असलेला पुतळा कोणाचा असेल ह्याचा अंदाज कोणताही भारतीय किंवा निदान कोणताही मराठी माणूस नक्कीच बंधू शकेल. तो पुतळा आहे भारतीय चित्रपट उद्योगाचे जनक दादासाहेब फाळके ह्यांचा. ल्युमियेरेपासून झालेली तंत्रज्ञानाची सुरुवात, नंतर आलेले मूकपट, त्यानंतर आलेले बोलपट, मग रंगीत चित्रपट हे सगळे आपल्याला गुलशन महलमधील वेगवेगळ्या नऊ विभागातून पाहायला मिळते. गाणी ऐकता येतात, इतकेच काय आपल्या आवाजात गाणी रेकॉर्ड करून देखील ऐकता येतात. |
आराखडा |
|
प्रॅक्सीनोस्कोप |
|
भारतीय परंपरा |
|
जादुई दिवा |
|
राजा हरिश्चंद्र |
|
मूकपटातील नायिका |
|
सिनेमा सिनेमा |
|
मराठी आणि गुजराथी सिनेमाचा संक्षिप्त इतिहास |
|
साहित्याचा प्रभाव |
|
सिनेमा आणि समाज |
|
१९४७ |
या संग्रहालयाचा दुसरा भाग असलेली भव्य अत्याधुनिक
इमारत, त्या इमारतीतील अत्यंत आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने सांगितला जाणारा चित्रपट व्यवसायाचा इतिहास, बदलत गेलेली उपकरणे हे सगळे पाहताना जुन्या इमारतीतून नव्या इमारतीत आल्यावर एक शतक भराचा प्रवास करून आल्यासारखे वाटते.
|
नवी इमारत |
|
नवी इमारत
|
|
नवी इमारत
|
|
नवी इमारत
|
|
नवी इमारत
|
नव्या इमारतीतला प्रत्येक मजला एका विशिष्ट संकल्पनेला वाहिलेला आहे. सत्यजित रे आणि सिनेमा, गांधी आणि सिनेमा, लहान मुलांसाठी फिल्म स्टुडिओ, टेक्नॉलॉजी, क्रीएटिव्हिटी आणि इंडियन सिनेमा, सिनेमा ऍक्रोस इंडिया असे वेगवेगळे भाग असलेली दालने आणि मजले नव्या इमारतीत आहेत. |
भारतातील सिनेमा दालन |
|
भारतीय सिनेमातील पथ शोधक |
|
जत्रा आठवली ना? |
|
जाहिरात |
|
सेन्सॉर प्रमाण पत्र |
|
भारतातील प्रारंभीच्या काळातील सुप्रसिद्ध स्टुडियोज |
|
कॅमेरा, लाईट,ऍक्शन |
|
अभिनेत्री |
|
माहिती आणि फोटो |
|
फिल्म्स डिव्हिजन |
|
फिल्म फेस्टिवल्स |
|
फिर भी दिल हैं हिंदुस्थानी |
|
दादासाहेब फाळके पुरस्कार |
|
सिनेसंगीत |
|
भारतीय सिनेसंगीत |
चित्रपटाची निर्मिती, कॅमेरा, लाईट, नंतर त्याचे संकलन, इतकेच काय त्याची प्रसिद्धी या सर्वांविषयी अत्यंत विस्ताराने प्रेक्षकांना माहिती मिळेल. डिजिटल एडिटिंग, थ्रीडी सिनेमा हे सर्व कसे होते ते बघता येते. कित्येक गोष्टी स्वतः करून बघायला मिळतात. |
चित्रपट निर्मिती |
|
शूटिंग |
|
शूटिंग |
|
प्रोजेक्टर |
|
ऍनिमेशन |
|
संकलन |
|
गांधी आणि भारतीय सिनेमा |
|
गांधी आणि भारतीय सिनेमा |
|
गांधी आणि भारतीय सिनेमा |
|
सत्यजित रे |
|
सत्यजित रे - अनोखी पोस्टर्स |
|
सुलेखन |
भारतीयांना असलेले सिनेमाचे वेड सर्वश्रुत आहे. जो सिनेमा आपण पडद्यावर बघतो तो तयार कसा होतो हे पाहणे देखील औत्सुक्याचे आणि आनंदाचे ठरते.
|
सिनेमाप्रेम - वेड |
गेल्या शंभर वर्षांचा इतिहास सांगणारे हे संग्रहालय लवकरच मुंबईच्या पर्यटनातील एक मानबिंदू ठरणार आहे यात शंकाच नाही. एकूणच जागतिक पातळीवर देखील अत्यंत अभिमानाने मिरवावे असे हे भारतातील पहिले चित्रपट संग्रहालय मुंबईत उभे राहिले आहे हे नक्की. The National Museum of Indian Cinema
Address- Films Division, Ministry of Information & Broadcasting, Government of India, 24 – Dr. G. Deshmukh Marg, Mumbai-26.
The Museum is open to the public from Tuesday to Sunday (11 AM to 6 PM) and will remain closed on Mondays and Public Holidays.
The entry fee to the Museum is:
- Indian Visitors above 14 yrs and above: INR 75
- Children 3 to 13 yrs : INR 40
- Foreign Citizen above 14 yrs : INR 500
- Foreign Citizen 3 to 13 yrs : INR 250
Parking is available at the Films Division Complex.
#Bollywood #Making Of Cinema #
One Day Tour In Mumbai #PeddarRoad # Sightseeing in Mumbai #GulshanmahalMumbai #भारतीय सिनेमा का राष्ट्रीय संग्रहालय
उत्तम माहिती. नक्की बघतो. धन्यवाद.
ReplyDelete