Skip to main content

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड


रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व!
शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता.
राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहासनाकडे, हिंदवी स्वराज्याकडे, संघटनेकडे वळवली. व्यक्ती माहात्म्य टाळले. अशी दृष्टी असणारे राज्यकर्ते फारच विरळे.
शिवाजी महाराज आदर्श राजा होते, उत्कृष्ट सेनापती होते. राज्याभिषेकाच्या निमित्ताने इतर राष्ट्रांची मान्यता मिळवणे हा हेतू तर त्यांनी साध्य केलाच पण रयतेची निष्ठा स्वराज्याकडे वळवून, आपल्या मृत्यूनंतरही अनेक वर्षे हा लढा चालू राहील अशी व्यवस्था निर्माण केली. विजिगिषु वृत्ती जागृत केली.
छत्रपती शिवाजी महाराज
ह्या अभूतपूर्व राज्याभिषेकाचे स्थान होते किल्ले रायगड! ही पोस्ट लिहिताना मला अतिशय आनंद होतो आहे. एरवी मी ब्लॉगपोस्ट लिहिते, ते मी जाऊन आलेल्या ठिकाणांची माहिती वाचकांना द्यावी म्हणून. पण ह्या पोस्टमध्ये काहीही माहिती नव्याने द्यायची गरजच नाही. आपल्याला सगळ्यांना रायगड, जरी प्रत्यक्ष तिथे गेलेलो नसलो तरीही, माहितीच असतो. माननीय बाबासाहेब पुरंदरे, गो. नी दांडेकर ह्यांच्या लेखनातून, भाषणातून रायगड आपल्या ओळखीचा झालेला असतो. कोणत्याही गडापेक्षा रायगडावर अधिक पुस्तके लिहिली गेली आहेत. अगदी पहिल्यांदा तिथे जाणाऱ्या लोकांना देखील आपण पहिल्यांदाच हे सगळे बघत आहोत असे वाटत नाही! मी आज फक्त तुमच्या रायगडाच्या आठवणी जागविण्याचे काम करणार आहे.
सह्याद्री पर्वतरांगांमध्ये असलेल्या ह्या किल्ल्याची उंची समुद्रसपाटीपासून १३५० मीटर आहे. पण भारतीय मनातील ह्या किल्ल्याची उंची न मोजता येण्याइतकी आहे. (रायगडाची उंची अनेक जण वेगवेगळी सांगतात. मी इथे लिहिलेली उंची रायगडावर जो फलक लावलेला आहे त्यावरची आहे.) आम्ही ऑक्टोबर २०१५ मध्ये रायगडला गेलो होतो. तेव्हाचे फोटो आहेत हे सगळे.
रायगडावरील माहितीफलक
बाराव्या शतकात हा किल्ला सर्वप्रथम बांधला गेला. त्या आधी नुसता डोंगर असतानाची नावे होती रासिवटा, तणस, नंदादीप. नंतर किल्ला बांधल्यावर नाव होते रायरी. अनेक वर्षे शिर्के ह्यांच्याकडे किल्ला होता. निजामशाहीत कैदी ठेवण्यासाठी ह्या किल्ल्याचा उपयोग होत असे.
मे १६५६ मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकला. इथे पोचायला आणि चढायला अत्यंत अवघड होते, तसेच समुद्र जवळ होता. म्हणून इथे राजधानी करावी असे राजांनी ठरवले. डच, पोर्तुगीज, अरब, इंग्रज या आक्रमकांचा विचार करून नाविक शक्ती, आरमार व्यवस्था विकसित करणाऱ्या महाराजांनी राजधानीसाठी समुद्र जवळ असलेला किल्ला निवडला हे अगदीच संयुक्तिक आहे.
महाराज हा किल्ला राजधानीसाठी निवडताना काय म्हणाले ते अनेक ठिकाणी वाचायला मिळते. किल्ल्यावरचा गाईड पण ते सांगतोच तरी देखील मी पुन्हा इथे ते शब्द देत आहे.
महाराजांचे त्यावेळचे शब्द सभासदाच्या बखरीत वाचायला मिळतात. "दीड गाव उंच - देवगिरीच्याहुन दशगुणी उंच जागा. पर्जन्यकाळी कड्यावर गवत उगवत नाही. उभ्या कड्यावर पाखरू उतरावयास जागा नाही. हे बघून महाराज खुषीने म्हणाले - तख्तास जागा हाच गड करावा."
आमचा किल्ल्यावरील मार्गदर्शक
मा. गो. नी. दांडेकर महाराजांच्या गड निवडीविषयी म्हणतात, "आधीही दुर्ग होतेच. पण शिवछत्रपतींनी दुर्गरचना, त्यांची गरज, उपयोग, महत्व, स्थान, आवश्यकता इत्यादी सर्व बाबींचा अतिशय सूक्ष्म अभ्यास केला व एक स्वतंत्र शास्त्र बनवले. जिथे पूर्वी दुर्गं होते त्यांची डागडुजी केली. नव्हते तिथे मोक्याच्या जागी नवे बांधवून घेतले.
प्रत्येक वेळीच महाराजांचे चातुर्य व दूरदृष्टी दिसून येते. पण सर्वाधिक चातुर्य दिसते ते रायगडी राजधानी स्थापन करण्यात. रायगड ऐन कोकणात. चहुबाजूंस डोंगरदाटी. वरंध घाट, लिंगाणा, माणगाव अशा चारदोन ठिकाणांव्यतिरिक्त अन्यत्र कुठुन तो किल्ला कोणता, ते त्या डोंगर दाटी मध्ये ओळखू येत नाही. घाटापासून तसा जवळ पण अडचणीत. समुद्रकिनारा अंदाजे तीस मैलांवर. चहूकडून तुटलेला ताशीव कडा. अगदी पाखरू बसू म्हणेल तरी त्यास जागा नाही. असा हा दुर्गम किल्ला त्यांनी राजधानी म्हणून निवडला. तिथून घाटावरही लक्ष पोचत असे व समुद्रही आवाक्यात होता."
आता कशी आहे रायगडाची वाट? पुण्याहून रायगड दर्शन बस आहे. मुंबईकरांना महाडमार्गे जाता येते. रस्ता २०१५ मध्ये आम्ही गेलो तेव्हा चांगला नव्हता. पण लवकरच दुरुस्ती होणार होती. तेव्हा आता चांगला असेल.
रायगडावर जाणारा रस्ता
पायथ्यापासून चढून जाणार असाल तर साधारण १४००/१५०० पायऱ्या चढून जावे लागेल. चढताना निसर्ग आणि अनेक ठिकाणे बघायला मिळतील. डोंगर चढण्याचा आनंद देखील मिळेल. तेव्हा खरे तर रायगड ह्याच मार्गाने पाहायला हवा.
नवा रज्जुमार्ग झालेला आहे. त्याचे ऑनलाईन आरक्षण होते. त्यांची साईट आहे,
https://www.raigadropeway.com/index.html
त्या साईटवर आपण केबल कारचे आरक्षण करू शकता. एका वेळचे अथवा परतीचे सुद्धा आरक्षण होऊ शकते. अवघ्या काही मिनिटात ही केबल कार आपल्याला गडावर घेऊन जाते.
केबल कार मधून दिसणारे दृश्य
केबल कार मधून दिसणारे दृश्य
केबल कार मधून दिसणारे दृश्य
केबल कार मधून दिसणारे दृश्य
केबल कार मधून दिसणारे दृश्य
केबल कार मधून इतका मोठा परिसर नजरेच्या आवाक्यात येतो. केबल कार अजून थोड्या वेळ चालू राहावी असेच वाटायला लागते!
ह्याच साईटवर राहण्याच्या व्यवस्थेचे पण आरक्षण होते. त्यांचे गडावर रेस्टॉरंट आहे. पण आम्ही २०१५ मध्ये गेलो तेव्हा तिथे फारसा स्वैपाक होत नसे. त्यामुळे आपल्याला काय आणि कधी हवे त्याची मागणी पायथ्याशी असलेल्या ऑफिस मध्ये नोंदवायची आणि मग त्या त्या वेळी अन्न केबल कारने गडावर येणार अशी व्यवस्था होती.
तुम्ही जाल तेव्हा चौकशी करून मगच वर जा. पायथ्याशी दुकाने आहेत. शिवाय तुम्ही स्वतः बरोबर काही अन्न पदार्थ ठेवणे चांगले.
गडावर MTDC ची देखील राहण्याची सोय तसेच रेस्टॉरंट आहे. त्यांचे बुकिंग पण आधीच करावे लागते. ऐनवेळी जाऊन सोय होण्याची शक्यता कमीच असते.
१६७४ मध्ये साम्राज्याची राजधानी हा रायगड बांधला तो महाराजांच्या आज्ञेवरून हिरोजी इंदुलकरांनी. आज इतक्या शतकानंतर, इंग्रजांनी उध्वस्त करून देखील ज्या काही थोड्या खुणा उरल्या आहेत त्यावरून तेव्हाच्या वैभवाची कल्पना आपण करू शकतो.
किल्ले रायगड
किल्ले रायगड
किल्ले रायगड- पाण्याची टाकी
किल्ले रायगड
किल्ले रायगड
गवत खूप वाढले आहे!
मी तुम्हाला सगळा गड फिरवणार नाही. अगदी विस्तृत माहिती देखील लिहिणार नाही! ज्यांनी रायगड पाहिला नाही त्यांना उत्सुकता वाटेल आणि ज्यांनी पाहिला आहे त्यांच्या आठवणी जागृत होऊन परत जावेसे वाटेल इतकेच सांगणार आहे!
बाजारपेठ
रायगडावरील बाजारपेठ घोड्यावर बसून खरेदी करता येईल अशी आणि इतकी उंच आणि रुंद आहे. पेठेच्या दोन रांगा आहेत. आता दुकानांची जोती उरली आहेत. दोन्ही रांगांमध्ये साधारण ४० फूट इतके अंतर सोडलेले आहे. प्रत्येक रांगेत वीस पेक्षा जास्त दुकाने आहेत.
किल्ले रायगड

किल्ले रायगड- नगारखाना दरवाजा 
किल्ले रायगड - कथा सांगतो शिवरायांची

सिंहासनाधिश्वर छत्रपती शिवाजी महाराज
किल्ले रायगड 
प्रत्येक भारतीयाचा उर अभिमानाने भरून यावा अशी ही जागा. महाराजांच्या अनेक कथा आठवतात. इथे प्रत्यक्ष महाराज वावरलेले आहेत, राज्याभिषेक झालेला आहे ह्या कल्पनेने देखील रायगडावर फिरताना अंगावर रोमांच उभे राहतात.
असे म्हणतात की दरवाज्याजवळ उभे राहून बोललेले सिंहासनाशी ऐकू जाईल अशी ध्वनी व्यवस्था गड बांधताना केलेली आहे. त्याचा अनुभव आम्ही घेतला.
आम्ही नगारखाना दरवाज्याजवळ असताना पाहिले की काही हौशी पर्यटक सिंहासनावर चढून महाराजांच्या खांद्यावर हात टाकून फोटो काढण्याच्या प्रयत्नात आहेत. ह्या उद्दामपणाने अक्षरश: अंगाचा संताप झाला. आम्ही नगारखाना दरवाज्यातून "खाली उतरा" असे ओरडलेले तिथे ऐकू गेले. कोणी ओरडल्यानंतर तरी खाली उतरण्याइतकी लाज त्यांच्याकडे शिल्लक होती हे आमचे नशीब.
हे असे उद्दाम हौशी पर्यटक, गडांवर जाऊन धूम्रपान, मद्यपान करणारे, घाण टाकून गड खराब करणारे पर्यटक ह्यांचे काय करावे, कळत नाही.
टकमक टोक 
पूर्वी गुन्हेगारांना देहदंड देण्यासाठी ह्या कड्या वरून ढकलून देण्यात येत असे. खरोखरच उभा कातळ आहे. कपाळमोक्ष शंभर टक्के ठरलेलाच. आता तो एक चांगला व्यू पॉईंट झाला आहे.
किल्ले रायगड - खलबतखाना
किल्ले रायगड - स्तंभ 
किल्ले रायगड - स्तंभ 
गंगासागरच्या जवळ उभे असलेले हे दोन सुंदर स्तंभ. अजूनही नक्षीदार तीन मजले दिसतात. पूर्वी हे पाच मजले होते असे म्हणतात. बारा कोनांचे हे स्तंभ खूपच विशेष आहेत. जगदीश्वर मंदिराजवळ असलेला शिलालेख पुढे दिला आहे त्यात उल्लेख केलेले स्तंभ हेच असावेत.
किल्ले रायगड 
किल्ले रायगड 
किल्ले रायगड 
गंगासागर तलाव 
राज्याभिषेकाच्या वेळी ह्या तलावात विविध तीर्थक्षेत्रीचे, नद्यांचे पाणी आणून मिसळले होते. त्यामुळेच ह्याचे नाव गंगा सागर असे पडले.
किल्ले रायगड 
किल्ले रायगड 
किल्ले रायगड - राणीवसा 
किल्ले रायगड - राणीवसा 
राणीवसा म्हणजे राण्यांची राहण्याची जागा. इथे सहा महाल आहेत. त्यांच्यासोबत त्यांच्या मदतनीसांची पण राहण्याची सोय केलेली आहे. मेणा दरवाजातून ह्या सर्वांची ये जा होत असे.
किल्ले रायगड 
रायगड संरक्षित स्मारक म्हणून आता शासनाच्या ताब्यात आहे. त्याची देखभाल शासनाच्या संबंधित विभागाने करणे अपेक्षित आहे. गडावरचे रस्ते ठीक आहेत आणि सर्वत्र पाट्या लावलेल्या आहेत.
किल्ले रायगड - होळीचा माळ 
किल्ले रायगड - होळीचा माळ 
किल्ले रायगड - होळीचा माळ व महाराजांचा पुतळा 
किल्ले रायगड 
किल्ले रायगड - जगदीश्वराची पायरी 
रायगडचा आराखडा करणारे व इमारती बांधवून घेणारे होते हिरोजी इंदुलकर. महाराजांच्या कल्पनेपेक्षाही भव्य अश्या इमारती बांधून त्यांनी गड सुसज्ज केला. महाराजांनी प्रसन्न होऊन, काय हवे ते माग सांगितल्यावर हिरोजी म्हणाले, काही नको. देवाच्या पायरीवर नाव लिहितो. माझ्या नावावर पाय देऊन महाराज देवाच्या दर्शनाला जातील. तुमच्या पायाची धूळ मस्तकी लागेल. अजून काय हवे? अहंकाराचा लोप होण्याचे किती मोठे उदाहरण! नाव पण काय लिहिले तर 'सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इटळकर'.
जगदीश्वर मंदिर - बाह्य द्वार व नंदी 
जगदीश्वर मंदिर 
जगदीश्वर मंदिर -शिलालेख
शिलालेख वाचून दाखवताना आमचा मार्गदर्शक 
तो शिलालेख असा आहे.
"श्री गणपतये नमः। प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया श्रीमच्छत्रपतेः शिवस्यनृपतेःसिंहासने तिष्ठतः। शाकेषण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ॥१॥ वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ स्तभेः कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते। श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो यावच्चन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ॥२॥"
ह्याचा साधारण अर्थ असा, "गणपतीला नमस्कार! हा जगदीश्वराचा प्रासाद,सर्व जगाला आनंददायी असा, सिंहासनाधिश्वर श्रीमद् छत्रपती शिवाजी राजांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाचा शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे अशांची उभारणी केली आहे. ती चंद्रसूर्य असेतोवर अशीच विलसत राहो."
वाघ्याचा स्मृतीस्तंभ 
शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा रायगडाने पाहिला तसाच त्यांचा मृत्यू देखील रायगडाला सहन करावा लागला. शके १६०२ चैत्र शुद्ध १५ म्हणजेच १६८० मध्ये महाराजांचा मृत्यू झाला. असे म्हणतात की महाराजांच्या चितेत त्यांच्या वाघ्या कुत्र्याने देखील उडी मारली व आत्मार्पण केले. त्याचे स्मृतिस्थळ आपल्याला जगदीश्वराच्या मंदिरासमोरच दिसते आणि अर्थातच ह्या फोटोत उंच दिसते आहे ती महाराजांची समाधी. अष्टकोनी जोते बांधलेले आहे.
📷विकिमीडिया कॉमन्स
महाराजांची समाधी पाहून मन विषण्ण होते खरे, पण मग वाटते, आपल्या सगळ्यांच्या मनात तर महाराज कायम राहणार आहेतच..अगदी त्या शिलालेखात म्हटल्याप्रमाणे यावतचंद्र दिवाकरौ. त्यांनी दिलेली शिकवण आपल्याला सतत मार्गदर्शन करत राहणार आहे.
किल्ले रायगड 
जय भवानी जय शिवाजी 

#Raigad #ShivajiMaharajRajyabhishek #ShivajiMaharajThrone #WheretostayonRaigad #HowtogotoRaigad #OneDayTripToRaigad #RaigadRopeway #Hirkani #Takmaktok #ChatrapatiShivajiMaharaj #ShivajiMaharajCapital #shivSwarajyaDin

Comments

  1. किल्ले रायगड - नाव उच्चारताच रोमांच उसे राहतात. वृंदा टिळक आज सर्व आठवणींना उजाळा मिळाला. छान लेख लिहीला आहे.महाराजांना त्रिवार प्रणाम 🙏

    ReplyDelete
  2. Mast lekh vrunda tai , Raigad che vernan atishay surekh

    ReplyDelete
  3. वृंदा सर्व फोटो व लिखाण मस्त🙏
    सगळ्या सुंदर हा महाराजांचा फोटो🙏🙏🙏

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

लक्ष्मीकेशव मंदिर, कोळीसरे

  मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते.  असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे.  गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...

नागाव

  नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा.  नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा.  नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे  अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह.  अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली.  ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली.  गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे.  आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...

हनुमान जन्मस्थळ आणि शबरी धाम, जय श्रीराम, जय जय राम!

आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे.  पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे.  भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...

पैसाच्या खांबाचे मंदिर!

पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...

श्री व्याडेश्वर देवस्थान, गुहागर

  कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव.  गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  श्री व्याडेश्वर देवस्थान.  तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...

श्री क्षेत्र गिरनार

  गिरनार माझ्यासाठी ते मोहक फळ होते, जे मिळायला अवघड होते आणि कितीही हवेहवेसे वाटले तरी त्यासाठी माझ्याकडून प्रयत्न मात्र अजिबात केले गेले नव्हते. गिरनारच्या अद्भुत कथा खूप ऐकल्या, वाचल्या होत्या. गिरनारची मनात ओढ होती. पण ते सगळे मनातच. प्रत्यक्षात कोणतेही ट्रीप ठरवताना, कुठे जायचे याचा विचार करताना पुढे होऊन गिरनारला जाऊयात असे कधी म्हटले नव्हते हेही तितकेच खरे.  श्री क्षेत्र गिरनार  काय आहे गिरनार?  गिरनार हा पर्वत समूह आहे. दत्तात्रेयांचा इथे निवास असल्याने ते हिंदूंच्यासाठी अत्यंत पवित्र आणि महत्वाचे धार्मिक स्थळ आहे.  हिमालयापेक्षाही जुना असलेला हा पर्वत अनेक नावांनी प्राचीन साहित्यात आलेला आहे. रेवतक हे त्यातील सर्वात जास्त माहिती असलेले नाव.  जैन लोकांसाठी देखील हे अत्यंत महत्वाचे ठिकाण आहे कारण इथे जैन मंदिर समूह देखील आहे. नेमिनाथ, आदिनाथ, मल्लिनाथ आणि इतर तीर्थंकरांची मंदिरे आहेत.  कुठे आहे गिरनार ? गुजराथ, सौराष्ट्र मधील जुनागढ जवळ गिरनारच्या पायथ्याचे, तलेटी नावाचे गाव आहे.  गिरनारला लोक का जातात? तेथील द...

परशुराम कुंड, अरुणाचल.

अरुणाचल मधील टेंगापानी, नामसाईच्या गोल्डन पॅगोडाहुन परशुराम कुंड ला जाण्यासाठी  आम्ही निघालो. ही गोष्ट आहे ऑक्टोबर २०१९ मधील.  त्या दिवशी सतत पाऊस पडत होता. सगळीकडे हिरवेगार तर अरुणाचल मध्ये नेहमीच असते. पावसात भिजलेली झाडे, स्वच्छ हिरवळ, मध्येच ढगांत अदृश्य होणाऱ्या पर्वतरांगा, वाहणारे थंडगार वारे, फार सुंदर होते ते सगळे.  अरुणाचल  डोंगरातला रस्ता होता. तुफान वारा होता. त्या सगळ्या अवाढव्य डोंगराळ प्रदेशात आमची गाडी म्हणजे एक ठिपका होती. वाऱ्याने उडून जायला वेळ लागणार नाही इतका जोरात वारा वाहत होता. एक खिडकी फोटो काढण्यासाठी उघडली तर ड्राइवर म्हणाला की दुसऱ्या बाजूची पण उघडा, नाहीतर आत आलेल्या वाऱ्याने गाडी हलायला लागेल. शेजारी खोल दरी दिसत असताना गाडी हलायच्या कल्पनेने अंगावर काटा आला आणि पहिली खिडकी देखील फोटो काढल्या काढल्या बंद केली..नकोच ती वाऱ्याची परीक्षा!  रस्ता कसा होता हे प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी पुढे दिलेल्या लिंकवर क्लिक करून विडिओ नक्की बघा. Namsai- Parshuram kund road ह्या नदीचे नाव लोहित आणि ह्या जिल्ह्याचेही नाव लोहित. लोहितचा अर्थ रक्त किंवा रक्...

सिद्धेश्वर मंदिर, टोके - प्रवरा संगमावर उमललेले दगडी बिल्वपत्र

भिंतीवरील कोरीवकाम  महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातले टोके हे एक लहान गाव. अहिल्यानगर कडून छत्रपती संभाजीनगरला जाताना डावीकडे नदीच्या काठावर हे सुंदर मंदिर आपल्याला दिसते. जगप्रसिद्ध वेरूळ, अजिंठा लेणी बघायची असतील तर सांभाजीनगरला जावे लागते हे आपल्याला माहिती असेलच. सिद्धेश्वर मंदिर, टोके हे मला एखाद्या दगडी बेलपत्राप्रमाणे वाटले. हे बेलपत्र उमलले आहे अमृतवाहिनी प्रवरा आणि दक्षिणगंगा गोदावरीच्या संगमावर. त्या संगमाच्या, ज्याला प्रवरा संगम म्हणतात त्या परिसरात सिद्धेश्वर, घटेश्वर, मुक्तेश्वर, रामेश्वर, संगमेश्वर अशी अनेक मंदिरे आहेत. पण सर्वात खास आणि सुंदर आहे ते सिद्धेश्वर मंदिर. सिद्धेश्वर मंदिर परिसर बघा असा दिसतो! हा फोटो घेतला होता सप्टेंबर २०१९ मध्ये. पावसाळा भरपूर बरसून आता आपला मुक्काम आवरत होता आणि नद्यांना भरपूर पाणी होते तेव्हाचा! मंदिराचा परिसर  सिद्धेश्वर मंदिर समूह हा तुलनेने नवा समूह आहे, अठराव्या शतकात बांधला गेलेला. पेशव्यांच्या काळात बांधल्या गेलेल्या ह्या मंदिराला सभोवताली एखाद्या छोट्या किल्ल्यासारखी किंवा गढीसारखी उंच भिंत आहे. मुख्य मंदिर आहे शंकराचे...

शिवथरघळ

जर आपण भारताचा नकाशा पाहिला  तर आपल्याला नकाशात डावीकडे, गुजरात ते कन्याकुमारीपर्यंत काळसर  हिरवी रेषा दिसते. ही रेषा  गुजराथ येथून सुरु होते  आणि महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक, तामिळनाडू मार्गे जाऊन केरळला पोहोचते. ती रेषा म्हणजेच पश्चिम घाट आहे. पश्चिम घाट म्हणजे दख्खनच्या पठाराची जणू किनारच आहे. दख्खन पठाराच्या काठावरच्या ह्या पर्वत रांगा आहेत.  या भागात बरीच जंगले, जलसाठे, धबधबे आहेत आणि जैवविविधता तसेच त्याचे वय यामुळे या भागाला 'युनेस्को जागतिक वारसा' म्हणून ओळखले गेले आहे. पश्चिम घाट हिमालयापेक्षाही जुना आहे! वरंधा घाट  📷विकिमीडिया कॉमन्स  पश्चिम घाट हा अनेक मुख्य नद्यांचे उगमस्थान आहे. वरील छायाचित्रात दिसते आहे त्या प्रमाणे, वर्षा ऋतूत या प्रदेशात अनेक धबधबे पाहायला मिळतात.  पश्चिम घाटातील (महाराष्ट्र) अनेक सुंदर धबधब्यांपैकी एक म्हणजे शिवथरघळ धबधबा. जेव्हा मुसळधार पाऊस पडतो तेव्हा धबधबा त्याच्या पूर्ण रौद्र सौंदर्यानिशी आणि ताकदीनिशी रोरावत खाली येताना दिसतो.  हा धबधबा सुमारे शंभर फूट उंचीवर...