एखादा वनविभाग राष्ट्रीय स्मारक असणे तसे दुर्मिळ नसले तरी नक्कीच कौतुकाचे असते. म्यूईर वूड्स हे असेच अमेरिकेतील एक राष्ट्रीय स्मारक. अमेरिकेचे भूतपूर्व अध्यक्ष रुझवेल्ट ह्यांनी ह्या जंगलाचे नाव म्यूईर राष्ट्रीय स्मारक ठेवले आणि हा विभाग संरक्षित देखील केला.
म्यूईर वन राष्ट्रीय स्मारक - इतिहास
त्या आधी ह्या वनविभागाने अनेक स्थित्यंतरे पाहिली. मुळात अनेक शतकांपूर्वी इथे वहिवाट होती ती ह्या भागातील मूळ निवासी मिवाक जमातीची. ती देखील फार क्वचित शिकारीसाठी ते आले जंगलात तर. एरवी इथली उंचच उंच झाडे, त्यांच्यातून झिरपणारे सूर्यकिरण, जंगली श्वापदे, पाण्याचे झरे, मुक्तपणे बागडणारी पक्षी आणि अपार शांतता.
पण ह्या सुखी चित्रात आला आधुनिक माणूस आणि जे व्हायचे तेच झाले. कॅलिफोर्नियात सोने सापडायला लागले आणि माणसांची आवक वाढली. त्याच सुमारास तांत्रिक प्रगती व्हायला सुरुवात झाली होती. रेल्वे सुरु झाली होती. लाकडाची वाहतूक सोपी झाली. त्या नंतर ह्या वनविभागाने पाहिला जंगलतोडीचा काळ, लाकूड उद्योगाची भरभराट. त्या नंतर लागलेल्या आगी आणि त्यात भस्मसात झालेली झाडे हे सगळे सगळे पाहिले.
अशावेळी १९०३ मध्ये विल्यम केंट नावाच्या श्रीमंत राजकारणी गृहस्थाला त्यांचा मित्र घेऊन गेला ह्या रेडवूड कॅनियनला आणि जंगलतोड थांबवण्यासाठी तूच ही सगळी जमीन विकत घे अशी गळ घातली. जंगलाचे नशीब चांगले म्हणून विल्यम केंट आणि त्याच्या पत्नीने हे सगळे जंगल म्हणजे ६११ एकर त्यावेळी ४५००० डॉलर्स ना विकत घेतले.
माउंट तमालपईस रेल्वे सुरु झाली आणि ह्या वनविभागाला भेट देणाऱ्या लोकांची संख्या वाढली. अनेक लोक इथे फिरण्यासाठी, गिर्यारोहणाची येऊ लागले.
जंगलतोडीला प्रतिबंध करणारे काही नियम आले. जंगलाने कदाचित थोडा सुटकेचा निश्वास टाकला असेल आणि आले दुसरे संकट.. पाण्याचे. इथे पाण्याचा तलाव करून पाणीपुरवठा करावा अशी योजना एका कंपनीने मांडली. त्यातून तोडगा काढून, वनविभाग वाचवण्यासाठी केन्टने ही सगळी जमीन सरकारला देणगी म्हणून देऊन टाकली आणि इथे संरक्षित वनविभाग करावा, त्याला निसर्ग प्रेमी आणि पर्यावरणासाठी काम करणारे जॉन म्यूईर ह्यांचे नाव द्यावे अशी मागणी केली. अमेरिकेचे अध्यक्ष रुझवेल्ट ह्यांनी ती मागणी मान्य करून म्यूईर वुड्स नॅशनल मॉन्युमेंट असे नाव दिले ते आपण सुरुवातीला वाचलेच.
"The clearest way into the Universe is through a forest wilderness. " - John Muir
कुठे आहे?
अमेरिकेतील कॅलिफोर्निया राज्यातील सॅन फ्रान्सिस्को शहरापासून अगदी जवळ, साधारण २० किलोमीटरवर हा वनविभाग आहे.
गोल्डन गेट ब्रिज वरून पुढे जायचे म्हणजे अर्थातच त्याचे शूटिंग करणे आलेच!! त्याही दिवशी म्हणजे जुलै २०२२ च्या शेवटच्या आठवड्यात, दिनांक २९ जुलैला भरपूर धुके होते.
रॉबिन विल्यम्स टनेल आणि सॉसलिटो नावाच्या अत्यंत सुंदर गावातून जाणारा रस्ता नंतर अनेक वळणे घेत जातो.
डोंगरउतारावर असलेली घरे, वळणांचे रस्ते, सुखद थंड हवा, फुले, समुद्रकिनारा आणि निवांतपण ह्या सगळ्यांमुळे Sausalito गाव प्रसन्न वाटते.
गोल्डन गेट नॅशनल रिक्रिएशन एरिया मधून पुढे जात माउंट तमालपाईसच्या वळणांच्या रस्त्यावरून आपण पुढे जातो. सॅन फ्रान्सिस्कोचे प्रसिद्ध धुके आपल्यासोबत असतेच.
जसे जसे आपण म्यूईर वन विभागाच्या जवळ येऊ लागतो तसतशी आजूबाजूची झाडे जास्त दाट आणि उंच आहेत असे लक्षात यायला लागते.
थोड्याच वेळात आपण म्यूईर वूड्सला पोचतो. प्रवेशासाठी तिकीट आहे.
प्रवेशद्वारातून आपण आत जातो ते उंचच उंच रेडवुड्स च्या सान्निध्यात. इतकी शतके जुनी अशी रेडवुड्सची जंगले आता जगात फार कमी राहिली आहेत. त्यातील हे एक.
जंगलात आत गेल्यावर मानवी वस्तीची ही एकच खूण दिसते. ते देखील मुख्य प्रवेशद्वाराजवळ असलेले कँटीन. बाकी आत गेल्यावर मग काही बांधकाम दिसत नाही.
ह्या वरच्या दोन्ही फोटोत ते लोक काय बघत आहेत असा प्रश्न पडला असेल तर त्याचा फोटो हा बघा.
हा आहे रेडवूडचा एक स्लाइस. १९३० मध्ये सापडलेला आणि तेव्हापासून इथे असलेल्या ह्या लाकडाचा अभ्यास केल्यावर तज्ज्ञांच्या असे लक्षात आले की हे झाड हजार वर्षे जगले होते. त्या वलयांनी अनेक शतकांची कहाणीच सांगितली होती, कधी दुष्काळ होता, कधी पाणी मिळाले, कधी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला, कधी आगी लागल्या..त्या सगळ्यांच्या खुणा अंगावर वागवत असलेला हा इतका पुरातन ओंडका पाहणे फार अपूर्वाईचे वाटले. आता त्यावर त्या त्या वलयाच्या वेळी मानवी इतिहासात काय काय महत्वाचे घडत होते ते रंगवले आहे.
जंगलात वेगवेगळे ट्रेल्स आहेत. ते किती अवघड आहेत, किती चढाचे आहेत, किती वेळ लागेल ही सर्व माहिती माहितीफलकावर ठिकठिकाणी लिहिलेली आहे. त्यातले आपापल्या वेळेनुसार, इच्छेनुसार, शक्तीनुसार आपण निवडू शकतो.
आत चार पूल आहेत. हे पूल आहेत झऱ्यांवर बांधलेले. माउंट तमालपाईस वरून वाहत येणारे पाणी रेडवुड्स क्रिकला ह्या झऱ्यातून मिळते. तिथपर्यंत जातानाचा त्यांचा झुळझुळ वावर आपल्याला जागोजागी भेटत राहतो. ते झरे आणि धुक्यापासून मिळणारे पाणी हेच ह्या रेडवूड्स ची जीवनवाहिनी आहेत.
कोट्यावधी वर्षांपासून रेडवूड्स पृथ्वीवर आहेत. त्यांच्या इतकीच जुनी अनेक झाडे आणि डायनोसोर सारखे प्राणी नष्ट झाले. पण उल्कापात, पूर, दुष्काळ, अतिवृष्टी, वादळे, अग्नितांडव, हवामानातील आणि पर्यावरणातील बदल ह्या सगळ्याला तोंड देत रेडवुड्सच्या काही प्रजाती टिकून राहिल्या. आता जगातील सर्वात जुनी, सर्वात उंच, सर्वात मोठी जिवंत वस्तू कोणती असा प्रश्न आला तर त्याचे उत्तर अर्थातच रेडवुड्स हेच आहे.
इथली म्हणजे म्यूईर वूड्स मधली झाडे देखील शेकडो वर्षांपासून इथे आहेत.
कधी आगीमुळे किंवा इतर कोणत्या संकटामुळे झाड मरू लागले तर लगेच हा धोक्याचा इशारा मिळताच त्याच्या मुळांतून अनेक बर्ल स्प्राऊट्स वर येतात आणि त्या मूळ खोडाभोवती गोलाकारात वाढतात. त्यांना फॅमिली ट्रीज असे अत्यंत समर्पक नाव आहे.
पण ह्या खेरीज बियांपासून देखील झाडे उगवतात. १९७६ मध्ये अभ्यासकांच्या लक्षात आले जे दोनशे वर्ष जुने झाड आहे ते एकटेच आहे. फॅमिली ट्री नाही. तेव्हा हे बी पासून वाढलेले झाड असावे असा निष्कर्ष काढण्यात आला.
हे जंगल संरक्षित वनविभाग होण्यात महत्वाची भूमिका बजावलेल्या श्रीयुत पिनशॉ ( Gifford Pin - chot ) ह्यांच्या सन्मानार्थ एका वृक्ष समूहाला आणि जागेला Founders Grove असे नाव देण्यात आले आहे.
जगणे, जगत राहणे सोपे नसतेच. मग माणूस असो की झाडे.. ही झाडे बघा शतकांच्या प्रवासात, जगण्याच्या खुणा वागवत अशी झाली आहेत.
१९ मे १९४५ ला युनाइटेड नेशन्सच्या बैठकीसाठी जमलेले सभासद म्यूईर वूड्सला आले होते. तेव्हा नुकत्याच म्हणजे महिन्यापूर्वी मृत्यू पावलेल्या प्रेसिडेंट रुझवेल्ट ह्यांना श्रद्धांजली वहावी हा उद्देश होताच. पण ह्या शांत वातावरणाचा, वृक्षांच्या सान्निध्याचा परिणाम होऊन जागतिक शांततेच्या दिशेने एक पाऊल पुढे जाईल ही आशा देखील होती.
शांत वातावरण, झऱ्याचा आवाज, अधून मधून होणारी पक्ष्यांच्या पंखांची फडफड .. आपण अगदी वेगळ्याच जगात असतो.
इथे किती फोटो काढावे तितके कमीच आहेत.
ही झाडाची ढोली मोठी होतीच. अशा अनेक आहेत. पण जी म्यूईर वूड्सच्या फोटोत नेहमी असते ती झाडाची ढोली एकावेळी चांगली चारपाच ढोली माणसे उभी राहू शकतील इतकी मोठी होती!! ही बघा दोन माणसे उभी आहेत.
रेडवूड्सची मुळे खूप पसरतात. सभोवतालच्या परिसरात आपली व्याप्ती वाढवतात.
'And into the forest I go, to lose my mind and find my soul.'- John Muir
मंदिर म्हणजे एक उर्जाकेंद्र! प्राचीन काळापासून भाविक मंदिरात देवतांच्या दर्शनासाठी जात आले आहेत. आजही हिंदू लोक मंदिरात जाऊन, चित्त एकाग्र करून ध्यान, पूजा आणि आरती करतात. यामुळे त्यांना ऊर्जा आणि शांततेचा अनुभव मिळतो. प्रत्येक देवी-देवतेचे एक विशिष्ट मंदिर असते. असेच कोळीसरे येथे श्री विष्णूचे - लक्ष्मीकेशवाचे सुंदर मंदिर आहे . रत्नागिरी शहरापासून फक्त ५० किलोमीटर अंतरावर किंवा गणपती पुळ्यापासून २१ किलोमीटर अंतरावर निसर्गसुंदर कोळीसरे गाव आहे. पुणे मुंबई हून रत्नागिरी जिल्ह्यातील कोळीसरे येथे जायचे असल्यास चिपळूण मार्गे जाता येईल. परशुराम - कोळीसरे रस्त्यात अशी नयनरम्य दृश्ये अनेकदा दिसतात. परशुराम कोळिसरे रस्ता अगदी कमी लोकवस्तीचे, घनदाट झाडी असलेले हे गाव कोळीसरे फाट्याहून आत गेल्यावर दीड दोन किलोमीटर प्रवास केल्यावर येते. रत्नागिरीहून बसने जाता येते अन्यथा मंदिरापर्यंत पोचण्यासाठी स्वतःचे वाहन असणे सोयीचे आहे. गाडी पार्क केल्यानंतर काही पायऱ्या उतरून मग घनदाट झाडीत वसलेल्या ह्या मंदिरात जाता येते. ह्या रस्त्यावरून व्हील चेयर जाउ शकत नाही. पार्किंग पासून उ...
नागाव म्हणजे माडापोफळींच्या वाड्या. नागाव म्हणजे केळीच्या बागा. नागाव म्हणजे सुंदर स्वच्छ समुद्रकिनारा. नागाव म्हणजे वस्त्रगाळ मऊ वाळूचा किनारा. नागाव म्हणजे अनेक मंदिरे. नागाव म्हणजे लक्षवेधी दीपमाळा. नागाव म्हणजे कोपऱ्या कोपऱ्यावर भेटणारे तळे! नागाव म्हणजे तळ्यात फुललेलीअनेकानेक कमळे!! नागावच्या शेजारचे अक्षी, चौल, रेवदंडा ही देखील अशीच गावे. नितांतसुंदर, साधी. अलिबाग आणि ह्या सर्व गावांना मिळून अष्टागर असे म्हणत असत. आठ गावांचा समूह. अलिबाग पर्यटन स्थळ म्हणून ७० च्या दशकापासूनच प्रसिद्ध झाले होते. तेव्हा शांत निवांत असलेले अलिबाग नंतर खूपच गजबजले आणि मग दुसऱ्या सहस्त्रकात अलिबागशेजारील रेवदंडा, नागाव, चौल ही लहान लहान गावे देखील पर्यटनस्थळे म्हणून विकसित होऊ लागली. ह्या निवांत, शांत गावांना जणू अचानक खडबडून जाग आली. तिथेही पर्यटकांची गर्दी वाढू लागली. स्थानिक लोकांना रोजगार, विकासाची संधी, अर्थार्जनाची संधी त्यात दिसली. गावांवर आधुनिक पेहराव चढला आणि तिथे उदयाला आली मुंबईकरांची आवडती पर्यटनस्थळे. आता तर परिस्थिती अशी आहे की जवळ जवळ एका...
पैसाच्या खांबाचे मंदिर! अनेक वर्षांपूर्वी दुर्गा बाईंचे ' पैस ' हे पुस्तक वाचनात आले. त्यात होता हा पैसाचा खांब. पैस म्हणजे अवकाश. जिथे ज्ञानेश्वरी लिहिली गेली तो हा पैसाचा खांब. ज्ञानेश्वरीचे जन्मस्थान! खांबाला टेकून बसलेले, ज्ञानेश्वरी सांगत असलेले ज्ञानेश्वर आणि ती लिहून घेत असलेले लेखनिक सच्चिदानंद बाबा असे चित्र आधीही अनेकदा पाहिलेले होते. पण त्या खांबाला ' पैसाचा खांब' म्हणतात हे माहितीच नव्हते. पैस ह्या पुस्तकातील पैसाचा खांब हे प्रकरण वाचले आणि अक्षरशः थरारून गेले. 'पैसाच्या खांबाचे मंदिर' अहिल्यानगर जिल्ह्यातील नेवासा या प्रवरा नदीच्या तीरावरील गावी आहे. नेवासे गावाच्या पश्चिमेला हे मंदिर आहे. 'शके बाराशे बारोत्तरे| तैं टीका केली ज्ञानेश्वरे| सच्चिदानंद बाबा आदरे| लेखकू जाहला|' असा उल्लेख सापडतो. मूर्त आणि अमूर्त ह्याची अशी जोडणी म्हणजे ज्ञानाच्या अनंत अवकाशात जाण्याची पहिली पायरीच जणू. ज्ञानेश्वरी वाचण्याएवढी आणि कळण्याएवढी योग्यता ह्या जन्मात अंगी येईल की नाही माहिती नाही. पण हा खांब पाहू या कधीतरी असे ठरवून टाकले. अवघड नव्हतेच जाणे. संभाजीनगर...
कोकणावर निसर्गाचा वरदहस्त आहेच. त्यातही काही गावांनी आपल्या सौंदर्याने विशेष स्थान मिळवले आहे. त्यातील एक महत्वाचे नाव म्हणजे गुहागर. सुंदर लहानसे गाव आहे. एक मुख्य रस्ता, त्याच्या दोन्ही बाजूला घरे, घरांच्या मागे नारळ सुपारीच्या वाड्या. रस्त्याच्या एका बाजूच्या प्रत्येक घराच्या मागच्या वाडीतून समुद्राला जाण्याचा रस्ता, भव्य स्वच्छ समुद्रकिनारा असे हे मोहात पाडणारे गुहागर गाव. गुहागर प्रसिद्ध आहे व्याडेश्वरासाठी. व्याडेश्वर हे शंकराचे मंदिर अनेक कोकणवासीयांचे कुलदैवत आहे. कोकणातील सर्वात महत्त्वाच्या शिवमंदिरांपैकी एक म्हणजे गुहागरमधील श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. श्री व्याडेश्वर देवस्थान. तुम्हाला जर का कधी दक्षिणेतील मंदिरे पाहून वाटले असेल की अशी मंदिरे आपल्या महाराष्ट्रात का नाही?!! तर गुहागरच्या व्याडेश्वर मंदिराला भेट द्या. भव्य सुंदर देवालय आहे. मंदिराचे आवार स्वच्छ, प्रशस्त आहे. मुख्य म्हणजे अगदी नांदते, जागते मंदिर आहे. मंदिराची साफसफाई, निगराणी केली जाते आहे. आवारात भरपूर झाडे आहेत. श्री व्याडे...
आज आपण रामायणातील दोन ठिकाणांना भेट देणार आहोत आणि दोन महान राम भक्तांच्या भेटीसाठी तुम्हाला घेऊन जाताना मला अतिशय आनंद झालेला आहे. पहिल्यांदा आपण जाऊयात, हनुमानाच्या जन्मस्थानी अंजनेय टेकडीवर. ही टेकडी कर्नाटक मध्ये हंपीजवळच्या भागात आहे असे मानले जाते. ही जागा अंजनीच्या पुत्राचे, अंजनेयाचे म्हणजेच हनुमानाचे जन्मस्थळ आहे. भारतात अजूनही इतर काही ठिकाणे आहेत की जी हनुमानाचे जन्मस्थळ म्हणून सांगितली जातात. पण अंजनेय टेकडी हे हनुमानाचे जन्मस्थळ असणे मला सर्वात जास्त संयुक्तिक वाटते. कारण ऋष्यमूक पर्वत, जिथे सुग्रीव, हनुमान आणि भगवान श्रीराम यांची भेट झाली होती तो इथून जवळच आहे. हंपीपासून अंजनेय टेकडीपर्यंतचा रस्ता नैसर्गिक सृष्टिसौंदर्याने अतिशय समृद्ध आहे. तुंगभद्रेच्या किनाऱ्यावर असल्यामुळे हा संपूर्ण प्रदेश अत्यंत सुपीक आहे रस्त्याच्या दोन्ही बाजूला सतत तुम्हाला भात शेती, नारळाची झाडे, केळीच्या बागा आणि अर्थातच प्रचंड मोठे खडक, जे ह्या भागाचे वैशिष्ट्य आहेत ते दिसत राहतात. हा संपूर्ण परिसर रामायणातला किष्किंधा भाग मानला जातो. भात शेती केळीच्या बागा भातशेतीचा मखमली गालिचा टे...
ट्रेकचा तिसरा दिवस. कालचा सारी- देवरियाताल प्रवास तर खूपच छान झाला होता. पायही दुखले नव्हते की थकल्यासारखे देखील वाटले नव्हते. त्यामुळे उत्साहाने आजच्या दिवसाला सुरुवात केली. आजचा दिवस तसा अवघड असेल अशी, इंडियाहाईक्सच्या वेब साईटवरचे वर्णन वाचून कल्पना आली होती. आज अंतर नऊ किलोमीटरपेक्षा जास्त होते. पण वाटेत अनेक शिखरे दिसणार होती. घनदाट जंगलातून जाणार होतो त्यामुळे अनेक पक्षीही दिसणार होते. त्याचीही उत्सुकता होती. सगळेजण देवरियाताल कॅम्पसाईट मधून बाहेर पडलो. अवघे एक दिवस वास्तव्य केलेले असले तरी मन थोडेतरी गुंतलेले असतेच. देवरियातालच्या रस्त्याच्या डाव्या बाजूने एक जंगलवाटेचा फाटा होता. त्या वाटेने आम्ही निघालो. थोडा वेळ चालल्यावर आम्हाला पुन्हा एकदा चंद्रशिला शिखर दिसणार होते. अधून मधून दिसणारे हे शिखर आपल्याला कुठे पोचायचे आहे त्याची जाणीव करून द्यायचे, त्यानेही एक नवे बळ मिळायचे. पण आज आकाश इतके ढगाळ होते की शिखर दिसलेच नाही.उजवीकडे पुन्हा एकदा सारी गाव मात्र दिसले. 📷Cotrekker 📷Sumati Dhembre ह्या फोटोवरून कशा रस्त्याने आम्ही चालत होतो, चढ किती होता त्याची कल्पना येईल....
आदल्या संध्याकाळी भुरभुरत असलेल्या पावसाने हवेतला गारवा अजूनच वाढवला होता. इतक्या लहान तंबूमध्ये झोपण्याची पहिलीच वेळ होती. पण सुरुवातीचे दोन तास सोडले तर नंतरचे पाच तास चांगली झोप झाली. अगदी प्रसन्न जाग आली.काल एकदाच क्षणभर का होईना, मनात तरळून गेलेला,"आपण ट्रेक इथेच थांबवावा का?"ह्या विचाराचा आज कुठे मागमूसही उरला नव्हता. मनात होते, "इरादे अगर पक्के हो, तो डगमगाए कदम क्यु? हौसले बुलंद हो तो सहमा सा हो मन क्यु? मंज़िल अब दूर नहीं.. बस संभल के चलना, कभी न रुकना, हार ना मानना, बस्स .. चलते रहना।" - वृंदा टिळक आमच्या सगळ्याच कॅम्पसाईट्स भन्नाट जागांवर होत्या. आजची स्यालमीची कॅम्प साईट देखील त्याला अपवाद नव्हती. नजर पोचेल तिथपर्यंत फक्त पर्वत रांगा आणि जंगल. मानवी वस्तीची जवळपास काहीच चाहूल नाही. 📷Samrat Darda सगळ्यांचे आवरून वॉर्म अप करून आम्ही निघालो. आजचा सगळा रस्ता सुंदर असणार होता. काल इतके चढ उतार चढून उतरून आता सगळ्यांची चांगली तयारी झाली होती. शिवाय आज मी नीकॅप्स देखील घातल्या होत्या!! त्यामुळे समजा जरी आज रस्ता अवघड असला असता तरी काळजीचे काही कारण नव्हते....
📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती. उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते. इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत ज...
रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता. राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा सिंहा...
आपण स्वप्न पाहतो… आपण स्वप्ने पाहतो… त्यातील एखाद दुसरेच प्रत्यक्षात यावे म्हणून धडपडतो आणि बाकीची स्वप्ने कधीतरी नवलाईने आंजारायला गोंजारायला असावीत म्हणून त्यांना स्वप्न म्हणूनच राहू देतो. हाय अल्टिट्युड ट्रेक हे माझे एक असेच स्वप्न होते, नेहमी भुरळ पाडणारे आणि तरीही प्रत्यक्षात आले तर इतक्या उंचीवर चालताना काहीशी धास्तीच वाटावी असे. त्यामुळे वर्षानुवर्ष ते स्वप्न प्रत्यक्षात न येता स्वप्नच राहिले होते. नोव्हेंबरमध्ये माझी मैत्रीण धनश्री जगताप इंडियाहाईक्सबरोबर देवरिया ताल चंद्रशिला हा ट्रेक करून आली. तिच्याशी गप्पा मारताना या ट्रेकची सविस्तर माहिती मिळाली. मार्च एप्रिलमध्ये या संपूर्ण रस्त्यावर ऱ्होडोडेंड्रॉनची फुले फुललेली असतात असेही कळले… आणि मनातल्या स्वप्नाला पुन्हा एकदा जाग आली. असे म्हणतात की देवरिया ताल म्हणजे जिथे यक्षाने युधिष्ठिराला प्रश्न विचारले ते तळे. वाटेत लागणारे तुंगनाथ हे तर जगातले सर्वात उंचावर असणारे शंकराचे मंदिर, पंच केदारापैकी एक. हे पांडवांनी बांधले आहे असे सांगितले जाते. ट्रेकचा समिट पॉईंट...
Comments
Post a Comment