मुख्य सामग्रीवर वगळा

पोस्ट्स

Kumbhalgarh- A wonder- Longest wall in India

In the last week, I had written about the  Terracotta Warriors  in my blog post and there was a mention of Great Wall Of China in it. So this time I had thought of taking you to the Great wall Of China. But then I thought that let me first take you to The Great Wall Of India.  Most of you won't be knowing about it.  The second longest wall in the world is in India and is a UNESCO world heritage site. It is about 90 km from Udaipur - The city of lakes in Rajasthan state of India. It is a wall built for protection, around the Fort Kumbhalgarh. Kumbhalgarh Fort 📷 Girish Tilak Fort Kumbhalgarh is located in Aravalli ranges at a height of 1100 meters. It is situated in Kumbhalgarh wild life sanctuary in Rajsmand district of Rajasthan. It's location and architecture made it one of the strongest forts of Mewar region. It's location made it nearly inaccessible and the hilly terrain makes it invincible.  It was built in 15th century by Rana Kumb...

कुंभलगड - एक आश्चर्य - भारतातील सर्वात जास्त लांबीची भिंत. 

मागच्या आठवड्यात मी माझ्या  टेराकोटा सेना  ह्या ब्लॉग पोस्ट मध्ये चीनच्या प्रसिद्ध भिंतीचा उल्लेख केला होता. म्हणून ह्या वेळी ठरवले होते की तुम्हाला ती चीन ची भिंत दाखवायला घेऊन जावे. पण मग वाटले तुम्हाला भारतातली प्रसिद्ध भिंतच दाखवावी, कदाचित ही भारतातली भिंत पण बऱ्याच जणांना माहितीच नसेल!  संपूर्ण जगातील क्रमांक दोनची लांब भिंत म्हणून ही भिंत जगभरात प्रसिद्ध आहे. युनेस्कोने हे ठिकाण जागतिक वारसा स्थळ म्हणून पण घोषित केलेलं आहे. हे ठिकाण आहे तळ्याचे शहर म्हणून प्रसिद्ध असलेल्या, राजस्थानमधील उदयपूर ह्या शहरापासून साधारण ९० किलोमीटर वर. ही भिंत बांधली गेली आहे कुंभलगड किल्ल्याची संरक्षक भिंत म्हणून.  कुंभलगड  📷 गिरीश टिळक  अरवली पर्वतरांगांमध्ये समुद्रसपाटीपासून ११०० मीटर उंचीवर कुंभलगड किल्ला आहे. राजस्थान मधील राजसमंद जिल्ह्यातील कुंभलगड वन्य जीव अभयारण्यात हा किल्ला वसलेला आहे. त्याची अतिशय दुर्गम जागा आणि वैशिष्ट्यपूर्ण रचना ह्यामुळे कुंभलगड हा अजेय आणि अभेद्य किल्ला बनला आहे. मेवाड भागातील सर्वात भक्कम किल्ल्यांमध्ये ह्या किल्ल्याचा पह...

टेराकोटा सेना - एक मोठे रहस्य 

मला वाटते तुम्ही आधी बाँपो म्युझियम बघून मनाची तयारी करावी, नंतर टेराकोटा योध्दे प्रतिकृती बनताना पाहून, मग आपल्याला काय पाहायचे आहे त्या विषयीच्या कल्पना कराव्यात आणि मग टेराकोटा योध्दे सापडले ते ठिकाण पाहायला जावे. सरळ टेराकोटा योध्देच बघायला जाणे थोडे धक्कादायक होऊ शकते. टेराकोटा सेना  आधुनिक काळातील उत्खननात टेराकोटा सेनेचे उत्खनन हे खूपच, जवळपास सर्वात महत्वाचे उत्खनन आहे. काय आहे ही टेराकोटा सेना आणि ती कशी सापडली? आपण ते नंतर बघू या. आधी मी म्हटले तसे बाँपो संग्रहालय बघायला जाऊ या.  बाँपो म्युझियम  चीन मधील शान्क्सि भागात बाँपो म्युझियम आहे. शियान शहराजवळच्या एका प्रागैतिहासिक उत्खनन स्थळाजवळ हे म्युझियम उभारलेले आहे. ६००० वर्षांपूर्वीच्या खेड्यातील जीवन कसे असेल ह्याची झलक आपल्याला इथे पाहायला मिळते. प्रदर्शन कक्षात उत्खननात सापडलेल्या अनेक कलाकृती पाहायला मिळतात.  बाँपो येथे सापडलेली चित्राकृती बाँपो येथे सापडलेली ही एक चित्राकृती. ह्या चित्रात मासे, माणूस आणि डोंगर दाखवला आहे. चित्रलिपीतील काही अक्षरे दगडावर किंवा एखाद्या खापरावर को...