बुसान बघताना सर्वात आधी एक गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे जरी स्पेलिंग Busan असे असले तरी त्याचा उच्चार पुसान असा होतो! पुसान हे दक्षिण कोरियामधील एक अत्यंत प्रगत आणि प्रभावी शहर आहे. इथे होणारे विविध फेस्टिवल्स आणि कॉन्फेरन्सेस ह्यासाठी पुसान प्रसिद्ध आहे. आशियामधील #MICE ( meetings, incentives, Conferences and exhibitions) हब सिटी होण्यासाठी कसून प्रयत्न करत आहे. तुम्हाला २००२ चे आशियाई खेळ स्पर्धा आणि फिफा विश्वचषक आठवत असेलच. पुसान मध्ये दर वर्षी, वर्षभर वेगवेगळे फेस्टिवल्स आयोजित केले जात असतात. पुसान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला आशियामध्ये मानाचे स्थान आहे. पुसान हे दक्षिण कोरियामधील सर्वात जास्त आर्थिक उलाढाल होणारे बंदर आहे. जगातील कोणत्याही आधुनिक आणि प्रगत शहरात असतील त्या सर्व व्यवस्था आणि सुविधा इथे उपलब्ध आहेत. तंत्रज्ञानातील प्रगती आणि चमत्कार दाखवणारे उड्डाण पूल आणि उंचच उंच इमारती विपुल प्रमाणात दिसतात. आम्ही दक्षिण कोरियातील ज्येजू बेटावरून पुसानला जाण्यासाठी सकाळचे विमान पकडले. आधीच आरक्षित केलेली टॅक्सी पुसान विमान...