गेल्या पोस्टमध्ये, आपण होतो दिरांग ला ! तिथला सुप्रसिद्ध, सुंदर सूर्योदय देखील आपण पाहिला होता. निसर्गरम्य दिरांग शहराच्या सौंदर्यामुळे आमच्या अपेक्षा खूपच उंचावल्या होत्या आणि आम्ही उत्सुकतेने से ला पास दिसण्याची वाट पाहत होतो. तिबेटियन भाषेत ला म्हणजे पास. त्यामुळे खरे तर नुसते से ला म्हणणे पुरेसे आहे! मात्र ह्याचा उल्लेख सर्वत्र से ला पास असाच केलेला आढळतो. अरुणाचल मधील वाहन जाण्याजोग्या सर्वात उंच रस्त्यांपैकी हा एक रस्ता असल्याने, तुमचा प्रवास खूपच रोमहर्षक होतो. तवांग ला बाकी भारताशी जोडणारा हा एकमेव रस्ता असल्याने संरक्षणाच्या तसेच दळणवळणाच्या दृष्टीने हा रस्ता खूपच महत्वाचा आहे. समुद्रसपाटीपासून अंदाजे 13,700 फूट उंचीवर, आपण अरुणाचलच्या पश्चिम कामेंग जिल्ह्यातील दिरांग आणि तवांग दरम्यानच्या हिमालय पर्वतरांगा ओलांडतो. हवामान थंड असले आणि बर्याच वेळा रस्ता बर्फाच्छादित असला तरी बीआरओ (सीमा रस्ता संस्था) हा रस्ता प्रवासासाठी खुला राहील यासाठी खूप प्रयत्न करते. वर्षाकाठी, फक्त काही वेळा, तुफान बर्फवृष्टीमुळे, मुसळधार पाऊस पडल्याने किंवा ...
'सिल्व्हर व्हेगन ट्रॅव्हल्स' सोबत अनुभवा जगभराची सांस्कृतिक सफर. प्राचीन मंदिरे, निसर्गरम्य ठिकाणे आणि प्रवासात व्हेगन जीवनशैली जपण्याचे रंजक अनुभव.