नाशिक (महाराष्ट्र राज्य, भारत) आणि नाशिकच्या परिसरात बरीच पर्यटन स्थळे आहेत. त्यापैकी काही स्थळांना धार्मिक महत्त्व आहे, काही ट्रेकिंगसाठी प्रसिद्ध आहेत, काही प्राचीन मूर्ती आणि मंदिर रचनेसाठी प्रसिद्ध आहेत तर काही वाईनरीज आहेत. पण अशी एक जागा आहे जिथे यापैकी एकही गोष्ट नाही आणि तरीही संपूर्ण भारतातील लोकांना तेथे जाण्याची इच्छा असते. त्या स्थळाचे नाव आहे भगूर! भगूर हे नाशिक जवळ दारणा नदीकाठी वसलेले एक छोटेसे गाव आहे. नाशिक शहरापासून ते १७-१८ कि.मी. अंतरावर आहे. नाशिक रोड रेल्वे स्थानकापासून ते ८ कि.मी. अंतरावर आहे. जर आपण नाशिकहून जात असाल तर आपल्याला देवळाली लष्करी भागातील सुंदर परिसर ओलांडून जावे लागेल. स्वच्छ आणि सुंदर, उत्तम देखभाल केलेल्या बागा आणि इमारती आणि खूप मोठमोठे, शतकभराचे जुने वृक्ष ह्यामुळे हा रस्ता नक्कीच संस्मरणीय होतो. मला खात्री आहे की आपणा सर्वांना भगूर बद्दल माहिती असेल आणि प्रत्येक भारतीयाला भगूरला भेट द्यावीशी का वाटते ते देखील माहिती असेल. भगूर हे महान स्वातंत्र्यसेनानी, लेखक, कवी, सामाजि...