समुद्रसपाटीपासून 7200 फूट उंचीवर असलेले कोडाईकनाल हे भारतातील एक उत्कृष्ट हिल स्टेशन आहे. याला 'प्रिंसेस ऑफ हिल स्टेशन' आणि 'गिफ्ट ऑफ फॉरेस्ट' म्हणून देखील ओळखले जाते. हे तामिळनाडूच्या दिंडी गुल जिल्ह्यात आहे आणि त्याच्या सभोवताली पलानी पर्वत रांगा आहेत. पलानी पर्वतरांगाचे मूळ रहिवासी म्हणजे पलिआन भटक्या जमाती, जे शिकारी होते आणि मध, औषधी वनस्पती इत्यादी जंगलात सापडणाऱ्या वस्तू गोळा करणारी जमात होती. तामिळ संगम साहित्य म्हणून ओळखल्या जाणार्या प्राचीन तामिळ साहित्यात, कोडाईकनालचे संदर्भ आढळतात. कोडाईकनाल म्हणजे धुके किंवा दाट धुके, रमणीय भूप्रदेश आणि आनंददायी हवामान! तेथे अनेक ठिकाणे आणि स्पॉट्स असे आहेत, जिथे पर्यटक म्हणून आपण नक्की भेट द्यायला हवी.आपल्या सहलीत आपण ते सगळे बघावे अशी धडपडदेखील कराल. पण मी सांगते की वाटेतले कोणतेही ठिकाण देखील तितकेच सुंदर असेल! जरी ते पर्यटन स्थळांच्या यादीत लिहिलेले नसले तरीही! तर आपल्याकडे खासगी वाहन असल्यास, जेव्हा आणि जिथे वाटेल तिथे थांबा आणि मनसोक्त फोटोज घ्या! फोटो घेऊन झाले की मग शांतपणे ते सौ...