Skip to main content

Posts

Showing posts from October, 2020

Jeju- Seogwipo city- Canola Flowers

Yellow denotes brightness. Yellow denotes happiness. Yellow denotes positivity. Yellow denotes sunshine. Yellow denotes spring. Last week we have celebrated Vijaydashami in India and tied fresh Marigold strings to the entrance of our home. The vibrant Yellow and Saffron Orange color of Marigold is very energetic. That yellow reminded me of some place where I could see the beautiful Yellow as far as my eyes could reach.  The place was the Jeju Island of South Korea. South Korea is blessed with stunningly beautiful nature's wonders. Jeju is the Crowning glory of South Korea's natural wonders.  Jeju had various names in the past. The Gods own country, Korea's Hawaii. But the most appropriate was Samdado which means that it has three things in abundance. Which are those three things? Rock, Wind and Women.  Being a volcanic island, you can see Basalt rocks everywhere in Jeju. Jeju being an isolated island in the sea, has to face unusually strong winds through out the year. It ...

ज्येजू - Seogwipo city- कॅनोलाची फुले

पिवळा रंग म्हणजे तेज. पिवळा रंग म्हणजे आनंद. पिवळा रंग म्हणजे सकारात्मकता. पिवळा रंग म्हणजे सूर्यप्रकाश. पिवळा रंग म्हणजे वसंत ऋतू! गेल्या आठवड्यात भारतात आम्ही विजयादशमी साजरी केली. दारांना झेंडूच्या माळा बांधल्या. झेंडूचा तो झळाळता पिवळा आणि केशरी रंग खूपच ऊर्जा देणारा आहे. त्या पिवळ्या रंगाने मला आठवण झाली ती एका ठिकाणाची. असे ठिकाण की जिथे नजर पोचेल तिथपर्यंत, मला असा सुंदर ऊर्जादायी पिवळा रंग दिसला होता.  ते ठिकाण होते दक्षिण कोरियामधील ज्येजू बेट. दक्षिण कोरियाला अपार नैसर्गिक सौंदर्याचे वरदान लाभलेले आहे आणि ज्येजू तर जणू त्या नैसर्गिक सौंदर्याचा मुकुटमणीच! पूर्वी ज्येजू अनेक नावानी ओळखले जात असे. देवांची भूमी, कोरियाचे हवाई अशी अनेक नावे. त्यातील सर्वात योग्य नाव होते समदादो. समदादो म्हणजे तीन गोष्टी विपुल प्रमाणात असणारे बेट. कोणत्या होत्या त्या तीन गोष्टी? तर खडक, वारा आणि स्त्रिया.    ज्वालामुखीच्या मुळे बनलेले बेट असल्याने सर्वत्र बसाल्ट खडक दिसतो. समुद्रात असलेले स्वतंत्र बेट आहे, त्यामुळे चहुबाजूनी वारा वर्षभर घोंघावत असतो. त्या...

बृहदेश्वर मंदिर - चोला वास्तुशास्त्राचा उत्कृष्ट नमुना

आज आपण बृहदेश्वर ला जाणार आहोत. जगातील सर्वात मोठ्या शिवलिंगांपैकी एक, असे शिवलिंग ज्या मंदिरात आहे, ते हे मंदिर! ज्याचे शिखर (विमान) जगातील सर्वात उंच मंदिर शिखरांपैकी एक आहे, असे हे मंदिर! गोपुर आणि विमान ह्या दोन संकल्पनांमध्ये गोंधळ होऊ देऊ नका. गोपुर हे प्रवेशद्वारावर असते तर विमान /शिखर हे गर्भगृहावर असते. अनेक वर्षे बृहदेश्वरचे शिखरच जगातील सर्वात उंच शिखर होते. पण नव्यानेच बांधलेले वाराणसीमधील मंदिर आणि अजून जे बांधून होते आहे असे वृन्दावनमधील कृष्णाचे मंदिर ही दोन मंदिरे आता जगातील सर्वात उंच शिखर/विमान असणारी मंदिरे आहेत.   कुठे आहे हे बृहदेश्वर? तामिळनाडूमधील तंजावर मध्ये हे मंदिर आहे. हो.. बरोबर! तेच हे तंजावर, जे कावेरी नदीच्या तीरावर आहे, जिथे छत्रपती शिवाजी महाराजांचे सावत्र बंधू एकोजी राजे सतराव्या शतकात राज्य करत होते आणि नंतर त्यांचे वंशज जिथे राज्य करीत होते. तेच हे तंजावर, जिथे विविध विषयांवरील हजारोंच्या संख्येने दुर्मिळ पुस्तके असलेले विश्व विख्यात सरस्वती महाल वाचनालय आहे. हे तेच तंजावर, जे तंजावर शैलीतील चित्रांसाठी प्रसिद्ध आहे. तेच हे तंजावर जिथे भरतन...