Skip to main content

Posts

Showing posts from 2024

देवरियाताल चंद्रशिला ट्रेक - भाग 5- अंतिम भाग - बनियाकुंड- तुंगनाथ- चंद्रशिला

  📷Samrat Darda १५ एप्रिल, बनियाकुंड कॅम्पसाईट मधून काढलेला चंद्राचा सुंदर फोटो. त्या दिवशी शुक्ल पक्षातील सप्तमी किंवा अष्टमी असावी. कारण १७ एप्रिलला रामनवमी होती. सुंदर काळ्याभोर रात्रीचा सघन अंधार.. पौर्णिमा अजून साताठ दिवसांवर असली तरीही आत्तापासूनच तेजाळलेला चंद्र.. चमचमणारे, मध्येच ढगांच्या आड लपणारे चांदणे, आमच्या मनातील समिटविषयीची उत्सुकता..फार अनोखी रात्र होती ती.  उद्या पहाटे दोन वाजताचा वेकप कॉल असणार होता. आम्हाला आवरून, ब्रेकफास्ट करून तीन वाजता निघायचे होते. न विसरता घेण्याच्या गोष्टी तशा तर डे पॅक मध्ये भरूनच ठेवल्या होत्या. हेडलॅम्पच्या उजेडात सामान देखील आवरून ठेवले होते. पहाटे निघताना बाकी सामान मेन टेन्ट मध्ये नेऊन ठेवायचे होते.  इतक्या उंचीवर जायचे होते. काही तासांत आम्ही ४००० फुटांचा अल्टीट्युड गेन करणार होतो. झोपण्यासाठी डोळे मिटले खरे, पण मिटल्या डोळ्यांपुढेही बर्फाच्छादित शिखरांचीच दृश्ये तरळत होती. कधीतरी झोप लागली. सतत अधूनमधून जाग येऊन घड्याळात बघत होते. सगळे दोन वाजता उठणार, त्या आधी आपण आपले आवरून घेऊ या असा विचार डोक्यात होता तो बहुधा सतत जाग आणत असावा!!

Deoriatal Chandrashila trek - Part 5(Last part)- Baniyakund - Tungnath- Chandrashila

📷Samrat Darda A beautiful photograph of the moon taken from Baniyakund campsite, April 15. That day should be Saptami or Ashtami of Shukla Paksha. Because Ram Navami was on 17th April. In the intense and tranquil darkness of the beautiful night, though the full moon day was still seven or eight days away, the moon was already bright. The shining moon, occasionally hiding behind the clouds, the curiosity of the summit in our minds.. it was a very unique night. There was going to be a two o'clock wakeup call tomorrow.  we had to pack up, have breakfast, and be ready to leave for the day at three o'clock.  I packed the essential things in the day pack and packed everything else in the bag to be offloaded. That bag was to kept in the main tent while leaving in the morning. Tomorrow, in few hours we would gain an altitude of 4000 ft. I closed my eyes to sleep, but even before my closed eyes, the images of the snow-capped peaks were floating.  I woke up at quarter to two in the mo