Lahaina Banyan tree Lahaina Banyan tree Lahaina Banyan tree Lahaina Banyan tree Ficus Benghalensis, मराठीत ह्याला आपण वड म्हणतो, ह्या वृक्षाचा विस्तार प्रचंड होऊ शकतो. ह्या फोटोतील वडाचे झाड आहे अमेरिकेतील हवाई बेट समूहातील माउई मधील लहाईना ह्या गावातील. भारतातील मिशनऱ्यांनी भेट दिलेले हे झाड १८७३ मध्ये इथे लावले गेले. सप्टेंबर २०२२ मध्ये जेव्हा आम्ही लहाईनाला गेलो तेव्हा दीडशे वर्ष वय असलेल्या ह्या झाडाचा विस्तार होता साधारण ४०० मीटरपेक्षा देखील जास्त आणि उंची होती जवळपास ६० फुटा! हवाईमधील हा सर्वात मोठा वृक्ष तर आहेच पण अमेरिकेतील सर्वात मोठ्या वृक्षांपैकी एक आहे. वडाच्या खाली झेपावणाऱ्या शेकडो पारंब्या, त्याचे कधी एकमेकांत गुंतून झालेले जाळे, तर कधी अगदी कोवळी लवलवती टोकेसगळे लक्ष खिळवून ठेवणारे असेच होते. त्यातील कितीतरी पारंब्या जमिनीत रुजून पुन्हा त्याचे मोठे वृक्ष झालेले आहेत. ह्या झाडाला, ह्या परिसराला भेट देणे हा एक विलक्षण अनुभव होता. लहाईना गाव ज्या हवेसाठी प्रसिद्ध आहे ती गरम हवा, कडक ऊन ह्या वृक्षाखाली येताच अगदी मवाळ होऊन जाते. सुखद थंडावा अनुभवाला येतो. जमिनीव...