Skip to main content

Posts

Showing posts from June, 2021

Raigad- Capital of Hindavi Swarajya

Raigad! The emotions that occupy our mind when we hear this name are extraordinarily unique and indescribable. Today is 'Jyestha Shuddha Trayodashi' means 'Shiva Rajyabhishek Din', 'Hindu Samrajya Din'. A day of pride, a day of glory. Indian history is one of struggle and victory. The bright, golden page that shines in it, is the life and work of Chatrapati Shivaji Maharaj! The tireless work of Shivaji Maharaj and his comrades reached its culmination on the day of Jyeshtha Shuddha Trayodashi, 1674. It was not just a coronation. It was not just an official announcement of the establishment of Hindavi Swarajya. It was an unprecedented invention, a result of combination of the power of noble minded people which was awakened by the teachings of the saints and the bravery and fortitude rekindled in the minds of the Mavalas, people of Maharashtra.  The coronation was not Shivaji Maharaj's personal ambition. The vow taken as a child at Rohideshwar was fulfilled w

हिंदवी स्वराज्याची राजधानी - किल्ले रायगड

 रायगड! हे नाव घेताच मनात उठणारे भावतरंग अवर्णनीय असेच असतात. आज ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी म्हणजे 'शिव राज्याभिषेक दिन', 'हिंदू साम्राज्य दिन'. अभिमानाचा, गौरवाचा दिवस. भारतीय इतिहास हा संघर्षाचा व विजयाचा आहे. त्यातील झळाळून उठणारे तेजस्वी, सोनेरी पान म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व! शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे अविश्रांत परिश्रम पूर्णत्वाला पोचले ते ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी, १६७४ ह्या दिवशी. हा केवळ राज्याभिषेक नव्हता. हिंदवी स्वराज्याची स्थापना झाल्याची केवळ अधिकृत घोषणा नव्हती. तर संतांच्या उपदेशांनी जागलेली सज्जन शक्ती, मावळ्यांच्या रूपातील सामान्य जनतेच्या मनात जागलेली वीरवृत्ती ह्यांच्या संगमाने घडलेला तो एक अभूतपूर्व अविष्कार होता.  राज्याभिषेक ही शिवाजी महाराजांची व्यक्तिगत महत्वाकांक्षा नव्हती. रोहिडेश्वर येथे लहानपणी घेतलेली प्रतिज्ञा अथक प्रयत्नांनी पूर्ण झाली होती. "हे हिंदवी स्वराज्य व्हावे हे तो श्रींची इच्छा" हे वचन सार्थ झाले होते. पण राज्याभिषेकाच्या निमित्ताने शिवाजीमहाराजांनी मोठ्या युक्तीने त्यांच्यावर असलेली लोकांची निष्ठा