Skip to main content

Posts

Showing posts from December, 2020

Merta- Meerabai's residence and Nagaur Fort

  Geetajayanti was celebrated on 25 th Dec. 2020. It's an unique example in the world, where birthday of a book is celebrated. When the Krishna devotion is in the air, I would like to write about Lord Krishna's great devotee Meerabai's native place.  The Great poetess and Krishna's devotee Meerabai's native place is Merta in Rajasthan. Her birthplace is a small village near Merta and she stayed in Merta for first few years of her life.  Young Meerabai Raja Ravi Varma's painting 📷 wikipedia Merta is situated in Nagaur District of Rajasthan in India. It is near to Pushkar. Pushkar is famous for the Pushkar lake and Bramha mandir. You can take a day tour from Pushkar to Merta and Nagaur. Merta is only 61 km from Pushkar. Merta -Jodhpur distance is 125 km and Merta Jaipur distance is 210 km.  We had visited Merta while going to Bikaner from Pushkar by road. The roads in Rajasthan are really good. There will be occasional sightings of Nilgais on the highways in Raja

मेडता - मीराबाईंचे निवासस्थान आणि नागौर किल्ला 

गीताजयंती नुकतीच म्हणजे 25 डिसेंबर 2020 रोजी साजरी केली गेली. जगातील हे एकमेव आणि अनोखे उदाहरण आहे, जिथे एका पुस्तकाचा वाढदिवस इतक्या मोठ्या प्रमाणावर साजरा केला जातो. सध्या वातावरणात सगळीकडे कृष्ण भक्ती आहे, तेव्हा मला भगवान कृष्णाच्या महान भक्त संत मीराबाईंच्या गावाबद्दल, घराबद्दल लिहायला आवडेल.  महान कवी व कृष्णभक्त असलेल्या संत मीराबाई यांचे मूळ ठिकाण राजस्थानमधील मेडता हे आहे. त्यांचे जन्मस्थान हे मेडता जवळील एक छोटेसे गाव आहे आणि बालपणी त्या मेडता येथे राहिल्या होत्या.  Young Meerabai Raja Ravi Varma's painting 📷 wikipedia मेडता हे गाव भारतातील राजस्थान राज्याच्या नागौर जिल्ह्यात आहे. हे गाव पुष्कर जवळ आहे. पुष्कर हे ठिकाण पुष्कर तलाव आणि ब्रम्हा मंदिरासाठी प्रसिद्ध आहेत. आपण पुष्करहुन मेडता आणि नागौर ची एक दिवसाची ट्रिप करू शकतो. पुष्करपासून मेडता फक्त ६१ कि. मी. अंतरावर आहे. मेड़ता- जोधपूर हे अंतर १२५ कि.मी. आणि मेडता जयपूर हे अंतर २१० कि. मी. आहे. पुष्करहून बिकानेरला जाताना आम्ही मेडता येथे गेलो होतो. राजस्थानमधील रस्ते खरोखर चांगले आहेत. राजस्थानमधील महामार्गांवर अधुनमधू

चेरापुंजी की सोहरा??? ते सोहराच आहे!

  रिकाम्या  जागा भरा, जोड्या लावा , एका वाक्यात उत्तर द्या, कारण सांगा.. आपण शाळेच्या प्रश्नपत्रिकेतील, ह्यातील प्रत्येक प्रकारच्या  प्रश्नाचे नाव घेतले  की  आपल्याला आठवेल, भारतात सर्वात जास्त पाऊस पडणाऱ्या  जागेबद्दल प्रश्न होता. उत्तर नक्कीच चेरापुंजी होते. चेरापुंजीला  एका महिन्यात सर्वाधिक पाऊस पडण्याचा गिनीज रेकॉर्ड आहे. जुलै 1861 मध्ये चेरापुंजीला एका महिन्यात 30.5 फूट पाऊस पडला!!!! ह्यामुळे चेरापुंजी गावाचे नाव  - पृथ्वीवरील सर्वात जास्त ओली  जागा असे पडले . परंतु सध्या सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाण आहे जवळचेच Mawsynram  नावाचे गाव.  म्हणूनच आता हे ठिकाण सर्वाधिक पाऊस पडणारे ठिकाणही नाही आणि त्या गावाचे आता चेरापूंजी असे नावदेखील नाही!! आता त्याला 'सोहरा' असे म्हणतात, जे खरे तर त्या गावाचे मूळ नाव आहे. मूळ नाव सोहरापूनजी होते, जे ब्रिटिश राज्यकर्ते उच्चारू शकत नव्हते आणि म्हणूनच त्यांनी त्याला चेरापुंजी म्हटले. या जागेचे मूळ नाव पुन्हा ठेवले जावे म्हणून, भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही, अनेक वर्षे स्थानिक लोकांना प्रयत्न करावे लागले. 2007 मध्ये मेघालय सरकारने ठरविले की