Skip to main content

Posts

Showing posts from January, 2024

ग्यानबोक पॅलेस, सेऊल, साऊथ कोरिया

राष्ट्रीय अस्मितेची चिन्हे परकीय आक्रमक पुसून टाकायचा प्रयत्न करतात, करतातच. जगभर अशी असंख्य उदाहरणे सापडतील. कारण त्याशिवाय त्यांना त्यांची सत्ता निर्माण करता येणार नसते. पण मग त्या त्या देशातील, देशावर प्रेम असणारे लोक काय करतात हे जाणून घ्यायचे असेल तर एक उदाहरण सांगते. आपल्याला सेऊल मधील ग्यानबोक  पॅलेस याच्याविषयी वाचायला हवे. ------------- तसा पोचायला आम्हाला थोडा उशीरच झाला होता. शेवटची इंग्लिश गाईडेड टूर चुकते की काय अशी भीती वाटायला लागली होती. अनेक कोरियन युवक युवती राजवाड्याकडे जाताना दिसत होते. विशेष म्हणजे त्यांनी पारंपरिक कोरियन पोशाख घातले होते. फार छान दिसत होते ते सगळे. आम्ही गेलो होतो, कोरियाच्या सार्वभौमत्वाचे मानचिन्ह असलेल्या ग्यानबोक पॅलेसला ( Gyeongbok Palace ) भेट देण्यासाठी.  तिकिटाच्या काउंटर जवळच राजवाड्याचे मुख्य प्रवेशद्वार आहे. त्याचे नाव आहे ग्वान्गमन गेट.( Gwanghwamun) . सेऊलच्या पुरातन इतिहासाचे प्रतीक असलेले हे प्रवेशद्वार १३९५ मध्ये बांधले गेले आहे. आज हे प्रवेशद्वार कोरियाची ओळख बनलेले आ...