प्रत्येक शहरात अशी काही ठिकाणे असतात की जिथला पत्ता सांगणे अत्यंत प्रतिष्ठेचे मानले जाते. असाच एक पत्ता म्हणजे दक्षिण मुंबईची जणू रक्तवाहिनी असलेला पेडर रोड. श्रीमंत उद्योजक, गुणवान आणि ऐश्वर्यसंपन्न कलावंत यांची निवासस्थाने असलेला पेडर रोड. ज्या रस्त्यावरून प्रतिदिनी लाखो वाहने जात असतात असा पेडर रोड. असे म्हटले जायचे की ह्या रस्त्याला लागण्यापूर्वी महालक्ष्मी मंदिरात लक्ष्मीचे दर्शन घ्यायचे आणि नंतर ह्या रस्त्यावरच्या मंगेशकरांच्या प्रभुकुंज मध्ये गानसरस्वती लता मंगेशकरांचे दर्शन घ्यायचे! त्याच रस्त्यावर लक्ष्मी ज्यांच्यावर प्रसन्न आहे असे अनेक लक्ष्मीपुत्र राहतात. नावेच घ्यायची झाली तर जिंदाल आहेत, अंबानी आहेत. अशा सुप्रसिद्ध, सुप्रतिष्ठित पेडर रोडच्या मुगुटातला हिरवा पाचू म्हणजे गुलशन महाल आणि त्याच्या आजूबाजूची हिरवाई. गुलशनमहाल मोठाले वृक्ष, त्यांच्याभोवती बांधलेले पार, त्या शीतल सावलीत बसण्यासाठी कोणालाही मोहात पडतील. गर्द सभोवती ... गुलशन महाल ह्या इमारतीचे पूर्वीचे नाव होते गुलशन आबाद - गुलशनाबाद. एकोणिसाव्या शतकाच्या मध्यावर बांधला गे...